सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाले क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी
तक्रारदार यांचे बचत खात्यातील व मुदतठेवीवरील एकूण रक्कम
रु.1,91,458/-(अक्षरी रु.एक लाख, एक्याण्ण्व हजार, चारशे
अठ्ठावण्ण) ठरलेल्या व्याजासह हा आदेश प्राप्त झाल्यापासून
30 दिवसाचे आत द्यावी. सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास
आदेशाच्या तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल होईपावेतो
द.सा.द.शे.11 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाले क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5000/-
व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड