Maharashtra

Beed

CC/14/176

Ambadas Tatyaba garje - Complainant(s)

Versus

Administrator ,The Beed District Central Co-Op Bank Ltd - Opp.Party(s)

Adv Bodkhe

22 Jan 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/172
 
1. Ashvani Navnathrao Jadhav
R/o Watanwadi Ta Ashti
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Administrator ,The Beed District Central Co-Op Bank Ltd
Head Office Rajuri ves Beed
Beed
Maharashtra
2. Branch Manager, Beed District Central Co op Bank Ltd
Branch Ashti Ta Ashti
Beed
Maharashtra
3. Branch Manager,The Beed District Central Co-Op Bank Ltd
Branch Kada Ta Ashti
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/14/173
 
1. Indubai Niwrati Darekar
R/o Murshadpur Ashti Ta Ashti
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Administrator ,The Beed District Central Co-Op Bank Ltd
Head Office Rajuri ves
Beed
Maharashtra
2. Branch Manager, Beed District Central Co op Bank Ltd
Branch Ashti Ta Ashti
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/14/174
 
1. Jagnath Deorao Aute
R/o Nanda Ta Ashti
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Administrator ,The Beed District Central Co-Op Bank Ltd
Head Office Rajurivesh
Beed
Maharashtra
2. Branch Manager, Beed District Central Co op Bank Ltd
Branch Ruinalkol Ta Ashti
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/14/175
 
1. Aajinath Balkrishna Aute
R/o Nanda Ta Ashti
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Administrator ,The Beed District Central Co-Op Bank Ltd
Head office Rajuri ves Beed
Beed
Maharashtra
2. Branch Manager,The Beed District Central Co-Op Bank Ltd
Branch Dhamangaon Ta Ashti
Beed
Maharashtra
3. Branch Manager, Beed District Central Co op Bank Ltd
Branch Ashti Ta Ashti
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/14/176
 
1. Ambadas Tatyaba garje
R/o Khilad Ta Ashti
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Administrator ,The Beed District Central Co-Op Bank Ltd
Head Office Rajurivesh Beed
Beed
Maharashtra
2. Branch Manager,The Beed District Central Co-Op Bank Ltd
Branch Dhamangaon Ta Ashti
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 22.01.2015

                  (द्वारा- श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्‍या)

             तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी  तक्रारदार यांना द्यावयाच्‍या  सेवेत त्रुटी ठेवली आहे म्‍हणून  नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

 

            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार हया मौजे वटणवाडी ता.आष्‍टी जि.बीड येथील रहिवाशी असून  गृहीणी आहे. तक्रारदार यांचे पती परिवहन विभागात नोकरीस होते. सन 2009 मध्‍ये तक्रारदाराचे पती सेवानिवृत्‍त झाले आहेत.  सामनेवाला क्र.1 हे प्रशासक आहे. सामनेवाला क्र.2 व 3 हे शाखा व्‍यवस्‍थापक आहे. तक्रारदार यांनी त्यांच्‍याकडे खालील तपशिलाप्रमाणे रक्‍कम ठेवलेली होती व आहे.

 

अ.क्र.

बीड जिल्‍हा मध्‍यवर्ती सह.बँकेची शाखेचे नांव

बचत खाते क्र./मुदत ठेव क्र.

रक्‍कम

बचत खाते/ठेवीवरील व्‍याज दर

मॅच्‍युरिटी तारीख

 

 

 

 

 

 

 

 

1.

आष्‍टी

जुना 067-0024565

नविन खाते क्र.000711002006356

32004     

4.5%

लागु नाही

2.

आष्‍टी

ठेव क्र.07994

100000

9%

28.2.14

3.

आष्‍टी

ठेव क्र.07497

50000     

9%

28.2.14

4.

आष्‍टी

ठेव क्र.07498

50000     

9%

28.2.14

5.

कडा  

जुना 067-0020955

नविन खाते क्र.002111002008333

34365

4.5%

लागु नाही

6.

कडा

ठेव क्र.0007836   

100000

8%

28.5.13

7.

कडा

ठेव क्र.028669

100000

8%

3.6.13

 

 

एकूण रक्‍कम

466369

 

 

 

 

येणेप्रमाणे तक्रारदाराच्‍या रक्‍कमा बचत खाते आणि मुदतठेवीमध्‍ये सामनेवाला नं.2 व 3 यांच्‍या शाखेमध्‍ये असून संबंधित शाखाधिकारी यांच्‍या ताब्‍यात तक्रारदाराची रक्‍कम आहे.मुदत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर तक्रारदारास व्‍याजासहीत रक्‍कम देणे सामनेवाला यांचेवर बंधनकारक आहे. तक्रारदार हे गरज पडेल तेव्‍हा  सदरील खात्‍यातून पैसे काढतात. तक्रारदार यांना प्रापंचीक अडचण असल्‍यामुळे त्‍यांचे खात्‍यातील रक्‍कम काढणेसाठी गेले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्‍या  बचत खात्‍यातून पैसे देण्‍यास  टाळाटाळ केली.

