Maharashtra

Nagpur

CC/10/734

Agnirath Sankul Aprtment Owners Association, Nagpur Through Secretary Shri Pratyash Dube - Complainant(s)

Versus

Agni Builders and Developers Through Managing Partner Girish Ramkrishna Menan - Opp.Party(s)

Adv. R.N. Deshpande

24 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/734
 
1. Agnirath Sankul Aprtment Owners Association, Nagpur Through Secretary Shri Pratyash Dube
Plot No. 37, Kh.No. 85/1, Shyam Nagar, Somalwada, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Agni Builders and Developers Through Managing Partner Girish Ramkrishna Menan
Office- 14/15, Sai Regency Apartment, Ravi Nagar Chowk, Amravati Road,Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Zadba Lahanuji Mahajan
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Ramesh Zadba Mahajan
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Prakash Zadba Mahajan
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
5. Vijay Zadba Mahajan
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
6. Chandrakant Zadba Mahajan
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
7. Smt. Kusum Damodhar Vaidya
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
8. Smt. Usha Ashok Chakole
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
9. Smt. Ratnamala Tulshiram Rakshe
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
10. Archana Zadba Mahajan
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
11. Panchfula Zadba Mahajan
Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar, R/o. 16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
12. Power of Attorney Shri Vyankatesh Tryambakrao Kunawar
16, Shri Natha Sai Nagar, Ring Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
13. Shri Chandrakant Bhaurao Padmawar Through Partner M/s. Pushkar Builders and Developers
15, N K Y Towers, Ajani Chowk, Wardha Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. R.N. Deshpande, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक : 24/11/2011)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदार क्र.1 ते 11 विरुध्‍द मंचात दिनांक 06.12.2010 रोजी दाखल करुन मागणी केली आहे की, अग्‍नीरथ संकुल येथील गच्‍चीपासुन ते खालपर्यंत भींतीवर आतुन व बाहेरुन होणारी गळती व सिपेजचे काम व्‍यवस्थित करुन देण्‍यात यावे तसेच पेंन्‍ट हाऊस गार्डनमधुन होणारे ‍लिकेज दुरुस्‍त करुन देण्‍याचे निर्देश देण्‍यांत यावे. तसेच कायद्याप्रमाणे आपातकालीन निकास आणि फायर सेफ्टी इक्‍युपमेंट बसवुन देण्‍यांत यावे. तसेच इमरजन्‍सी एग्‍झीटचे मागील बाजुस लोखंडी सिडी लावुन द्यावी, नागपूर सुधार प्रन्‍यासकडून ऑकुपेशन सर्टीफीकेट मिळवुन द्यावे, कॉमन एरीयातील उरलेल्‍या सोयी सुविधा डि.ओ.डि. प्रमाणे पुरविण्‍याचे आदेश व्‍हावेत. तसेच सभासदांना सिपेज व गळतीमुळे आलेल्‍या खर्चापोटी रु.1,00,000/-, सभासदांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-, तक्रारीच्‍या खर्चापोटी र1.10,000/- व अतिरिक्‍त नुकसान भरपाई म्‍हणून रु.50,000/- देण्‍याबाबत मागणी केलेली आहे.
 
2.          तक्रारकर्ता ही संस्‍था अपार्टमेंट ऍक्‍ट, 1963 च्‍या तरतुदींनुसार गठीत करण्‍यांत आलेली आहे, तसेच डि.ओ.डि. प्रमाणे दि.23.08.2005 ला नोंदणीकृत झालेली आहे. प्रस्‍तुत इमारतीतील गाळेधारक संस्‍थेचे सभासद असल्‍यामुळे कायद्याप्रमाणे संस्‍थेस तक्रार दाखल करण्‍याचा पूर्ण अधिकार आहे. प्रस्‍तुत इमारतीतील बांधकामातील सार्वजनिक उपयोगाच्‍या सेवेतील तृटींसाठी ‘ग्राहक’ म्‍हणून तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार आहे, तसेच जनरल बॉडीचे ठरावानुसार अधिकार देण्‍यांत आलेले आहेत.
 
