Maharashtra

Bhandara

CC/16/135

Anantram Mangruji Giripunje - Complainant(s)

Versus

Administrator, Laxmi Mahila Gramin Bigar Sheti sahkari Pat Sanstha Ltd - Opp.Party(s)

Adv Harde

13 Jun 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/16/135
 
1. Anantram Mangruji Giripunje
Girola,Post Kardha Tah Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Administrator, Laxmi Mahila Gramin Bigar Sheti sahkari Pat Sanstha Ltd
Silli,Post Silli
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.G.CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Jun 2017
Final Order / Judgement

श्री. मनोहर चिलबुले, अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

आ दे श -

      (पारित दिनांक – 13 जून, 2017)

1.           तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारकर्त्‍याची संक्षिप्‍त तक्रार अशी आहे की, त्‍याने वि.प.लक्ष्‍मी महिला बिगरशेतकी सहकारी संस्‍थेत खालीलप्रमाणे मुदतीठेवीची रक्‍कम ठेवलेली आहे आणि संस्‍थेने तक्रारकर्त्‍यास मुदत ठेव पावत्‍या दिलेल्‍या आहेत.

अ.क्र.

ठेव रक्‍कम

ठेवीचा दिनांक

मुदतपूर्ती दिनांक

मुदत पूर्तीची रक्‍कम

1

रु.52,000/-

24.08.2015

24.08.2016

रु.58,760/-   

2

रु.1,50,000/-

05.08.2015

05.08.2016

रु.1,69,500/-  

3

रु.60,000/-

05.08.2015

05.08.2016

रु.67,800/-   

4

रु.75,000/-

05.08.2015

05.08.2016

रु.84,750/-   

5

रु.65,000/-

21.07.2015

21.07.2016

रु.73,450/-   

6

रु.50,000/-

21.07.2015

21.07.2016

रु.56,500/-   

7

रु.50,000/-

17.06.2015

17.06.2016

रु.56,500/-   

8

रु.44,000/-

28.05.2015

28.05.2016

रु.49,720/-   

9

रु.37,000/-

19.05.2015

19.05.2016

रु.41,810/-    

10

रु.27,500/-

19.10.2015

19.10.2016

रु.31,075/-    

11

रु.50,000/-

09.10.2015

09.10.2016

रु.56,500/-   

12

रु.12,000/-

03.10.2015

03.10.2016

रु.13,560/-    

13

रु.1,13,000/-

16.09.2015

16.09.2016

रु.1,27,690/-  

14

रु.80,000/-

15.09.2015

15.09.2016

रु.90,400/-   

15

रु.15,000/-

08.09.2015

08.09.2016

रु.16,950/-    

16

रु.40,000/-

03.09.2015

03.09.2016

रु.45,200/-   

17

रु.30,000/-

29.10.2010

29.10.2016

रु.60,000/-

 

एकूण ठेवी रु.9,50,000/- मुदत पूर्तीची रक्‍कम रु.11,00,165/- .

 

            वरील ठेवीची मुदतपूर्ती झाल्‍यावर मुदत पूर्तीच्‍या रकमेची तक्रारकर्त्‍याने वि.प.कडे मागणी केली असता वि.प.ने ती नाकारली. तक्रारकर्त्‍याने अधिवक्‍ता श्री.एम.जी.हरडे यांचेमार्फत वि.प.ला दि.25.10.2016 आणि 28.10.2016 रोजी नोटीस पाठवून मुदतपूर्तीची रक्‍कम रु.11,00,165/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह, तसेच नुकसान भरपाई रु.50,000/- देण्‍याची मागणी केली. सदर नोटीस मिळूनही वि.प.ने पूर्तता केली नाही किंवा उत्‍तरही दिले नाही. सदरची बाब ठेवीदार ग्राहकाप्रती सेवेतील न्‍यूनता असल्‍याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.

  1. वि.प.ने ठेवींच्‍या मुदतपूर्तीची एकूण रक्‍कम रु.11,00,165/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचा आदेश व्‍हावा.
  2. शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.50,000/- मिळावी.
  3. तक्रार खर्च रु.20,000/- मिळावा.

 

 

            तक्रारीचे पुष्‍ट्यर्थ तक्रारकर्त्‍याने मुदत ठेव प्रमाणपत्रांच्‍या एकूण 17 प्रती व रजि. नोटीस आणि पोस्‍टाची पावती व पोचपावती दाखल केलेली आहे.

