जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 587/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 31/05/2010
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 01/04/2014
1. श्री.प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी व इतर,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
सर्व रा.2 ब, मकरंद कॉलनी, महाबळ कॉलनी मागे,
जळगांव, ता.जि.जळगांव. ........ तक्रारदार
विरुध्द
1. अग्रेसर को ऑप क्रेडीट सोसायटी लि,जळगांव,
ज्योती संजीव खारे, व्यवस्थापक व इतर 3. ..... विरुध्द पक्ष.
कोरम –
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष.
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
--------------------------------------------------
नि.क्र.1 वरीलआदेशव्दाराःश्रीमतीपुनमनि.मलीक, सदस्याः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील माहे मार्च,2012 पासुन नेमलेल्या पुढील तारखांना सतत गैरहजर. तक्रारदाराने माहे मार्च,2012 पासुन तक्रार अर्जाचे कामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. आज रोजी देखील नेमलेल्या तारखेस तक्रारदार व त्यांचे विधिज्ञांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्याची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 13(2)(सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली
काढण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 01/04/2014.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) ( श्री.चंद्रकांत मो.येशीराव) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.