Maharashtra

Pune

CC/06/97

Vwaghu Vittal Satkar - Complainant(s)

Versus

Adhvait Construction - Opp.Party(s)

31 May 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/06/97
 
1. Vwaghu Vittal Satkar
314, Budhwar peth, pune-38
...........Complainant(s)
Versus
1. Adhvait Construction
out house flat no-10, Kotharud, Pune
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MR. S. M. KUMBHAR MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा- मा. श्री. श्रीकांत कुंभार, सदस्‍य
                   :- निकालपत्र :-
                 दिनांक 31/मे/2013
 
तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत जाबदेणार यांच्‍या विरुध्‍द सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केली आहे. यातील कथने खालीलप्रमाणे-
1.        जाबदेणार अद्वैत कन्‍स्‍ट्रक्‍शन यांच्‍या सिटी सर्व्‍हे नं 993, बुधवार पेठ येथे बांधलेल्‍या इमारतीतील पहिल्‍या मजल्‍यावरील एकमेकांशेजारील सदनिका क्र 3 व 4, क्षेत्रफळ अ.क्र. 350 चौ.फुट व 300 चौ. फुट एकूण बिल्‍टअप 650 चौ.फुट तक्रारदारांनी नोंदणीकृत दस्‍तऐवज क्र 3490 व 3491 दिनांक 16/6/2004 नुसार विकत घेतले. तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 15/5/2004 रोजी रुपये 45000/- रोख, दिनांक 10/8/2004 रोजी रुपये 40,000/- रोख व बँक ऑफ इंडिया नवी पेठ शाखा यांच्‍या दिनांक 10/11/2004 रोजीच्‍या डी.डी. अन्‍वये रुपये 7,00,000/- मोबदला अदा केला. तक्रारदारांच्‍या कथनानुसार प्रत्‍यक्ष मोजणीनंतर बिल्‍टअप एरिया 494.39 चौ.फुट इतका आढळला म्‍हणजेच 155.61 चौ.फुट बिल्‍टअप एरिया कमी आढळला. 155.61 चौ.फुट क्षेत्रफळाची रुपये 1500/- प्रति चौ.फुट दराने किंमत रुपये 2,32,500/- होते. जाबदेणार यांना प्रत्‍यक्षात तक्रारदारांनी रुपये 7,85,000/- अदा केलेले आहेत. पुणे महानगर पालिकेच्‍या मंजूर नकाशानुसार दोन्‍ही सदनिकांचा बिल्‍टअप एरिया 494.39 चौ. फुट इतका असून त्‍याची खरेदीची किंमत रुपये 7,41,585/- इतकी होते. तक्रारदारांनी रुपये 43,415/- जास्‍त भरलेले आहेत. तसेच सदनिकांचा उशीरा ताबा दिला, करारानुसार काम केले नाही, खरेदीखत करुन दिले नाही, पार्किंग मध्‍ये प्‍लोअरिंग नाही, ड्रेनेज पाणी पाईपलाईन व्‍यवस्‍था पूर्ण करुन दिली नाही, सदिनकेत सुरक्षा दरवाजा व अंतर्गत दरवाजे बसवून दिले नाहीत, स्‍लॅब मधून गळती होत आहे, अपुरे पिण्‍याचे पाणी, सुरक्षा भिंत व निकृष्‍ट पाईपलाईन अशाही तक्रारदारांच्‍या जाबदेणारांचे अनुषंगिक सेवेबाबत तक्रारी आहेत. जाबदेणार यांना विनंती करुनही जाबदेणार यांनी तक्रारींचे निराकरण केले नाही म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून वरील तक्रारी दुरुस्‍त करुन मागतात. तसेच रुपये 43,415/- 18 टक्‍के व्‍याजासह परत मागतात. लाईट मिटर पोटी रुपये 20,000/-, कागदोपत्री अर्धा खर्च रुपये 18,912/-, बँकेचे व्‍याज रुपये 70,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, तीन महिन्‍यांचे घरभाडे रुपये 6000/-, नुकसान भरपाई पोटी रुपये 2,30,000/- एकूण रुपये 3,98,327/- मागतात.
 
