विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,
वाशिम.
तक्रार क्रमांक : १९/२०१४ दाखल दिनांक :२९/०३/२०१४
निर्णय दिनांक :२७/०४/२०१५
निर्णय कालावधी : ०१ वर्ष २९ दिवस
तक्रारकर्ता : गोविंद डिगांबर देवळे, वय २५ वर्ष
तक्रारकर्ते यांचे तर्फे रा.हुडको कॉलनी, मंगरुळपीर ता.मंगरुळपीर.
अॅड.एस.बी.अग्रवाल जि.वाशिम
// विरुध्द //
विरुध्द पक्ष : व्यवस्थापक,
विरुध्द पक्ष यांचे तर्फे तिरुपती ट्रॅक्टर्स, स्वागत लॉन जवळ, वाशिम
अॅड.पी.बी.बगडीया ता.जि.वाशिम
पारित व्दारा :- १. मा.सौ.एस.एम.उंटवाले, अध्यक्षा
२. मा.श्री.ए.सी.उकळकर,सदस्य
३. मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड, सदस्या
::: आ दे श :::
( पारित दिनांक : २७/०४/२०१५ )
आदरणीय सदस्य, मा.ए.सी.उखळकर, यांचे अनुसार : -
१. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये, सादर करण्यात
आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणे प्रमाणे,
..२..
तक्रारकर्ते हे मंगरुळपीर येथील रहीवाशी असुन, ते शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्तेला स्वत:च्या शेतीच्या कामाकरीता व व्यवसाया करीता ट्रॅक्टर घ्यायचे होते. त्याकरिता तक्रारकर्ते विरुध्दपक्ष यांच्या शोरुमध्ये चौकशी करण्याकरिता नोव्हेंबर २०१३ मध्ये गेले होते. त्यावेळी विरुध्दपक्ष यांनी ट्रॅक्टर बाबत माहिती देऊन महिंद्रा-५७५ या ट्रॅक्टरचे कोटेशन दिले होते. सदर कोटेशन हे रु.६,०७०००/- संपूर्ण साहित्यासह दिले होते. तसेच कोटेशन दिल्या नंतर तक्रारकर्ते यांना विरुध्दपक्ष यांच्या शोरुम मधुन वारंवार फोन करुन ट्रॅक्टर घेण्या विषयी आग्रह करीत होते. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष यांच्याकडे तक्रारकर्तेकडे असलेली तवेरा गाडी क्र.एमएच २० बीए ३७९० एक्सचेंज करण्याविषयी विचारपुस केली. त्यावेळी तक्रारकर्तेला विरुध्दपक्ष यांनी तवेरा गाडी शोरुममध्ये आणण्या विषयी सांगितले. त्यानुसार तक्रारकर्तेने त्यांची तवेरा गाडी शोरुममध्ये नेल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी गाडीची किंमत रु.३,६५,०००/- अशी ठरविली. तक्रारकर्ते व विरुध्दपक्ष यांचे झालेल्या बोलणीवरुन सदरहू तवेरा गाडी एक्सचेंज करुन तवेरा गाडीची किंमत ट्रॅक्टरच्या किंमतीमधून कमी करुन देण्याविषयी विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना आश्वासन दिले. त्यानुसार तक्रारकर्ते यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये तवेरा गाडी विरुध्दपक्ष यांना दिली. त्याबाबतची तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे गाडी एक्सचेंज केल्याबद्दल वारंवार पावतीची मागणी केली. त्यानंतर शेवटी विरुध्दपक्ष यांनी दि.२४.०१.२०१४ ला गाडी एक्सचेंज केल्याबद्दलची पावती दिली.
..३..
