Maharashtra

Nanded

CC/08/370

Tukaram Limbaji Khillare - Complainant(s)

Versus

ADV.R.G.Hatkar - Opp.Party(s)

25 Mar 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/370
1. Tukaram Limbaji Khillare NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. ADV.R.G.Hatkar NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 25 Mar 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.370/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  26/11/2008.
                          प्रकरण निकाल दिनांक 25/03/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील        अध्‍यक्ष.
                     मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                 मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
 
तुकाराम लिंबाजी खिल्‍लारे                               
वय वर्षे 40, व्‍यवसाय शेती,
रा. देगांव (कु.), ता. अर्धापुर
जि. नांदेड.                                             अर्जदार
विरुध्‍द
1.   व्‍यवस्‍थापक,
     शमा इंण्‍डेन गॅस सर्व्‍हीसेस,
     गॅस गोडावून जवळ, पुर्णा रोड,
     नांदेड.                                         गैरअर्जदार
2.   प्रबंधक,
     दि इंडियन इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
     पि.पि. नंबर 35, लाहोटी कॉम्‍प्‍लेक्‍स,
     वजिराबाद, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे.           - अड.आर.आर. नरवाडे.
गैरअर्जदार क्र.1 तर्फे      - अड.डी.के.कदम.
गैरअर्जदार क्र.2 तर्फे      - अड.एस.व्‍ही.राहेरकर.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
         गैरअर्जदार यांच्‍या ञूटीच्‍या सेवे बददल अर्जदार यांनी नूकसान भरपाई म्‍हणून रु.1,88,300/-, 12 टक्‍के व्‍याजासह मागितले आहेत.
          अर्जदार यांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, अर्जदार हे मौजे देगांव (कु.) ता.अर्धापूर येथे टिन पञाचे घर असून ते 10 8 फुट क्षेञफळाच्‍या तिन खोल्‍यात राहतात. त्‍यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून ग्राहक क्र.05512 याअन्‍वये दि.03.12.2007 रोजी गॅस कनेक्‍शन घेतले आहे. त्‍यावेळेस गैरअर्जदार क्र.1 यांनी असे सांगितले होते की, गॅस सिंलेडर लिकेज होऊन एखादा विपरीत प्रसंग घडला तर त्‍यांचा मावेजासाठी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून विमा उतरविलेला होता. त्‍यांची पॉलिसी नंबर 1609/46/07/22/000017 दिनांक 18.10.2007 ते दि.17.10..2008 या कालावधीसाठी घेतलेली आहे. दि.08.07.2008 रोजी सकाळी आमचे राहत घरात गॅस सिंलेडर लिकेज होऊन स्‍फोट झाला व घरास आग लागली. त्‍यामूळे घरातील सर्व सामान जळून खाक झाले. यासंबंधी यादीप्रमाणे घराच्‍या सामानाची रु.1,68,300/- चे नूकसान झालेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे सांगण्‍यावरुन तहसिलदार यांचेकडे सूचना दिली. त्‍याप्रमाणे दि.08.07.2008 रोजी तलाठी यांनी जायमोक्‍यावर जाऊन पंचनामा केला. अर्धापूर पोलिस स्‍टेशन येथे गून्‍हा नंबर 12/2008 दि.09.07.2008 रोजी नोंदविण्‍यात आला. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून अद्यापही नूकसान भरपाई मिळालेली नाही. त्‍यामूळे झालेल्‍या मानसिक ञासाबददल रु.20,000/- व अर्जाचा खर्च म्‍हणून रु.5,000/- अर्जदार यांनी मागितलेले आहेत.
 
              गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचा तक्रार अर्ज पूर्णतः खोटा आहे. अर्जदार यांनी गॅसचे कनेक्‍शन घेतल्‍यानंतर जवळपास 7 ते 9 महिने झाले आहे परत गॅस नेला नाही. त्‍यामूळे दि.16.03.2007 रोजी पासून त्‍यांचे कनेक्‍शन डेड झाले आहे. कनेक्‍शन बंद असल्‍याकारणाने ते त्‍यांचे ग्राहक नाहीत. नियम व अटी प्रमाणे 90 दिवसांत जर गॅस सिलेंडर नेला नाही तर आपोआप कनेक्‍शन डेड होते. गैरअर्जदारांनी सार्वजनिक विमा उतरविलेला होता. गॅस लिकेज झाला ही बाब खोटी आहे. केवळ माणूसकीच्‍या भावनेतूनच गैरअर्जदार यांनी मदत व्‍हावी म्‍हणून शिफारस केली आहे. अर्जदाराने इतर जून्‍या कंपनीचे सिलेंडर लावण्‍याचा प्रयत्‍न केला व त्‍यांचे चूकीमूळे सदरील घटना घडली यासाठी शमा गॅस एजन्‍सीचा काहीही संबंध नाही. त्‍यामूळे अर्जदाराचा तक्रार खर्चासह फेटाळावा असे म्‍हटले आहे.
 
          गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक नाही. गैरअर्जदार क्र.1 यांचे नांवाने जी पॉलिसी दिलेली आहे ती  Multo Perils L.G.P. dealers Package Insurance अशी असून सदर पॉलिसी ही नियम व अटी यांचे अधीन आहे. नवीन कनेक्‍शन ग्राहकाना देत असताना जर काही दूर्घटना झालीच तर त्‍या परिस्थितीत देणे लागू शकते. नवीन कनेक्‍शन दिल्‍याच्‍यानंतर त्‍या कालावधीत दूर्घटना झाली तर गैरअर्जदार कंपनी जबाबदार राहत नाही. सदरील पॉलिसीचे नियम व अटी दाखल केलेल्‍या आहेत. पॉलिसीमध्‍ये जर गॅस पाईपची गळती होऊन जर काही अपघात झाला तर तो पॉलिसीमध्‍ये समाविष्‍ठ होत नाही. गैरअर्जदाराने सर्व्‍हेअर व लॉस असेंसर श्री. संजय यादवडकर यांना पाठविले असता त्‍यांनी जायमोक्‍यावर जाऊन सर्व्‍हे करुन त्‍याप्रमाणे रु.41,000/- चे नूकसान असेंस केलेले आहे. पॉलिसीतील तरतूदीप्रमाणे कलम 7 यात नवीन कनेक्‍शन देत असताना काही नूकसान झाले तर तरतूदीप्रमाणे म्‍हणजे   while installing New cylinder कंपनी काही देणे लागते. त्‍यामूळे दावा हा पॉलिसीच्‍या तरतूदीमध्‍ये बसत नाही. तलाठी पंचनामा चूकीचा आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे नूकसान झाल्‍या बाबतचे अर्जावर अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही. तलाठयाने केलेला पंचनामा चूकीचा आहे. त्‍यावर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे क्‍लेमवर कोणताही नीर्णय घेतलेला नाही. म्‍हणजे प्रिमॅच्‍यूअर आहे. तेव्‍हा सेवेतील ञूटी होणार नाही. म्‍हणून अर्जदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
 
          अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                               उत्‍तर
1.                 गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द       होय.
करतात काय ?     
                       