 

            तक्रारदार हयांचे पती सेवानिवृत्‍त झाल्‍यामुळे त्‍यांना कुटूंबाचे प्रापंचिक अडचण असल्‍याने  सदर रकमेची आवश्‍यकता असल्‍यामुळे वेळोवेळी गैरअर्जदार बँकेत जावून रकमेची मागणी केली असता सामनेवाला क्र.2 व 3 ने सध्‍या बँकेची बिकट परिस्थिती आहे, पैसे शिल्‍लक नाहीत असे सांगून तक्रारदारास वेळोवेळी परत पाठविले. तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेल्‍या तारखेप्रमाणे सामनेवाला यांच्‍याकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली परंतू सामनेवाला यांनी अद्यापपर्यंत तक्रारदारास मुदत ठेवीतील रक्‍कम दिली नाही. तक्रारदाराचे पती सेवानिवृत्‍त झाल्‍यामुळे त्‍यांना फक्‍त  रक्‍कम रु.1805/- पेन्‍शन मिळते. सदर पेन्‍शनवर तक्रारदार यांचे कुटूंबाचे उदरनिर्वाह चालत नाही. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे. ग्राहकास योग्‍य ती सेवा देण्‍यास सामनेवाला हे बंधनकारक आहे. असे असताना सुध्‍दा सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे मुदत ठेवीतील रक्‍कम न देऊन सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे. तक्रारदारास प्रापंचिक व घरगुती अडचणीमुळे रकमेची आवश्‍यकता आहे. तसेच तक्रारदाराची ही रक्‍कम हक्‍काची असतानाही सामनेवाला यांनी योग्‍य त्‍या वेळेत सदर रक्‍कम न देऊन सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रास झाला आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून एकूण मुदत ठेवीतील व बचत खात्‍यातील रक्‍कम रु.4,66,369/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.50,000/-, आर्थिक नुकसानीपोटी रु.55000/- तक्रारीचा खर्च रु.10,000/- असे एकूण रु.5,81,369/-  व्‍याजासह  देण्‍याचे आदेश व्‍हावे अशी विनंती केली आहे.

 

            सामनेवाला क्र.1 ते 3 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी आपली लेखी कैफियत दाखल केली. तक्रारदार यांची रक्‍कम सामनेवाला यांच्‍याकडे  मुदतठेवीमध्‍ये  जमा आहे हे म्‍हणणे बरोबर आहे. तसेच सामनेवाला यांनी बँकेची परिस्थिती बिकट असल्‍यामुळे तक्रारदारास सदर रक्‍कम देता आली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यास रक्‍कम देण्‍यास केव्‍हाही टाळाटाळ केली नाही किंवा नकार दिला नाही. म्‍हणून सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे असे म्‍हणता येणार नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास बँकेच्‍या  परिस्थितीबददल माहिती दिली आहे. त्‍यामुळे रकमेवर 18 टक्‍के व्‍याज देणे हे मागता येणार नाही. तक्रारदार यास शारिरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मागण्‍याचा अधिकार नाही. तक्रारदार यांनी सदर तक्रार ही मा.जिल्‍हा  उपनिबंधक सहकारी संस्‍था बीड यांचेकडून परवानगी घेऊन दाखल करणे आवश्‍यक होते परंतू तक्रारदार यांनी परवानगीशिवाय  सदर तक्रार दाखल केली आहे म्‍हणून तक्रार रदद करण्‍यात यावी. तसेच नुकसान भरपाई खर्च मागता येणार नाही. बँकेची परिस्थिती सुस्थितीत आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. बँकेकउे रक्‍कम जमा झाल्‍यानंतर नियमानुसार प्रशासकीय मंडळ तक्रारदारांना त्‍यांची ठेव देण्‍यास बांधील आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करण्‍यात यावी.

 

            तक्रारदार यांनी मुदत ठेव व बचत खाते क्रमांकासह सदर बचत खाते उता-याची प्रत दाखल केली आहे. सामनेवाला यांना दिलेल्‍या  अर्जाच्‍या     प्रती, इत्‍यादी  कागदपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी  स्‍वतःचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदार यांचे वकील श्री.बोडखे यांचा युक्‍तीवाद ऐकला. सामनेवाला यांचा युक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

               मुददे                                   उत्‍तर

1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांची मुदतठेव व बचत

   खात्‍यातील रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज न देऊन

   सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, ही बाब तक्रारदार यांनी

   शाबीत केली आहे काय?                                 होय.

