Maharashtra

Beed

CC/14/98

Motiram Ashruba Jagtap - Complainant(s)

Versus

Administrator D.C.C.Bank Ltd - Opp.Party(s)

Adv Bodkhe

31 Dec 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/98
 
1. Motiram Ashruba Jagtap
R/o Takalshig Ta Ashti
Beed
Maharashtra
2. Ashvini Motiram Jagtap
As above
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Administrator D.C.C.Bank Ltd
Head Office Rajuri Ves Beed
Beed
Maharashtra
2. Bracnh manager, D.C.C.Bank
Branch Kada Ta Ashti
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                             दिनांक- 31.12.2014

                       (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)

 

           तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले  यांनी तक्रारदार यांनी बचत खात्‍यातील रक्‍कम व मुदत ठेव योजनेतील रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

 

             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार क्र.1 व 2 हे टाकळसिंग  ता.आष्‍टी   जि.बीड येथील रहिवासी आहेत.तक्रारदार क्र.2 ही तक्रारदार क्र.1 यांची मुलगी आहे. सामनेवाले हे बीड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक आहे. सामनेवाले क्र.1 हे बँकेचे प्रशासक आहेत व सामनेवाले क्र.2  हे बँकेचे शाखा व्‍यवस्‍थापक आहेत. तक्रारदार  यांनी सामनेवाले यांचे बॅकेत  तक्रारदार क्र.1 यांचे बचत खाते क्र.1350 मध्‍ये ठेवीची रक्‍कम रु.92,640/- जमा आहे. तक्रारदार क्र.2 यांचे बचत खाते क्र.5591 मध्‍ये रु.17,225/- जमा आहेत. तसेच तक्रारदार क्र.2 हिचे नांवे मुदत ठेव पावती क्र.020591 मध्‍ये दि.17.02.2014 रोजी रु.60,000/- ठेवले होते. तक्रारदार क्र.2 हे रक्‍कम  काढण्‍यासाठी गेले असता सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार क्र.2 यांचे इच्‍छेविरुध्‍द 12 महिन्‍याकरिता रक्‍कम मुदत ठेव मध्‍ये ठेवली. तक्रारदार क्र.1 व 2 यांनी सामनेवाले यांना मुदत ठेव रक्‍कम व बचत खात्‍यातील रक्‍कमेची मागणी केली असता सामनेवाले यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारदार क्र.1 यांचे मुलगा व मुलगी हे विवाहास योग्‍य असल्‍याने त्‍यांचे विवाहासाठी रक्‍कमेची आवश्‍यकता आहे. तक्रारदाराने दि.09.4.2014 रोजी लेखी व तोंडी रक्‍कमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी बँकेत रक्‍कम शिल्‍लक नाही व आम्‍ही पैसे देऊ शकत नाही असे सांगितले. तक्रारदार यांनी दि.12.5.2014 रोजी सामनेवाले क्र.1 यांचेकडे रक्‍कमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी रक्‍कम दिली नाही. तक्रारदारास कौटूंबिक गरजेसाठी व दवाखान्‍याचे खर्चासाठी रक्‍कमेची आवश्‍यकता आहे. तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्र.1 व 2 यांनी एकत्रितरित्‍या व संयूक्‍तीकरित्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व बचत खात्‍यातील रक्‍कम व त्‍यावर 12 व्‍याज संपूर्ण रक्‍कम वसूल होईल पर्यत दयावे, तसेच तक्रारदारास झालेलया शारीरिक,मानसिक आणि आर्थिक त्रासापोटी  रु.30,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- मिळावेत.