तक्रारकर्ते यांनी ट्रॅक्टर करीता एच.डी.एफ.सी.बँक,शाखा वाशिम येथून रु.४,०२,३००/- चे ट्रॅक्टर कर्ज काढून त्याचा धनादेश विरुध्दपक्ष यांना दिला. त्यानंतर दि.२८.११.२०१३ ला रु.९९,०००/- चे रोटावेटर विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना दिले. तसेच दि.१५.०२.२०१४ ला नगदी रु.८,८००/- असे एकूण रु.७,७६,१००/- तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष यांना दिले. त्यामधून फक्त विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना रु.९९,०००/- चे रोटावेटर दिले. ट्रॅक्टर घेतल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना बिल देण्यास टाळाटाळ केली. वारंवार बिलाची मागणी केल्यावर तक्रारकर्ते यांना विरुध्दपक्ष यांनी शेवटी दि.०५.०३.२०१४ ला मागील तारखेचे (दि.२५.११.२०१३) रु.६,५७,०००/- चे बिल दिले. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी आर.टी.ओ.,वाशिम येथे चौकशी केली असता तेथे विरुध्दपक्ष यांनी सदर ट्रॅक्टरचे बिल रु.५,४८,०१९/- असे दाखल केले आहे. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष यांना रु.७,७६,१००/- दिले. त्यामध्ये विरुध्दपक्ष यांनी फक्त रु.९९,०००/- चे रोटावेटर दिले. ती रक्कम वजा जाता विरुध्दपक्ष यांना तक्रारकर्ते यांनी सर्वप्रकारे रु.६,७७,१००/- दिले.
संपूर्णबाबीचे अवलोकन केले असता तक्रारकर्ते यांचे असे लक्षात आले की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तेकडून रु.१,२९,०८१/- जास्तीची रक्कम घेती आहे. त्याबाबत तक्रारकर्तेने विरुध्दपक्ष यांचेकडे वारंवार सदर रक्कमेची मागणी केली. परंतु विरुध्दपक्षयांनी सदरहू रक्कम पुढील महिन्यात देतो असे सांगून नेहमी तक्रारकर्त्याची फसवणूक केली. त्यामूळे तक्रारकर्तेने नाईलाजाने दि.०७.०३.२०१४ला रजिष्टर पोष्टाने विरुध्दपक्षाला नोटिस देउन सदर रकमेची
..४..
मागणी केली, परंतू विरुध्दपक्षला नोटिस मिळूनसुध्दा विरुध्दपक्षाने सदर नोटीसचे उत्तर दिले नाही किंवा तक्रारकर्तेचे पुर्तता सुध्दा केली नाही. त्यामूळे नाईलाजाने तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाकडून सदर रक्कम वसूल करुन मिळण्या साठी वि.कोर्टात तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
तरी तक्रारकर्ते यांची विनंती आहे की, सदर तक्रार मंजुर व्हावी. तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाकडून रु.१,२९,०८१/- जास्तीची दिली गेलेली रक्कम परत देण्याचा आदेश व्हावा. तसेच मानसिक, आर्थिक त्रासाबद्दल रु.१०,०००/-, तक्रार खर्च रु. १०,०००/- व वकील फी रु.५०००/- विरुध्दपक्षाकडून १८ % व्याज दराने तक्रारकर्ते यांना मिळण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार तक्रारकर्ते यांनी शपथेवर दाखल केलेली असुन त्या सोबत एकुण १० दस्ताऐवज पुरावे म्हणुन दाखल केलेले आहे.
२) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब ः- सदर तक्रारीची मंचा तर्फे नोटिस प्राप्त झाल्या नंतर विरुध्दपक्षाने त्यांचा लेखी जवाब सादर करुन तक्रारकर्त्याचे सर्व कथन फेटाळुन अधिकच्या कथनात असे नमुद केले आहे की,
दि.१४.०२.२०१४ रोजीचे बिल दाखल करण्यात आले आहे ते चुकीचे आहे. विरुध्दपक्षाचे कार्यालयातून अशा प्रकारचे कोणतेही बिल देण्यात आलेले नाही. असे दिसते तक्रारकर्तेने रबर स्टॅम्प बनवून बनावट बिल दाखल केलेले आहे.
तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष कार्यालयातून संबंधीत ट्रॅक्टरच्या किमती विषयी कोटेशन घेतले होते. त्यावेळेस ट्रॅक्टर ची किंमत रु.६,०७,०००/- होती. त्याकोटेशनवर तक्रारकर्तेची सही आहे. या शिवाय ज्या दिवशी तक्रारकर्ते ट्रॅक्टर
..५..
विकत घेईल ती किंमत आकारली जाईल असा स्पष्ट उल्लेख आहे. शिवाय विमा व इतर खर्च भरण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे. विरुध्दपक्षा जवळून तक्रारकर्तेने रु.९९,०००/- चे एक रोटा वेटर सुध्दा विकत घेतले होते व त्याची पूर्ण रक्कम देण्याची जबाबदारी तक्रारकर्ते यांची होती व आहे. संबंधीत कंपनीकडून वेळोवेळी व सणानिमीत्त काही ऑफर्स असतात. त्या ऑफर्सची विक्री जास्त होत असेल तर दिल्या जातात. ज्यावेळेस ट्रॅक्टर विकत घेतले त्यावेळेस ट्रॅक्टरची किंमत रु.६,५७,०००/- होती. त्या शिवाय त्यावेळेसचे जे कर येतात ते कर भरण्याची जबाबदारी म्हणजेचं नोंदणी करिता लागणारा खर्च व विम्याचा खर्च हा तक्रारकर्तेने दयायचा होता. त्यानुसार दि.२५.११.२०१३ रोजी त्या वेळेसच्या दारानुसार बिल बनविण्यात आले त्या वेळेस कोणतीही सुट नव्हती. त्यावेळेसच्या दरा नुसारच रक्कम आकारली होती. या शिवाय रोटा वेटरची किंमत रु. ९९,०००/- विमा व इतर खर्च तक्रारकर्तेयांनाच दयायचा होता. संबंधीत बँकेकडून केवळ रु.३,९५,०००/- चा धनादेश मिळाला. रोटा वेटरची किंमत धरुन तक्रारकर्तेने जी रक्कम दिली आहे तितक्या रुपयाचे बिल तक्रारकर्तेला मिळालेले आहे त्यामूळे तक्रारकर्ते जवळून कोणतीही जास्तीची रक्कम घेण्यात आली नाही. तक्रारकर्तेचे जे म्हणने आहे कि, विरुध्दपक्षाकडे त्याची रक्कम निघते हे म्हणने चुकीचे आहे. ट्रॅक्टरच्या किमती शिवाय रु.१४,०००/- चा खर्च, विमा व इतर रक्कम ट्रॅक्टर नोंदणीकरिता लागला. विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्तेची कोणतीही फसवणुक झाली नाही. जितकी रक्कम दिली तितक्या रकमेचे बिल देण्यात आले आहे. त्यामुळे तक्रारकर्ते यांना कोणतीही रक्कम मागता येत नाही.
..६..
काही एक कारण नसतांना दुस-यांच्या सांगण्यावरुन तक्रारकर्ते यांनी खोटे आरोप केलेले आहे. जी रक्कम ट्रॅक्टर विकत घेतांना ठरली होती ती रक्कम ग्राहकाची असते रु.६,०७,०००/- चे कोटेशन तक्रारकर्तेला विरुध्दपक्षाने दिले होते. त्यामुळे तक्रारकर्तेला केलेल्या करारापासून परावृत्त होता येत नाही. संबंधीत कालावधीमध्ये ट्रॅक्टर विक्रीवर कोणतीही सुट नव्हती.
दिनांक २५.११.२०१३ रोजी तक्रारकर्तेने जी जुनी तवेरा गाडी दिली होती त्यासह पुर्ण हिशोब करण्यात आला. त्या हिशोबावर तक्रारकर्तेची व विरुध्दपक्षाच्या संबंधीत कर्मचा-याची सही आहे. तो हिशोब खालील प्रमाणे आहे.
महिंद्रा ट्रॅक्टर ५७५ मॉडेल पि.एस. रु.६,५७,०००/-
विमा व आर.टी.ओ.पासिंग रु. १४,०००/-
रोटा वेटर रु. ९९,०००/-
एकुण किंमत रु. ७,७०,०००/-
जुनी गाडी तवेरा मॉडेल २०१० चे रु. ३,६५,०००/-
घेणे बाकी रु. ४,०५,०००/-
दिनांक २५.११.२०१३ रु. ११००/-
बाकी रक्कम रु. ४,०९,३००/-
अशा प्रकारचा हिशोब तक्रारकर्ते व विरुध्दपक्षाने केलेला आहे. त्यावर दोघांच्याही सहया आहेत. त्यामुळे जी किंमत ठरली होती तितकीच आकारण्यात
..७..
आलेली आहे. तक्रारकर्तेला बिलाची रक्कम व इतर खर्च मंजुर होता ते बिल तक्रारकर्तेला बंधनकारक आहे. त्यांनतर विरुध्दपक्षाला एच.डी.एफ.सी. बँकेकडून केवळ रु.३,९५,०००/- मिळाले अशा प्रकारे विरुध्दपक्षाकडे जास्तीची रक्कम कोणतीही जमा नाही. या उलट विरुध्दक्षाला बाकी रक्कम तक्रारकर्ते कडून घेणे बाकी आहे. तक्रारकर्ते ते रक्कम देण्यास टाळाटाळ करित आहे व मुद्दामहून हे प्रकरण दाखल केले आहे.
