जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 03/2012 तक्रार दाखल तारीख – 05/01/2012
तक्रार निकाल तारीख– 22/03/2013
लिंबाजी यादा चांभार
वय 46 वर्षे, धंदा चांभारकी,
रा.राजेगांव ता.केज जि.बीड
ह.मू.केज न्यायालया समोरच झोपडी. ..अर्जदार
विरुध्द
1) अँड.जे.एस.नाईकवाडे
वय सज्ञान व्यवसाय वकिली
2) अँड.बाळासाहेब जे. नाईकवाडे,
वय, सज्ञान व्यवसाय वकिली,
दोघे रा.केज ता.केज जि.बीड ...गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - स्वतः
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे – कोणीही हजर नाही.
------------------------------------------------------------------------------------ निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तो केज येथील रहिवासी आहे. तक्रारदाराचे वडिलोपार्जित घर राजेगांव ता.केज येथे आहे. तो घरात नवनाथ शिंदे हे अतिक्रमण करुन रहातात. म्हणून तक्रारदाराने सदर शिंदे यांचे विरुध्द केज येथील न्यायालयात वकील श्री.जे.एस.नाईकवाडे व त्यांचा मुलगा बाळासाहेब जे.नाईकवाडे यांचे मार्फत खटला दाखल केला होता. सदर श्री. नाईकवाडे व त्यांचा मुलगा हे या तक्रारीत गैरअर्जदार क्र.1 व 2 आहेत.
या प्रकरणाचा निकाल लावणे कामी दि.31.10.2009 रोजीला गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांचे कडून रु.5000/- (रुपये पाच हजार फक्त) रोख घेतले आहेत.
सदर प्रकरणाचा निकाल लावून न देताच फाईल परत केली व पैसे परत मागितले असता नकार दिला व शिवीगाळ केली. नंतर तक्रारदाराने वकिलांस दिलेले पैसे परत मिळावे म्हणून आमरण-उपोषणाची नोटीस दिली. तेव्हा तहसीलदार केज यांनी त्यांना सक्षम न्यायालयात दाद मागा असा लेखी सल्ला दिला.
म्हणून तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. त्या अंतर्गत त्यांनी दिलेली रक्कम रु.5000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याज दराने दि.31.10.2009 पासून मागितले आहेत. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2000/- असे एकूण रु.12,000/- मागितले आहेत.
गैरअर्जदारांनी मंचाने पाठवलेली नोटीस “ नांवात बदल आहे “ म्हणून नाकारली. म्हणून अर्जदाराने त्यांचेसाठी दि.25..12.2012 रोजी दैनिक पुण्यनगरीत जाहीर प्रकटन दिले. तरी देखील गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले नाहीत. सबब मंचाने दि.20.02.2012 रोजी प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्याचा हूकूम झाला.
तक्रारदार स्वतः हजर झाले. त्यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराने युक्तीवादात सांगितले की, गैरअर्जदारांकडून त्यांला लेखी नोटीस आली होती परंतु त्यात त्यांच्या विरुध्द मजकूर होता म्हणून त्यांने नोटीस स्विकारली नाही. युक्तीवादात त्यांनी सांगितले की, पैसे परत मागण्यासाठी गेले असताना गैरअर्जदारांनी त्यांना शिवीगाळ केली व हाकलून दिले.
वरील विवेचनावरुन खालील मूददे मंचाने विचारात घेतले.
मूददे उत्तर
1. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे का ? नाही.
2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुददा क्र.1 व 2 ः-
अर्जदाराने अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्रे बघीतली त्यात रोजनामा नक्कल, कोर्टान काढलेले मुददे, मुळ दावा, वकीलपत्र , कोर्टासमोर केलेले काही अर्ज व कागदपत्रे आहेत. त्यातील वकीलपत्रावर श्री.जी.एन.नाईकवाडे व श्री.आर.जी.नाईकवाडे अशी वकिलांची नांवे आहेत. तर गैरअर्जदार म्हणून श्री. जे.एस.नाईकवाडे व बाळासाहेब जे. नाईकवाडे अशी नांवे आहेत. जी दाव्यातील वकिलांशी जुळत नाही. दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन संबंधीत वकील कोर्टासमोर गैरहजर होते असे दिसत नाही. त्यांनी दावा दाखल केला होता. प्रतिवादीच्या अर्जाला “ से ” दिला होता. (दि.13.03.10) (दि.16.11.10) त्याच प्रमाणे दाखल कागदपत्रावरुन दावा अजूनही प्रलंबित आहे. त्यांचा निकाल लागलेला नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदारांचे नांव दाव्यातील वकिलांच्या नांवाशी जुळत नाही तसेच गुणवत्तेचा विचार केला असता देखील तक्रारदारांनी गैरअर्जदारांनी सेवेत काही कमतरता दिली आहे असे दिसत नाही. सबब, तक्रारदार हा दाद मिळण्यास पात्र नाही असे मंचाचे मत आहे.
मंच खालील आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
1.
2. खर्चाबददल आदेश नाही.
2.
. 3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड