Maharashtra

Dhule

CC/12/189

Ku.Nilima Omprakash Agrwal - Complainant(s)

Versus

Administrator, Shri Agrasen Sahkari Patsanstha Ltd. Dhule - Opp.Party(s)

Shri Y.B.Joshi

13 Aug 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/12/189
 
1. Ku.Nilima Omprakash Agrwal
23,G.B.nager, Malegaon Rd. Dhule
...........Complainant(s)
Versus
1. Administrator, Shri Agrasen Sahkari Patsanstha Ltd. Dhule
Pushpanjali market,Purti Bldg.Agra Rd. Dhule
Dhule
Maharashtra
2. Chairman, Shri Niraj B.Chaudhari, Shri Agrasen Sahkari Patsanstha Ltd. Dhule
Deputy Registrar Co.Op.Shirpur, Dist Dhule.
Dhule
Maharashtra
3. Member, Shri S.S.Bhoi ,
Sahkar Adhikari Class 1 , Deputy Registrar Co.Op. Dhule.
Dhule
Maharashtra
4. Member, Shri S.B.Chauhan ,
Office of Dist. Vishesh Lekha Parikashak Sah.Sanstha, Class-1 Dhule, Rande Smruti,gali No. 4 Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 HON'BLE MRS. K.S. Jagpati MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक   –  १८९/२०१२

                                  तक्रार दाखल दिनांक  – ३१/१०/२०१२

                                 तक्रार निकाली दिनांक – १३/०८/२०१४

 

    कु. निलीमा ओमप्रकाश अग्रवाल  

     उ.व.- १६ धंदा – शिक्षण  

   अ.पा.क ओमप्रकाश भटुलाल अग्रवाल

     उ.व.-४७ धंदा – व्‍यापर

     रा.२३, जी.बी.नगर, मालेगांव रोड,

     धुळे                                            . तक्रारदार                      

    

      विरुध्‍द

 

  1. श्री. अग्रसेन सहकारी पतसंस्‍था मर्यादित, धुळे  

    पुष्‍पांजली मार्केट, पुर्ती बिल्‍डींग,

    आग्रारोड, धुळे

    नोटीसीची बजावणी प्रशासक किंवा

    मॅनेजर/पतपेढीतील कर्मचारीवर करावी.

  1. अध्‍यक्ष

श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्‍था मर्यादित, धुळे

श्री.निरज बी. चौधरी

उ.व. - सज्ञान धंदा - नोकरी

पत्‍ता – सहायक उपनिबंधक सहकारी संस्‍था

शिरपुर ता.शिरपुर जि.धुळे

  1. सदस्‍य

श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्‍था मर्यादित, धुळे

श्री.एस.एस. भोई

उ.व.- सज्ञान धंदा – सहकार अधिकारी प्रथम श्रेणी

पत्‍ता - सहकार अधिकारी प्रथमश्रेणी

द्वारा – उपनिबंधक सहकारी संस्‍था, धुळे

  1. सदस्‍य

श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्‍था मर्यादित,धुळे

श्री.ए.बी. चव्‍हाण

उ.व.-सज्ञान धंदा-लेखा परिक्षक प्रथम श्रेणी

पत्‍ता – लेखा परिक्षक प्रथम श्रेणी, अधिन जिल्‍हा

विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्‍था वर्ग-१,

धुळे हयांचे कार्यालय, रानडे स्‍मृती, ग.नं.४,

धुळे.                                     . सामनेवाले                     

                   

  •  

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)

 

 

उपस्थिती

(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.वाय.बी. जोशी)

(सामनेवाले तर्फे – एकतर्फा)

 

निकालपत्र

 (द्वाराः मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

 

१.     तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍या पतसंस्‍थेत ‘धनसंचय ठेव’ या योजनेत  गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.

 

२.  तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले ‘श्री. अग्रसेन सहकारी पतसंस्‍था मर्यादित, धुळे’  या पतसंस्‍थेत ‘धनसंचय ठेव’  या योजनेत रक्‍कम गुंतविली होती. या योजनेतील नियमानुसार दरमहा १०० रूपये १२० महिन्‍यात भरल्‍यानंतर ५ वर्षे मुदतीनंतर रक्‍कम रूपये ६०,००० मिळेल. त्‍यानंतर तक्रारदार यांनी खाते क्रमांक १४ उघडले व योजनेनुसार दरमहा १००/- रूपये प्रमाणे नियमीत रोख १२० हप्‍ते सामनेवाले पतसंस्‍थेत भरले. या योजनेप्रमाणे दि.२९/०४/१९९७ पासुन १५ वर्षात म्‍हणजे दि.२९/०४/२०१२ अखेर रू.६०,०००/- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे होते.

