जिल्हा ग्राहक
तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड.प्रकरण क्र. 123/2008.
प्रकरण दाखल तारीख./span> 24/03/2008.
प्रकरण निकाल तारीख. /span> 09/07/2008.
समक्ष - /span>मा.श्री.सतीश सामते. - अध्यक्ष (प्र.)
श्रीमती सुजाता पाटणकर, -सदस्या
सौ.निलाबाई भ्र. प्रभाकर गोखले /span>अर्जदार.
वय, 55 वर्षे, धंदा, शेती
रा. मौजे सरसम (बु) ता. हिमायत नगर /span>
जि.नांदेड.
विरुध्द.
1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि
मार्फत अधिक्षक अभिंयता, विद्यूत भवन नांदेड गैरअर्जदार
2. महाराष्ट्र राज्य वि.वि. कं. मर्यादित
मार्फत सहायक विद्युत निरीक्षक, विद्यूत
निरिक्षण उप वभिाग, उघोग उर्जा व कामगार
खाते, शिवसिला बिल्डींग, गणेश नगर, नांदेड
3. महाराष्ट्र राज्य वि. वि. कं. मर्या.
मार्फत, सहायक अभिंयता, हिमायतनगर
/span> नांदेड.
4. महाराष्ट्र राज्य वि.वि. कं. मर्या.
मार्फत, कार्यकारी अभिंयता, भोकर जि. नांदेड
5. महाराष्ट्र राज्य वि.वि. कं. मर्या.
मार्फत, कनिष्ठ अभिंयता, सरसम (बू.)
ता. हिमायतनगर, जि. नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील/span> अड.एस.एस.कूंटे अड. कादरी
गैरअर्जदार क्र. 1, 3 ते 5 तर्फे वकील- अड. व्ही.व्ही.नांदेडकर
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे/span>- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
(द्वारा - मा.श्री.सतीश सामते,अध्यक्ष ( प्र.)
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी /span>बाबत अर्जदार यांची तक्रार आहे, ती थोडक्यात खालील प्रमाणे,
अर्जदार हे मौजे सरसम ता. हियामतनगर येथील त्यांची शेत सर्व्हे क्र.80/1 एकूण क्षेञफळ 1 हे. 21 आर यांचे मालक असून सिंचनासाठी /span>गैरअर्जदार यांच्याकडून त्यांने ग्राहक क्र.559630002432 अन्वये विद्यूत पूरवठा घेतला आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास विद्यूत पूरवठा करण्यासाठी त्यांच्या शेतात एक विद्यूत खांबाची उभारणी केली आहे.विद्यूत खांबावरील तार अत्यंत निष्काळजीपणे जोडण्यात आलेली होती. /span>थोडयाश्याही वा-याने ते एकमेकाना मिळून त्या मधून स्पार्कीग होत होती,सदर घटनेची तोंडी माहीती गैरअर्जदाराला अर्जदार यांना दिलीहोती. पण गैरअर्जदाराने दूरुस्त करणे तर लांबच त्या ठिकाणी भेट देखील दिली नाही व अर्जदारास उडवाउडवीची उत्तरे दिली. दि.16.12.2007 रोजी विद्यूत खांबावरील तारामध्ये स्पार्कीग होऊन तार तूटून पडली व शेतामध्ये उभा असलेल्या 250 टन ऊस आग लागून खाक झाला. आगीमध्ये पाणी पूरवठा करणारे पि.व्ही.सी. पाईप व केबल वायर हे सूध्दा जळाले. सदरील घटनेची सूचना पोलिस स्टेशन हिमायतनगर येथे दिली असून जळीत अर्ज क्र.09/2007 /span>दि.16.11.2007 अशी नोंद करुन घटनास्थळाचा पंचनामा तयार करण्यात आला. या घटनेची माहीती गैरअर्जदार यांचे अधिकारी यांना दिली. सदरील घटनेची माहीती तहसिलदारहिमायतनगर यांना दिली असता त्यांनी घटनास्थळाचीपाहणी करुन दि.08.11.2007 रोजी पंचनामा केला. ऊसाचे नूकसान रु.2,40,000/-, पि.व्हि.