तक्रार दाखल दिनांकः 05/01/2016
आदेश पारित दिनांकः 09/09/2016
तक्रार क्रमांक. : 106/2015
तक्रारकर्ता : श्री चंद्रकांत देवचंदजी रेवतकर
वय – 35 वर्षे, धंदा – व्यापार
रा. कस्तुरबा गांधी वार्ड, ता.जि. भंडारा.
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) प्रशासक,
साफल्य नागरी सह.पत संस्था,
भंडारा
2) व्यवस्थापक, साफल्य नागरी सह.पत संस्था,
मोठा बाजार, सेंट्रल बँकेजवळ, भंडारा
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड.पी.एम.रामटेके व अॅड.एन.के.गजभिये
वि.प. : व्यवस्थापक, अरुण वैदय
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. हेमंतकुमार पटेरिया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक - 09 सप्टेंबर, 2016)
अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
1) संक्षेपाने तक्रारदाराचे म्हणणे असे की, अर्जदार चंद्रकांत देवचंदजी रेवतकर यांचे गैरअर्जदार साफल्य जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. भंडारा यांचेकडे नित्यनिधी खाते क्र. 14369 आहे. सदर खात्यात अर्जदाराने दररोज रक्कम जमा केली असून दिनांक 05/3/2011 पर्यंत एकुण जमा रक्कम रुपये 53,000/-+ व्याज रुपये 1,740/- मिळून एकुण जमा रक्कम रुपये 54,740/- होती. सदरच्या रकमेची मागणी अर्जदाराने गै.अ. कडे वेळोवेळी करुनही गैरअर्जदाराने रक्कम परत केली नाही या उलट अर्जदाराची कसल्याही प्रकारची संमती न घेता दिनांक 19/12/2011 रोजी सदर रक्कम रुपये 57,740/- बचत खाते क्रमांक 283 मध्ये स्वमर्जीने हस्तांतरित केले. वरील रक्कम त्यास परत करण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदाराने ती परत केली नाही. गै.अ. ही बॅंकीग व्यवहार करणारी संस्था असल्याने ठेवीदाराची रक्कम त्यांना पाहिजे तेव्हा परत करण्याची गै.अ. ची कायदेशीर जबाबदारी आहे. खातेदारांनी रक्कम मागणी केली असता ती परत न करणे व परस्पर बचत खाते क्र.283 मध्ये स्वमर्जीने हस्तांतरित केले ही गै.अ. ने अवलंबीलेली बॅंकीग सेवेतील ञुटी आणि अनुचित व्यापार पद्धती आहे म्हणुन अर्जदाराची गैरअर्जदाराकडे बचत खात्यात जमा असलेली रक्कम रुपये 54,740/- दिनांक 05/03/2011 पासुन द.शा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत करण्याचा, तसेच शारीरीक व मानसिक ञासाबद्दल रुपये 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 8,000/- देण्याचा गै.अ. विरुद्ध आदेश व्हावा अशी अर्जदाराने सदरच्या तक्रारीत मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीच्या कथनापृष्ठर्थ निशानी 2 नुसार 30 दस्तऐवज दाखल केले आहे.
2) अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ. विरुद्ध नोटीस काढण्यात आल्यावर गै.अ. ने हजर होऊन लेखी जबाब दाखल केला आहे. त्यात अर्जदाराची रक्कम परत न करु शकल्यामुळे खेद व्यक्त करत आहे असे कबुल केले आहे. त्यांचे पुढे म्हणणे असे की, संस्थेला अर्जदाराची रक्कम परत करणे अशक्य आहे. माञ भविष्यात संस्थेकडे ज्या प्रमाणात वसुली रक्कम प्राप्त होईल त्याप्रमाणे अर्जदारास त्याची रक्कम परत करण्यात येईल.
3) अर्जदार व गैरअर्जदार यांच्या कथनावरुन खालिल मुद्दे विचारार्थ मंचासमोर आले त्यावरील निष्कर्ष व त्याची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
मुद्दे निष्कर्ष
1) | वि.प.ने सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला आहे काय ? | - | होय. |
2) | तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | - | अंशतः |
3) | अंतीम आदेश काय ? | - | अंतीम आदेशाप्रमाणे तक्रार अंशतः मंजुर. |
कारणमिमांसा
4) सदर प्रकरणात तक्रारदार चंद्रकांत देवचंदजी रेवतकर यांनी त्याची साक्ष शपथपञावर निशानी क्र. 13 प्रमाणे दिली आहे. गै.अ. ने शपथेवर साक्ष निशानी क्र. 14 प्रमाणे दिली आहे. गै.अ. आणि त्याचे अधिवक्ता यांनी लेखी जबाब हा युक्तीवाद म्हणुन समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली आहे.
