(मा. अध्यक्ष,श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून दोन बचत खात्यावरील एकूण रक्कम रु.6,48,304/- मिळावेत व या रकमेवर सन 2006 पासून मुदतठेवीएवढे व्याज मिळावे, तसेच प्रत्यक्ष रक्कम वसुल होईपावेतो 15 टक्के प्रमाणे व्याज मिळावे, तसेच एकूण चार मुदतठेवीचे पावत्यावरील एकूण रक्कम रु.40,156/- मिळावेत व या रकमेवर सन जानेवारी 2008 पासून मुदतठेवीएवढे व्याज मिळावे तसेच प्रत्यक्ष रक्कम वसूल होईपावेतो 15 टक्के प्रमाणे व्याज मिळावे, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
याकामी सामनेवाले क्र.3 ते 13 यांनी पान क्र.35 लगत लेखी म्हणणे व पान क्र.36 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी पान क्र.29 लगत लेखी म्हणणे सादर केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-- होय सामनेवाले क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.
3. अर्जदार हे सामनेवाले क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांचेकडून ठेवपावत्यांवरील व बचत खात्यावरील संपुर्ण रक्कम व्याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय
4. अर्जदार हे सामनेवाले क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय ---होय
5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे व अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.3 ते 13 विरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार यांचेवतीने अँड.ए.व्ही.गर्गे यांनी युक्तीवाद केलेला आहे व अर्जदार यांनी पान क्र.49 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. तसेच सामनेवाला यांचेवतीने अँड.एन.एच.लाहोटी यांनी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांनी याकामी पान क्र.44,पान क्र.45,पान क्र.46 व पान क्र.47 लगत एकूण चार मुळ अस्सल ठेवपावत्या हजर केलेल्या आहेत व पान क्र.42 व पान क्र.43 लगत दोन बचत खाते पुस्तके हजर केलेली आहेत. ही कागदपत्रे सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेली नाहीत. अर्जदार यांचा तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील कथन तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व वरील सर्व कागदपत्रे यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.3 ते 13 त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक दि.23/3/2006 पासून करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 83 व कलम 88 प्रमाणे सामनेवाला यांचेविरुध्द जबाबदारी निश्चीत करण्यात आलेली नाही त्यामुळे सामनेवाला क्र.3 ते 13 विरुध्द तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
याबाबत सामनेवाला यांनी 2011(3) ऑल महाराष्ट्र रिपोर्टर. मुंबई उच्चन्यायालय. औरंगाबाद खंडपीठ. पान 88. सौ.वर्षा रविंद्र इसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी व इतर. हे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र दाखल केलेले आहे.
सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत सामनेवाला क्र.2 हे पतसंस्थेचे प्रशासक आहेत. सामनेवाला क्र.1 व्यवस्थापक व सामनेवाला क्र.3 ते 13 यांना महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 88 नुसार जबाबदार धरलेले आहे व तसा अहवाल तयार झालेला आहे याबाबत कोणतेही कागदपत्र मंचासमोर दाखल झालेली नाहीत. याचा विचार होता व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 व्यवस्थापक व सामनेवाला क्र.3 ते 13 यांचेविरुध्द चालण्यास पात्र नाही असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला 1 व 2 यांनी पान क्र.29 लगत लेखी म्हणणे दाखल केलेले आहे व त्यासोबत कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या लेखी म्हणण्याचा व कागदपत्रांचा विचार होता सामनेवाला क्र.2 यांची अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्था यांचेवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे हे स्पष्ट होत आहे. कर्जाऊ रकमेची वसुली करणे व ठेवीदारांच्या रकमा परत करणे याची जबाबदारी प्रशासक म्हणून सामनेवाला नं.2 यांचेवर आहे. अर्जदार याचेकडून पान क्र.6 नुसार दि.11/01/2011 रोजीची नोटीस सामनेवाला क्र.1 व 2 यांना पान क्र.7 ते 11 चे पोष्टाचे पावतीप्रमाणे मिळाले नंतरही अर्जदार यांचे ठेवपावतीवरील व बचत खात्यावरील संपुर्ण रक्कम व्याजासह सामनेवाला क्र.2 प्रशासक यांनी परत केलेली नाही. यामुळे सामनेवाला क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचेवतीने मा.राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांचेसमोरील रिव्हीजन पिटीशन क्र.2528/2006 निकाल तारीख 24/7/2008 रिझर्व बँक ऑफ इंडिया वि. ईश्वरअप्पा. या वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
पान क्र.44, पान क्र.45, पान क्र.46 व पान क्र.47 लगत एकूण चार मुळ अस्सल ठेवपावत्या हजर केलेल्या आहेत व पान क्र.42 व पान क्र.43 लगत दोन बचत खाते पुस्तके हजर केलेली आहेत. या कागदपत्रांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांचेकडून ठेवपावत्यावरील संपुर्ण रक्कम व्याजासह व दोन्ही बचत खात्यावरील संपुर्ण रक्कम व्याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांनी अर्जदार यांना एकूण चार ठेवपावत्यांवरील संपूर्ण रक्कम व्याजासह व दोन बचत खात्यावरील संपुर्ण रक्कम व्याजासह परत केलेली नाही. सामनेवाला यांचेकडून रक्कम परत मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवालाविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. सामनेवाला यांचे कृत्यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला आहे. याचा विचार होता अर्जदार क्र.1 व 2 हे एकत्रितरित्या सामनेवाला क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- अशी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे,वकिलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद, वर उल्लेख केलेले व आधार घेतलेले वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.3 ते 13 विरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
3) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला क्र.1 पतसंस्था व सामनेवाला क्र.2 प्रशासक यांनी अर्जदार क्र.1 व 2 यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यातः
अ. अर्जदार क्र.1 व 2 यांना ठेवपावती क्र.020802 या ठेवपावतीवरील रक्कम
रु.10,039/- द्यावेत व या रकमेवर दि.03/12/2007 पासून पासून संपूर्ण
रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज दयावे.
ब. अर्जदार क्र.1 व 2 यांना ठेवपावती क्र.020900 या ठेवपावतीवरील रक्कम
रु.10,039/-द्यावेत व या रकमेवर दि.02/01/2008 पासून पासून संपूर्ण
रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज दयावे.
क. अर्जदार क्र.1 व 2 यांना ठेवपावती क्र.020803 या ठेवपावतीवरील रक्कम
रु.10,039/- द्यावेत व या रकमेवर दि.03/12/2007 पासून पासून संपूर्ण
रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज दयावे.
ड. अर्जदार क्र.1 व 2 यांना ठेवपावती क्र.020901 या ठेवपावतीवरील रक्कम
रु.10,039/- द्यावेत व या रकमेवर दि.02/01/2008 पासून पासून संपूर्ण
रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज दयावे.
इ. अर्जदार क्र.1 व 2 यांना बचत खाते क्र.102339 या वरील रक्कम
रु.5,58,543/- द्यावेत व या रकमेवर दि.14/03/2010 पासून पासून
संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.6% दराने व्याज दयावे.
ई. अर्जदार क्र.2 यांना बचत खाते क्र.102929 या वरील रक्कम
रु.89,761/- द्यावेत व या रकमेवर दि.14/03/2010 पासून पासून संपूर्ण
रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.6% दराने व्याज दयावे.
4) अर्जदार क्र.1 व क्र.2 यांना एकत्रितरित्या मानसिक त्रासापोटी रु.15,000/- द्यावेत.
5) अर्जदार क्र.1 व क्र. 2 यांना एकत्रितरित्या तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- द्यावेत.
6) वर कलम 3(अ) ते 3(ई) मध्ये देय रकमेपैकी काही रक्कम सामनेवाला यांनी अर्जदार यांना यापुर्वी अदा केली असल्यास त्याची वजावट वरील देय रकमेमधून करावी.