Maharashtra

Kolhapur

CC/21/236

Varsha Maruti Galande - Complainant(s)

Versus

Aegon Life Insurance Company Ltd. & Other - Opp.Party(s)

P.R.Kolekar

26 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/21/236
( Date of Filing : 07 May 2021 )
 
1. Varsha Maruti Galande
319 B 49, Balaji Park Uchagaon, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Aegon Life Insurance Company Ltd. & Other
Goregaon, Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 26 Nov 2021
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदयाचे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      तक्रारदारांचे पती मयत श्री मारुती रामचंद्र गलांडे हे गावोगावी फिरुन कापड विक्रीचा व्‍यवसाय करत होते व ते सदर व्‍यवसायापासून वार्षिक अंदाजे रु. 2,80,000/- ते रु.3,00,000/- पर्यंत कमवत होते.  वि.प.क्र.1 ही जीवन विमा व्‍यवसाय करणारी कंपनी असून वि.प.क्र.2 ही वि.प.क्र.1 ची शाखा आहे.  मयत श्री मारुती रामचंद्र गलांडे हे एईगॉन लाईफ ग्रुप टर्म इन्‍शुरन्‍स प्‍लॅनचे मेंबर होते.  सदर ग्रूप हा मास्‍टर पॉलिसी होल्‍डर वन 97 कम्‍युनिकेशन लिमिटेड यांचा होता व त्‍यांचेतर्फे मॅनेज केला जात होता.  मयत श्री मारुती रामचंद्र गलांडे हे सदर मास्‍टर पॉलिसी होल्‍डर वन 97 कम्‍युनिकेशन लिमिटेडचे मेंबर असलेने त्‍यांचे ग्रुप जीवन विमा हा सदर ग्रुपचे मेंबर म्‍हणून सदर ग्रुपने उतरविलेला होता.  सदर पॉलिसीखाली त्‍यांनी सिल्‍व्‍हर या बेनिफिटचा ऑप्‍शन घेतला होता.  सदर सिल्‍व्‍हर या बेनिफिट ऑप्‍शनखाली मृत्‍यूसमयी सभासदांना रक्‍कम रु.15,00,000/- चे विमा कवच देणेत आले होते.  मयत श्री मारुती रामचंद्र गलांडे हे मास्‍टर पॉलिसी नंबर पी 01 जी 20190918001 खाली विमाधारक होते व त्‍याचा सर्टिफिकेट ऑफ इन्‍शुरन्‍स कं. हा पी 03 जी 0000033532 होता.  सदर पॉलिसी ही दि. 17/12/2019 पासून एक वर्षाकरिता वैध होती.  सदर विमा पॉलिसीसाठी रक्‍कम रु. 2,236/- चा हप्‍ता हा एकरकमी भरला होता.  श्री मारुती रामचंद्र गलांडे यांना दि. 11/3/2020 रोजी रात्री 12 वा. छातीत दुखावयास लागून कळ येवू लागलेने त्‍यांना ताबडतोब डॉ निखिल नेमिनाथ चौगुले यांचे संजीवनी क्लिनिक, बेडग येथे दाखल केले.  डॉ चौगुले हे तपासत असतानाच रात्री 12.50 वा. श्री मारुती रामचंद्र गलांडे यांचा ह्दयविकाराचे धक्‍क्‍याने मृत्‍यू झाला.  तदनंतर तक्रारदारांनी दि. 10/5/2020 रोजी सर्व कागदपत्रांसह वि.प.क्र.2 यांचेकडे क्‍लेम दाखल केला.  वि.प. यांचे अधिकारी/ इन्‍व्‍हेस्‍टीगेटींग अधिकारी यांनी मयताचे मृत्‍यूबाबत तक्रारदाराकडे व परिसरातील लोकांकडे जून 2020 मध्‍ये माहिती घेतलेली आहे.  असे असतानाही वि.प. यांनी तक्रारदाराचा क्‍लेम मंजूर केलेला नाही अथवा क्‍लेम नामंजूर केलेबाबतही कळविलेले नाही.  म्‍हणून तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 29/1/2021 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली असता वि.प. यांनी तक्रारदारास कोणताही प्रतिसाद दिला नाही.  अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने विम्‍याची रक्‍कम रु. 15,00,000/- मिळावी व सदर रकमेवर दि.11/3/2020 पासून तक्रार दाखल तारखेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्‍के दराने होणारे व्‍याज रु.2,70,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- व नोटीस खर्च रु. 15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत विमा पॉलिसी, मयताचा दाखला, डॉ निखिल चौगुले यांचा मयत दाखला, वि.प. यांना पाठविलेली नोटीस, वि.प.क्र.1 ची परत आलेली नोटीस, नोटीसची पोस्‍टाची पावती वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.

 

4.    प्रस्‍तुत कामी वि.प.क्र.1 यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प.क्र.1 याकामी गैरहजर राहिलेने वि.प.क्र.1 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे. 

     

5.    प्रस्‍तुत कामी तक्रारदारांनी दि. 17/9/21 रोजी पुरसीस दाखल करुन वि.प.क्र.2 यांना या प्रकरणातून वगळले आहे.

 

6.   वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

 

होय.