            सामनेवाले क्र.1 व 2 यांना या मंचाची नोटीस मिळाली. सामनेवाले क्र.1 व 2  हे मंचासमोर हजर झाले. सामनेवाले यांनी लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची रक्‍कम असल्‍याबाबत मान्‍य केले आहे. तक्रारदार यांनी मागणी करुनही मुदत रक्‍कम दिली नाही ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाले यांचे कथन की, बॅंकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्‍यामुळे व रक्‍कम शिल्‍लक नसल्‍यामुळे ते तक्रारदार यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम व मुदत ठेव रक्‍कम देऊ शकलेले नाहीत.  सामनेवाले यांनी जाणूनबूजून सेवेत त्रूटी ठेवलेली नाही.  तसेच तक्रारदार हे त्‍यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. ही बाब सामनेवाले  यांनी मान्‍य केली आहे. बँकेवर प्रशासक मंडळ नियूक्‍त केले असल्‍यामुळे  नियमानुसार वसूली व देणे यांची व्‍यवस्‍था करीत आहेत. त्‍यांत प्रशासक मंडळाची चूक नाही.  तक्रारदारास कोणताही मानसिक व आर्थिक त्रास दिलेला नाही.  तक्रारदाराची तक्रार खर्चासह रदद करण्‍यात यावी.

 

            तक्रारदार यांनी त्‍यांचे स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेची मुदत  ठेव  पावती, तक्रारदार क्र.1 व 2 यांच्‍या बचत खात्‍याच्‍या पासबूकाची प्रत, दाखल केली कआहे. सामनेवाले यांनी लेखी म्‍हणणे  दाखल केले. तक्रारदार यांचे वकील श्री.बोडखे यांचा यूक्‍तीवाद केला. सामनेवाले यांचा यूक्‍तीवाद ऐकला.  न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

            मुददे                                                 उत्‍तर

1.     तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेतील बचत खात्‍यातील रक्‍कम  

      व मुदत ठेवीची रक्‍कम मागणी करुनही सामनेवाले यांनी न

      देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात

      काय ?                                                      होय.

2.    तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत

      काय ?                                                    होय.अंशतः

3.    काय आदेश ?                                       अंतिम आदेशाप्रमाणे.

                              कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः-

 

            तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेला पुरावा व यूक्‍तीवाद यावरुन खालील बाबीविषयी वाद नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांचे  तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे मुदत ठेव योजने मध्‍ये व बचत खात्‍यात रक्‍कमा जमा आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदरील रक्‍कमेची मागणी केली परंतु सामनेवाले यांनी ती रक्‍कम दिली नाही.

 

            सामनेवाले  यांनी असा यूक्‍तीवाद केला की, बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली असल्‍यामुळे व रक्‍कम शिल्‍लक नसल्‍यामुळे तक्रारदार यांना त्‍यांचे बचत खात्‍यावर असलेली रक्‍कम व मुदत ठेवीची रक्‍कम देता आली नाही. बॅंकेचे कर्ज वसूल झाल्‍यानंतर हातात रक्‍कम आल्‍यानंतर व्‍यवस्‍थापक मंडळ ती तक्रारदार यांना नियमानुसार देण्‍याची तरतूद करतील असा युक्‍तीवाद केला.

 

            तक्रारदार क्र.1 व 2 यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांना  रक्‍कमेची आवश्‍यकता आहे. सदरील बाब सामनेवाले यांचे निदर्शनास आणून दिल्‍यानंतरही तक्रारदार यांची बचत खात्‍यावर असलेली रक्‍कम व मुदत ठेवीची रक्‍कम  तक्रारदार यांना मिळाली नाही. तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. केवळ बॅंकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. या कारणास्‍तव खातेदाराला रक्‍कम काढणे पासून वंचित ठेवता येणार नाही. तक्रारदार यांचे बचत खात्‍यातील रककम व मुदत ठेवीची रक्‍कम  न देऊन सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्‍कम देण्‍याचा आदेश देण्‍यात यावा.

