Maharashtra

Beed

CC/14/92

Dwarkabai Bhaskar Kulkarni - Complainant(s)

Versus

Administrator Beed D.C.C Bank Beed - Opp.Party(s)

Adv N.M.Kulkarni

13 Oct 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/92
 
1. Dwarkabai Bhaskar Kulkarni
R/o Dindayal Colony,Mandwa Road Ambjogai
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Administrator Beed D.C.C Bank Beed
Head office Rajur ves Beed
Beed
Maharashtra
2. Branch manager,/Ajent D.C.C.Bank Branch Ambajogai Urban Branch
Near Ghuge Hospital Pokhari Road Ambajogai
Beed
Maharashtra
3. Branc manager/Ajent,D.C.C. Bank Branc Bardhapur
Branch Bardhapur Ta Ambajogai
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                    निकाल

                       दिनांक- 13.10.2014

                  (द्वारा- श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्‍या )

           तक्रारदार द्वारकाबाई भास्‍कर कुलकर्णी यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले  यांनी तक्रारदार यांच्‍या बचत खात्‍यातील रक्‍कम देण्‍यास नकार देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे  म्‍हणून त्‍यावरील व्‍याज व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात  खालील प्रमाणे आहे,  तक्रारदार हे सेवानिवृत्‍त असून सेवानिवृत्‍तीनंतर मिळालेल्‍या रकमेपैकी काही रक्‍कम सामनेवाला यांचे बँकेमध्‍ये मुदतठेव व वैयक्तिक बचत खात्‍यात ठेवली आहे. तक्रारदार यांचे शहर शाखा बचत खाते क्रमांक 067/0005079 त्‍यामधील रक्‍कम रु.2,54,100/- सामनेवाला यांचेकडे गुंतवली आहे. तक्रारदार यांचे अंबाजोगाई शाखा बचत खाते क्रमांक 000411002005101 यामधील रक्‍कम रु.2,78,881/- गुंतवली आहे. तसेच तक्रारदार यांनी शाखा बर्दापूर येथील खाते क्रमांक 399 मध्‍ये  रक्‍कम रु.1,47,825/- जमा केले आहे. असे एकूण रक्‍कम रु.6,80,806/- सामनेवाला यांचे बँकेत गुंतवलेली आहे. तक्रारदार यांना किडनीचा त्रास आहे व त्‍यांचे पती कॅन्‍सर आजाराने त्रस्‍त असून वैद्यकीय उपचारासाठी व भविष्‍यातील गरजा व अत्‍यावश्‍यक सेवा याचा विचार करुन सेवानिवृत्‍ती नंतरच्‍या मिळकतीच्‍या  रकमा सामनेवाला यांच्‍याकडे गुंतविल्‍या होत्‍या. तक्रारदार यांना औषधोपचारासाठी व आजारावर उपचार करण्‍यासाठी आवश्‍यकता असल्‍यास त्‍यांनी सामनेवाला यांच्‍याकउे सदर रकमेची मागणी केली, सामनेवाला यांनी दुर्लक्ष करुन देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांनी दि.01.02.2014 रोजी सामनेवाला यांच्‍याकडे अर्ज देऊन जमा असलेल्‍या रकमेची मागणी केली सदर अर्जावर देखील सामनेवाला  यांनी कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे  वेळोवेळी पैशाची मागणी करुनही तक्रारदारस रक्‍कम न दिल्‍यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच औषधोपचारासाठी लोकांकडून  हातऊसने म्‍हणून रक्‍कम घ्‍यावी लागली. सामनेवाला यांनी तक्रारदारास जमा असलेली रक्‍कम न देऊन सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी व तक्रारदार यांना वैयक्तिक बचत खात्‍यात जमा असलेली रक्‍कम रु. 6,80,806/-  व त्‍यावर 15 टक्‍के दराने व्‍याज आकारण्‍यात यावे. तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- मिळण्‍याची विनंती केली आहे.