3.          गैरअर्जदार क्र.1 हे बांधकाम व्‍यावसायीक असुन ते खुली जागा विकत घेऊन जमीन मालकाशी भुखंड विकसीत करण्‍याचा करार करुन सदनिका बांधतात, सदर संस्‍था ही भागीदारी संस्‍था असुन ती व्‍यवसाय करते. गैरअर्जदार क्र.2 ते 11 हे खसरा नं.85/1, मौजा- सोमलवाडा, शिट नं.712, सिटी सर्वे नं.558, वार्ड नं.15 नागपूर महानगर पालिका आणि नागपूर सुधार प्रन्‍यास यांच्‍या हद्दीतील मालक आहेत. गैरअर्जदार क्र.2 तेत 11 ने दि.28.01.2004 ला मे. पुष्‍कर बिल्‍डर आणि डेव्‍हलपर्स (भागीदारी संस्‍था) तर्फे व्‍यंकटेश कुणावार व चंद्रकांत भाऊरावजी पद्मावार यांना कधीही बदलू न शकणारे आममुखत्‍यारपत्र नोंदणीकृत करुन दिले व वरील जमीनीसंबंधी सर्व व्‍यवहार करण्‍याचा अधिकार प्राप्‍त झाला. मुखत्‍यारपत्राच्‍या आधारे गैरअर्जदारांनी दि.26.05.2005 रोजी गैरअर्जदार क्र.1 गिरीश मेनन, मॅनेजींग पार्टनर यांचेसोबत भुखंड विकसीत करुन त्‍याची जाहीरात देऊन सदनिका, गाळे व दुकाने विकण्‍याचा करार केला होता, त्‍यानुसार गैरअर्जदार क्र.1 ने सदनिका बांधुन त्‍याची विक्री केली. तक्रारकर्ता ही संस्‍था डि.ओ.डि. प्रमाणे नोंदणीकृत असुन ज्‍यांनी सदनिका अथवा गाळे विकत घेतले आहे ते सर्व लोक सभासद आहेत. दि.11.01.2005 ला गैरअर्जदार क्र.2 ते 11 यांनी नागपूर सुधार प्रन्‍यास यांचेशी भुखंड विकसीत करण्‍याचा करार केला होता व मंजूर नकाशाप्रमाणे ते बांधकाम करतील असे सांगितले होते, तसेच गैरअर्जदारांनी पाण्‍याच्‍या पाण्‍याचे व सिव्‍हर लाईनचे काम करण्‍याचे मान्‍य केले होते. परंतु गैरअर्जदार क्र.1 ने कराराचे पालन केले नाही. गैरअर्जदारांना संपूर्ण मोबदला दिलेला असल्‍यामुळे त्‍यांनी इमारतीच्‍या सोईसुविधा करुन देणे बंधनकारक असतांना तक्रारकर्त्‍यांना सुविधा उपलब्‍ध करुन न दिल्‍यामुळे सेवेत तृटी असुन गैरअर्जदारांनी अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केल्‍यामुळे सदरची तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
4.          तसेच गैरअर्जदारांनी कराराप्रमाणे व प्रचलीत कायद्यानुसार इमारतीचे बांधकाम नियम व निकषांप्रमाणे आपतकालीन दरवाजे, अग्‍नीरोधक उपकरणे बसविणे, तसेच संबंधीत विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणणे व इमारत 6+1 मजल्‍याची असल्‍यामुळे ना-हरकत प्रमाणपत्र आणणे गरजेचे होते व ते न केल्‍यामुळे गैरअर्जदारांनी सेवेत तृटी दिलेली आहे. तक्रारकर्ता संस्‍थेच्‍या सभासदांनी ज्‍या दिवशी पासुन सदनिकेचा ताबा घेतला त्‍या दिवशी पासुनच डूप्‍लेक्‍स व पेंट हाऊस येथे गळती सिपेज सुरु झाली व ही गळती पेंट हाऊस गार्डनमधून सुरु होती व त्‍याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांना कळवुन सुध्‍दा कोणतीच उपाय योजना केलेली नाही, असे नमुद केलेले आहे. तक्रार दाखल करण्‍याचे कारण दि.12.10.2008 रोजी अपूर्ण कामाबद्दल पत्र दिले तेव्‍हा घडले व त्‍यानंतर दि.04.05.2010, 17.05.2010 व दि.28.05.2010 रोजी घडले असुन तक्रार मुदतीत दाखल केल्‍याचे नमुद केले आहे.
 
