Maharashtra

Beed

CC/14/58

Yashwant Patilbuwa Kakde - Complainant(s)

Versus

Administrator Beed Central Co Op Bank ltd - Opp.Party(s)

Adv E,G,Kakde

01 Aug 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/58
 
1. Yashwant Patilbuwa Kakde
R/o Nalwandi Ta Patoda
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Administrator Beed Central Co Op Bank ltd
Beed
Beed
Maharashtra
2. Branch Manager, D.C.C.Bank Beed Branch Patoda
Patoda
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                     निकाल

                       दिनांक- 01.08.2014

                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)

           तक्रारदार यशवंत काकडे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले  यांनी तक्रारदार यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम देण्‍यास नकार देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे  म्‍हणून बचत खात्‍यातील रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे मौजे नाळवंडी ता.पाटोदा जि.बीड येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे व्‍यवसायाने शेतकरी आहेत. सामनेवाले हे बीड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक आहे. सामनेवाले क्र.1 हे बँकेचे प्रशासक आहेत व सामनेवाले क्र.2 हे बँकेचे शाखा व्‍यवस्‍थापक आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे बॅकेत बचत खाते नंबर 067/0025329 उघडलेले आहे. तक्रारदार हे सदरील बचत खात्‍यात रक्‍कम ठेवणे व गरज वाटेल तेव्‍हा रक्‍कम काढणे करिता उघडलेले आहे. तक्रारदार यांनी त्‍यांचे बचत खात्‍यात रक्‍कम रु.1,93,374/- जमा केलेले आहेत व तशी नोंद पासबूकामध्‍ये केलेली आहे.

            तक्रारदार यांना खर्चासाठी रक्‍कमेची गरज असल्‍याकारणाने व तसेच त्‍यांचे आजारपणासाठी व औषधोपचारासाठी रक्‍कम आवश्‍यक असल्‍याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे बँकेत जाऊन व खात्‍यातील रक्‍कम काढून मिळावे म्‍हणून मागणी केली. सामनेवाले क्र.2 यांनी सध्‍या बँकेची बिकट परिस्थिती आहे व रक्‍कम शिल्‍लक नाही असे सांगून तक्रारदार यांना त्‍यांचे बचत खात्‍यातून रक्‍कम परत दिली नाही. दि.27.01.2014 रोजी तक्रारदार यांनी औषधोपचारासाठी व तसेच गुडघ्‍याच्‍या  आजारासाठी खर्च रक्‍कम रु.50,000/- ची आवश्‍यकता होती. तक्रारदार हे  सामनेवाले बॅकेत चालू खात्‍यातील  रक्‍कम काढण्‍यासाठी गेले. सामनेवाले यांनी चालू खात्‍यातील रक्‍कम दिली नाही. तक्रारदार यांनी पोस्‍टाद्वारे सामनेवाले यांचेकडे अर्ज पाठविला. सामनेवाले यांनी आजपावेतो त्‍या  अर्जाची दखल घेतली नाही व तक्रारदार यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम काढण्‍यास परवानगी दिली नाही. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी त्‍यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम रु.1,93,374/- व त्‍यावरील व्‍याज, शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च असे एकूण रु.2,48,374/- ची मागणी केली आहे.  

            सामनेवाले क्र.1 व 2 यांना या मंचाची नोटीस मिळाली. सामनेवाले क्र.1 व 2 हे अँड.एल.वाय.कुलकर्णी  मार्फत मंचासमोर हजर झाले. सामनेवाले यांनी लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे बचत खात्‍यात रक्‍कम असल्‍याबाबत मान्‍य केले आहे. तक्रारदार यांनी मागणी करुनही बचत खात्‍यातील रक्‍कम दिली नाही ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाले यांचे कथन की, बॅंकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्‍यामुळे व रक्‍कम शिल्‍लक नसल्‍यामुळे ते तक्रारदार यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम देऊ शकलेले नाहीत.  सामनेवाले यांनी जाणूनबूजून सेवेत त्रूटी ठेवलेली नाही.  तसेच तक्रारदार हे त्‍यांचे बचत खात्‍यातील रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. ही बाब सामनेवाले  यांनी मान्‍य केली आहे. केवळ बँकेची आर्थिक  परिस्थिती  तक्रारदार यांना रक्‍कम देण्‍याची नाही या कारणास्‍तव बँक पैसे देऊ शकत नाही असे कथन केलेले आहे.  बॅकेची परिस्थिती रक्‍कम परतफेड करण्‍यासारखी नसल्‍यामुळे कर्ज वसूली झाल्‍यानंतर नियमानुसार ठेवीदाराचे पैसे व व्‍याज प्रशासक मंडळ तक्रारदार यांना देण्‍यास तयार आहे.

            तक्रारदार यांनी त्‍यांचे स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेच्‍या बचत खात्‍याची  झेरॉक्‍स प्रत दाखल केली आहे. सामनेवाले यांनी शपथपत्र दाखल केले. तक्रारदार यांचे वकील श्री.काकडे यांचा यूक्‍तीवाद केला. सामनेवाले यांचे वकील श्री.एल.वाय.कूलकर्णी यांचा यूक्‍तीवाद ऐकला.  न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

            मुददे                                              उत्‍तर

1.     तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेतील बचत खात्‍यातील रक्‍कम   

      मागणी करुनही सामनेवाले यांनी न देऊन सेवेत त्रूटी ठेवली

      आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ?                    होय.