 

            वर नमूद केलेला यूक्‍तीवाद लक्षात घेतला तसेच तक्रारदार क्र.1 यांनी दाखल केलेले शपथपत्राचे व सामनेवाले यांचे लेखी म्‍हणणे यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2  या शाखेत वरील प्रमाणे मुदत ठेवी योजनेत व बचत खात्‍यात रक्‍कम ठेवली होती. तक्रारदार क्र.1 व 2 यांची बचत खात्‍यावर रक्‍कम रु.1,09,865/-जमा आहे. तसेच मुदत ठेवी रककम रु.60,000/- जमा आहे. खातेदार बॅकेमध्‍ये बचत खाते उघडतात व मुदत ठेवीमध्‍ये रक्‍कम ठेवतात त्‍यांचा मुख्‍य उददेश तक्रारदार यांना अगर खातेदार यांना रक्‍कमेची आवश्‍यकता असेल त्‍यावेळी रक्‍कम काढता यावी, तसेच रक्‍कम  खात्‍यात जमा करता यावी हा उददेश ठेऊन काढलेला असतो व मुदत ठेवी मध्‍ये याकरिता ठेवतात की थोडे जास्‍तीचे व्‍याज मिळावे व जेव्‍हा रक्‍कमेची आवश्‍यकता आहे तेव्‍हा मुदत ठेव मोडून रक्‍कम मिळावी याकरिता मुदत ठेवीमध्‍ये रक्‍कम ठेवतात. तक्रारदार क्र.1 व 2 यांना सदरील  रक्‍कमेची आवश्‍यक आहे. सदरील रक्‍कम मिळण्‍यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे मागणी केली आहे तसेच लेखी अर्ज दिला. त्‍यानंतर सामनेवाले यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही. सामनेवाले यांचे कथन की, बँकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्‍या बाबत सामनेवाले यांनी कोणताही अहवाल या मंचासमोर हजर केला नाही. तसेच सामनेवाले यांचे बँकेमध्‍ये एकूण रक्‍कम किती शिल्‍लक आहे व ती कशी वाटली जाणार आहे या बाबतचा अहवाल सादर केलेला नाही. ज्‍या ज्‍या कर्जदारांनी कर्ज काढलेले आहे  व बँक आर्थिक डबघाईस आणण्‍यास कारणीभूत झालेले आहे त्‍यांची विरुध्‍द कारवाई करुन पैसे वसूल करण्‍याची जबाबदारी बॅकेवर आहे. त्‍या कामी बँकेनी काय कारवाई केली आहे यांचा अहवाल मंचासमोर नाही. सबब, या मंचाचे मत की, सामनेवाले यांनी तक्रारदार क्र.1 व 2 यांचे बचत खात्‍यातील रककम व मुदत ठेवीची रक्‍कम न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार मान्‍य करण्‍यास पात्र आहे. 

            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

 

                         आदेश

            1)  तक्रारदारांची  तक्रार मंजूर  करण्‍यात येत आहे.          

2)  सामनेवाले क्र.1 व 2  यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार क्र.1 व 2

    यांना सामनेवाले यांचेकडे असलेली बचत खात्‍याची एकूण रक्‍कम

    रु.1,09,865/- या रक्‍कमेवर रक्‍कम शिल्‍लक असलेल्‍या तारखेपासून

    संपूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यत बचत खात्‍याचे व्‍याज दर प्रमाणे व्‍याजासह

    रक्‍कम दयावी.

3)  सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार क्र.2 मुदत

    ठेव रक्‍कम रु.60,000/- व त्‍यावर ठरलेले मुदत ठेवीची व्‍याजासह

    निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत, विहीत मुदतीत रक्‍कम

    न दिल्‍यास तक्रार दाखल दि.17.06.2014 पासून संपूर्ण रक्‍कम वसूल

    होईपर्यत 10 टकके प्रमाणे व्‍याज दयावे लागेल.  

4)  सामनेवाले क्र.1 व 2  यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार क्.1 व 2    

    यांना शारिरीक  व मानसिक त्रासापोटी रक्‍कम  रु.3,000/- व 

    तक्रारीच्‍या खर्चापोटी  रककम रु.1500/- दयावेत.

5)  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम

                20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत

                करावेत.

 

 

 

श्री.रविंद्र राठोडकर,              श्रीमती मजुंषा चितलांगे            श्री.विनायक लोंढे,

     सदस्‍य                       सदस्‍या                          अध्‍यक्ष

                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 

 

 

 

 

 

जयंत पारवेकर

लघुलेखक

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.