::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/07/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेली, विधी सेवा व त्याचा मोबदला यासंबंधी, सदर तक्रार स्विकृत करुन घेण्याचे युक्तिवादासाठी ठेवण्यात आली होती.
दिनांक 17/07/2017 रोजी सदर प्रकरण तक्रारकर्त्याचे वकिलांचे प्राथमिक युक्तिवादाकरिता नेमलेले होते. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचे वकिलांचा प्राथमिक युक्तिवाद एैकला व दाखल दस्ताचे अवलोकन केले असता असे दिसून आले की, जिल्हा ग्राहक मंच, वाशिम च्या भौगोलीक अधिकार क्षेत्रात कुठेही सदर प्रकरणाची कारणमिमांसा / तक्रारीस कारण घडलेले नाही. त्यामुळे अर्जदारास / तक्रारदारास आवश्यकता भासल्यास योग्य त्या न्यायमंचासमोर नव्याने प्रकरण दाखल करण्याची मुभा देण्यात येत आहे व पुढील प्रमाणे, अंतिम आदेश, पारीत करण्यात येत आहे.
:::अं ति म आ दे श:::
1) तक्रारकर्ता यांची तक्रार भौगोलीक अधिकार क्षेत्राअभावी खारीज करण्यात येत आहे.
2) तक्रारकर्त्यास आवश्यकता भासल्यास विहीत मुदतीत योग्य त्या न्यायमंचासमोर नव्याने प्रकरण दाखल करण्याची
मुभा देण्यात येत आहे.
3) या न्यायमंचाचे सदस्यांची प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
4) सदर आदेशाची प्रत तक्रारदारास निःशुल्क दयावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri