Maharashtra

Chandrapur

CC/19/36

Shri Ramchandra Nagorao Shrirame - Complainant(s)

Versus

Additional Executive Engineer Maharashtra State Electricity Distribution Corporation Company Ltd. D - Opp.Party(s)

A M Marekar

21 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/19/36
( Date of Filing : 07 Mar 2019 )
 
1. Shri Ramchandra Nagorao Shrirame
R/o Saibaba Ward, Near Akashwani, Chandrapur Tah.Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Additional Executive Engineer Maharashtra State Electricity Distribution Corporation Company Ltd. Division no 2 Chandrapur
Bangali Camp, Shastri Nagar, Mul Road, Chandrapur Tah.Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 21 Feb 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                    (पारीत दिनांक २१/०२/२०२२ )

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १४ सह १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडून वीज कनेक्‍शन घेतले असून त्‍याचा ग्राहक क्रमांक ४५००१०२३३२०३ व ४५००१०३६२५१८ हा असून त्‍याचे दोन इलेक्‍ट्रीक मीटर आहेत. विरुध्‍द पक्ष यांचा मीटर रिडिंग घेणारा कर्मचारी हा मीटर क्रमांक ४५००१०२३३२०३ चे रिडिंग मागील मागील एक वर्षापासून घेत नव्‍हता व बिल सुध्‍दा देत नव्‍हता त्‍यामुळे वीज खंडित केल्‍या जाईल  या भीतीने तक्रारकर्त्‍याने कार्यालयात जावून लगेच बिल घेऊन त्‍याचा भरणा केला. तक्रारकर्त्‍याने सदर मीटरचे बिल बद्दल लेखी तक्रार दिनांक ५/११/२०१८ व दिनांक २१/११/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष यांना दिली. परंतु त्‍यावर विरुध्‍द पक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारकर्ता हे वयोवृध्‍द  असल्‍याने त्‍यांना वारंवार विरुध्‍द पक्षाकडे जावून बिल भरणे शक्‍य नसल्‍यामुळे त्‍यांनी त्‍यांच्‍या वकीलामार्फत विरुध्‍दपक्ष यांना नोटीस पाठवून दोन्‍ही मीटरचे नियमीत रिडिंग घेवून बिल पाठवावे असे नोटीस मध्‍ये नमूद केले.सदर नोटीस तक्रारीसोबत दाखल आहे. परंतु सदर नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यावर कार्यवाही केली नाही उलट तक्रारकर्त्‍याचे मीटर क्रमांक ४५००१०२३३२०३  चे रिडिंग आजही न घेवून त्‍याचे बिल तक्रारकर्त्‍याला पाठविले गेले नाही.
  3. विरुध्‍द पक्ष यांनी नियमीतपणे तक्रारकर्त्‍याकडे असलेल्‍या दोन्‍ही मीटरचे रिडिंग नियमीतपणे न घेतल्‍यामुळे त्‍यांना बिलाचा भरणा करणे शक्‍य नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागत असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार विरुध्‍द पक्ष यांचे विरुध्‍द दाखल केलेली आहे.
  4. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडे असलेल्‍या दोन्‍ही मीटरचे नियमीत मीटर रिडिंग घेवून सदरचे बिल तक्रारकर्त्‍याला पाठवावी तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक ञासापोटी रुपये २५,०००/- नुकसान भरपाई विरुध्‍द पक्ष यांनी द्यावी तसेच तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- देण्‍यात यावा.
  5. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्ष यांना नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित होऊन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन खोडून काढीत त्‍याचे विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष यांना अवास्‍तव बिल दिले, मीटर फॉल्‍टी आहे, सरासरी देयके दिली अशी तक्रार नाही.त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला वेळोवेळी योग्‍य ती सेवा दिली आहे. सध्‍या विरुध्‍द पक्ष यांनी ग्राहकाला उत्‍तम सेवा उपलब्‍ध करुन देत  आहेत. ग्राहक सहजरित्‍या घरुन बिल भरणा करु शकतो. एखादेवेळेस चुकून बिल आले लसेल तर सदर बिल महावितरणाच्‍या साईटवर जाऊन मिळवून वीज देयक भरु शकतात. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांच्‍या कार्यालयात किंवा बॅंकेत जाऊन बिल भरण्‍याची आवश्‍यकता नाही. विरुध्‍द पक्ष हे प्रत्‍येक ग्राहकाच्‍या मीटरची रिडिंग आली पाहिजे व बिल त्‍यांना पाठविण्‍याची काळजी घेतात. तसेच मीटर रिडिंगची कामे वेगवेगळ्या एजंन्‍सीला दिले गेले असून सदर एजंन्‍सी ती कामे पार पाडतात.विरुद्ध पक्ष ह्यांनी त्यांच्या युक्तिवादात पुढे असे नमूद केले कि तक्रारकर्त्याने घेतलेले दोन मीटर हे दोन वेगवेगळ्या वापराकरिता आहे असे त्याचे तक्रारीत म्हणणे नाही, वास्तविक कोण्याही व्यक्तीला एकाच प्रिम्यासेस मधेय समान वापरासाठी दोन वीज कनेक्शन घेता येत नाही. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला योग्‍य ती सेवा दिलेली असून यापुढेही विरुध्‍द पक्ष सेवा देण्‍यास प्रयत्‍नशील आहेत. सबब विरुध्‍द पक्ष विरुध्‍द दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी ही विनंती.
  6. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञाबद्दल दाखल केलेली पुरसिस व तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्‍याकरिता खालील कारणमीमांसा व त्‍यावरील निष्‍कर्ष कायम करण्‍यात आले.

