Maharashtra

Nagpur

CC/778/2021

SHRI. ANKUR ASHOKRAO KATKAMWAR - Complainant(s)

Versus

ADITYA BIRLA HEALTH INSURANCE CO. LTD. THROUGH MANAGING DIRECTOR/ CHIEF EXECUTIVE OFFICER - Opp.Party(s)

ADV. UDAY P. KSHIRSAGAR

31 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/778/2021
( Date of Filing : 15 Dec 2021 )
 
1. SHRI. ANKUR ASHOKRAO KATKAMWAR
R/O. FLAT NO.602, B WING, SHRI SWAMI PURAM, CHICHBHUVAN, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ADITYA BIRLA HEALTH INSURANCE CO. LTD. THROUGH MANAGING DIRECTOR/ CHIEF EXECUTIVE OFFICER
REG. OFF.AT, 401,402, 9TH FLOOR, TOWER 1, ONE INDIA BULLS CENTER, JUPITER MILS COMPOUND, SENAPATI BAPAT MARG, ELFISTAN ROAD, MUMBAI-400013
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. UDAY P. KSHIRSAGAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 31 May 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून स्‍वतःकरिता व त्‍याच्‍या कुटुंबाकरिता विमा पॉलिसी क्र. 23-19-0111773-01-00 अन्‍वये दि. 22.01.2020 ला विमामुल्‍य रुपये 3,30,000/- करिता विमा पॉलिसी घेतली होती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून प्रपोझल फॉर्म भरुन व आवश्‍यक दस्‍तावेज स्‍वीकारुन सर्व व्‍यक्‍तीगत वैद्यकीय तपासण्‍या करुन घेतल्‍यानंतर विमा पॉलिसी निर्गमित केली होती.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याची विमा पॉलिसी मुदतीत असतांना दि. 10.04.2021 ला तक्रारकर्त्‍याला कोविड-19 हा आजार झाला व तक्रारकर्त्‍याला दि. 10.04.2021 ते दि. 17.04.2021 या कालावधीत दवाखान्‍यात उपचार घ्‍यावे लागले व त्‍याकरिता  तक्रारकर्त्‍याला रुपये 3,48,066/- इतका खर्च आला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा दि.17.04.2021 ला सर्व आवश्‍यक देयकासह सादर केला होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला 3 वर्षापासून हायपर टेन्‍शनचा आजार आहे असे कारण दाखवून त्‍याचा विमा दावा नाकारला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीबाबत माहिती नव्‍हती तसेच IRDA च्‍या Protection of Policyholder interest regulation 2000 प्रमाणे Proposal Form ची प्रत ही तक्रारकर्त्‍याला देण्‍यात आली नाही, ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍या प्रती सेवेतील त्रुटी आहे. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या आजाराचा व हायपर टेन्‍शनचा काहीही संबंध नाही. कोविड-19 हा पूर्ण जगात अचानक विषाणूने पसरलेला आजार होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या त्रुटी पूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याने आयोगा समक्ष तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 3,30,000/- दिनांक 19.07.2021 पासून  द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस दि. 19.01.2022 ला प्राप्‍त होऊन विरुध्‍द पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा दि.04.05.2022 रोजी आदेश पारित करण्‍यात आला.

 

  1.        तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

मुद्दे उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                  होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय?            होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय?      होय

 

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

  • कारणमीमांसा

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून स्‍वतःकरिता व त्‍याच्‍या कुटुंबाकरिता दि. 22.01.2020 रोजी विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 3,30,000/- ची विमा पॉलिसी क्र. 23-19-0111773-01-00 घेतली होती, हे नि.क्रं. 2(1) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याची विमा पॉलिसी मुदतीत असतांना तक्रारकर्त्‍याला कोविड-19 हा आजार झाला व त्‍याला  दि. 10.04.2021 ते दि. 17.04.2021 या कालावधीत दवाखान्‍यात उपचारार्थ दाखल केले होते व त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला रुपये 3,48,066/- इतका खर्च आला होता हे नि.क्रं. 2(4) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून प्रपोझल फॉर्म भरुन घेऊन व आवश्‍यक दस्‍तावेज स्‍वीकारल्‍या नंतर तसेच सर्व व्‍यक्‍तीगत वैद्यकीय तपासण्‍या केल्‍यानंतरच  विमा पॉलिसी निर्गमित केली होती. तक्रारकर्त्‍याचा विमा काढण्‍यापूर्वी तक्रारकर्त्‍याची वैद्यकीय तपासणी करुन हिस्‍ट्री या मथळयाखाली healthy असे नमूद असल्‍याचे नि.क्रं. 2(6) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा वैध असलेला विमा दावा तक्रारकर्ता मागील 3 वर्षापासून हायपर टेन्‍शनने बाधित असल्‍याचे कारण दाखवून तक्रारकर्त्‍याचा योग्‍य व वैध असलेला विमा दावा नाकारला ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍या प्रती त्रुटीपूर्ण सेवा असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे दिसून येते असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.

     सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा दावा अंतर्गत देय असलेली विमाकृत रक्कम रुपये 3,30,000/- व त्‍यावर दिनांक 19.07.2021 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्‍याजासह रक्‍कम  द्यावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.