 

३.   तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे वरील देय रक्‍कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाले यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही.  सबब तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडून धनसंचय ठेव योजनेमधील देय रक्‍कम रू.६०,०००/- व त्‍यावर मुदतपूर्ण दिनांकापासून द.सा.द.शे. १०% प्रमाणे व्‍याज आणि मानसिक, आर्थिक, शारिरीक त्रासाबाबत रक्‍कम रू.१०,०००/- व सदर तक्रारीचा खर्च रक्‍कम रूपये १,०००/- सामनेवाले यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्‍यात आला. 

 

४.    तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ट्यर्थ धनसंचय ठेव योजनेच्‍या  खाते उता-याची छायांकित प्रत दाखल केलेली आहे.

 

५.    सामनेवाले यांना मे. मंचाच्‍या नोटीसची बजावणी होवूनही ते मुदतीत हजर  झाले नाहीत व त्‍यांनी खुलासा दाखल केला नाही. त्‍यामुळे त्‍यांचे विरूध्‍द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्‍यात आला आहे.

 

६.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.

 

              मुददे                                    निष्‍कर्ष

  1.  तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?           होय
  1.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    

 कसूर केली आहे काय ?                                                     होय

  1.  तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍याकडून देय रक्‍कम

 व्‍याजासह आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्‍या

 खर्चापोटी भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?          होय

ड.  आदेश काय ?                              अंतिम आदेशा प्रमाणे

 

 

  • वेचन

७.  मुद्दा -  तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे ‘धनसंचय ठेव’ योजनेत रक्‍कम गुंतविली होती. आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ट्यर्थ त्‍यांनी धनसंचय ठेव योजनेच्‍या खाते उता-याची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. त्‍यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते.  म्‍हणून मुददा ‘अ’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

८. मुद्दा -  तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता,  त्‍यांनी पतसंस्‍थेत धनसंचय ठेव योजनेत रक्‍कम गुंतविली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे गुंतवलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतु मागणी करुनही रक्‍कम दिलेली नाही ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा ‘ब’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

९. मुद्दा - तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या धनसंचय ठेव योजनेमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाले पतसंस्‍था, अध्‍यक्ष व सदस्‍य श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्‍था मर्यादित, धुळे यांच्‍याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. सामनेवाला क्र.२,३ व ४ हे शासकीय कर्मचारी असल्‍यामुळे त्‍यांना तक्रारदारांची रक्‍कम देण्‍यास जबाबदार धरता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले श्री. अग्रसेन सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, धुळे यांचेकडून धनसंचय ठेव योजनेमधील मुदतीअंती देय रक्‍कम रूपये ६०,०००/- व त्‍यावर दि.२९/०४/२०१२ पासून संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के दराप्रमाणे व्‍याज अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

 

    तक्रारदार यांनी दाखल केलेली धनसंचय ठेव योजनेमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाले यांच्‍याकडून परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना सामनेवाले पतसंस्‍था श्री. अग्रसेन सहकारी पतसंस्‍था मर्यादित, धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे.  सबब तक्रारदार  हे  सामनेवाले  यांच्‍या कडून  मानसिक  त्रासापोटी रु.२०००/-  व  अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.१०००/- भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा ‘क’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

१०. मुद्दा - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आ दे श

 

  1.  तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

  1. सामनेवाले श्री. अग्रसेन सहकारी पतसंस्‍था मर्यादित, धुळे यांनी, सदर        आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना        खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.

 

  • अ) धनसंचय ठेव योजनेमधील मुदतीअंती देय रक्‍कम रूपये  ६०,०००/- (अक्षरी रूपये साठ हजार मात्र) व त्‍यावर दि.०२/०५/२०१२ पासून  संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्‍के दराप्रमाणे व्‍याज द्यावे.  

 

  •       ब) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.२,०००/- (अक्षरी रूपये दोन हजार            मात्र) व  अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक          हजार मात्र) दयावेत.  

 

    ३. वर नमूद आदेशाची अमंलबजावणी      (अध्‍यक्ष/ संचालक/ व्‍यवस्‍थापक/      अवसायक)  यापैकी वेळोवेळी जे कोणी  पतसंस्‍थेचा  कारभार पाहात          असतील त्‍यांनी करावी.  तसेच आदेश २(अ) मधील  रकमेपैकी काही        रक्‍कम अगर  व्‍याज दिले  असल्‍यास,  कर्ज दिले असल्‍यास सदरची       रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.  

 

  1.  
  2.  

(श्री.एस.एस. जोशी)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)

  •           अध्‍यक्ष

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER
 
[HON'BLE MRS. K.S. Jagpati]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.