2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास

   पात्र आहे काय?                                        होय.

3) आदेश काय ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                        कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः- तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेला पुरावा व युक्‍तीवाद याचे अवलोकन केले. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तसेच सामनेवाले यांचेकडे तक्रारीत नमुद केल्‍याप्रमाणे बचत खात्‍यात व मुदत ठेवीची रक्‍कम जमा आहे ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तक्रारदार यांनी सदरील रकमेची मागणी सामनेवाला यांच्‍याकडे केली असता सामनेवाला यांनी सदर रक्‍कम ही तक्रारदारास दिली नाही.

 

            सामनेवाला यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारीत नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदार यांची मुदत ठेव रक्‍कम जमा आहे हे म्‍हणणे बरोबर आहे. बँकेची परिस्थिती ही बिकट असल्‍यामुळे तक्रारदार यांना बचत खात्‍यात असलेली रक्‍कम देता आली नाही. बँकेचे कर्ज वसूल झाल्‍यानंतर   नियमानुसार प्रशासक मंडळ तक्रारदार यांना मुदत ठेवीची रक्‍कम देण्‍याची तरतूद करतील.

 

            तक्रारदार यांचे वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती सेवानिवृत्‍त झाल्‍याने त्‍यांना कौटूंबिक गरजा भागविण्‍यासाठी सदर रकमेची आवश्‍यकता आहे, ही बाब सामनेवाला यांच्‍या लक्षात आणून दिल्‍यानंतरही सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्‍या बचत खात्‍यातील रक्‍कम दिली नाही. सबब तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रास झाला आहे. केवळ बँकेची परिस्थिती बिकट आहे या कारणास्‍तव खातेदाराला रक्‍कम काढण्‍यापासून वंचित ठेवता येणार नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना त्‍यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम न देऊन सेवा देण्‍यात कसूर केला आहे. तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्‍कम देण्‍याचा आदेश देण्‍यात यावा ही विनंती केलेली आहे.

 

            वर नमुद केलेला युक्‍तीवाद लक्षात घेतला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्‍हणणे याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे तक्रारीत नमुद केल्‍याप्रमाणे बचत खात्‍यात व मुदतठेवीमध्‍ये एकूण रक्‍कम रु.4,66,369/- जमा केली आहे. खातेदार हे सामनेवाला बँकेमध्‍ये बचत खाते उघडतात व तसेच मुदतठेवीमध्‍ये आपली रक्‍कम विश्‍वासाने  गुंतवितात. खातेदाराची सदरील रक्‍कम ज्‍या ज्‍या वेळेस आवश्‍यकता भासेल त्‍या वेळेस खात्‍यातून त्‍यांना रक्‍कमा काढता यावी व मुदतठेवीचा कालावधी संपल्‍यानंतर सदरील रक्‍कम त्‍यांना मिळावी असा उददेश असतो. तक्रारदार यांनी मोठया विश्‍वासाने सामनेवाला बँकेमध्‍ये बचत खाते उघडले व मुदतठेवी ठेवल्‍या. सदरील मुदतठेवीचा कालावधी संपुष्‍टात आला. तक्रारदार यांनी सदरील रक्‍कम मिळावी म्‍हणून सामनेवाला यांच्‍याकडे वेळोवेळी मागणी केली. सामनेवाला यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली.  बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, याबाबत  जरी सामनेवाला यांनी कथन केले असले तरी, तसा कोणताही पुरावा या मंचासमोर हजर केला नाही. सामनेवाला यांनी ज्‍या लोकांना कर्ज वाटले आहे त्‍या   कर्जदारांकडून कर्ज वसूल करुन घेऊन ठेवीदारांचे पैसे तातडीने देणे गरजेचे आहे. त्‍याबाबत सामनेवाला यांनी कार्यवाही केल्‍याबाबत अहवाल या मंचासमोर नाही. तक्रारदार यांनी जी मुदतठेव ठेवलेली आहे ती रक्‍कम मुदतीनंतर व्‍याजासह देण्‍याची जबाबदारी सामनेवाला यांचेवर आहे. बँकेच्‍या  आर्थिक स्थितीला तक्रारदार हे जबाबदार नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्‍या बचत खात्‍यातील व मुदतठेवीतील रक्‍कम देण्‍याची टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रास झाला आहे. सबब या मंचाचे मत की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे बचत खात्‍यातील व मुदतठेवी वरील रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे. तक्रारदार हे तक्रारीत केलेली मागणी मिळण्‍यास पात्र आहे. मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

          सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                        आदेश

         1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

         2) सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार यांचे

            सामनेवाला यांच्‍याकडे बचत खाते क्र. 067-0024565 मध्‍ये

            भरणा केलेली रक्‍कम रु.32,004/- (अक्षरी रु.बत्‍तीस हजार, चार)

            सदर रकमेवर जमा असलेल्‍या तारखेपासून तक्रार दाखल

            दि.23.09.2014 पर्यंत द.सा.द.शे.4.5 टक्‍के व्‍याजाने हा आदेश

            प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावे. सदर रक्‍कम विहीत

            मुदतीत न दिल्‍यास त्‍यावर तक्रार दाखल दिनांकापासून संपूर्ण

            रक्‍कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज द्यावे.

        3)  सामनेवाले क्र.1 व 3 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार यांचे

            सामनेवाला यांच्‍याकडे बचत खाते क्र. 067-0020955 मध्‍ये

            भरणा केलेली रक्‍कम रु.34,365/- (अक्षरी रु.चौतीस हजार, तिनशे

            पासष्‍ट) सदर रकमेवर जमा असलेल्‍या तारखेपासून तक्रार दाखल

            दि.23.09.2014 पर्यंत द.सा.द.शे.4.5 टक्‍के व्‍याजाने हा आदेश

            प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावे. सदर रक्‍कम विहीत

            मुदतीत न दिल्‍यास त्‍यावर तक्रार दाखल दिनांकापासून संपूर्ण

            रक्‍कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज द्यावे.

         4) सामनेवाले क्र 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार

            यांनी सामनेवाला यांच्‍याकडे मुदत ठेव पावती क्र.07994 मध्‍ये

            जमा असलेली रक्‍कम रु.1,00,000/- मुदत ठेव  पावती

            तारखेपासून द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याजाने हा आदेश प्राप्‍त

            झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावे. सदर रक्‍कम विहीत मुदतीत

            न दिल्‍यास सदरील रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज तक्रार

            दाखल दिनांकापासून संपूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यंत द्यावे.

         5) सामनेवाले क्र 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार

            यांनी सामनेवाला यांच्‍याकडे मुदत ठेव पावती क्र.07497 मध्‍ये

            जमा असलेली रक्‍कम रु 50,000/- व मुदत ठेव  पावती

            क्र.07498 मध्‍ये जमा असलेली रक्‍कम रु.50,000/- मुदत ठेव

            पावती तारखेपासून द.सा.द.शे.10.50 टक्‍के व्‍याजाने हा आदेश

            प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावे. सदर रक्‍कम विहीत

            मुदतीत न दिल्‍यास सदरील रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज

            तक्रार दाखल दिनांकापासून संपूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यंत द्यावे.

         6) सामनेवाले क्र 1 व 3 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार

            यांनी सामनेवाला यांच्‍याकडे मुदत ठेव पावती क्र.007836 मध्‍ये

            जमा असलेली रक्‍कम रु 1,00,000/-(अक्षरी रु.एक लाख) मुदत

            ठेव पावती तारखेपासून द.सा.द.शे.10.50 टक्‍के व्‍याजाने हा आदेश

            प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावे. सदर रक्‍कम विहीत

            मुदतीत न दिल्‍यास सदरील रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज

            तक्रार दाखल दिनांकापासून संपूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यंत द्यावे.

        7)  सामनेवाले क्र 1 व 3 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार

            यांनी सामनेवाला यांच्‍याकडे मुदत ठेव पावती क्र.028669 मध्‍ये

            जमा असलेली रक्‍कम रु 1,00,000/-(अक्षरी रु.एक लाख) मुदत

            ठेव पावती तारखेपासून द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याजाने हा आदेश

            प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावे. सदर रक्‍कम विहीत

            मुदतीत न दिल्‍यास सदरील रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज

            तक्रार दाखल दिनांकापासून संपूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यंत द्यावे.

 

         8) सामनेवाले क्र 1 व 3 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार

            यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5000/-

            व तक्रारीच्‍या  खर्चापोटी  रक्‍कम रु.2,000/- दयावेत.

         9) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील

            कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला

            परत करावेत.

 

 

 

          श्री.रविंद्र राठोडकर,   श्रीमती मंजूषा चितलांगे,    श्री.विनायक लोंढे,

               सदस्‍य               सदस्‍य               अध्‍यक्ष

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.