5.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशाणी क्र. 3 वर एकूण 10 दस्‍तावेज दाखल केले त्‍यामधे ठराव, गैरअर्जदारांना पाठविलेली पत्रे, ग्राहक पंचायतीने गैरअर्जदारांना पाठविलेले पत्र, नागपूर महानगर पालिकेकडू मिळवीलेली माहिती, निरीक्षण रिपोर्ट, म.न.पा. ने पुष्‍कर बिल्‍डर यांना पाठविलेली नोटीस, नळाच्‍या मंजूरीबाबत सुचना, कर पावत्‍या इत्‍यादी दस्‍तावेज अनुक्रमे पृष्‍ठ क्र.15 ते 45 वर दाखल केलेले आहेत.
 
6.          मंचाने तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्षांस नोटीस बजावली असता गैरअर्जदार क्र.2,3,5,7,8 व 11 यांना मंचाने पाठविलेल्‍या नोटीसची पोच प्रकरणात दाखल आहे व त्‍यांचा पुकारा केला असता ते गैरहजर असल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द दि.23.02.2011 रोजी त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केलेला आहे. तसेच गैरअर्जदार क्र.4,9 व 10 यांना तक्रारीतुन वगळण्‍यांत आले. गैरअर्जदार क्र.1 व 6 यांनी आपले उत्‍तर दाखल केले ते खालिल प्रमाणे...  
 
7.          गैरअर्जदार क्र.6 ने आपल्‍या उत्‍तरात गैरअर्जदार क्र.2 ते 11 यांनी आममुखत्‍यारपत्र करुन दिल्‍याची बाब तसेच गैरअर्जदार क्र.2 ते 11 यांचे मालकीची जमीन मे. पुष्‍कर बिल्‍डरला विकण्‍याचा करार केला होता व गैरअर्जदार क्र.2 ते 11 ने आममुखत्‍यारपत्र दिल्‍यामुळे नागपूर सुधार प्रन्‍यासशी करार केला. मात्र त्‍याचे पालन करण्‍याची जबाबदारी पुष्‍कर बिल्‍डरवर होती. गैरअर्जदार क्र.6 ने तक्रारकर्त्‍याबरोबर कुठलीही सेवा पुरविण्‍याचा करार केला नव्‍हता व गैरअर्जदार क्र.2 ते 11 ने कुठलीही इमारत बांधलेली नाही, एकंदरीत करार हा गाळे धारकांशी केला असल्‍यामुळे कराराचे पालन करण्‍याची जबाबदारी ही गैरअज्रदार क्र.1 ची आहे व गेरअर्जदार क्र.2 ते 11 त्‍यास जबाबदार नाहीत. गैरअर्जदार क्र.2 ते 11 यांनी बांधकाम योजना गैरअर्जदार क्र.1 मार्फत राबविली हे नाकारले त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.2 ते 11 हे मुळीच जबाबदार नाहीत.
8.          तक्रारीतील संपूर्ण बाबी सदनिकेतील तृटया या गैरअर्जदार क्र.1 शी संबंधीत असल्‍यामुळे व बांधकामातील सेवेत तृटींबाबत असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र.6 विरुध्‍द न्‍याय मागण्‍याचा अधिकार नाही. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या इतर मागण्‍या नाकारुन त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
 