 

2.                वि.प.ने लेखी जवाब दाखल केला असून तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने वि.प. संस्‍थेत मुदती ठेवी ठेवल्‍या असल्‍याचे मान्‍य केले आहे. संस्‍थेच्‍या सभासदांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली नसल्‍याने तक्रारकर्त्‍यास मुदत ठेवीची रक्‍कम परत करता आली नसल्‍याचे आणि संस्‍था एकमुस्‍त मुदत ठेवीची परिपक्‍वता राशी परत करण्‍यास असमर्थ असल्‍याचे म्‍हटले आहे. संस्‍थेची सभासदांकडून जशी वसूली होईल तशी तक्रारकर्त्‍यास देणे रक्‍कम प्राधान्‍याने परत करण्‍यांत येईल असेही म्‍हटले आहे. संस्‍थेची आर्थिक स्थिती चांगली नसल्‍याने अर्जदाराची ठेव रक्‍कम द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज दराने परत करण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.

 

3.                तक्रारीच्‍या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष व कारण खालीलप्रमाणे –

 

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.

विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय?

अंशतः

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

अंतिम आदेशाप्रमाणे तक्रार अंशतः मंजूर.

 

 

- कारणमिमांसा –

4.    मुद्दा क्रमांक बाबतः-     तक्रारकर्त्‍याने तक्रारीत परिच्‍छेद क्र. 4 मध्‍ये नमूद केल्याप्रमाणे वि.प.कडे एकूण रु.9,50,000/- मुदती ठेवीत ठेवले असून ठेवींचे परिपक्‍वता मुल्‍य रु.11,00,165/- तक्रारकर्त्‍याने नोटीसद्वारे मागणी करुनही वि.प.ने ती रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत केली नसल्‍याची बाबदेखिल वि.प.ने मान्‍य केली आहे. वि.प. ही ठेवीदारांच्‍या ठेवी स्विकारुन त्‍यावर व्‍याज देणारी आणि सभासदांना कर्ज देऊन त्‍यावर व्‍याज घेणारी सहकारी पत संस्‍था आहे. सदर संस्‍थेने सभासदांना दिलेले कर्ज वसूल करण्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी सदर संस्‍थेची असून सभासदांनी कर्ज वसूली दिली नाही म्‍हणून ठेवीदारांना मुदत पूर्तीनंतर ठेवीची व्‍याजासह रक्‍कम परत न करण्‍याची वि.प.ची कृती ही ठेवीदार ग्राहकांप्रती निश्चितच सेवेतील न्‍यूनता आहे, म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे.  

 

5.    मुद्दा क्रमांक 2  व 3 बाबतः-     वि.प.संस्‍थेने तक्रारकर्त्‍याकडून द.सा.द.शे. 13 टक्‍के व्‍याजाने रु.9,50,000/- च्‍या ठेवी स्विकारल्‍या असून मुदत पूर्तीनंतर ठेवीची परिपक्‍वता राशी रु.11,00,165/- देण्‍याची वि.प.ची कायदेशीर जबाबदारी आहे. परंतू वि.प.ने सदर रक्‍कम मागणी करुनही तक्रारकर्त्‍यास दिली नसल्‍याने मुदतपूर्ती नंतर तक्रारकर्ता सदर रक्‍कम दि.01.01.2016 पासून प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत ठेवीच्‍या व्‍याज दराईतक्‍या म्‍हणजे द.सा.द.शे. 13 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारखर्च रु.5,000/- मिळण्‍यास देखिल तक्रारकर्ता पात्र आहे, म्‍हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

                  वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

-आदेश-

1.     तक्रारकर्त्‍याचा ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यांत येत आहे.

2.    वि.प.ने तक्रारकर्त्‍यास एकूण रु.9,50,000/- ठेवीची परिपक्‍वता राशी रु.11,00,165/-   दि.01.01.2016 पासून प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 13 टक्‍के व्‍याजासह द्यावी.

3.    वि.प.ने तक्रारकर्त्‍यास शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/-   आणि तक्रार खर्च रु.5,000/- द्यावा.

4.    आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावी.

5.    आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्‍य देण्‍यांत यावी.     

6.    प्रकरणाची फाईल तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. M.G.CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.