Maharashtra

Dhule

CC/11/44

Shanjy Ananda Chaudhari Pimpalner Ta Shakri Dist Dhule - Complainant(s)

Versus

Adhikshak Abhiyanta Maharashtra Rajya Vij Vitaran co Ltd Sahyadri Anand nagar Deopur Dhule - Opp.Party(s)

A P Barade

30 Apr 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/11/44
 
1. Shanjy Ananda Chaudhari Pimpalner Ta Shakri Dist Dhule
...........Complainant(s)
Versus
1. Adhikshak Abhiyanta Maharashtra Rajya Vij Vitaran co Ltd Sahyadri Anand nagar Deopur Dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,धुळे.

 

मा.अध्‍यक्षा-श्रीमती.वी.वी.दाणी.      मा.सदस्‍या-श्रीमती.एस.एस.जैन.

                                  ----------------------------------------                          ग्राहक तक्रार क्रमांक  ४४/२०११

                                  तक्रार दाखल दिनांक    ०१/०३/२०११

                                  तक्रार निकाली दिनांक ३०/०४/२०१३

 

श्री.संजय आनंदा चौधरी.                ----- तक्रारदार.

उ.व.४३,धंदा-व्‍यवसाय,

रा.भोई गल्‍ली,पिंपळनेर,

ता.साक्री.जि.धुळे.

              विरुध्‍द

(१)मा.अधिक्षक अभियंता,                    ----- सामनेवाले.

महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लि.

सहयाद्री,आनंद नगर,देवपूर,धुळे.

ता.जि.धुळे.

(२)मा.मुख्‍य अभिंयता,

महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लि.

जळगांव परीमंडळ,एम.आय.डी.सी.एरीया.

विद्यूत भवन,अजिंठा रोड,जळगांव,ता.जि.जळगांव.

(३)कार्यकारी अभियंता,

ग्रामीण विभाग,महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण

कंपनी लि.,नकाणे सबस्‍टेशन जवळ,धुळे.ता.जि.धुळे.

(४)सहायक अभियंता,

महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लि.

पिंपळनेर,ता.साक्री,जि.धुळे.

न्‍यायासन

(मा.अध्‍यक्षाः श्रीमती.वी.वी.दाणी.)

(मा.सदस्‍याः श्रीमती.एस.एस.जैन.)

उपस्थिती

(तक्रारदारा तर्फे वकील श्री.ए.पी.बर्डे.)

(सामनेवाले क्र.१ ते ४ तर्फे वकील श्री.एच.पी.मोहिते.)

--------------------------------------------------------------------

निकालपत्र

(द्वाराः मा.अध्‍यक्षा - श्रीमती.वी.वी.दाणी.)

 

(१)       सामनेवाले यांनी सेवेत त्रृटी केली म्‍हणून, तक्रारदार यांनी सदर तक्रार या न्‍यायमंचात दाखल केली आहे. 

 

(२)      तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे  आपली उपजिवीका व चरीतार्थ चालविण्‍यासाठी वृंदावन बियर बार नामक हॉटेल चालवीतात.  त्‍यामध्‍ये तक्रारदारांच्‍या वडीलांचे नांवे विद्युत मिटर आहे.  तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍या सेवेचे लाभार्थी आहेत व वीज बिलाच्‍या रकमेनुसार बिल भरत आहेत. 

 

(३)       सदर हॉटेलमध्‍ये दि.०२-०७-२०१० रोजी राञी ११.०० ते ११.३० चे सुमारास सामनेवालेंमार्फत पुरविल्‍याजाणा-या वीज पुरवठयाचा विद्यूत दाब अचानक वाढल्‍याने इलेक्‍ट्रीक शॉर्ट सर्कीट झाले व त्‍यामुळे हॉटेलमध्‍ये आग लागली.  सदर घटनेची खबर पिंपळनेर पोलिस स्‍टेशन यांना व माहिती महसुल विभागास देण्‍यात आली.  त्‍यानुसार पंचनामा करण्‍यात आला, त्‍यामध्‍ये सदर घटना इलेक्‍ट्रीक शॉर्ट सर्कीटमुळे घडल्‍याने आग लागून रक्‍कम रु.१५,८४,९३०/- चे नुकसान झाले आहे असे नमूद केले आहे.  त्‍याकामी सहाय्यक विद्यूत निरीक्षक साहेब उर्जा विभाग धुळे यांना दि.०७-०७-२०१० रोजी पञ दिले.  त्‍यांच्‍या अहवालाप्रमाणे पावसामुळे वीज पुरवठा चालू-बंद होत असल्‍याने वायरींगमध्‍ये तांञीक बिघाड होऊन स्‍पार्कींग झाल्‍याने आग लागली.  सामनेवालेंमार्फत मिळालेल्‍या सदोष सेवेमुळे झालेली नुकसान भरपाई मिळणेकामी तक्रारदारांनी सामनेवाले यांना नोटिस पाठविली.  पंरतु सामनेवाले यांनी त्‍याप्रमाणे दखल न घेतल्‍यामुळे सदर तक्रार या मंचात दाखल करावी लागली आहे.