2.        जाबदेणार क्र 1 अ- श्री. राजेन्‍द्र मांगीलाल धुत व जाबदेणार क्र 1 क श्री. कैलास जीतमल लाटे यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदार व जाबदेणार यांच्‍याकमध्‍ये सदनिका क्र 3 व 4 संदर्भात करारनामा झाल्‍याचे, तक्रारदारांनी रुपये 7,85,000/- मोबदल्‍यापोटी जाबदेणार यांना अदा केल्‍याचे जाबदेणार यांना मान्‍य आहे. जाबदेणार यांनी तसेच विलास एकनाथ भगत व एकनाथ पांडूरंग भगत यांचेबरोबर सिटी सर्व्‍हे नं 993, बुधवार पेठ संदर्भात विकसन करारनामा करुन दिनांक 27/2/2002 रोजी नोंदणीकृत कुलमुखत्‍यारपत्र केलेले आहे. मिळतीचे मालक हे भागीदार श्रीपती रामभाऊ भगत यांचे नातेवाईक होते व श्रीपती रामभाऊ भगत यांना सदर योजनेसंदर्भात सर्व अधिकार देण्‍यात आलेले होते. त्‍यासंदर्भात त्‍यांनी दिनांक 20/10/2003 रोजी हमीपत्र दिलेले आहे. विसार पावती दिनांक 22/10/2003 व पावती दिनांक 17/2/2004 वर त्‍यांच्‍याच सहया आहेत. दिनांक 30/11/2005 रोजीच्‍या रिक्‍न्‍स्‍ट्क्‍शन डीड नुसार प्रस्‍तुतचे जाबदेणार हे निवृत्‍त झालेले आहेत. प्रस्‍तुतचे जाबदेणार यांनी दिनांक 26/6/2006 रोजी श्रीपती रामभाऊ भगत यांच्‍यासोबत भागीदारी करारनामा केलेला असून त्‍यानुसार सर्व व्‍यवहारांची, अर्धवट व्‍यवहारांची जबाबदारी श्रीपती रामभाऊ भगत यांनी स्विकारली होती. प्रस्‍तुतचे यांचे नाव वगळण्‍यात यावे अशी विनंती करुन तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा अशी विनंती जाबदेणार करतात.
 
3.        जाबदेणार क्र 1-ब श्रीपती रामभाऊ भगत यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी दोन्‍ही सदनिकांच्‍या बांधकामाची पूर्ण खात्री करुन सदनिका ताब्‍यात घेतलेल्‍या आहेत. सदनिका क्र 3 व 4 यांची प्रत्‍येकी किंमत 5,30,000/- अशी ठरली होती. त्‍या रकमेपैकी करारनामा नोंदणीच्‍या वेळी सदनिका क्र 3 व 4 पोटी जाबदेणार यांना रुपये 25,000/- प्रत्‍येकी मिळालेले आहेत. दोन्‍ही सदनिकांची एकूण किंमत रुपये 10,60,000/- होती. पैकी तक्रारदारांनी रुपये 7,85,000/- अदा केलेले आहेत. उर्वरित रक्‍कम रुपये 3,15,000/- मागूनही तक्रारदारांनी अदा केलेली नाही. तक्रारदारांनी नको त्‍या व्‍यवसायासाठी सदनिका दिलेल्‍या आहेत, दिलेल्‍या सुविधांची नासधूस केलेली आहे. वीज मिटर स्‍वखर्चाने देण्‍यात आलेले आहे. पुर्वी दोन्‍ही सदनिकांना सामाईक वीज मिटर मधून वीज पुरवठा देण्‍यात आलेला होता. तथापि सहा महिन्‍यांपासून दोन्‍ही सदनिका एकत्र असल्‍यामुळे एक मिटर देण्‍यात आलेला आहे. तक्रारदारांनी सदनिकांचा ताबा दोन वर्षापूर्वी घेतलेला होता त्‍यावेळी लिकेज नसल्‍याची खात्री करुन घेतली होती. जाबदेणार यांच्‍या सेवेत त्रुटी नाही असे कथन करुन तक्रारदारांनी रुपये 3,15,000/- दयावेत तसेच नुकसान भरपाई व खर्चापोटी रुपये 10,000/- तक्रारदारांनी जाबदेणार यांना दयावेत अशी विनंती जाबदेणार करतात.
 
4.   तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब नाकारला.
 
5.   उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद, तज्ञाचा पुरावा विचारात घेऊन खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्‍यात येत आहे. मुद्ये, त्‍यावरील निष्‍कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-

अ.क्र
मुद्ये 
निष्‍कर्ष
1
जाबदेणार यांनी तक्रारदारांना करारनाम्‍या नुसार ठरल्‍याप्रमाणे सदनिका क्र 3 व 4 यांचे क्षेत्रफळ एकूण 650 चौ.फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाची सदनिका दिलेली आहे काय व त्‍यामुळे सदोष सेवा दिली आहे काय ?
होय 
2   
तक्रारदार कमी क्षेत्रफळाच्‍या सदनिकेसाठी रकमेचा परतावा मिळण्‍यास व कागद खर्चाची रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय? 
होय 
3
जाबदेणार अपूर्ण कामे पूर्ण करुन देण्‍यास जबाबदार आहेत काय ?
होय 
4
तक्रारदार नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पात्र आहेत काय ? 
होय
5
अंतिम आदेश काय      ?
तक्रार अंशत: मंजूर