 

2.    तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत

      काय ?                                                    होय.अंशतः

3.    काय आदेश ?                                   अंतिम आदेशाप्रमाणे.

                              कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः-

            तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेला पुरावा व यूक्‍तीवाद यावरुन खालील बाबीविषयी वाद नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांचे  बचत खाते क्र.067/0025329 हे सामनेवाले बँकेत आहे. तक्रारदार यांचे बचत खात्‍यात रक्‍कम रु.1,93,374/- जमा ओत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदरील रक्‍कमेची मागणी केली परंतु सामनेवाले यांनी ती रक्‍कम दिली नाही.

            सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी असा यूक्‍तीवाद केला की, बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली असल्‍यामुळे व रक्‍कम शिल्‍लक नसल्‍यामुळे तक्रारदार यांना त्‍यांचे बचत खात्‍यावर असलेली रक्‍कम देता आली नाही. बॅंकेचे कर्ज वसूल झालयानंतर हातात रक्‍कम आल्‍यानंतर व्‍यवस्‍थापक मंडळ ती तक्रारदार यांना नियमानुसार देण्‍याची तरतूद करतील असा युक्‍तीवाद केला.

            तक्रारदार यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार हे पायाचे आजाराने व्‍याधीत आहेत. त्‍यांना वेळोवेळी औषधोपचार घ्‍यावे लागतात. सदरील बाब सामनेवाले यांचे निदर्शनास आणून दिल्‍यानंतरही तक्रारदार यांचे बचत खात्‍यावर असलेली रक्‍कम तक्रारदार यांना मिळाली नाही. तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. रक्‍कमे अभावी तक्रारदार हे औषधोपचार करु शकले नाही. केवळ बॅंकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. या कारणास्‍तव खातेदाराला रक्‍कम काढणे पासून वंचित ठेवता येणार नाही. तक्रारदार यांचे खात्‍यातील रककम न देऊन सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्‍कम देण्‍याचा आदेश देण्‍यात यावा.

 

            वर नमूद केलेला यूक्‍तीवाद लक्षात घेतला तसेच तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 शाखा पाटोदा या शाखेत बचत खाते क्र.067/0025329  हे उघडलेले आहे. तक्रारदार यांचे खात्‍यावर रक्‍कम रु.1,93,374/-जमा आहेत. खातेदार बॅकेमध्‍ये बचत खाते उघडतात त्‍यांचा मुख्‍य उददेश तक्रारदार यांना अगर खातेदार यांना रक्‍कमेची आवश्‍यकता असेल त्‍यावेळी रक्‍कम काढता यावी, तसेच रक्‍कम  खात्‍यात जमा करता यावी हा उददेश ठेऊन काढलेला असतो. सदरील तक्रारदार यांचे खाते रु.1,93,374/- जमा आहेत. तक्रारदार यांना सदरील  रक्‍कम स्‍वतःच्‍या वैद्यकीय उपचारासाठी आवश्‍यक आहे. सदरील रक्‍कम मिळण्‍यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे मागणी केली आहे तसेच लेखी अर्ज दिला. त्‍यानंतर सामनेवाले यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही. सामनेवाले यांचे कथन की, बँकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्‍या बाबत सामनेवाले यांनी कोणताही अहवाल या मंचासमोर हजर केला नाही. तसेच सामनेवाले यांचे बँकेमध्‍ये एकूण रक्‍कम किती शिल्‍लक आहे व ती कशी वाटली जाणार आहे या बाबतचा अहवाल सादर केलेला नाही. ज्‍या ज्‍या कर्जदारांनी कर्ज काढलेले आहे  व बँक आर्थिक डबघाईस आणण्‍यास कारणीभूत झालेले आहे त्‍यांची विरुध्‍द कारवाई करुन पैसे वसूल करण्‍याची जबाबदारी बॅकेवर आहे. त्‍या कामी बँकेनी काय कारवाई केली आहे यांचा अहवाल मंचासमोर नाही. सबब, या मंचाचे मत की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे बचत खात्‍यातील रककम न देऊन त्रूटी ठेवली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे. तक्रारदार यांना वैद्यकीय उपचारासाठी रक्‍कम न मिळाल्‍यामुळे ते उपचार करु शकलेले नाहीत. सबब, तक्रारदार यांची तक्रार मान्‍य करण्‍यास पात्र आहे. 

            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

                         आदेश

            1)  तक्रारदारांची  तक्रार मंजूर  करण्‍यात येत आहे.          

2)  सामनेवाले क्र.1 व 2यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार यांना

    बचत खात्‍यातील रक्‍कम एकूण रक्‍कम   रु.1,93,374/-निकाल 

    कळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत व्‍याजासह दयावेत, न दिल्‍यास  तक्रार

    दाखल दि.28.04.2014 पासून पुर्ण रक्‍कम वसुल होईलपर्यत द.सा.द.शे

    10 टक्‍के व्‍याज दराने संपूर्ण रक्‍कम दयावी.

3)  सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार   

    यांना शारिरीक  व मानसिक त्रासापोटी रक्‍कम  रु.7,000/- व 

    तक्रारीच्‍या खर्चापोटी  रककम रु.1500/- दयावेत.

4)  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम

                20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत

                करावेत.

 

 

 

                       श्री.रविंद्र राठोडकर,            श्री.विनायक लोंढे,

                             सदस्‍य                    अध्‍यक्ष

                            जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 

 

 

जयंत पारवेकर

लघुलेखक

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.