 

(४)       तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांच्‍याकडून पंचनाम्‍यानुसार झालेले नुकसान रु. १५,८४,९३०/- हे दि.०२-०७-२०१० पासून व्‍याजासह मिळावेत आणि मानसिक ञासापोटी रु.१,००,०००/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु.५,०००/- मिळावा.   

          याकामी तक्रारदार यांनी नि.नं. ३ वर शपथपञ,आणि नि.नं.५ सोबत एकूण १० कागदप‍ञे दाखल केली आहेत. 

 

(५)       सामनेवाले नं.१ ते ४ यांचा लेखी खुलासा पान नं.१३ वर आणि  शपथपञ नि.नं.१४ वर दाखल आहे.  त्‍यात त्‍यांनी असे नमुद केले आहे की, तक्रारदारांच्‍या नावाने सामनेवाले यांनी विद्यूत पुरवठा दिलेला नाही.  त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत.  सदरची आग ही अंतर्गत शॉर्ट सर्कीटमुळे लागली आहे.  हॉटेलच्‍या आतील वीज संच मांडणीतील वायरींग कनेक्‍शनमध्‍ये तांञीक बिघाड झाल्‍यामुळे शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली आहे.  तक्रारदारांनी योग्‍य दर्जाची वायरींग करणे आवश्‍यक होते.  तसेच त्‍यांनी सुरक्षीततेसाठी Earth Leakage Circute Brakaje  हे उपकरण बसविलेले नाही.  हॉटेलमधील सदोष वायरींगमुळे आग लागली असून त्‍यास सामनेवाले जबाबदार नाहीत.  सामनेवाले यांनी कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही.  सामनेवाले हे नुकसान भरपाईस जबाबदार नाहीत.  सबब सदरचा अर्ज खर्चासह रद्द करावा अशी सामनेवाले यांनी विनंती केली आहे.

 

(६)       तक्रारदारांचा अर्ज, शपथपञ, सामनेवाले यांची कैफीयत आणि पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षांच्‍या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर विष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत. 

मुद्देः

  निष्‍कर्षः

(अ)तक्रारदार  यांनी खरेदी केलेली सेवा ही व्‍यापारी    कारणासाठी केली आहे काय ?

होय

(ब‍)तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (d)(ii)प्रमाणे ग्राहक आहेत काय ?

नाही.

(क‍)आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

 

विवेचन

(७)     मुद्दा क्र. ‘‘’’ तक्रारदार यांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांच्‍या मालकीचे वृंदावन बियर बार हे हॉटेल आहे.  त्‍याबाबत तक्रारदार यांनी लायसन दखल केले आहे.  सदर लायसन पाहता असे दिसते की तक्रारदार हे हॉटेलचे मालक आहेत व ते बियरबार व हॉटेलचा व्‍यवसाय करतात.

          सदर हॉटेलमध्‍ये आग लागली आहे त्‍या बाबतचा महसुल पंचनामा नि.५/४ वर दाखल आहे.  सदर पंचनामा पाहता हा पंचनामा तलाठी साक्री यांनी, दि.०३-०७-२०१० रोजी दिला असून या पंचनाम्‍याप्रमाणे हॉटेलमध्‍ये आग लागून रक्‍कम रु.१५,८४,९३०/- रुपयांचे नुकसान झाले आहे.  सदर नुकसान भरपाईचा विचार करता तक्रारदार यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे.  यावरुन तक्रारदार यांनी सदर हॉटेलमध्‍ये ब-याच मोठया रकमेची गुंतवणूक केलेली असून त्‍यामधून त्‍यांना मोठया प्रमाणात नफा मिळत आहे असे दिसते.  

          सदर व्‍यवसाय हा कोणत्‍याही एका व्‍यक्‍तीकडून चालविला जावू शकत नाही.  यावरुन तक्रारदार हे निश्चितच सदरचा व्‍यवसाय वैयक्‍तीक करीत नाहीत.  तसेच हा व्‍यवसाय करुन ते इतर ग्राहकांना हॉटेलमार्फत सेवा देतात.   म्‍हणजेच तक्रारदार हे मोठया प्रमाणात नफा कमविण्‍याच्‍या उद्देशाने हा व्‍यवसाय करीत आहेत व त्‍याकामी वापरली जाणारी वीज ही सुध्‍दा व्‍यावसायीक कारणासाठी वापरली जाते.  यावरुन असे स्‍पष्‍ट होते की, सामनेवाले यांच्‍याकडून घेतली जाणारी सेवा ही वैयक्‍तीक वापरासाठी नसून व्‍यापारी कारणासाठी ते सामनेवाले यांच्‍याकडून सेवा घेत आहेत.   म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘’’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

(८)     मुद्दा क्र. ‘‘’’ ग्राहक संरक्षण कायदा 2(d)(ii) : (hires or avails of) any services for a consideration which has been paid or promised or party paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who (hires or avails of) the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person (but does not include a person who avails of such services for any commercial purpose).