            सामनेवाला क्र.1 ते 3 मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी आपली लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्‍या  मुदतठेवीमध्‍ये बचत खात्‍यात रक्‍कम असल्‍याबाबत मान्‍य केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्‍या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही, रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली नाही. तक्रारदार यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. तसेच तक्रारदार यांचे थकीत रकमेवर 15 टक्‍के या दराने मागणी ही कायद्याला धरुन नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करण्‍यात यावी.

            तक्रारदार यांनी बचत खाते क्रमांक 067/0005079, 000411002005101, 399 सदर बचत खाते उता-याची प्रत दाखल केली आहे. सामनेवाला यांना दिलेल्‍या अर्जाची प्रत, तसेच तक्रारदारास असलेल्‍या   आजाराबाबतचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी पुराव्‍याकामी स्‍वतःचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदार यांचे वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्‍तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे वकील श्री.पंडीत यांचा युक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

               मुददे                                   उत्‍तर

1) तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे बँकेतील बचत

   खात्‍यातील रक्‍कम मागणी करुनही सामनेवाला

   यांनी सदर रक्‍कम न देऊन सेवा देण्‍यात कसूर केला

   आहे, ही बाब तक्रारदार यांनी सिध्‍द केली काय ?             होय.

2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र आहेत काय?    होय.

3) काय आदेश ?                                अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                        कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः- तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेला पुरावा व युक्‍तीवाद याचे अवलोकन केले. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तसेच तक्रारदार यांचेकडे तक्रारीत नमुद केल्‍याप्रमाणे बचत खात्‍यात रक्‍कम जमा आहे ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तक्रारदार यांनी सदरील रकमेची मागणी सामनेवाला यांच्‍याकडे केली असता सामनेवाला यांनी सदर रक्‍कम ही तक्रारदारास दिली नाही.

            तक्रारदार यांचे वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांच्‍या आजारावर औषधोपचार करण्‍यासाठी तसेच कौटूंबिक गरजा भागविण्‍यासाठी सदर रकमेची आवश्‍यकता आहे, ही बाब सामनेवाला यांच्‍या लक्षात आणून दिल्‍यानंतरही सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्‍या बचत खात्‍यातील रक्‍कम दिली नाही. सबब तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रास झाला आहे. सामनेवाला यांचेकडून रक्‍कम न मिळाल्‍यामुळे तक्रारदार यांना आजारावर उपचार व औषधोपचार करण्‍यासाठी लोकांकडून हातऊसने स्‍वरुपात रक्‍कम घ्‍यावी लागली. केवळ बँकेची परिस्थिती खालावली आहे या कारणास्‍तव खातेदाराला रक्‍कम काढण्‍यापासून वंचित ठेवता येणार नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना त्‍यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम न देऊन सेवा देण्‍यात कसूर केला आहे. तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्‍कम देण्‍याचा आदेश देण्‍यात यावा ही विनंती केलेली आहे.

            सामनेवाला यांचे वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, बँकेची परिस्थिती ही खालावली असल्‍यामुळे तक्रारदार यांना बचत खात्‍यात असलेली रक्‍कम देता आली नाही. बँकेचे कर्ज वसूल झाल्‍यानंतर बँकेचे व्‍यवस्‍थापक नियमानुसार तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍याची तरतूद करतील.

            सामनेवाला क्र.1 व 3 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाही.

            वर नमुद केलेला युक्‍तीवाद लक्षात घेतला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्‍हणणे याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे खाली नमुद केल्‍याप्रमाणे बचत खात्‍यात एकूण रक्‍कम रु.5,35,408/- जमा केली आहे.