मुद्दा क्रमांक 1 बाबत
5) या प्रकरणातील गैरअर्जदार ही सहकारी पतसंस्था असुन लोकांकडुन ठेवी स्विकारण्याचा आणि सभासदांना कर्ज देण्याचा व्यवसाय करते. अर्जदाराने सदर संस्थेकडे त्यांचे नित्य निधी ठेव खाते क्र. 14369 मध्ये वेळोवेळी जमा केलेली रक्कम व्याजासह रुपये 54,470/- शिल्लक असल्याचे गैरअर्जदार ने लेखी बयाणात कबुल केले आहे. तसेच अर्जदाराने यादी निशानी क्र.2 सोबत दाखल दैनिक नित्य निधी ठेव जमा रजिस्टर दस्त क्र. 2/1 प्रमाणे सदर रक्कम अर्जदाराचे खात्यात असल्याचे दिसते. अर्जदारास जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा बचत खात्यातील रक्कम मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे परंतु अर्जदाराने दस्तऐवजाची यादी निशानी क्र. 2 सोबतच्या दस्त क्र. 2/3 प्रमाणे लेखी व तोंडी मागणी करुनही संस्थेची आर्थिक स्थिती चांगली नाही या सबबीवर अर्जदाराची रक्कम परत करण्याचे गैरअर्जदाराने टाळले आहे. खातेदारांची रक्कम त्याने मागणी केल्यावर न देणे ही बॅंकीग व्यवसाय करणा-या गैरअर्जदार संस्थेच्या सेवेतील ञुटी असुन ती अनुचीत व्यापार पद्धतीचे घोतक आहे. गैरअर्जदाराची आर्थिक स्थिती चांगली नाही ही बाब अर्जदाराची बचत खात्यातील रक्कम परत न करण्यास समर्थनीय कारण ठरु शकत नाही.
6) अर्जदाराने सदर रकमेवर दिनांक 05/03/2011 पासुन द.शा.द.शे. 18 टक्के व्याजाची मागणी केली आहे. सदर संस्था ग्राहकांना ठेवीवर किती टक्के व्याज देते याबाबत अर्जदाराने त्यांच्या अर्जात किंवा गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी बयाणात कोणताही उल्लेख केलेला नाही. गैरअर्जदार संस्थेने अर्जदाराच्या बचत खात्यातील रक्कम रुपये 54,740/- अर्जदारास परत न करता अनधिकृतपणे बचत खाते क्र. 283 नुसार रोखुन ठेवली आहे. म्हणुन अर्जदार सदर रकमेवर द.शा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पाञ आहे. वरील कारणामुळे मुद्दा क्रमांक 1 वरील मंचाचा निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
7) गैरअर्जदाराकडे अर्जदाराची जी रक्कम घेणे आहे त्यावर अर्जदाराच्या मागणी प्रमाणे द.शा.द.शे. 12 टक्के व्याज मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे शारीरीक व मानसिक ञासापोटी अर्जदाराने केलेली रुपये 10,000/- ची मागणी समर्थनीय नाही. या सदरखाली अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरीक ञासाबद्दल रुपये 5,000/- नुकसान भरपाई मंजूर करण्यात येते. गैरअर्जदाराने अर्जदारास वेळेवर रक्कम न दिल्याने त्यास सदर ची तक्रार दाखल करावी लागली म्हणुन तक्रारीच्या खर्चाबाबत अर्जदारास रुपये 5,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील
तक्रार वि.प. क्र.1 व 2 विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजुर करण्यात येत
आहे.
2. गै.अ. ने अर्जदाराचे नित्य निधी खाते क्र. 14369 मध्ये दिनांक 05/03/2011 रोजी शिल्लक असलेली रक्कम रुपये 54,740/- दिनांक 06/03/2011 पासुन द.शा.द.शे. 12 टक्के व्याजासह अर्जदारास 2 महिण्याचे आत परत करावी.
3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान
भरपाई रुपये 5,000/-(पाच हजार) दयावी.
4. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/-
(पाच हजार) दयावे.
5. वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून दोन महिन्याचे आत
करावी.
6. गै.अ. ने दिलेल्या मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 25 व 27 अन्वये होणा-या कारवाईस पाञ राहील.
7. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
8. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.