9.          गैरअर्जदार क्र.1 ने आपल्‍या उत्‍तरात खालिल प्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत. त्‍यांचे मते सदर तक्रार बनावट असुन मंचाची दिशाभूल करण्‍यासाठी व मंचाचा मुल्‍यवान वेळ व्‍यर्थ घालवीत असल्‍यामुळे दंड आकारुन सदर तक्रार खारिज करण्‍याची विनंती मंचास केलेली आहे. प्रस्‍तुत तक्रार ही अग्‍नीरथ संकुल अपार्टमेंट असोसिएशन म्‍हणून दाखल केलेली आहे. म्‍हणजेच त्‍यांनी स्‍वतःला महाराष्‍ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायदा 1970 चे अधीन राहुन सोसायटीचा दर्जा घेऊन दाखल केली व सोसायटीचा वाद असल्‍यामुळे वरील मंचाला तक्रारीत निकाल देण्‍याचा अधिकार नाही. सदनिकेतील सर्व गाळेधारक व दुकान धारकांचे विक्रीपत्रात स्‍पष्‍ट लिहले आहे की, कोणत्‍याही गाळेधारकाला किंवा दुकानधारकाला गैरअर्जदार क्र.1 ने केलेल्‍या बांधकामा विषयी काही तक्रार असेल तर ते आधी त्‍यांची तक्रार ऑरबिटेशन एन्‍ड कन्‍सीलेशन केल्‍याशिवाय कोणत्‍याही दिवाणी न्‍यायालयात किंवा ग्राहक मंचात प्रकरण दाखल करणार नाही म्‍हणून ऑरबिटेशन एन्‍ड कन्‍सीलेशन ऍक्‍ट 1996 नुसार तक्रार चालविण्‍याचा मंचास अधिकार नाही.
10.         अग्‍नी संकूलामध्‍ये 50 गाळे व दुकानदार आहेत व बांधकाम व इतर गोष्‍टींकरीता तृटी किंवा तक्रारी असेल तर त्‍या लोकांनी तक्रारीमध्‍ये अग्‍नी संकुल तर्फे गैरअर्जदार क्र.1 विरुध्‍द तक्रार दाखल करण्‍या करीता प्रस्‍तावामध्‍ये सह्या केल्‍या असत्‍या. परंतु फक्‍त काही गाळे धारकांच्‍या सह्या केलेल्‍या आहेत. अग्‍नी संकुलची स्‍कीम चार वर्ष अगोदर बांधली होती व गाळे वेगवेगळया लोकांना विकलेले होते. तसेच विक्रीपत्रामध्‍ये खरेदीदारांना बांधकामा विषयी काहीही शिकायत नाही व ते पूर्णपणे समाधानी आहेत. गैरअर्जदार क्र. 1 असे म्‍हणतात की, सदनिकेमध्‍ये काही काळानंतर नैसर्गीक कारणामुळे लहान-सहान क्रॅक्‍स, रिसन संभव असते, त्‍या करीता बांधकामाला जबाबदार ठरवु शकत नाही, तसेच त्‍यांचे सेवेत तृटी नसल्‍याचे नमुद केले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी मान्‍य केले आहे की, सदनिकेत फायर सेफ्टी इक्‍वीपमेंट बसविण्‍यांस प्रतिबध्‍द आहेत, तसेच नागपूर महानगर पालिकेकडून फायर विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणून देईल व मागील लोखंडी सीडी नियमात असलेल्‍या निकषा प्रमाणे लावुन देऊ हे मान्‍य केले.
 
            गैरअर्जदार क्र.1 यांनी डि.ओ.डि. मान्‍य केली व सदर संस्‍था ही ओनरशिप फ्लॅट ऍक्‍ट 1963 प्रमाणे नोंदणीकृत असल्‍याचे मान्‍य केले आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी परिच्‍छेद क्र.2 पूर्णपणे मान्‍य केला परंतु हे नाकारले की, कराराचे कुठलेही पालन केलेले नाही. तसेच परिच्‍छेद क्र.4 चे उत्‍तरात म्‍हटले आहे की, सार्वजनीक उपयोगाच्‍या ब-याच गोष्‍टी पूर्ण केलेल्‍या नाहीत हे नाकारले नाही तसेच इतर सर्व बाबी नाकारल्‍या. कराराप्रमाणे व बांधकामाचे नियमानुसार आपतकालीन दरवाजे, अग्‍नीरोधक उपकरणे बसविणे हे गैरअर्जदारांचे काम आहे हे नाकारले. तसेच सदनिकेत डूप्‍लेक्‍स व पेंटहाऊस येथे सीपेज सुरु झाली व गळती ही पेंट हाऊस गार्डन येथून सुरु होती, तसेच उपाय योजना केली नाही हे म्‍हणणे नाकारले.
11.         तसेच तकारीच्‍या परिच्‍छेद क्र.7,8,9,10,11 व 112 नाकारुन सदर तक्रार खोटी असल्‍यामुळे ती खारिज करण्‍याची मागणी केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 ने आपल्‍या उत्‍तरासोबत दि.28.03.2007 व 06.03.2009 रोजीचे विक्रीपत्रांची प्रत दाखल केली.
12.         सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्‍तीवादाकरीता दि.18.10.2011 रोजी आली असता मंचाने तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.6 चा वकीलामार्फत युक्तिवाद ऐकला, इतर गैरअर्जदार. गैरहजर सदर प्रकरणी दाखल तक्रार व दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
                                           -// निष्र्ष //-
 