 

12(Explanation – For the purposes of this clause, “Commercial purpose” does not include use by a person of goods bought and used by him and services availed by him exclusively of the purposes of earning his livelihood by means of self-employment;)

        या व्‍याख्‍ये प्रमाणे ग्राहक होणे कामी कोणतीही व्‍यक्‍ती, जो मोबदला देऊन माल किंवा सेवा खरेदी करतो तो ग्राहक होत आहे.   या प्रमाणे जी व्‍यक्‍ती स्‍वत:च्‍या किंवा घरातील कुटूंबीयांच्‍या वापरासाठी सेवा खरेदी करतो तोच ग्राहक ठरतो.  परंतु व्‍यापारी प्रयोजनासाठी म्‍हणजे फायदा घेऊन पुन्‍हा विक्रीसाठी खरेदी करणारी व्‍यक्‍ती किंवा सेवेचा लाभ घेणारी व्‍यक्‍ती ही ग्राहक ठरत नाही.  म्‍हणजेच खरेदी केलेली सेवा ही वैयक्‍तीक वापरासाठी पाहिजे. सदर खरेदी केलेली सेवा ही व्‍यापारी प्रयोजनासाठी खरेदी केलेली नसावी.     व्‍यावसायीक कारणासाठी सेवा घेतली असल्‍यास ती व्‍यक्‍ती या कायद्याप्रमाणे ग्राहक होत नाही.  या कलमाचा विचार होता, तक्रारदार हे या कायद्या प्रमाणे ग्राहक होत नाहीत असे आमचे मत आहे.  म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘’’ चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत.

(९)      सदर प्रकरणी तक्रारदार यांनी खालील न्‍यायनिवाडा दाखल केला आहे.

          2010(1) CPR 3 H.P.State Commission , Shimla :

          H.P.State  Electricity Board Vs Jaswant Rai Sood and Anr.

                   या न्‍यायनिवाडयातील वस्‍तुस्थिती व घटनाक्रम हा या प्रकरणातील वाद विषयापेक्षा वेगळया स्‍वरुपाचा असल्‍याचे दिसून येते.  त्‍यामुळे सदर न्‍यायनिवाडा या प्रकरणी लागू होणार नाही असे आमचे मत आहे.

     या कमी मंचामार्फत खालील न्‍यायनिवाडयाचा आधार घेण्‍यात आला आहे.

 

          II (2011)CPJ 18 (NC) NCDRC,New Delhi :

           Ishwar Singh Vs Dakshin Haryana Vidyut Prasaran Nigam Ltd.

          या न्‍यायनिवाडयामध्‍ये तक्रारदारांनी खरेदी केलेली वीज सेवा ही व्‍यावसायीक कारणासाठी घेतली असल्‍याने त्‍यांना ग्राहक धरता येणार नाही या मुद्याचा उहापोह केला आहे.  त्‍यामुळे सदर तत्‍व या प्रकरणी तंतोतंत मिळतेजुळते आहे असे आमचे मत आहे.       

          वरील सर्व कारणांचा विचार होता सदर वीजेचा वापर हा व्‍यावसायीक वापर असल्‍याकारणाने, या कायदेशीर मुद्याचा विचार होता तक्रारदार ग्राहक नाहीत.  त्‍यामुळे या मंचात सदरची तक्रार चालू शकत नाही असे या मंचाचे मत आहे.  त्‍यामुळे आम्‍ही इतर मुद्ये विचारात घेत नाहीत.  सबब सदरच्‍या या कायदेशीर मुद्यावर सदरची तक्रार रद्द करणे योग्‍य आहे.  तक्रारदार यांना आवश्‍यकता वाटल्‍यास ते योग्‍य त्‍या कार्यक्षेञ असलेल्‍या न्‍यायालयाकडे दाद मागू शकतात. 

          सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

आदेश

 

(अ)  तक्रारदारांचा तक्रार अर्ज निकाली काढण्‍यात येत आहे.

(ब)  तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.  

 

धुळे.

दिनांकः ३०/०४/२०१३

 

 

              (श्रीमती.एस.एस.जैन.)    (श्रीमती.वी.वी.दाणी.)

                    सदस्‍या               अध्‍यक्षा

                 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,धुळे.

 

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.