जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३३६/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०१/१२/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २१/०७/२०१४
सौ.सविता मधुकर केदार
उ.वय.४० धंदा- नोकरी
रा.प्लॉट नं.१४, बालाजी नगर, शिंगावे रोड
शिरपूर ता.शिरपूर जि. धुळे. . तक्रारदार
विरुध्द
- श्री.अग्रसेन सह. पतसंस्था, लि. मर्या. धुळे
जिल्हा धुळे. मुख्य शाखा, धुळे
२) श्री.अग्रसेन सह. पतसंस्था मर्या.धुळे,
शाखा शिरपूर, महाराजा कॉम्प्लेक्स,
वरचा मजला, शिरपूर जि.धुळे
३) चेअरमन व संचालक मंडळ
श्री.अग्रसेन सह.पतसंस्था, लि.मर्या.धुळे
जिल्हा धुळे. मुख्य शाखा, धुळे
(नोटीसीची बजावणी मॅनेजर सो.
धुळे व मॅनेजर शिरपूर यांचेवर
करणेत यावी) . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.एन.एस. पाटील)
(सामनेवाला तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खात्यामध्ये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्था लि. मर्या धुळे’ या पतसंस्थेत बचत खाते क्र.२३/१४५७ मध्ये रक्कम रूपये ४३,८७९/-, ठेव पावती क्र.२४४३५ मध्ये रक्कम २७,४८१/-, ठेव पावती क्र.२४४३६ मध्ये रक्कम रूपये २७,७३३/-, ठेव पावती क्र.२४४४६ मध्ये रक्कम रूपये ५६,३७३/- अशी एकूण रक्कम रूपये १,५५,४६६/- गुंतविली होती.
३. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेवपावती व बचत खात्यामधील एकूण रक्कम रूपये १,५५,४६६/- व शारिरिक, मानसिक, आर्थिेक नुकसानापोटी एकूण रक्कम रू.१,००,०००/- अशा एकूण रकमेवर दाखल दिनांकापासून द.सा.द.शे. १८% प्रमाणे रक्कम मिळेपावेतो व्याज. तसेच तक्रार अर्जाचा खर्च रू.१०,०००/- सामनेवाला यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ नि.५ सोबत नि.५/१ ते ५/३ वर मुदत ठेव पावतींची छायांकित आणि नि५/४ वर बचत खाते पासबुकची छायांकित प्रत दाखल केलेली आहे.
५. सामनेवाले यांना मंचाची नोटीस न मिळाल्यामुळे तक्रारदार यांच्या विनंती वरून फेरनोटीस काढण्यात आली. सदर फेरनोटीसीचा अहवाल अद्यापर्यंत मंचास प्राप्त झालेला नाही.
६. तक्रारदार हे दाखल दिनांकानंतर तारीख ०७/०२/२०११ पासून सतत गैरहजर आहे. तसेच तक्रार अर्ज सुरू ठेवणेकामी कोणताही पाठपुरावा (Steps) केलेला नाही. यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते.
७. वरील सर्व विवेचन पाहता, सदर तक्रार अर्ज हा अंतिमरित्या निकाली काढण्यात यावा, असे मंचाचे मत बनले आहे. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
- तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.