सी. पाईप व केबल वायर चे नूकसान रु.4000/- व मानसिक ञासाबददल रु.50,000/- असे एकूण रु.2,94,000/- नूकसान भरपाईपोटी गैरअर्जदाराकडून अर्जदारास मिळावेत अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्र.1, 3 ते 5 यांनी लेखी जवाब दाखल केला. प्रस्तूत प्रकरण अर्जदाराला कोणतीही सेवेत कमतरता दिली नसताना अर्जदाराने खोटी फिर्याद दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.2 हा महाराष्ट्र शासनाचा अधिकारी आहे. गैरअर्जदारांनीउभे केलेले विद्यूत खांब अंत्यत निष्काळजीपणे जोडण्यात आलेले होते व थोडया वा-याने ते एकमेकाना स्पर्श करुन स्पार्कीग होत आहे हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. सदरील घटनेची तोंडी माहीती अर्जदाराने गैरअर्जदारांना दिली हे म्हणणे खोटे आहे. परिच्छेद क्र.4 मधील मजकूर खोटा आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे दि.16.11.2007 रोजी विद्यूत खांबामधील तारामध्ये स्पार्कीग होऊन तार तूटून पडली व अर्जदाराचया शेतामध्ये उभा असलेल्या 250 टन ऊस जळून खाक झाला हे त्यांचे म्हणणे खोटे आहे असे म्हटले आहे. अर्जदाराच्या अर्जात प्रचंड विसंगती आहे कारण परिच्छेउ क्र.1 मध्ये अर्जदाराने 1 हेक्टर 20 आर ची मालकी सांगितली आहे व उलटपक्षी या परिच्छेदामध्ये अर्जदार स्वतःच 3 हेक्टर क्षेञाचे मालक आहे असे म्हणतात.3 हेक्टर मध्ये 250 टन ऊस होता हे म्हणणे अतीशोयक्ती आहे व खोटे आहे व अत्यंत सूपीक अशी जमीनीत ही मराठवाडयात83 टन प्रति एकर विक्रमी पिक झालेले नाही म्हणून अर्जदार यांची मागणी अवास्तव आहे. दि.08.11.2007 रोजी पंच व तलाठी सज्जायांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला हे खोटे आहे. परिच्छेद क्र.4 मध्ये दि.16.11.2007 रोजी घटना घडली मग अर्जदाराने आठ दिवस पूर्वी पंचनामा केला आहे हा त्यांचा खोटेपणा सिध्द करतो. त्यामुळे अर्जदार यांची फिर्याद खोटी असून ती खर्चासह फेटाळावी अशी मागणी केली आहे.
अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र.1 व 3 ते 5 यांनी आपआपले शपथपञ दाखल केले आहे.
दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
1.गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार
सिध्द करु शकतात काय ? होय.
2.काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणे
मूददा क्र.1 ः-
अर्जदार यांनी त्यांचे शेत सर्व्हे क्र.80/1 यात उभा ऊस दि.16.11.2007 रोजी स्पार्कीग होऊन ढिनगी पडून ऊस खाक झाला आहे त्यांला पूरावा म्हणून एफ.आय. आर, घटनास्थळ पंचनामा, पोलिस पंचनामा हिमायतनगर, यांचा जोडलेला आहे. पंचनाम्याप्रमाणे उभा ऊस जळाला असून आग शॉर्टसर्कीटमूळे लागली आहे असे म्हटले आहे. यानंतर दि.18.11.2007 रोजी तलाठी सज्जा हिमायतनगरयांनी पंचासमक्ष पंचनामा करुन विजेच्या तारा तूटल्यामूळे शॉर्टसर्कीट होऊन आग लागली व ऊस जळाला, ऊसाचे क्षेञ /span>1 हेक्टर 20 आर असे दर्शविले.त्यामुळे अर्जदाराचे रु.2,40,000/- व पी.व्ही.सी. पाईप व केबल वायरचे रु.4000/- नूकसान झाले असा उल्लेख केला आहे. या घटनेची माहीती गैरअर्जदार यांना देण्यासाठी दि.23.11.2007 रोजी अर्जदारांनी अर्ज दिला तो अर्ज दाखल केलेला आहे. अर्जदार यांनी आपल्या शेत मालकी बददल 7/12 दाखल केलेलो आहे.