Maharashtra

Akola

CC/15/274

Jagjitsingh Kartarsingh Virak - Complainant(s)

Versus

Additional Executive Engineer - Opp.Party(s)

Ravindra Nagare

21 Mar 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/274
 
1. Jagjitsingh Kartarsingh Virak
New Radhakisan Plot,Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Additional Executive Engineer
M S E D C L,Urban Subdivison No.3,Ratanlal Plot, Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक :  21/03/2016 )

 

आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे,, यांचे अनुसार

 

1.        ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर  करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .

          तक्रारकर्ते यांच्याकडे त्यांचे वडील सरदार करतारसिंग विरक यांचे नावाने विरुध्दपक्षाकडून घरगुती वापराकरिता विज पुरवठ्याचे दोन कनेक्शन घेतले असून त्यांचे ग्राहक क्रमांक 310070539801 व 310070544503 असे आहेत.  तक्रारकर्त्याचे वडील मरण पावले असून, तक्रारकर्ता दोन्ही विज जोडण्यांचा वापर करीत आहे व नियमितपणे विज देयकांचा भरणा करित आहे.  तक्रारकर्त्याने दि. 14/09/2015 रोजी सदरहू विज जोडण्या त्याचे नावाने होण्याकरिता विरुध्दपक्षाकडे अर्ज केलेला आहे.  तक्रारकर्त्यास ऑक्टोबर 2014 पासून दोन्ही मिटरचे अवाजवी बिल येत आहेत, त्यामुळे तक्रारकर्त्याने या बाबत विरुध्दपक्षाकडे तक्रार केली हेाती,  तरी सुध्दा विरुध्दपक्ष यांनी सदरहू बिल दुरुस्त करुन दिले नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्याने माहे जुन 2015 चे दोन्ही मिटर देयके भरली नाही.  त्यानंतर विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास जुलै 2015 चे देयके पाठविले,  परंतु त्यामध्ये सुध्दा कुठलीही सुधारणा केली नाही.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दि. 12/08/2015 रोजी  विज मिटरमध्ये दुरुस्ती व विज देयकात दुरुस्ती करण्याबाबत लेखी अर्ज दिला होता,  परंतु त्या अर्जावर विरुध्दपक्षाने कुठलीही कार्यवाही केली नाही.  या उलट दि. 28/8/2015 रोजी विज देयकांची रक्कम न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची नोटीस पाठविली.  त्यानंतर तक्रारकर्त्यास ऑगस्ट 2015 चे दोन्ही मिटरचे अवाजवी बिले देण्यात आली. सदर देयक अवाजवी असल्यामुळे तक्रारकर्त्याने ते भरले नाही.  सदरहू दोन्ही विज जोडण्यांचा तक्रारकर्त्याचा सरासरी वापर 200 ते 300 युनिटच्या आत आहे.  परंतु विरुध्दपक्ष यांनी जुन 2014 पासून वास्तविक रिडींगपेक्षा जास्त विज वापर दाखवून अतिरीक्त व अवाजवी बिले आकारणे सुरु केले आहे. तक्रारकर्त्यास ऑगस्ट 2015 चे ग्राहक क्र. 310070539801 चे रु. 71,910/- चे देयक देण्यात आले सदरहू बिलात तक्रारकर्ता यांनी 822 युनिट वापरल्याचे नमुद आहे.  तसेच ग्राहक क्र. 310070544503 चे रु. 37,420/- चे देयक देण्यात आले व त्यामध्ये 735 युनिट वापरल्याचे नमुद आहे.  तक्रारकर्त्याच्या घरी कुठलेही अवास्तव विजेचे उपकरणे नाहीत.  त्यामुळे विज देयकात दर्शविण्यात आलेला विज वापर अवास्तव आहे.  तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन  विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याकडील दोन्ही विज पुरवठा‍ मिटर मधील बिघाड दुरुस्त करुन तक्रारकर्त्यास दोन्ही मिटरचे दुरुस्त केलेले वाजवी बिले देण्यात यावी व तो पर्यंत तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये.  विरुध्दपक्षाने दिलेले अवास्तव बिले रद्द करण्यात यावी.  तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 50,000/- देण्याचा आदेश व्हावा.  तसेच न्यायिक खर्चासाठी रु. 10,000/- विरुध्दपक्षाकडून मिळावे. 

सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्‍यासोबत  एकंदर  16 दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत. 