 
कारणे-
मुद्या क्र 1 ते 5-
          तक्रारदार व जाबदेणार यांच्‍यामध्‍ये सिटी सर्व्‍हे नं 993 बुधवार पेठ मधील इमारतीतील सदनिका क्र 3, पहिला मजला, बिल्‍टअप क्षेत्रफळ 350 चौ.फुट मोबदला रुपये 5,30,000/- तसेच सदनिका क्र 4, पहिला मजला, बिल्‍टअप क्षेत्रफळ 350 चौ.फुट मोबदला रुपये 5,30,000/- संदर्भात दिनांक 16/6/2004 रोजी नोंदणीकृत करारनामा झालेला होता हे दाखल करारनाम्‍यां वरुन स्‍पष्‍ट होते. नोंदणीकृत करारनाम्‍यांच्‍या कलम 12 नुसार जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदनिकांचा ताबा करारनाम्‍याचा दिनांक 15/4/2004 नोंदणीकृत दिनांक दिनांक 16/6/2004 पासून 18 महिन्‍यांच्‍या आत दयावयाचा होता. परंतु तक्रारदारांना सदनिकांचा ताबा दिनांक 16/12/2005 रोजी देण्‍यात आला. करारात ठरलेल्‍या मुदतीनुसार तक्रारदारांना सदनिकांचा ताबा देऊ केला होता यासंदर्भात जाबदेणार यांनी कुठलाही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. विलंबाने सदनिकांचा दिलेला ताबा ही जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे.
           जाबदेणार यांनी नोंदणीकृत करारानुसार सदनिका क्र 3 व 4 एकूण क्षेत्रफळ 650 चौ.फुट तक्रारदारांना दयावयाची होती. तक्रारदारांनी दाखल केलेला तज्ञाचा अहवाल- सिव्‍हील इंजिनिअर व कॉन्‍ट्रॅक्‍टर श्री. सहदेव पी. राऊत यांच्‍या दिनांक 23/7/2007 रोजीच्‍या अहवालाचे अवलोकन केले असता सदनिका क्र 3 व 4 चे एकूण बिल्‍टअप क्षेत्रफळ 494.39 चौ.फुट असल्‍याचे, स्‍वतंत्र विद्युत मिटर दिलेला नसल्‍याचे, पार्किंग मधील प्‍लोअरिंगचे काम पूर्ण नसल्‍याचे, ड्रेनेज लाईन व्‍यवस्‍था पूर्ण नसल्‍याचे, पाय-यांचे काम अपूर्ण असल्‍याचे, मुख्‍य दरवाज्‍यास सुरक्षा दरवाजा व अंतर्गत दरवाजे बसविलेले नसल्‍याचे, स्‍लॅब मधून गळती असल्‍याचे, पाण्‍याची पाईप लाईनचे काम अपूर्ण असल्‍याचे, पी.व्‍ही.सी पाईप हलक्‍या प्र‍तीचे असल्‍याचे व इमारती भोवती सुरक्षित भिंत नसल्‍याचे नमूद करण्‍यात आलेले आहे. श्री. राऊत यांनी त्‍यांच्‍या अहवालाच्‍या पुष्‍टयर्थ शपथपत्रही दाखल केलेले आहे. सबब जाबदेणार यांनी करारानुसार बांधकाम पूर्ण केलेले नसल्‍याचे, बांधकाम सदोष व निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. प्रत्‍येक सदनिकेसाठी स्‍वतंत्र दरवाजा व विद्युत मिटर पैसे स्विकारुनही न देणे ही जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे.
     तक्रारदार व जाबदेणार यांच्‍यात दिनांक 22/10/2003 रोजी झालेल्‍या विसार पावतीनुसार सदनिकेचा प्रति चौरस फुट दर रुपये 1500/- ठरलेला होता. सबब 494.39 चौ.फुटांसाठी प्रति चौरस फुट दर रुपये 1500/- नुसार किंमत रुपये 7,41,585/- इतकी होते. प्रत्‍यक्षात तक्रारदारांनी जाबदेणार यांना पुढील प्रमाणे रक्‍कम अदा केलेली आहे.
दिनांक 15/5/2004        रु. 45,000/-
दिनांक 10/8/2004        रु. 40,000/-
दिनांक 10/11/2008        रु. 7,00,000/-
                        ------------------
एकूण रुपये               रु. 7,85,000/-    
तक्रारदारांनी जाबदेणार यांना एकूण रुपये 7,85,000/- अदा केलेले आहेत. या रकमे मधून रुपये 7,41,585/- वजा जाता तक्रारदार रक्‍कम रुपये 43,415/- परत मिळण्‍यास पात्र आहेत.
 
