Maharashtra

Nagpur

CC/239/2017

Shashant Giridhar Nandanwar - Complainant(s)

Versus

Aero Club, Through Manager - Opp.Party(s)

Self

27 Nov 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/239/2017
( Date of Filing : 12 Jun 2017 )
 
1. Shashant Giridhar Nandanwar
R/o. AF-110, Jindal Complex, Near Bus Stop, Umrer, Tah. Umrer, Dist. Nagpur 441203
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Aero Club, Through Manager
Residency Road, Ward No. 38, Liberty Cinema, Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Nov 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती चंद्रिका बैस, मा. सदस्‍या)

 

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता शशांत नंदनवार हे शिक्षक असुन त्‍यांनी  विरुध्‍द पक्ष/ऐरो क्‍लब यांचेकडुन P0006 FWR Men’s Sndal GD-1392113, Brown – 42, (Invoice No. 002426) ही वस्‍तु ४० टक्‍के सुटवर दिनांक ३०/०१/२०१७ रोजी  खरेदी केले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याच्‍या  लक्षात आले की, उपरोक्‍त किंवा सदरहु सामानाकरीता विरुध्‍द पक्षाने ६० टक्‍के रक्‍कम जास्‍त लावुन देयक बनविले आहे तसेच त्‍यात त्‍यांनी VAT देखील जोडला होता. यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या लक्षात आले की, विरुध्‍द पक्षाने स्‍वतःच्‍या सामानांची फसवेगीरीची जाहिरात केली होती. तक्रारकर्त्‍याने सदरहु वस्‍तुचे रुपये १,९७१/- चे देयक घेतले होते त्‍यावर त्‍यांना ४० टक्‍के सुट म्‍हणजे ते सामान त्‍याला रुपये १,७३७/- रुपयात मिळावयास  हवे होते. ( २,८९५/- या MRP रकमेच्‍या ४० टक्‍के सुट दराने १,७३७/- रुपये होतात) परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍यात रुपये २३४/- VAT म्‍हणुन अतिरीक्‍त १३.५ टक्‍के जोडले. याचाच अर्थ विरुध्‍द पक्षाने बनावटी VAT सदरहु रकमेवर जोडला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक २४/०३/२०१७ रोजी वकीलमार्फत विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविले व विरुध्‍द पक्षाच्‍या वकीलांनी दिनांक २२/०४/२०१७ रोजी त्‍याचे उत्‍तर दिले. परंतु यात त्‍यांनी स्‍वतःचा गुन्‍हा कबुल केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक ञासाला सामोरे जावे लागले व त्‍यांना मंचात दाद मागण्‍यास यावे लागले.
  3. तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करुन सेवेत ञुटी केली असल्‍याचे घोषित करावे.
  2. तक्रारकर्त्‍याकडुन वसुल केलेले अतिरीक्‍त VAT ची रक्‍कम रुपये २३४/- तक्रारकर्त्‍यास वापस करण्‍यात यावे.
  3. शारिरीक व मानसिक ञासाकरीता रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च मागितला आहे.
  1. विरुध्‍दपक्षाने निशानी क्रमांक ८ वर आपले जबाब दाखल केले आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानूसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द मानसिक ञास देण्‍याकरीता व त्‍यांचेकडुन अतिरीक्‍त पैसे उकळण्‍याकरीता सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याने ही तक्रार VAT ची रक्‍कम वसुल केल्‍यामुळे मंचात दाखल केली आहे. परंतु VAT वसुल करणे हे कायदेशीर बाब आहे. त्‍यामुळे या प्रकरणात विरुध्‍द पक्षाने कोणत्‍याही अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केला नसुन सेवेत ञुटी केलेली नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने VAT दोन वेळा वसुल केले परंतु या म्‍हणण्‍यात कोणतेही तथ्‍य नाही. तक्रारकर्त्‍यास वस्‍तुची MRP किंमत व VAT यामधील फरक कळला नाही. वस्‍तुतः वॅट हा MRP किंमतीचा अतिरीक्‍त जोडलेला असतो व तो सामान विकण्‍याचे वेळी जोडला जातो. विरुध्‍द पक्षाला स्‍वतःचा सामान विकण्‍याकरीता कोणत्‍याही शर्ती व अटी लावण्‍याची मुभा आहे. त्‍यामुळे हे प्रकरण मंचाच्‍या अधिकार क्षेञात येत नाही. जेव्‍हा विरुध्‍द पक्षाने सामानावर 40 टक्‍के सुट दिली व VAT अतिरीक्‍त असे लिहुन सेल लावला होता. याचा अर्थ तक्रारकर्त्‍यास सामानांच्‍या MRP रकमेवर वॅट द्यावयाचा आहे असे निर्धारीत होते. विरुध्‍द पक्षाने ४० टक्‍के सुट ही केवळ MRP रकमेवर दिली होती. त्‍यात VAT अतिरीक्‍त लागणार हे निश्‍चीत होते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने सदरची तक्रार VAT विभागाकडे करावयास हवी होती. त्‍यामुळे सदरहु तक्रार भारी खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विरुध्‍द पक्षाने विनंती केली आहे.
  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार व सोबत  दाखल केलेले दस्‍ताऐवज, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकुण मंचाने खालिलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नोंदविले आहेत.               

             अ.क्र.            मुद्दे                                                                         उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                          अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष/ऐरो क्‍लब यांचेकडुन P0006 FWR Men’s Sndal GD-1392113, Brown – 42, (Invoice No. 002426) ही वस्‍तु ४० टक्‍के सुटवर दिनांक ३०/०१/२०१७ रोजी  खरेदी केले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याच्‍या  लक्षात आले की, उपरोक्‍त वस्‍तु करीता विरुध्‍द पक्षाने ६० टक्‍के रक्‍कम जास्‍त लावुन वस्‍तुचे बिल  बनविले आहे तसेच त्‍यात त्‍यांनी VAT देखील जोडला होता. यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या लक्षात आले की, विरुध्‍द पक्षाने स्‍वतःच्‍या वस्‍तुंची फसवेगीरीची जाहिरात केली होती.  यावरुन असे दिसुन येते की, स्‍वतःचे सामान विकण्‍याकरीता फ्लॅट 40 टक्‍के ऑफ असे मोठे मोठे पोस्‍टर्स लावले होते व त्‍यात VAT अतिरीक्‍त लागेल असे जाहिरातीत कुठेही उल्‍लेख नाही. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक १ वर रुपये २,२१७.५०/- चे बिल जोडले आहे. या बिल देयकामध्‍ये  सामानाची रक्‍कम १,९५३.३६/- इतकी असुन त्‍यावर VAT वॅट ची रक्‍कम २६३.६४/- इतकी जोडलेली आहे. वस्‍तुतः MRP रकमेच्‍या अंतर्गत सर्व  त-हेचे कर अंर्तभुत असतात. ग्राहकास कोणतेही सामान विकत घेतांना MRP पेक्षा जास्‍त रक्‍कम देणे अपेक्षीत नाही. परिस्‍थीतप्रमाणे दुकानदाराने ग्राहकास सुट दिल्‍यास एक वेळ सामानाची किंमत MRP पेक्षा कमी राहु शकते परंतु कोणत्‍याही दुकानदारास/निर्मात्‍यास MRP रकमेपक्षा रक्‍कम वसुल करणे ही अनुचित व्‍यापार पद्धती होय.
  2. तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच्‍या समर्थनार्थ मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या आदेशाची न्‍यायनिवाड्याची प्रत जोडली आहे.

Revision Petition No. 3477/2016, M/s Aero Club (Woodland) Vs. Rakesh Sharma, यात म्‍हटल्‍याप्रमाणे

  • If we read this display board with 40% off having VAT extra, then also it is not possible to make out by a prudent man that the VAT was to be paid on the concessional price also. Since, the MRP includes the VAT, so one could easily understand that the VAT was already paid, Hence, this advertisement of 40%  off is misleading. One cannot reach at the conclusion that VAT extra was also to be given on 40% off price or 60% of the price. Had the OP specifically mentioned that extra VAT shall have to be paid after 40% off price or concessional price, in that situation it could be argued on behalf of the OP that the complainant was duly informed about charging of the extra VAT. This display of 40% off with VAT extra itself is misleading and leads the customer nowhere. Display of such type of misleading advertisement notice boards by the OP amounts to unfair trade practice on its part.

     सदरच्‍या न्‍यायनिवाड्यावरुन स्‍पष्‍ट दिसुन येते की, विरुध्‍द पक्ष यांच्‍या विरोधात दिनांक ४/१/२०१७ रोजी मा. राष्‍ट्रीय आयोगाने ऐरो क्‍लब वुडलॅंन्‍ड यांच्‍या विरोधात आधीच आदेश पारीत केलेला आहे. सबब मंच या न्‍यायनिवाड्याचा आधार घेऊन खालिल आदेश पारीत करीत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास रुपये २३४/- द्यावे आणि सदरहु रकमेवर सामान खरेदी केल्‍याच्‍या दिनांकापासुन म्‍हणजेच दिनांक ३०/०१/२०१७ पासुन ते प्रत्‍यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने व्‍याज  द्यावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासाकरीता रुपये ३,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.