2

वि.प. कंपनीने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे  काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

वि वे च न

 

7.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण मयत श्री मारुती रामचंद्र गलांडे हे एईगॉन लाईफ ग्रुप टर्म इन्‍शुरन्‍स प्‍लॅनचे मेंबर होते.  सदर ग्रूप हा मास्‍टर पॉलिसी होल्‍डर वन 97 कम्‍युनिकेशन लिमिटेड यांचा होता व त्‍यांचेतर्फे मॅनेज केला जात होता.  मयत श्री मारुती रामचंद्र गलांडे हे सदर मास्‍टर पॉलिसी होल्‍डर वन 97 कम्‍युनिकेशन लिमिटेडचे मेंबर असलेने त्‍यांचे ग्रुप जीवन विमा हा सदर ग्रुपचे मेंबर म्‍हणून सदर ग्रुपने उतरविलेला होता.  सदर पॉलिसीखाली त्‍यांनी सिल्‍व्‍हर या बेनिफिटचा ऑप्‍शन घेतला होता.  सदर सिल्‍व्‍हर या बेनिफिट ऑप्‍शनखाली मृत्‍यूसमयी सभासदांना रक्‍कम रु.15,00,000/- चे विमा कवच देणेत आले होते.  मयत श्री मारुती रामचंद्र गलांडे हे मास्‍टर पॉलिसी नंबर पी 01 जी 20190918001 खाली विमाधारक होते व त्‍याचा सर्टिफिकेट ऑफ इन्‍शुरन्‍स कं. हा पी 03 जी 0000033532 होता.  सदर पॉलिसी ही दि. 17/12/2019 पासून एक वर्षाकरिता वैध होती.  सदर पॉलिसीची प्रत तक्रारदार यांनी याकामी दाखल केली आहे.  सदर पॉलिसीवर तक्रारदाराचे पती मारुती रामचंद्र गलांडे यांचे नाव नमूद आहे.  तसेच विमा संरक्षण रक्‍कम रु. 15,00,000/- असलेचे नमूद आहे.  वि.प.क्र.1 यांनी याकामी हजर होवून प्रस्‍तुत बाब नाकारलेली नाही.  तक्रारदार या मयत मारुती रामचंद्र गलांडे यांच्‍या पत्‍नी असलेने त्‍या पॉलिसीच्‍या लाभधारक आहेत.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट सिध्‍द झाली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

8.    तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, श्री मारुती रामचंद्र गलांडे यांना दि. 11/3/2020 रोजी रात्री 12 वा. छातीत दुखावयास लागून कळ येवू लागलेने त्‍यांना ताबडतोब डॉ निखिल नेमिनाथ चौगुले यांचे संजीवनी क्लिनिक, बेडग येथे दाखल केले.  डॉ चौगुले हे तपासत असतानाच रात्री 12.50 वा. श्री मारुती रामचंद्र गलांडे यांचा ह्दयविकाराचे धक्‍क्‍याने मृत्‍यू झाला.  तदनंतर तक्रारदारांनी दि. 10/5/2020 रोजी सर्व कागदपत्रांसह वि.प.क्र.2 यांचेकडे क्‍लेम दाखल केला.  वि.प. यांचे अधिकारी/ इन्‍व्‍हेस्‍टीगेटींग अधिकारी यांनी मयताचे मृत्‍यूबाबत तक्रारदाराकडे व परिसरातील लोकांकडे जून 2020 मध्‍ये माहिती घेतलेली आहे.  असे असतानाही वि.प. यांनी तक्रारदाराचा क्‍लेम मंजूर केलेला नाही अथवा क्‍लेम नामंजूर केलेबाबतही कळविलेले नाही असे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प.क्र.1 यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत.  वि.प. क्र.1 यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्‍दा ते याकामी आयोगात हजर झाले नाहीत.  म्‍हणून, वि.प. यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.  म्‍हणजेच वि.प. क्र.1 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.  तक्रारदारांनी त्‍यांचे कथनाचे पुष्‍ठयर्थ मयत मारुती गलांडे यांचा मृत्‍यू दाखला तसेच डॉ निखिल चौगुले यांचा मयत दाखला दाखल केला आहे.  तसेच तक्रारअर्जातील कथनांचे पुष्‍ठयर्थ पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे.  सबब, तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथनांवर विश्‍वासार्हता ठेवणे न्‍यायोचित वाटते.  सबब, तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू पॉलिसीचे कालावधीत होवून देखील वि.प. यांनी तक्रारदाराचे क्‍लेमबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही ही बाब स्‍पष्‍टपणे शाबीत होते.  सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

9.    सबब, तक्रारदाराने दाखल केलेल्‍या विमा पॉलिसीचे अवलोकन करता विमा संरक्षण हे रक्‍कम रु.15,00,000/- इतक्‍या रकमेचे असलेचे दिसून येते.  सबब, तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचेकडून विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु. 15,00,000/- मिळणेस पात्र आहेत तसेच प्रस्‍तुत रकमेवर तक्रार दाखल केले तारखेपासून रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के दराने व्‍याज वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.   तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- वि.प. क्र.1 यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.

 

      सबब, प्रस्‍तुत कामी आम्‍ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. 

 

 

आदेश

 

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु.15,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/-  वि.प. क्र.1 यांनी तक्रारदारास अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार योग्‍य ती कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.