जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २०७/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २९/११/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ३०/०९/२०१३
१) श्रीमती शकुंतलाबाई रामदास शिंपी, उ.व.६५,
धंदा – घरकाम
२) सौ. अलका अशोक बोरसे, उ.व.४५,
धंदा – घरकाम
दोघे राहणार – नवा प्रकाशा रोड, सागर बेकरीच्या
बाजुला, साईकृपा ट्रॅक्टर गॅरेजच्या मागे, शहादा,
तालुका – शहादा, जिल्हा – नंदूरबार. .............. तक्रारदार
विरुध्द
धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी
सहकारी पतसंस्था मर्या. धुळे, २९४१, ग.नं.४,
धुळे, ता.जि. धुळे.
नोटीसीची बजावणी प्रशासक यांच्यावर व्हावी. ............ जाबदेणार
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी. जोशी)
(सामनेवाले तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार ‘धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अंतर्गत रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ. क्रं. |
तक्रारदाराचा नंबर |
ठेव पावती नंबर |
तारीख |
देय तारीख |
देय रक्कम |
१ |
१ |
२९७१९ |
०४/१०/०४ |
०४/१०/१० |
२०,०००-०० |
२ |
१ |
२९७२० |
०४/१०/०४ |
०४/१०/१० |
२०,०००-०० |
३ |
१ |
२९७२१ |
०४/१०/०४ |
०४/१०/१० |
२०,०००-० |
४ |
१ |
बचत खात क्र.२४ |
|
०३/०४/१० अखेर |
१०,३९०-०० |
५ |
२ |
बचत खाते क्रं.२६ |
|
१४/०९/१० अखेर |
२०,०००-०० |
एकूण रूपये |
९०,३९०-०० |
२. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून मुदत ठेव पावती व बचत खात्यामधील एकूण रक्कम रू.९०,३९०/- व त्यावर रक्क्म मिळेपर्यंत द.सा.द..शे. १२% व्याज देण्याचा आदेश व्हावा. तसेच शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रू.२५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च जाबदेणार यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ मुदत ठेव पावत्या व बचत खाते पुस्तकाच्या छायांकित प्रती नि.६/१ ते नि. ६/७ वर दाखल केलेल्या आहेत.
३. जाबदेणार यांना नोटीसची कल्पना मिळूनही मे.मंचात हजर न झालेने सामनेवाला यांचे विरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्यात येत आहे.
४. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विदवान वकीलानी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
४. तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. अंतिम आदेश ? आदेशाप्रमाणे
विवेचन
५. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावत्या व बचत खाते पुस्तकाच्या छायांकित प्रती नि.६/१ ते नि.६/७ वर दाखल केलेल्या आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावती व बचत खाते मधील रक्कमा नाकारलेल्या नाही. मुदत ठेव पावती व बचत खातेमधील असलेली रक्कम याचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
६. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही जाबदेणार यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदत ठेव पावतींमधील व बचत खातेमधील व्याजासह होणारी रक्कम जाबदेणार धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. धुळे यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे.
वरील बाबींचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार पतसंस्था धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. धुळे यांचेकडून मुदत ठेव पावतींमधील व बचत खातेमधील एकूण रक्कम रू.९०,३९०/- सदर आदेश तारखे पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दरा प्रमाणे व्याजासह, अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतींमधील व बचत खातेमधील व्याजासह होणारी रक्कम जाबदेणार यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना जाबदेणार पतसंस्था धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुदृा क्रं.४ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र.५- वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. जाबदेणार यांनी सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) मुदत ठेव पावतींमधील व बचत खातेमधील असलेली एकूण देय रक्कम रू.९०,३९०/- (अक्षरी नव्वद हजार तीनशे नववद मात्र) ही देय ता.०४/१०/२०१० पासून द.सा.द.शे. ६ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
धुळे.
दि.३०/०९/२०१३
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.