Maharashtra

Nagpur

CC/12/80

Shri Sudhir Nilkanth Rajderkar - Complainant(s)

Versus

Agrawal Express Logistic Pvt. Ltd., Through Manager - Opp.Party(s)

Adv. Anuradha Deshpande

08 Apr 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/80
 
1. Shri Sudhir Nilkanth Rajderkar
C/o. Dr. A.K.Mukherjee, Q-1, Near 8 Rasta Chowk, Laxminagar
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Agrawal Express Logistic Pvt. Ltd., Through Manager
Gulmohar, Plot No. 94-A, Sector 16, Row House - 5 Chikhali Road,
Pune 19
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. AMOGH KALOTI PRESIDENT
 HON'ABLE MR. SATISH DESHMUKH MEMBER
 
PRESENT:Adv. Anuradha Deshpande, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

श्री. सतीश देशमुख, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
 
 
-         आदेश
-          
 (पारित दिनांक – 08/04/2013)
 
1.           ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल सदर तक्रारीचा थोडक्‍यात आशय असा आहे की, तक्रारकर्त्‍याची पुणे येथून नागपूर येथे बदली झाल्‍यामुळे, दि.11.09.2011 रोजी पावती क्र.1112 अन्‍वये 1,000/- अग्रीम रक्‍कम देऊन, 19 बॉक्‍स पॅक केले व 12.09.2011 रोजी रु.21,539/- पावती क्र.1060 नुसार दिले. याच पावतीवर विमाकरीता रक्‍कम दिल्‍याचेही नमूद आहे. वि.प.चे त्‍याचे वाहनाने तक्रारकर्त्‍याचे सामान नागपूरला पाठविले. दि.17.09.2011 रोजी सदर सामान तक्रारकर्त्‍याला प्राप्‍त झाले. प्राप्‍त झालेल्‍या सामानाची तोडफोड झाल्‍याचे व सामान पुन्‍हा पॅक केल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे लक्षात आले. तसेच सामानातील 14 क्रमांकाचे बॉक्‍स नसल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे निदर्शनास आले. याबाबतची तक्रार तक्रारकर्त्‍याने वि.प.कडे केली असता त्‍यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला नविन सामान विकत घ्‍यावे लागले. तक्रारकर्त्‍याचे मते हरविलेल्‍या सामानाची किंमत रु.34,057/- एवढी आहे, जी वि.प.ने दिलेली नाही. करिता तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली व हरविलेल्‍या सामानाची किंमत रु.34,057/- व्‍याजासह मिळावी, विमा रक्‍कम मिळावी, नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशी प्रार्थना केलेली आहे.
 
2.          तक्रारीचे अनूषंगाने वि.प.वर नोटीस बजावण्‍यात आला. नोटीस प्राप्‍त होऊनही वि.प.क्र.1 व 2 ने तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर उपस्थितही झाले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी प्रकरण पुढे चालविण्‍याचा आदेश पारित केला.
 
-निष्‍कर्ष-
 
 
3.          तक्रारकर्त्‍याचे युक्‍तीवादाचे व कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने वि.प.ला रु.18,000/- पावती क्र.1112 चे अनूषंगाने दिलेले होते. पावती क्र. 1111 वर ठोक सामानाची यादी व पावती क्र.1056 मध्‍ये बॉक्‍समध्‍ये कुठले सामान आहे याबाबत विवरण आहे.  एकूण 19 बॉक्‍स असल्‍याची नोंदही त्‍यावर आहे. पावती क्र. 1010 वर तक्रारकर्त्‍याने वि.प.ला रु.21,539/- दिल्‍याची नोंद आहे. त्‍याचप्रमाणे 1069 या कंसाईनमेंट नोटवर, “The Customer has stated that, He has not insured the Consignment. He has insured the Consignment. वर रक्‍कम Amount Rs.50,000/- वर ( ) असे चिन्‍ह अंकित आहे. त्‍यानुसार त्‍यामध्‍ये विम्‍याचे रु.50,000/- असल्‍याचे नमूद होते. तसेच भाडे, सेवा कर इ. बाबत 18000/- + 1500/- + 1864/- + 175/- = 21,539/- घेतले आहे. असे असतांनासुध्‍दा सामानाची तोडफोड झालेली आहे अशी तक्रार तक्रारकर्त्‍याने केल्‍यावरही वि.प.ने विम्‍याची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला दिलेली नाही. मंचाचे मते वि.प.च्‍या सेवेतील ही न्‍यूनता/त्रुटी आहे. मा. राष्‍ट्रीय आयोगाने हीच बाब त्‍यांच्‍या अनेक निवाडयातून स्‍पष्‍ट केली आहे.
 
 
करिता हे न्‍याय मंच खालील अंतिम आदेश पारित करीत आहे.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)        वि.प.ला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला सामानाचे नुकसानीदाखल       रु.34,057/- द्यावे.
3)    वि.प.ने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक नूकसानीदाखल रु.5,000/- आणि तक्रारीच्‍या खर्चादाखल रु.5,000/- द्यावे.
4)    सदर आदेशाचे पालन वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत      करावे.
 
 
 
[HON'ABLE MR. AMOGH KALOTI]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. SATISH DESHMUKH]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.