2.    काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे
 
                          कारणे
मूददा क्र.1 ः-
 
          अर्जदार हे ग्राहक क्र.15512 अन्‍वये गैरअर्जदार क्र.1 यांचे ग्राहक झालेले आहेत, त्‍यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांचे म्‍हणणेप्रमाणे अर्जदार हे त्‍यांचे ग्राहक नाहीत या म्‍हणण्‍याला काही अर्थ उरत नाही. मूख्‍य वाद आहे तो दि.08.07.2008 रोजी अर्जदार यांचे घरात चहा करीत असताना गॅस लिंक होऊन त्‍यांचा स्‍फोट झाला व घराला आग लागली ही वस्‍तूस्थिती आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी सार्व‍जनिक विमा पॉलिसी नंबर 160900/46/07/22/000017 ग्राहकाच्‍या हितासाठी व अपघातातून होणारी नूकसान भरपाईसाठी दिलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी तब्‍बल 19 महिने अर्जदारांनी त्‍यांचेकडून गॅस सिलेंडर घेतले नाही म्‍हणून त्‍यांचे गॅस कनेक्‍शन डेड झालेले आहे व अर्जदार त्‍यांचा ग्राहक उरलेले नाहीत असा बचावाचा मूददा उरलेला नाही. पण त्‍यांचे कनेक्‍शन डेड झाले किंवा त्‍यांनी गॅस नेला नाही यासाठी कोणताही पूरावा त्‍यांचेकडे रेकॉर्ड उपलब्‍ध असताना दाखल केलेले नाही. उलट गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.22.07.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांना एक पञ लिहून,  अर्जदार त्‍यांचे ग्राहक असून त्‍यांचे घरात सिलेंडरच्‍या स्‍फोटामूळे लागलेल्‍या आगीत नूकसान झाले. त्‍यांना नूकसान भरपाई द्यावी म्‍हणून इन्‍शूरन्‍स कंपनीस शिफारस केलेली आहे. त्‍यामूळे आता गैरअर्जदार क्र.1 यांचा आक्षेप विचारात घेण्‍याजोगा नाही. दि.09.07.2008 रोजी तलाठी यांनी पंचनामा करुन नूकसान भरपाईचा आढावा घेतलेला आहे. तो पंचनामा तसेच एफ.आय.आर. व पोलिस पंचनामा व फोटो देखील या प्रकरणात दाखल आहेत. अर्जदाराचे नूकसान झालेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे मते शमा इंण्‍डेन गॅस ही डिलरच्‍या नांवाने दिलेली पॉलिसी ही  Multi perils L.G.P. dealers package insurance  अशा प्रकारची आहे व यातून वीशेष नियम सेक्‍शन 7/liability  याप्रमाणे  नवीन कनेक्‍शन देताना डिलरच्‍या चूकीमूळे किंवा गॅस सिलेंडर लिकेज होऊन जर अपघात झाला तर अशा परिस्थितीत नूकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी विमा कंपनीने घेतलेली आहे. पण ही अधिकची वीशेष बाब आहे. याशिवाय गैरअर्जदारांनी जी पॉलिसी दाखल केलेली आहे. यात सिरीयल नंबर 13 वर  P.A. Benefit to any customer at ther premices S.I. per customer Rs.15,000/-   यांचा अर्थ ज्‍या घरात गॅस कनेक्‍शन आहे तेथे लिकेज होऊन गॅस गळतीमूळे जर काही अपघात झाला तर प्रत्‍येक ग्राहकामागे रु.15,000/- देण्‍याची विमा कंपनीची जबाबदारी राहिल असे स्‍पष्‍ट आहे. गैरअर्जदार यांनी वकिलामार्फत जो यूक्‍तीवाद केला तो फक्‍त मूददयाचा व वीशेष बाबीसाठी आहे. म्‍हणजे नवीन गॅस कनेक्‍शन देताना अपघात झाला तर विमा कंपनी जबाबदार राहील. सर्व्‍हेअर श्री. संजय यादवडकर  यांनी दि.30.12.2008 रोजीच्‍या सर्व्‍हेअरचा ग्राहय धरला. याप्रमाणे रु.41,000/-  चे नूकसान दाखवलेले आहे. पण   I under signed verified, studied, Multi Perils Policy for Liquefied Petroleum Gas Dealer.   And as per our opinion said loss of attached report is not covered under any section ( From section 1 to 12 ) of said policy. Section 7 (seven) Public Liability Risk   in this section, risk covered while loss occurred at the time of installation, new connection (while installing New Cylinder).  Hence we feel that said claim of client of Insured (Mr. Tukaram Khillare r/0 Degaon) not covered under the scope of policy. 
 
          यामूळे क्‍लेम देय नाही किंवा पॉलिसीमध्‍ये कव्‍हर नाही असे म्‍हटले आहे. हा सर्व्‍हेअरचा नियम पॉलिसीतील सिरीयल नंबर 13 बरोबर जोडला आहे.  विमा कंपनीने प्रत्‍येक ग्राहकासाठी रु.15,000/- ची नूकसान भरपाईची जबाबदारी घेतली असेल तर तेवढीच रक्‍कम ग्राहकांना मिळेल यात नूकसान भरपाई जास्‍त असली तरी जास्‍तीची रक्‍कम विमा कंपनी देण्‍यास बांधील नाही. हे खरे आहे की, अर्जदाराचे नूकसान अधीकचे झालेले आहे.
          वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत.
                        आदेश
1.                                                                 अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते.
2.                                                                 गैरअर्जदार क्र.2 यांनी निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना विम्‍याची रक्‍कम रु.15,000/- प्रकरण दाखल केल्‍याचा दि.26.11.2008 पासून 12 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत.
3.                                                                 गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्‍द आदेश नाही.
4.                                                                 मानसिक ञासाबददल रु.3,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- मंजूर करण्‍यात येतात.
5.                                                                 पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)       (श्रीमती.सुजाता पाटणकर)      (सतीश सामते)    
           अध्यक्ष.                                सदस्या                   सदस्‍य
 
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.