13.         तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांवरुन सदनिकाधारक हे अग्‍नीरथ संकुल अपार्टमेंटचे सभासद आहेत हे स्‍पष्‍ट होते. सदर तक्रार ही सदनिकेतील गच्‍ची तसेच पेंटाहाऊस गार्डन मधील लिकेजबाबत, बांधकाम नियमावलीनुसार आपतकालीन निकास आणि अग्‍नीरोधक उपकरणे, फायर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवुन देणे, इमरजंन्‍सी एग्‍झीटचे मागील बाजुस लोखंडी सिडी पुरविण्‍याबाबत तसेच बांधकाम नियमावलीप्रमाणे ऑकुपेशनप सर्टीफीकेट मिळवुन देणे व कॉमन एरियातील सोयी सवलती पुरविण्‍याबाबत आहे. त्‍यामुळे गैरअर्जदारांविरुध्‍द मंचासमक्ष तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12(1) नुसार दाखल करता येत असुन मंचास तक्रार निकाली काढण्‍याचे अधिकारक्षेत्र आहे.
 
14.         गैरअर्जदारांनी आपल्‍या आक्षेपात सदर प्रकरण आर‍बीट्रेशन एन्‍ड कन्‍सीलेशन कायदा 1996 प्रमाणे मंचास सदर तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही, असे म्‍हटले असुन सदर म्‍हणणे खालिल निकालपत्रानुसार तथ्‍यहीन ठरते.
 
            “Supreme Court of India, Fair Air Engineers Pvt. Ltd. –v/s- M.K. Modi” Arbitration Clouse Section 34 – Consumer Forum – Civil Court U/s 3 of C.P.A. 1986, Consumer Forum is competent to proceed rather than relegating to arbitration proceeding as per contract.  
 
15.         गैरअर्जदार क्र.1 चा 3 रा आक्षेपसुध्‍दा तथ्‍यहीन असल्‍यामुळे मंचाने नाकारलेला आहे. त्‍यांचा 4 था आक्षेप आहे की, अग्‍नीरथ संकुलची स्‍कीम चार वर्ष अगोदर बांधलेली होती व वेगवेगळया लोकांना विकली व विक्रीपत्रामध्‍ये खरेदीदारांना काही शिकायत नाही व समाधानी असल्‍याचे लिहीले होते. कालांतराने नैसर्गीक कारणांमुळे लहान-सहान क्रॅक्‍स किंवा रिसन संभावत असते, त्‍यासाठी बांधकाम जबाबदार ठरत नाही व सेवेत त्रृटी सुध्‍दा होत नाही. अपार्टमेंट ऍक्‍टच्‍या तरतुदींनुसार सदनिकेचा ताबा घेतल्‍यानंतर 3 वर्षांचे अवधीत बांधकामात काही त्रृटया आढळून आल्‍यास खरेदीदारांना दाद मागता येते. तक्रारकर्त्‍यांनी नमुद केल्‍या प्रमाणे दि.12.10.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना सदनिकेचा ताबा लवकरात-लवकर देण्‍यांची विनंती केली, तरीही त्‍यांनी ताबा दिलेला नाही व नियमानुसार आवश्‍यक बाबींचे पूर्तता केलेली नाही. तसेच दि.04.05.2010 रोजी तक्रारकर्ता संस्‍थेच्‍या सभासदांमार्फत सार्वजनिक वापराच्‍या सोयी उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत मागणी केली होती व त्‍यास गैरअर्जदारांनी दि.28.05.2010 रोजी उत्‍तर पाठविले त्‍यामध्‍ये सुध्‍दा गैरअर्जदारांचे म्‍हणणे तथ्‍यहीन ठरते व तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेली तक्रार ही वेळेत दाखल केलेली आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच सदनिकेचे खरेदीदार हे संस्‍थेचे सभासद आहेत, त्‍यामुळे ते गैरअर्जदारांचे ‘ग्राहक’ ठरतात.
 
