जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन.
--------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १८३/२०११
तक्रार दाखल दिनांक – १४/०९/२०११ तक्रार निकाली दिनांक – ३०/०१/२०१३
१. परेश संजय जैन
वय १५, धंदा – शिक्षण
२. कु. भाग्यश्री संजय जैन
वय १३, धंदा – शिक्षण
तर्फे अ.पा.क. म्हणुन संजय नेमीचंद जैन
वय सज्ञान धंदा – व्यापार
३. सौ. संगीता संजय जैन
वय सज्ञान धंदा – घरकाम
रा. दोंडाईचा ता. शिंदखेडा जि.धुळे. ............तक्रारदार
विरुध्द
अवसायक
श्री.अग्रसेन सह.पतसंस्था मर्या., धुळे चे समन्स
पुर्ती बिल्डींग, आग्रारोड, धुळे. ..........विरुध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे –अॅड.एन.पी. आयाचीत)
(विरुध्दपक्ष तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
सौ.एस.एस.जैन, सदस्याः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती व पेन्शन ठेव योजना अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष श्री.अग्रसेन सह.पतसंस्था मर्या., धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व पेन्शन ठेव योजना अन्वये रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
ठेव पावती क्र. |
ठेव रक्कम |
ठेव दिनांक |
देय रक्कम |
मुदत |
व्याज |
देय दिनांक |
०१६५९० |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९१ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९२ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९३ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९४ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९५ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
पेन्शन ठेव योजना खाते नं.१३१० दि.१०.०१.२००७ अखेर रू.२२,२००/- |
३. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती व पेन्शन ठेव योजने तील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
४. विरुध्द पक्ष यांना नोटीसीची बजावणी होऊनही ते हजर झाले नाहीत व खुलासाही दाखल केला नाही त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आले आहेत.
५. तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे व युक्तीवाद यांचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावत्या व पेन्शन ठेव योजना खात्याची झेरॉक्स प्रती सादर केलेल्या आहेत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावतींची व पेन्शन ठेव योजनेची रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावती व पेन्शन ठेव योजनेतील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत व पेन्शन ठेव योजनेत रकमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावतीत व पेन्शन ठेव योजनेत गुंतवलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३ - तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतीतील व पेन्शन ठेव योजनेची व्याजासह होणारी रक्कम श्री.अग्रसेन सह.पतसंस्था मर्या., धुळे यांचेकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे.
९. तक्रारदार हे विरुध्द पक्ष श्री.अग्रसेन सह.पतसंस्था मर्या., धुळे यांचेकडून मुदत ठेव पावती व पेन्शन ठेव योजने मधील व्याजासह होणारी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना श्री.अग्रसेन सह.पतसंस्था मर्या., धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे श्री.अग्रसेन सह.पतसंस्था मर्या., धुळे यांच्या कडून अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.१०००/- व मानसिक त्रासापोटी रु.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
१०. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. श्री.अग्रसेन सह.पतसंस्था मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना खालील नमुद तपशीलाप्रमाणे मुदत ठेव पावती व पेन्शन ठेव योजनेची मुदतअंती देय रक्कम व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
ठेव पावती क्र. |
ठेव रक्कम |
ठेव दिनांक |
देय रक्कम |
मुदत |
व्याज |
देय दिनांक |
०१६५९० |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९१ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९२ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९३ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९४ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
०१६५९५ |
२०,०००/- |
२२.०१.२००५ |
४०,०००/- |
७६ महीने |
११% |
२२/०५/२०११ |
पेन्शन ठेव योजना खाते नं.१३१० दि.१०.०१.२००७ अखेर रू.२२,२००/- |
३. श्री.अग्रसेन सह.पतसंस्था मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास अथवा त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस.जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.