Maharashtra

Nanded

CC/15/338

Panjab S/o,Vithalrao Kadam, - Complainant(s)

Versus

Aditye Motars, Authorised Dealar - Opp.Party(s)

Adv.P.G.Wankhede

20 Jul 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/15/338
 
1. Panjab S/o,Vithalrao Kadam,
R/o,Ashti Tq,Hadgaon Dist,Nanded
NANDED
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Aditye Motars, Authorised Dealar
Maratha Hotel, Vinayek Nager, Nawa Mondha, Nanded
NANDED
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'BLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                 निकालपत्र        

(20.07.2015)                           

(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्‍यक्ष )

 

1.           अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सेवेत त्रुटीच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.

            अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.          गैरअर्जदार क्र. 1 हा ट्रॅक्‍टर कंपनीचा अधिकृत विक्रेता असून गैरअर्जदार क्र. 2 वित्‍तीय पुरवठा करणारी कंपनी आहे.   गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून दिनांक 25.02.2008 ट्रॅक्‍टर खरेदी केलेले असून ट्रॅक्‍टर खरेदीसाठी गैरअर्जदार क्र. 2 कंपनीकडून रक्‍कम रु.चार लाख कर्ज घेतलेले आहे. अर्जदाराचे हप्‍ते थकीत झालेले असल्‍याने गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराचा ट्रॅक्‍टर हा एका शेतात काम करीत असतांना दिनांक 05.01.2009 रोजी ट्रॅक्‍टर गुंड माणसांतर्फे ओढून नेला.  अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे विनंती करुनही अर्जदारास ट्रॅक्‍टर परत केलेला नाही व अर्जदारावर लवाद करावाई सुरु केलेली आहे.त्‍यामुळे सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्‍ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून अर्जदाराचे ट्रॅक्‍टर क्रमांक एमएच 26/के 6087 ओढून नेला आहे तो परत करावा अशी मागणी केलेली आहे.  दाखल यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे व तक्रारीचे अवलोकन केले असता अर्जदाराचा ट्रॅक्‍टर गैरअर्जदार यांनी दिनांक 05.01.2009 रोजी जप्‍त केलेला आहे. अर्जदार यांनी सदरील तक्रार ही दिनांक 15.07.2015 रोजी दाखल केलेली आहे. म्‍हणजेच अर्जदाराचे ट्रॅक्‍टर जप्‍त केल्‍यापासून 6 वर्षानंतर सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्‍ये अर्जदाराची मुख्‍य मागणी अर्जदाराचे गैरअर्जदार यांनी ओढून नेलेले ट्रॅक्‍टर परत करावे अशी आहे.   अर्जदारास जानेवारी 2009 मध्‍ये ट्रॅक्‍टर ओढून नेल्‍याची कल्‍पना होती तेव्‍हा पासून 2 वर्षाच्‍या आत तक्रार दाखल करणे ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(ए) नुसार आवश्‍यक होते.  परंतु 6 वर्षानंतर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍टेट बँक ऑफ इंडिया विरुध्‍द बी.एस.एग्रीकल्‍चरल †òन्‍ड ऑदर्स मधील निवाडयानुसार अर्जदाराची तक्रार नामंजूर करणेशिवाय मंचास पर्याय नाही.  अर्जदाराची तक्रार मुदतीत नसल्‍याने प्राथमिक अवस्‍थेत फेटाळण्‍यात येते. 

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.