जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 564/2015 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः-8/12/2015.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-17/3/2016.
श्री भगवान धनसिंग सोनवणे,
उ व सज्ञान, धंदाः चालक,
रा.मु पो कानळदा,ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
महिंद्रा अण्ड महिंद्रा फायनान्शीयल सर्व्हीस लि, तर्फे
व्यवस्थापक,
रा.कृषी उत्पन्न बाजार समिती, काशिनाथ स्टॉप जवळ,
अजिंठा रोड,जळगांव,ता.जि.जळगांव. ........... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री जयवंत ए चौधरी वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर. रेकॉर्डचे अवलोकन केले. मागील दि.2/2/2016, दि.16/2/2016 व दि.2/03/2016 या तारखांना तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर. सामनेवाला यांना नोटीस काढण्याचे आदेश करण्यात आले. तक्रारदार यांनी नोटीस बजावणी कामी हमदस्त दि.15/12/2015 रोजी घेतली तदनंतर सदरील नोटीस बजावणी कामी पाठवली आहे किंवा नाही याबाबत कोणताही खुलासा दाखल केलेला नाही.
2. रेकॉर्डचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने अंतरीम आदेश मिळण्यासाठी अर्ज केला होता सदरील अर्जावर न्यायमंचाने जैसे थे किंवा वादातील वाहनाबाबत जी परिस्थिती आहे ती परिस्थिती ठेवावी असे आदेश केले. तदनंतर तक्रारदार व त्यांचे वकील यांनी सामनेवाला यांना नोटीस बजावणीकामी कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारदारास नोटीस बजावणीकामी ब-याच संधी देण्यात आल्या. तक्रारदार व त्यांचे वकील सतत गैरहजर राहीले व स्टेप्स घेतल्या नाहीत त्यामुळे पुढील आदेशासाठी असा आदेश नि.क्र.1 वर दि.16/2/2016 रोजी करण्यात आला. आजही तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर आहेत. सबब उपलब्ध पुराव्याआधारे प्रस्तुत तक्रार निकालासाठी घेतली. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) तक्रारदाराची तक्रार ग्राहक या संज्ञेखाली या मंचासमोर
चालण्यास पात्र आहे काय ? नाही.
2) कोणता आदेश ? शेवटी दिलेप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 व 2 ः
3. तक्रारदार व सामनेवाला यांचे वादाचे स्वरुप लक्षात घेतले असता वादातील वाहन हे प्रकाश औंकार चव्हाण यांचे मालकीचे आहे. सदरील प्रकाश चव्हाण यांनी सामनेवाला फायनान्स कंपनीकडुन कर्ज घेतलेले आहे व तसा करारनामा लिहुन दिलेला आहे. तक्रारदार व प्रकाश औंकार चव्हाण यांचेमध्ये करार झाल्याचे निर्दशनास येते. सदरील वाहनावर कर्ज असल्यामुळे ते तक्रारदाराचे नांवे हस्तांतरीत होत नाही. सदरील वाहनावरील कर्ज न दिल्यास फायनान्स कंपनीला करारातील शर्ती व अटी नुसार सदरील वाहन ताब्यात घेऊन विक्रीचे अधिकार प्राप्त होतात. सदरील वाहन तक्रारदाराचे नांवावर नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन स्वतः कर्ज काढलेले नाही त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत. प्रथमदर्शनी सदरील तक्रार रद्य होणेस पात्र आहे. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्या क्र. 2 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज रद्य करण्यात येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 17/3/2016. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.