यातील क्षेञ 1.21 हेक्टर दाखवलेले असून ऊसाचे क्षेञ 1.20 अशी नोंद केलेली आहे. गैरअर्जदारांनी अशा प्रकारची आग लागली व ती त्यांच्या निष्काळजीपणामुळे लागली हे जरी नाकबूल केले असले तरी दाखल एफ.आय. आर, पंचनामा, तहसिल ऑफिसचा पंचनामा यावरुन आग लागली हे तरी सिध्दच होते परंतु पोलिस स्टेशन हिमायतनगर यांनी विद्यूत निरीक्षक यांना पञ लिहून आग लागण्याचे काय कारण आहे असे विचारले असता जाय मोक्यावर जाऊन विद्यूत निरीक्षक यांनी आगीचे कारण शोधून काढून एकपञ दिलेले आहे ते पञ या प्रकरणात दाखल केलेले आहे. या दि.31.12.2007 च्या पञानुसार विद्यूत निरीक्षक यांनी अर्जदार यांच्या शेतामध्ये सर्व्हे नंबर 80/1 मधील पिकाची पाहणी केली असता विज कंपनीची मध्यम दाब वाहीनी शेतातून गेलेली आहे. कट पॉईटच्या ठिकाणी लाईनमध्ये झोळ असल्याने ताण येऊन वरचा फेज तार तूटला तसेच लाईनला सूरक्षा साधने नाहीत हा फेज तार तूटून खालचा फेज तारेस स्पर्श झाल्याने शार्ट सर्किट होऊन स्पार्कीग झाली. जळीत ठीणग्या खाली ऊसाचे पाचटवर व ऊसावर पडल्याने त्यांस आग लागली व ऊस जळाला असे कारण सांगितले आहे. विद्यूत निरीक्षक हे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत. गैरअर्जदार विद्यूत कंपनीचे अधिकारी नाहीत. त्यामूळे त्यांनी हा दिलेला रिपोर्ट आम्ही ग्राहय धरुन असे ठरवितो की, निश्चितपणे गैरअर्जदार यांच्याकडून विद्यूत पूरवठा व्यवस्थित करण्यात निष्काळजीपणा झालेला आहे व त्यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागून अर्जदाराचे नूकसान झालेले आहे. अर्जदारांनी एक हेक्टर 20 आर मध्ये 250 टन ऊस होता हे म्हणणे आम्हास संयूक्तीक वाटत नाही. मराठवाडयातील ऊस पिकाची साधारणतः सरासरी एक एकरला कमीत कमी ऊस झाला तर 30 टन होऊ शकतो. साधारणतः 2006-2007 मध्ये ऊसाचा भाव 800 ते 850 टन जाहीर झालेला होता असा पूरावा अनेक प्रकरणात आलेला आहे. 1 हेक्टर 20 आर क्षेञ म्हणजे साधारणतः 3 एकर होय. अर्जदाराचा तिन एकरमधील ऊस जळाला आहे. म्हणजे 3 एकर x 30 टन ऊस = 90 टन ऊस एवढे पिक येणे अपेक्षीत होते म्हणजे साधारणतः अर्जदार यांना रु.72,000/- चे व केबल व पी.यू.सी. पाईपचे व केबल वायरचे रु.4,000/- असे मिळून रु,76,000/- चे एवढे नूकसान होणे अपेक्षीत आहे. म्हणून एवढी रक्कम मिळण्यास अर्जदार पाञ आहे.
वरील सर्व बाबीवरुन आम्ही खालील नीर्णय पारीत करीत आहोत.
आदेश
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.
1.
2. गैरअर्जदार क्र.1 व 3 ते 5 यांनी एकञितरित्या व संयूक्तीकरित्या अर्जदार यांना नूकसान भरपाईपोटी रु.76,000/- /span>प्रकरण दाखल केलेल्या तारखेपासून म्हणजे दि.27.03.2008 पासून 9% व्याजाने पूर्ण रक्कम देईपर्यत व्याजासह अर्जदारास दयावेत.
2.
3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- अर्जदारास दयावेत.
3.
4. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा.
(श्रीमती सुजाता पाटणकर ) (श्री.सतीश सामते)
सदस्या अध्यक्ष ( प्र.)