 

कारणमीमांसा

7.  तक्रारीत नमूद वीज कनेक्शन चे तक्रारकर्ता  विरुद्ध पक्ष यांच्याकडून सेवा घेत असल्यामुळे तक्रारदार हे विरुद्ध पक्ष यांचे ग्राहक आहेत,व विरुद्ध पक्ष हे सेवा पुरवठादार आहेत. तक्रारीतील तक्रार विरुद्ध पक्ष यांचे उत्तर  व  दोन्ही पक्षांचे दस्तेवज व युक्तिवादाचे अवलोकन केले असता असे निर्देशनास आलेले आहे कि तक्रारदाराने त्यांच्या नावावर एकाच प्रिमायसेस मध्ये दोन मीटर विरुद्ध पक्ष ह्याचेकडून घेतलेले आहे. नमूद दोन मीटर मधील एका मीटर कर्मक ४५००१०२३३२०३ चे  विरुद्ध पक्ष नियमित रीडिंग घेत नसल्यामुळे त्या मीटर चे देयक तक्रारदाराला नियमित देत नाही अशी तक्रार आहे परंतु आयोगाच्या मते विरुद्ध पक्ष कंपनी ने ग्राहकांना सोयीचे व्हावे म्हणून उत्तम सोय उपलब्ध करून दिलेली आहे, आज ग्राहकांना स्वतः बँकेत किंवा विरुद्ध पक्ष यांच्या कार्यालयात जाऊन देयक  भरण्याची गरज नाही. विरुद्ध पक्ष कंपनीच्या साइटवर जाऊन सुद्धा घरबसल्या देयकाचा भरणा ग्राहक करू शकतात.विरुद्ध पक्ष ह्यांनी त्याच्या उत्तरात तक्रारदाराने त्याच्या नावाने एकाच प्रिमायसेस मध्ये दोन मीटर घेणे हि बाब बेकायदेशीर आहे असे नमूद केले आहे, परंतु त्या बद्दल तक्रारकर्त्या विरुद्ध कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही.आयोगाच्या मते मूळताच एखाद्या ग्राहकाने एकाच प्रिमायसेस मधेय दोन मीटर चा वापर करणे हि बाब वीज अधिनियम नुसार बेकायदेशीर असल्यामुळे त्या अनुशंगाने सदर तक्रारीत तक्रारदाराने केलेली मागणी अमान्य होणे  क्रमप्राप्त आहे. सबब आयोग खालील आदेश पारित करीत आहे.   

अंतिम आदेश

 

  1. तक्रार क्रमाक ३६/२०१९ खारीज करण्‍यात येते.

                    2.  उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा. 

  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.

 

    

 

     (किर्ती वैद्य (गाडगीळ))     (कल्‍पना जांगडे (कुटे))       (अतुल डी. आळशी)

            सदस्‍या                सदस्‍या                  अध्‍यक्ष

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.