विरुध्‍दपक्ष  यांचा लेखीजवाब :-

2.    सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्‍दपक्ष  यांनी आपला  लेखीजवाब,   शपथेवर दाखल केला  त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन  असे नमुद केले आहे की,…

   विरुध्दपक्षाने दि. 01/01/1980 रोजी श्री सरदार करतारसिंग यांचे नावे घरगुती वापराकरिता ग्राहक क्र. 310070539801, मिटर क्र. 90/00129077 अन्वये  0.30 केडब्ल्यु चा विज पुरवठा दिला होता. सदर मिटर हे माहे सप्टेंबर 2014 मध्ये बदली करुन त्या जागी नविन मिटर 98/03376691 हे 0 वाचनावर उभारण्यात आले होते.  जुने मिटर बदली करतेवेळी त्यावर माहे ऑगस्ट 2014 मध्ये माहे जुलै 2014 चे विज वापराबाबत अंतीम वाचन 29403 पर्यंत निर्गमित करण्यात आले होते.  मिटर बदली करतेवेळी त्यावर अंतीम वाचन 30803 हे नोंदविलेले होते.  सदर वाचन माहे सप्टेंबर 2014 मध्ये नविन मिटरचे वाचनात समाविष्ट करुन आलेले वाचन हे मागील 7 महिन्यात विभागुन देयक निर्गमित करण्यात आले होते.  त्यामध्ये त्या पुर्वी आकारण्यात आलेले सरासरीच्या देयकाची वजावट देण्यात आली आहे.  सदर मिटरच्या अचुकतेबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वादांकित मिटर हे दि. 13/01/2015 रोजी मिटर चाचणी विभाग येथे चाचणी केली असता सदरचे मिटर हे योग्य रितीने काम करीत असल्याचे निदर्शनास आले  त्यामुळे ग्राहकास देण्यात आलेल्या देयकामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करणे विरुध्दपक्षाला शक्य नाही.  सदरचे मिटर चाचणीकरिता काढून आणले,  त्यानंतर ग्राहकाचे इमारतीवर नविन मिटर 98/02294116 हे उभारण्यात आले.

     दि. 15/06/1987 रोजी पुन्हा श्री सरदार करतारसिंग यांनी विरुध्दपक्षाकडून घरगुती वापराचा अतिरिक्त विज पुरवठा ग्राहक क्र. 310070544503, मिटर क्र. 76/01349425 नुसार घेतला.   तक्रारकर्त्याने विहीत कालावधीत देयके मिळूनही माहे सप्टेंबर 2014 पासून देयकांचा भरणा, कोणतेही संयुक्तीक कारण नसतांना, केलेला नाही.  सदरच्या देयकाबाबत तक्रारीचे अनुषंगाने सदरचे मिटर हे चाचणीकरिता बदली करुन त्या जागी नविन मिटर क्र. 75/12375300 हे उभारण्यात आले होते.   बदली केलेले मिटरची चाचणी, मिटर चाचणी विभाग येथे दि. 13/01/2015 रोजी केली असता,  सदरचे मिटर हे सुस्थितीत काम करीत असल्याचे आढळून आले.  त्यामुळे ग्राहकास देण्यात आलेले देयक हे मिटर वाचनानुसार देण्यात आलेले असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती संभवत नाही.  विरुध्दपक्षाचे मुळ ग्राहक सरदार करतारसिंग हे मयत झाल्याचे निदर्शनास येते.  तक्रारकर्त्याने दि. 14/8/2015 रोजी फक्त ग्राहक क्र. 310070544503, ह्या ग्राहक क्रमांकाचे नावात बदल करण्याकरिता अर्ज सादर केला होता.  सदरच्या अर्जाचे अनुषंगाने तक्रारकर्त्याने आवश्यक त्या रकमेचा भरणा करणे बंधनकारक होते,  त्या रकमेचा भरणा करणेबाबत तक्रारकर्त्यास भ्रमनध्वनीवरुन सुचित केले असता, तक्रारकर्त्याने अद्यापही त्या रकमेचा भरणा केला नाही,  तसेच दुसऱ्या ग्राहक क्रमांकाबाबत तक्रारकर्त्याने कोणतीही कार्यवाही केली नाही,  त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक होऊ शकत नाही व म्हणून सदर तक्रास मंचासमक्ष चालु शकत नाही.  वादांकित मिटर वरील वाचनानुसार विरुध्दपक्षाने देयके निर्ममित केलेली आहेत,  परंतु त्या बाबत कोणतेही संयुक्तीक कारण नसतांनाही माहे मार्च 2015 पासून कोणत्याही देयकाचा भरणा करण्यात आला नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.

3.   त्यानंतर  तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले व विरुध्दपक्षाने प्रतिज्ञालेख दाखल केला, तसेच उभय पक्षाने तोंडी युक्तीवाद केला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.      सदर प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष यांचा लेखी जबाब, दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ता यांचे प्रतिउत्तर, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलेाकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे

     उभय पक्षामध्ये हा वाद नाही की, तक्रारकर्त्याकडे त्यांचे वडीलांच्या नावाने विज पुरवठ्याचे दोन मिटर असून त्यांचे ग्राहक क्रमांक   310070539801 व 310070544503 असे आहेत.   तक्रारकर्ता यांच्या वडीलांचे निधन झाले आहे व त्यानंतर तक्रारकर्ता यांनी सदरहू विज जोडणी त्यांच्या नावावर होण्याकरिता विरुध्दपक्षाकडे अर्ज केला होता.  वरील वाद नसलेल्या बाबीवरुन तक्रारकर्ते, विरुध्दपक्षाचे लाभार्थी आहेत,  शिवाय  प्रकरण चालु असतांना तक्रारकर्ते यांचे म्हणणे असे आहे की, विरुध्दपक्षाने दोन्ही मिटर हे तक्रारकर्त्याच्या नावे करुन दिले आहेत.  त्यामुळे तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ग्राहक झालेले आहेत.  तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन मंचाला अशी विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष यांनी दोन्ही विज पुरवठा‍ मिटर मधील बिघाड दुरुस्त करुन द्यावा व ज्यानुसार वाजवी बिल द्यावी.  तसेच विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला या दोन्ही मिटर बद्दल दिलेले रु. 71,910/- व रु. 37,420/- हे जास्त रकमेचे बिले रद्द व्हावीत, तसेच नुकसान भरपाई व प्रकरणाचा खर्च मिळावा.

       तक्रारकर्ते यांनी मंचासमोर अंतरिम अर्ज दाखल करुन विरुध्दपक्षाने दोन्ही मिटरचा विद्युत पुरवठा, या प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत खंडीत करु नये, अशी विनंती केली होती.  त्यावर दाखल देयके तपासून मंचाने तक्रारकर्त्याला ग्राहक क्र. 310070539801, ज्याचे देयक रु. 71,910/- वादात आहे व ग्राहक क्र.  310070544503,  देयक रु. 37,420/- जे वादात आहे, या दोन्ही देयकापोटी रु. 30,000:- इतकी रक्कम विरुध्दपक्षाकडे भरावी व त्यानंतर विरुध्दपक्षाने सदर तक्रारीचा निकाल लागे पर्यंत दोन्ही मिटरचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये,  असे आदेश विरुध्दपक्षाला दि. 22/9/2015 रोजी दिले होते.  दाखल दस्त असे दर्शवतात की, तक्रारकर्त्याने ही रक्कम दि. 3/10/2015 रोजी विरुध्दपक्षाकडे भरली आहे.  सदर तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्दपक्षाचा असा युक्तीवाद आहे की, त्यांनी सप्टेबर 2014 मध्ये हे मिटर तक्रारकर्त्याला बदलून दिलेले आहे व त्यावरील वाचन हे सप्टेंबर 2014 च्या या नविन मिटरमध्ये निर्गमित केले होते.  त्यानंतर हे वाचन 7 महिन्यात विभागुन देयक देण्यात आले व त्यामध्ये पुर्वी आकारण्यात आलेल्या सरासरी  देयकांची वजावट देण्यात आली आहे.  तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले आहे.  परंतु त्यामध्ये सदर वादातील मिटर हे सप्टेंबर 2014 मध्ये विरुध्दपक्षाने बदललेले आहे, ही बाब नाकारलेली नाही.  तसेच तक्रारकर्ते यांनी सप्टेंबर 2014 चे देयक रेकॉर्डवर दाखल केले नाही व विरुध्दपक्षाने खतावणी प्रत दाखल केली नाही.  तक्रारकर्ते सदर खतावणीची प्रत विरुध्दपक्षाने दाखल करावी, असा अर्ज करु शकले असते,  परंतु त्यांनी तसे काही केले नाही.  तसेच उभय पक्षांनी दाखल केलेल्या विज देयकावरुन असे दिसते की, तक्रारकर्ते यांनी देयके भरण्यात अनियमितता दाखवलेली आहे.  तक्रारकर्ते यांनी दोन्ही मिटर मधील बिघाड दुरुस्त करावा, अशी विनंती केली आहे.  परंतु विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या दोन्ही मिटर बद्दल दाखल केलेल्या मिटर चाचणी अहवालावरुन सदर मिटरची चाचणी दि. 13/1/2015 रोजी विरुध्दपक्षाने केलेली असून,  त्याबद्दलचा रिपोर्ट हा, मिटर योग्य रितीने काम करीत असल्याचा आढळून येत आहे.  सदर मिटर चाचणी अहवाल हा विरुध्दपक्षाने तक्रारकर्ते यांचे समक्ष केला नाही किंवा चाचणी करतेवेळी हजर राहण्याबाबत विरुध्दपक्षाने कुठलीही नोटीस दिली नाही.  परंतु त्यामुळे हा अहवाल अयोग्य आहे,  असे म्हणता येणार नाही किंवा तसा नियम तक्रारकर्त्याने दाखल केला नाही.  अशा परिस्थितीत वादातील देयके हे चुकीचे असून ते रद्द करण्याचा आदेश मंचाला पारीत करता येणार नाही.

     सबब अंतीम आदेश पारीत करण्यात येतो तो खालील प्रमाणे

::: अं ति म  आ दे श  :::

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
  2. न्यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही

सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.