         जाबदेणार यांनी पूर्णत्‍वाचा दाखला तक्रारदारांना दिलेला नाही. करारानुसार बांधकाम पूर्ण केलेले नाही. स्‍वतंत्र विद्युत मिटर, दरवाजे, पाणी, ड्रेनेज, पार्किंग या सर्व सुविधांमध्‍ये त्रुटी आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार ही मुदतीत आहे. तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ्‍य पुरावा दाखल केलेला आहे.    तक्रारदार नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्चही मिळण्‍यास पात्र आहेत. जाबदेणार क्र 1, 1अ, 1ब व 1क यांनी करारनामा दिनांक 15/4/2004 नोंदणी दिनांक 16/6/2004 दस्‍त क्र 3490 व 3491 ने केलेल्‍या करारान्‍वये करारान्‍वये सर्व जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सर्वांच्‍या सहीने सदनिका खरेदी करार करुन दिला असल्‍याने तो सर्व जाबदेणार यांचेवर बंधनकारक आहे. जाबदेणार क्र 1अ, 1ब व 1क यांच्‍यामधील भागिदारी करार संपुष्‍टात आणण्‍याचा या प्रकरणी दाखल करण्‍यात आलेला करार व त्‍यांचे कैफियत मधील कथन या ठिकाणी कायदयाने लागू पडत नाही. कारण जाबदेणार 1अ, 1ब व 1क मधील तथाकथित हमीपत्राने रद्य केलेल्‍या भागिदारीची कल्‍पना तक्रारदार यांना नव्‍हती. सदर भागिदारी भंग करण्‍याच्‍या जाबदेणार यांच्‍या व्‍यवहारास तक्रारदार यांची परवानगी घेतलेली नाही किंवा त्‍याबाबतची कोणतीही कल्‍पना त्‍यांना देण्‍यात आलेली नाही. जाबदेणार यांनी त्‍यांच्‍या आपआपसातील केलेल्‍या कोणत्‍याही बदलामुळे तक्रारदार यांच्‍या करारावर कोणताही परिणाम होत नाही व तक्रारदार ग्राहक अशा कोणत्‍याही बदलांना बांधिल नाहीत. त्‍यामुळे मुळ करारानुसार सर्व जाबदेणार तक्रारदार यांच्‍या मागणीची पूर्तता करण्‍यास व सेवेतील दोष दूर करुन देण्‍यास बांधिल आहेत असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब सर्व जाबदेणार यांच्‍या विरुध्‍द तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येत असून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.
                        :- आदेश :-
1.        तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येत आहे.
2.        जाबदेणार क्र. 1, 1अ, 1ब व 1क यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना गैरसोईच्‍या व नोंदणीकृत करारानुसार सदनिका न देता कमी क्षेत्रफळाच्‍या सदनिका देऊन सदोष सेवा दिलेली आहे असे जाहिर करण्‍यात येत आहे.
3.        जाबदेणार क्र. 1, 1अ, 1ब व 1क यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना रक्‍कम रुपये 43,415/- तक्रार दाखल दिनांक 27/3/2006 पासून द.सा.द.शे 10 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यन्‍त आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावी.
4.        जाबदेणार क्र. 1, 1अ, 1ब व 1क यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना नोंदणीकृत करारनाम्‍याच्‍या वेळी घेतलेली व करारात नमूद केल्‍याप्रमाणे कागदखर्चाची रक्‍कम रुपये 18,000/-आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत परत करावी.
5.        जाबदेणार क्र. 1, 1अ, 1ब व 1क यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांच्‍या सदनिका क्र 3 व 4 मध्‍ये स्‍वतंत्र लाईट मिटर, पार्किंग प्‍लोअरिंगचे काम पूर्ण करुन दयावे, ड्रेनेज पाणी पाईपलाईन व्‍यवस्‍था पूर्ण व व्‍यवस्थित करुन कार्यान्‍वीत करुन दयावी, सदनिकामधील सर्व दोष काढून त्‍या परिपूर्ण करुन दयाव्‍यात, सदनिकांमध्‍ये अंतर्गत दरवाजे व सुरक्षा दरवाजा बसवून दयावा, स्‍लॅबची गळती दुरुस्‍त करुन कायमस्‍वरुपी गळती बंद करुन दयावी, पाणी पुरवठा पाईप लाईन घालून पाणी पुरवठा व्‍यवस्‍था पूर्ण व चांगली करुन दयावी, इमारतीस सुरक्षा भिंत, सदनिकेतील निकृष्‍ट पाईप बदलून चांगले दर्जाचे बसवून दयावेत. जाबदेणार यांनी या आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत करावी.
6.        जाबदेणार क्र. 1, 1अ, 1ब व 1क यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत करावी.
 
        आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S. M. KUMBHAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.