16.         गैरअर्जदार क्र.1 ने आपल्‍या उत्‍तरात त्‍यांनी अग्‍नीरथ संकुल अपार्टमेंटमध्‍ये फायर इक्‍वीपमेंट लवकरात-लवकर बसवुन देण्‍याचे कबुल केले, फायर विभागाचे प्रमाणपत्र आणून देणे, इमरजंन्‍सी निकासचे मागील बाजूस असलेल्‍या लोखंडी सीडीचे बांधकाम नियम व निकषाप्रमाणे लावुन देण्‍याचे मान्‍य केले तरी सुध्‍दा तक्रार प्रलंबीत असतांना गैरअर्जदार क्र.1 ने त्‍याची पुर्तता केली नाही, त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 त्‍या सोयी पुरविण्‍यांस बाध्‍य आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
17.         तक्रारकर्त्‍यांनी अग्‍नीरथ संकुल येथील गच्‍ची पासुन खालपर्यंत भिंतीवर आतुन-बाहेरुन होणारी गळती व सीपेजचे काम व्‍यवस्‍थीत करुन देणे तसेच पेंटाहाऊस गार्डन मधील लिकेजबाबत, बांधकाम नियमावलीनुसार आपतकालीन निकास आणि अग्‍नीरोधक उपकरणे, फायर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवुन देणे, इमरजंन्‍सी एग्‍झीटचे मागील बाजुस लोखंडी सिडी पुरविण्‍याबाबत तसेच बांधकाम नियमावलीप्रमाणे ऑकुपेशनप सर्टीफीकेट मिळवुन देणे व कॉमन एरियातील सोयी सवलती पुरविण्‍याबाबत मागणी केली आहे. तसेच तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेल्‍या पृष्‍ठ क्र.19 वरील गैरअर्जदार क्र.1 अग्‍ने बिल्‍डर्स एन्‍ड डेव्‍हलपर्स यांचे दि.08.11.2008 रोजीच्‍या पत्रात परिच्‍छेद क्र.3 व 4 मध्‍ये खालिल प्रमाणे नमुद केले आहे.
            3)         We take full responsibility of any kind of leakage for the Pent House
                        Garden.
4)                  The complaint of the individual occupant is attended as they required.
 
यामधे सुध्‍दा गैरअर्जदार क्र.1 ने दि.08.11.2008 नुसार मान्‍य करुन सुध्‍दा त्‍या त्रृटया दुरुस्‍त केल्‍या याबाबत कुठलाही दस्‍तावेज मंचासमक्ष दाखल केलेला नाही. त्‍यामुळे त्‍याबाबत तक्रारकर्त्‍यांची मागणी पूर्ण करण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 ची होती असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
18.         तक्रारकर्त्‍यांनी अनुक्रमे पृष्‍ठ क्र.35 व 36 वरील दाखल नागपूर महानगर पालिकेचे दि.21.06.2005 रोजीचे पत्रानुसार पुर्तता करणे बंधनकारक आहे, असे स्‍पष्‍ट होते. तसेच इतर दस्‍तावेजांवरुन सुध्‍दा हे स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदार क्र.1 ने व पुष्‍कर बिल्‍डरने परिपूर्णता प्रमाणपत्र प्राप्‍त करणे, बांधकाम नियमावलीनुसार बंधनकारक असुन सुध्‍दा प्राप्‍त केले नाही त्‍यामुळे गैरअर्जदारांनी सदर प्रमाणपत्र प्राप्‍त करण्‍यांस बाध्‍य आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
            वरील विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदार क्र.2 ते 11 ने त्‍यांचे मालकीची जमीन ही आममुखत्‍यार श्री. व्‍यंकटेश कुणावार व चंद्रकांत भाऊरावजी पद्मावार यांना विकून जमीनीबाबत व्‍यवहार करण्‍याकरीता आममुखत्‍यारपत्र करुन दिलेले होते. तसेच जमीन मालकाचे आममुखत्‍यारपत्र धारकाने गैरअर्जदार क्र.1 यांचेशी सदनिका बांधण्‍याचा, विकण्‍याचा करार केला होता व वरील सर्व सदनिकेचे खरेदीखताबाबत वाद हा मंचासमक्ष नाही, त्‍यामुळे सदर तक्रारीत आममुखत्‍यारधारक श्री. व्‍यंकटेश कुणावार व चंद्रकांत भाऊरावजी पद्मावार (पुष्‍कर बिल्‍डरचे भागीदार) व अग्‍नी बिल्‍डर एन्‍ड डेव्‍हलपर्स बरोबर केलेल्‍या करारनाम्‍यानुसार बांधकामातील त्रृटींपोटी ते दोघेही जबाबदार आहेत. तसेच इतर गैरअर्जदार हे त्‍याबाबत जबाबदार नसल्‍यामुळे त्‍यांना वगळणे संयुक्तिक होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
19.        सदर तक्रारीत गैरअर्जदार क्र.4,9,10 ला दि.18.10.2011 रोजीचे आदेशान्‍वये वगळण्‍यांत आलेले आहे. तसेच गैरअर्जदार क्र.2,3,5,7,8 व 11 यांना सुध्‍दा विनाकारण वादी केल्‍यामुळे त्‍यांना तक्रारीतुन वगळणे संयुक्तिक होईल, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
20.         वरील विवेचनावरुन हे सुध्‍दा स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍या संस्‍थेच्‍या मागणी नुसार गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र.2 ते 11 चे आममुखत्‍यारधारक हेच बांधकामातील त्रृटींस सर्वस्‍वी जबाबदार असुन त्‍याची पुर्तता करण्‍यांस ते बाध्‍य आहेत, असे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदारांचे सेवेत गंभीर स्‍वरुपाची त्रृटी असुन त्‍यांनी बांधकाम नियमावलीचे पूर्णतः उल्‍लंघन केल्‍यामुळे व निर्धारीत अवधीत पुर्तता न केल्‍यामुळे निश्चितच गैरअर्जदार क्र.1 संस्‍थेच्‍या सभासदांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र. 2 ते11 चे आममुखत्‍यारधारकाने संस्‍थेच्‍या सभासदांना शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्त्‍यांनी अग्‍नीरथ संकुल येथील गच्‍चीपासुन खालपर्यंत भिंतीवर आतुन-बाहेरुन होणारी गळती व सीपेजचे काम व्‍यवस्‍थीत करुन देणे तसेच पेंट हाऊस मधुन होणारे लिकेज दुरुस्‍त करुन देण्‍याची मागणी केली व गैरअर्जदाराने परिच्‍छेद क्र.18 नुसार मान्‍य केली होती. गैरअर्जदार क्र.1 हे पुर्तता करण्‍यांस बाध्‍य असतांना तक्रारकर्ता संस्‍थेने सदनिकेत असलेल्‍या सीपेज व गळतीची दुरुस्‍ती केल्‍यामुळे आलेल्‍या दुरुस्‍तीचे खर्चापोटी रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु त्‍याबाबत बिले व अभियंत्‍याचे प्रमाणपत्रासह नसल्‍यामुळे सदर मागणी पूर्णतः मंजूर करणे मंचास संयुक्तिक वाटत नाही व गैरअर्जदारांनी झालेल्‍या खर्चापोटी रु.25,000/- द्यावे. करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
 