सदर प्रकरण वि.मंचाच्या अधिकारक्षेत्रामध्ये येत नाही शिवाय तक्रारकर्ते हे वि.मंचासमक्ष खोटी तक्रार घेऊन आलेला असून स्वच्छ हाताने आलेला नाही. आवश्यक बाबींची पुर्तता केलेली नाही. त्यामूळे सदर तक्रार ही खोटी व फसवी असल्यामूळे ग्रा.सं.का. कलम २६ प्रमाणे खारिज व्हावी व या गैरअर्जदाराला नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.१०,०००/- देण्यात यावे,हि विनंती करिता हा लेखी जबाब दिला आहे.
3) कारणे व निष्कर्ष ः-
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब,
उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकला व लेखी युक्तीवाद, यांचे मंचाने काळजीपूर्वक अवलोकन करुन पूढील निष्कर्ष कारणे देऊन आदेश पारित केला तो येणे प्रमाणे.
उभयपक्षाना मान्य असलेली बाब पुढील प्रमाणे आहेत. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून महिंद्र ५७५ या कंपनीचे ट्रॅक्टर व रोटावेटर विकत घेतलेले आहेत.
..८..
तक्रारकर्त्याने युक्तीवाद केला कि, विरुध्दपक्षाने सदरहू ट्रॅक्टरच्या किमती बाबतचे कोटेशन रु.६,०७,०००/- चे दिले. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष यांच्याकडे असलेली तवेरा गाडी क्र.एम.एच.२० बी.ए.३७९० एक्सचेंज करण्या विषयी विचारपुस केली व त्या नुसार सदरहु गाडीची किंमत ३,६५,०००/- ठरविण्यात आली व ती रक्कम ट्रॅक्टरच्या किंमतीमधून कमी करण्या बाबत तक्रारकर्ते व विरुध्दपक्ष यांच्यामध्ये ठरले. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून रु.९९,०००/- किंमतीचे एक रोटोवेटर विकत घेतले. तक्रारकर्त्याच्या म्हणन्या नुसार तक्रारकर्त्याने एच.डी.एफ.सी. शाखा बँक वाशिम येथून ४,०२,३००/- रुपयाचे कर्ज काढून सदरहू धनादेश विरुध्दपक्षाला दिला. व तसेच दि.१५.०२.२०१४ ला नगदी रु.८,८००/- असे एकुण ७,७६,१००/- रुपये तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाला दिले. तक्रारकर्ते यांनी युक्तीवाद केला कि, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला बिलाची वारंवार मागणी करुन सुध्दा बिल दिले नाही व शेवटी दि.०५.०३.२०१४ रोजी मागील तारखेचे (२५.११.२०१३) रु.६,५७,०००/- चे बिल दिले. त्या नंतर तक्रारकर्तेयांनी आर.टी.ओ.वाशिम येथे चौकशी केली असता, विरुध्दपक्ष यांनी सदर ट्रॅक्टरचे बिल ५,४८,०१९/- असे दाखल केले आहे. परंतू तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष यांना ७,७६,१००/- रुपये दिले. तक्रारकर्तेचे म्हणने आहे कि, विरुध्दपक्षयांनी तक्रारकर्तेकडून रु.१,२९,०८१/- रक्कम जास्तीची घेतली आहे. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडे सदरहु रकमेची वारंवार मागणी करुन सुध्दा विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला सदरहु रक्कम न दिल्याने प्रस्तुत प्रकरण सदरहु रक्कमेची मागणी करीता दाखल करण्यात आले आहे.
..९..
विरुध्दपक्षाने युक्तीवाद केला कि, तक्रारकर्त्याने दि.१४.०२.२०१४ रोजीचे दाखल केलेले बिल चुकीचे आहे. सदरहु बिल विरुध्दपक्षाच्या कार्यालयातुन देण्यात आलेले नसुन बनावट स्वरुपाचे आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या कार्यालयातून ट्रॅक्टरचे किंमती विषयीचे कोटेशन घेतले त्यावेळेस ट्रॅक्टरची किंमत रु.६,०७,०००/- होती व त्या कोटेशनवर तक्रारकर्तेयांची सही आहे. व तसेच ज्या दिवशी तक्रारकर्ता ट्रॅक्टर घेईल ती किंमत आकारण्यात येईल असे कोटेशनवर उल्लेख आहे. शिवाय विमा व ईतर खर्च भरण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची आहे. तक्रारकर्तेने युक्तीवाद केला कि, सबंधीत कंपनीकडून वेळोवेळी व सना निमित्य काही ऑफर्स असतात जर विक्री जास्त होत असेल तर त्या दिल्या जातात. ज्या वेळेस तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर विकत घेतले त्यावेळेस ट्रॅक्टरची किंमत रु. ६,५७,०००/- होती. तसेच लागणारे कर, नोंदनी खर्च व विम्याचा खर्च हा तक्रारकर्त्याने द्यावयाचा होता व त्यानुसार दि.२५.११.२०१३ रोजीच्या दरानुसार बिल बनविण्यात आले. विरुध्दपक्षाला संबंधीत बँकेकडून केवळ रु. ३,९५,०००/- चा धनादेश मिळाला. तसेच रु. १४,०००/- चा खर्च विमा व ईतर रक्कम ट्रॅक्टर नोंदनी करीता लागला. विरुध्दपक्षाने युक्तीवाद केला कि, त्यांनी तक्रारकर्त्याची कोणतीही फसवणूक केली नाही. जी किंमत ट्रॅक्टर विकत घेता वेळेस ठरली होती तीच रक्कम तक्रारकर्त्याला आकारण्यात आली आहे. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते कि, विरुध्दपक्ष व तक्रारकर्ते यांच्यामध्ये पुढील प्रमाणे करार झाला होता.
..१०..
महिंद्रा ट्रॅक्टर ५७५ मॉडेल पि.एस. रु.६,५७,०००/-
विमा व आर.टी.ओ.पासिंग रु. १४,०००/-
रोटा वेटर रु. ९९,०००/-
एकुण किंमत रु. ७,७०,०००/-
जुनी गाडी तवेरा मॉडेल २०१० चे रु. ३,६५,०००/-
घेणे बाकी रु. ४,०५,०००/-
दिनांक २५.११.२०१३ रु. ११००/-
बाकी रक्कम रु. ४,०९,३००/-
व उर्वरीत राहलेली रक्कम ही कोणत्याही बँकेच्या डी.डी.नुसार दि.१५.१२.२०१३ च्या आत देणार .
तक्रारकर्त्याने जन माहिती अधिकारा अंतर्गत प्रादेशीक परिवहन कार्यालय, वाशिम यांच्याकडून मिळविलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते कि, सदरहु ट्रॅक्टरची किंमत रु.६,५७०००/- आहे. सदरहु बाबीवरुन स्पष्ट बोध होतो कि, ट्रॅक्टरची जी किंमत विरुध्दपक्ष व तक्रारकर्ते यांच्यामध्ये ठरली होती ती रु.६,५७,०००/- होती. म्हणून तक्रारकर्त्याचे म्हणने कि, सदरहू ट्रॅक्टरची किंमत रु.५,४८,०१९/- अशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखविण्यात आली होती, हि बाब मान्य करता येणार नाही.
..११..
विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते कि, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून रु.६,५७,०००/- किमतीच्या ट्रॅक्टर व्यतीरिक्त एक रु.९९,०००/- किमतीचे रोटावेटर विकत घेतलेले आहेत. तसेच या सर्व किमतीमधून तक्रारकर्तेची जुनी तवेरा गाडीची किंमत रु.३,६५,०००/- कमी करण्यात आलेली आहे. विमा, व आर.टि.ओ.पासिंगला लागणा-या खर्चाची एकुण रक्कम मिळुन असे दिसुन येते कि, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून रु.१,२९,०८१/- जास्तीचे घेतलेले नाही. विरुध्दपक्ष व तक्रारकर्ते यांच्यामध्ये झालेल्या करारानुसारच त्यांच्यामध्ये व्यवहार झाला आहे. असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्षाने कुठलीही अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला नाही असे या न्याय मंचाचे मत आहे.
सबब खालील आदेश पारित करण्यात आला.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्ता यांची तक्रार खारीज करण्यात येते.
२. न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत नाहीत.
३. उभयपक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड, मा.श्री.ए.सी.उकळकर मा.सौ.एस.एम.उंटवाले,
सदस्या सदस्य अध्यक्षा
दि २७.०४.२०१५
स्टेनो/गंगाखेडे