खात्‍याचा प्रकार    खाते क्रमांक                     रक्‍कम

बचत खाते(शहर

शाखा)            067/0005079             रु.2,54,100/-

बचत खाते(शाखा   000411002005101          रु.2,78,881/-

अंबाजोगाई)      

बचत खाते(शाखा

बर्दापूर)           399                       रु.1,47,825/-

                         

                             एकूण रक्‍कम    रु.6,80,806/-

तक्रारदार हे बँकेमध्‍ये बचत खाते उघडतात व मुदतठवीमध्‍ये रक्‍कम गुंतवितात. तक्रारदार यांचा मुख्‍य उददेश म्‍हणजे आवश्‍यकता भासल्‍यास त्‍यांना रक्‍कम काढता यावी तसेच रक्‍कम जमा करता यावी या उददेशाने तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍याकडे आपले खाते उघडतात.  तक्रारदार यांना सदरील रक्‍कम ही स्‍वतःच्‍या   वैद्यकीय उपचारासाठी व औषधोपचारासाठी आवश्‍यक आहे. सदरील रक्‍कम मिळण्‍यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे. तसेच लेखी अर्ज दिलेला आहे. तरी सामनेवाला यांनी तक्रारदार यांना आजपावेतो कोणतीही रक्‍कम दिली नाही. सामनेवाला यांचे कथन की, बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे त्‍याबाबतचा कोणताही अहवाल मंचासमोर हजर केला नाही. तसेच बँकेमध्‍ये एकूण किती रक्‍कम शिल्‍लक आहे व ती कशी वाटली जाणार याबाबतचा अहवाल सादर केला नाही. ज्‍या ज्‍या लोकांनी, ज्‍या ज्‍या   कर्जदारांनी कर्ज काढलेले आहे, सामनेवाला यांनी त्‍यांचे विरुध्‍द कार्यवाही करुन पैसे वसूल करण्‍याची जबाबदारी आहे, त्‍याबाबत सामनेवाला यांनी कोणती कार्यवाही केली हे दर्शविण्‍यासाठी कोणताही अहवाल मंचासमोर दाखल केला नाही. यावरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्‍या बचत खात्‍यातील रक्‍कम न देऊन सेवा देण्‍यात कसूर केला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रास झाला. तसेच तक्रारदार यांना वैद्यकीय उपचार करण्‍यासाठी सामनेवाला यांच्‍याकडून रक्‍कम न मिळाल्‍यामुळे तक्रारदार यांना उपचार करण्‍यासाठी लोकांकडून हातऊसने स्‍वरुपात रक्‍कम घ्‍यावी लागली आहे. त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. यावरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदारास बचत खात्‍यातील रक्‍कम न देऊन सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे. मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

          सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                        आदेश

         1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

         2) सामनेवाले क्र.2  यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदार

            यांचे शहर शाखा बचत खाते क्रमांक 067/0005079 मधील

            रक्‍कम रु.2,54,100/-, व बचत खाते क्रमांक शाखा अंबाजोगाई

            000411002005101 मधील रक्‍कम रु.2,78,881/-, जमा

            असल्‍यापासून बचत खात्‍याच्‍या व्‍याज दरानुसार संपूर्ण रक्‍कम

            व्‍याजासह 30 दिवसाच्‍या आत द्यावी.

         3) सामनेवाले क्र.3  यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदार

            यांचे बचत खाते शाखा बर्दापूर क्र.399 मधील रक्‍कम रुपये

            1,47,825/- जमा असल्‍यापासून बचत खात्‍याच्‍या व्‍याज दरानुसार

            संपूर्ण रक्‍कम व्‍याजासह 30 दिवसाच्‍या आत द्यावी.

         4) सामनेवाला क्र.2 व 3 यांनी सदर रक्‍कम विहीत मुदतीत न

            दिल्‍यास त्‍यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्‍कम वसूल

            होईपर्यत द.सा.द.शे.10 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

         3) सामनेवाले क्र 2 व 3 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी

            संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक

            त्रासापोटी रक्‍कम रु.5000/-व तक्रारीच्‍या  खर्चापोटी  रक्‍कम

            रु.2,000/- दयावेत.

         4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील

            कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला

            परत करावेत.

 

 

 

          श्री.रविंद्र राठोडकर,   श्रीमती मंजूषा चितलांगे,    श्री.विनायक लोंढे,

               सदस्‍य               सदस्‍य               अध्‍यक्ष

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.