 
-// अंति दे //-
 
 
1.         तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र.2 ते 11 चे आममुखत्‍यारधारक श्री. व्‍यंकटेश  कुणावार व चंद्रकांत भाऊरावजी पद्मावार (पुष्‍कर बिल्‍डरचे भागीदार) यांना आदेश      देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास बांधकाम       नियमावलीनुसार आपतकालीन      निकास आणि अग्‍नीरोधक उपकरणे लावणे, फायर विभागाचे ना हरकत       प्रमाणपत्र मिळवुन देणे, इमरजंन्‍सी एग्‍झीटचे मागील बाजुस      लोखंडी सिडी नियम व निकषाप्रमाणे लावुन द्यावी तसेच नागपूर महानगर पालिका व    नागपूर       सुधार प्रन्‍यास यांचेकडून बांधकाम नियमावलीप्रमाणे     ऑकुपेशनप सर्टीफीकेट
      मिळवुन द्यावे व कॉमन एरियातील सोयी सवलती उपलब्‍ध करुन द्याव्‍या.
3.    गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र.2 ते 11 चे आममुखत्‍यारधारक श्री. व्‍यंकटेश  कुणावार व चंद्रकांत भाऊरावजी पद्मावार (पुष्‍कर बिल्‍डरचे भागीदार) यांना आदेश      देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्ता संस्‍थेने सदनिकेत असलेल्‍या सीपेज व      गळतीची दुरुस्‍ती केल्‍यामुळे आलेल्‍या दुरुस्‍तीचे खर्चापोटी रु.25,000/- अदा करावे.
4.    गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र.2 ते 11 चे आममुखत्‍यारधारक श्री. व्‍यंकटेश  कुणावार व चंद्रकांत भाऊरावजी पद्मावार (पुष्‍कर बिल्‍डरचे भागीदार) यांना आदेश      देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्ता संस्‍थेच्‍या सभासदांना झालेल्‍या शारीरिक व    मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावे
5.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र.2 ते 11 चे    आममुखत्‍यारधारक श्री. व्‍यंकटेश कुणावार व चंद्रकांत भाऊरावजी पद्मावार (पुष्‍कर बिल्‍डरचे भागीदार) यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे  आंत करावी.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.