// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
दाखल दिनांक : 11/11/2014
निर्णय दिनांक : 25/02/2015
निलेश शंकरराव काळणे
वय 32 वर्षे, धंदा - नोकरी
रा. रायपुरा, अचलपुर, ता. अचलपुर
जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- अचलपुर नागरी सह. पतसंस्था, शाखा गांधी पुल,
- , र.नं. 351, परतवाडा,
तर्फे व्यवस्थापक, अचलपुर नागरी सह. पतसंस्था,
अचलपुर ता. अचलपुर, जि. अमरावती
- डॉ. रमेश राईकवार, अध्यक्ष
अचलपुर नागरी सह. पतसंस्था,
रा. जयस्तंभ चौक, परतवाडा जि. अमरावती
- श्री. प्रदीप नामदेवराव जवंजाळ, सचिव
अचलपुर नागरी सह. पतसंस्था,
ब्राम्हणसभा कॉलणी, परतवाडा, जि. अमरावती
- डॉ. शुभांगी रमेश राईकवार, उपाध्यक्ष,
अचलपुर नागरी सह. पतसंस्था,
रा. जयस्तंभ चौक, परतवाडा जि. अमरावती
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..2..
- विनोद देवचंद सेंगर, संचालक,
रा. पेन्शनपुरा, परतवाडा,
ता. अचलपुर, जि. अमरावती
- डॉ. विजय केशवराव ठाकरे, संचालक
रा. घामोडीया प्लॉट, परतवाडा
ता. अचलपुर, जि. अमरावती
- अनंत नारायण सोनपरोते, संचालक
रा. सरमसपुरा, अचलपुर
ता. अचलपुर, जि. अमरावती
- विनायक नारायण सोनपरोते, संचालक
रा. सरमसपुरा, अचलपुर
ता. अचलपुर, जि. अमरावती
- धरमचंद्र सीताराम हेडाऊ, संचालक
अब्बासपुरा. अचलपुर,
ता. अचलपुर, जि. अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. शेंडे
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. घाटे
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..3..
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 25/02/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारकर्ताने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सदरील तक्रार दाखल केली.
2. तक्रारदाराचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष हे अचलपुर नागरी सह. पतसंस्था, र.नं. 351 हया नावाने नोंदणीकृत असुन मुख्य कार्यालय जयस्तंभ चौक परतवाडा आहे.
3. तक्रारदार यांनी विरुध्दपक्षाकडे ‘प्रेसिडेंट धनवर्दनी’ अंतर्गत मुदतठेव रक्कम दि. ३.४.२००७ व दि. १०.८.२००७ रोजी अनुक्रमे रु. ३५,०००/- व रु. ८०,०००/-, 6 वर्षासाठी गुंतविली असुन मुदतीनंतर म्हणजे दि. ३.४.२०१३ व दि. १०.८.२०१३ रोजी अनुक्रमे रु. ७०,०००/- व रु. १,६०,०००/- तक्रारदाराला विरुध्दपक्षाकडून देय होती. परंतु देय दिनांका नंतर विरुध्दपक्षाने तक्रारदार यांना वरील मुदत ठेव रक्कम परत न
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..4..
केल्यामुळे विरुध्दपक्षाने केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे सदर तक्रार वि. मंचात तक्रारदाराने दाखल केली.
4. तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती करुन, तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, यांनी विरुध्दपक्ष यांना लेखी आदेश देऊन सुध्दा, त्यांनी हेतुपरस्परपणे टाळाटाळ केली. व शेवटी विनंती अर्जात प्रार्थना केली की, विरुध्दपक्षाने सदोष सेवा दिल्याचे घोषीत करुन, तक्रारदाराला मुदती नंतर देय असलेल्या संपुर्ण रक्कम रु. २,३०,०००/- देय दिनांक पासुन 24 टक्के द.सा.द.शे. व्याजाने परत मिळावी, तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. ५,०००/- व तक्रार खर्च रु. १०,०००/- विरुध्दपक्षाकडून मिळण्यात यावी. तक्रारदाराने निशाणी 2 प्रमाणे दस्त 1 ते 10 दाखल केले आहेत.
5. विरुध्दपक्ष क्र. 1 ते 9 यांनी त्यांचा लेखी जबाब निशाणी 10 ला दाखल करुन, त्यात नमुद केले की, तक्रारदाराच्या परिच्छेद 1 व 2 मधील म्हणणे अंशतः मान्य
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..5..
करुन, तक्रारदाराच्या परिच्छेद 3 व 4 मधील म्हणणे अमान्य केले. परिच्छेद 5 व 6 मधील म्हणणे अंशतः मान्य करुन तक्रारदाराने पाठविलेली कायदेशीर नोटीसला उत्तर दिल्याचे म्हटले. तसेच तक्रारदाराने केलेल्या प्रार्थनेतील विनंती विरुध्दपक्षाला मान्य नसुन, सदर प्रकरण वि. मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याबद्दल म्हटले आहे.
6. विरुध्दपक्षाने पुढे म्हटले की, तक्रारदाराचे वडील श्री. शंकरराव काळणे यांनी स्वतःचे व तक्रारदाराच्या नावाने वेगवेगळया रक्कमेच्या ठेवी ठेवल्या व तक्रारदाराचे वडीलच तक्रारदाराचा सर्व व्यवहार सांभाळायचे. विरुध्दपक्षाच्या संस्थेमध्ये काही आर्थिक अडचण आल्यामुळे, त्यांनी तक्रारदाराला विनंती केली की, तक्रारदाराला घेणे असलेली रक्कम प्रतिमाह रु. १०,०००/- प्रमाणे विरुध्दपक्ष द्यायला तयार आहे. तक्रारदाराचे वडील तयार झाल्यामुळे विरुध्दपक्षाने त्यांना रु. ३०,०००/- विरुध्दपक्षाकडून घेऊन, संस्थेची धोकेबाजी केली. सदर रक्कम विरुध्दपक्ष यांना
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..6..
भरण्यास सांगण्यात आली, परंतु त्यांनी ती विरुध्दपक्षाकडे भरली नाही.
7. विरुध्दपक्षाने तक्रारदाराचे पैसे परत करणार नाही, असे कधीही म्हटले नाही. उलट रु. १०,०००/- प्रतिमाह देण्यास तयार आहे. फक्त तक्रारदाराच्या वडीलांनी जे रु. ३०,०००/- विरुध्दपक्षाकडून घेतले ते परत करणे आहे. अशा प्रकारे तक्रारदाराची तक्रार व वाद हा दिवाणी स्वरुपाचा असल्यामुळे वि. मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही व तक्रारदाराचा अर्ज रद्द होणेस पात्र आहे. विरुध्दपक्षाने निशाणी 11 प्रमाणे दस्त 1 ते 4 सादर केले.
8. वरील प्रमाणे तक्रारदाराचा अर्ज व सादर केलेले दस्त, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब व सादर केलेले दस्त, तक्रारदार यांचा तोंडी युक्तीवाद व विरुध्दपक्षाचा लेखी युक्तीवाद, यावरुन वि. मंचाने खालील मुद्दे विचारात घेतली.
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..7..
मुद्दे उत्तर
- वि. मंचाला सदर तक्रार चालविण्याचा
अधिकार आहे का ? ... होय
- तक्रारदाराला विरुध्दपक्षाकडे असलेली
त्याची मुदत ठेव रक्कम, मुदती
अंती व देय तारखेपर्यंत, व्याजासह परत
मिळण्यास पात्र आहे का ? ... होय
- विरुध्दपक्षाने केलेल्या सेवेतील त्रुटी व
अनुचित व्यापार प्रथेमुळे, तक्रारदार हा
मानसिक व शारिरीक त्रासापोटी झालेली
नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे
का ? ... होय
- आदेश काय ? .. अंतीम आदेशा प्रमाणे
कारणे व निष्कर्ष ः-
9. तक्रारदारातर्फे अॅड. श्री. शेंडे यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात, तक्रारदाराच्या मुळ अर्जातील बाबींचा पुर्नरुच्चार करुन म्हटले की, विरुध्दपक्षाने सेवेतील त्रुटी करुन अनुचित
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..8..
व्यापार प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराची ज्या ठेव रकमेची मुदत संपल्यानंतर सुध्दा, परत न केल्यामुळे विनंती प्रार्थना मंजूर करण्याची विनंती वि. मंचासमोर केली. तसेच तक्रारदाराच्या वडीलांचा व्यवहार हा त्यांच्या वडीलांचा वेगळा व्यवहार असल्यामुळे, रु. ३०,०००/- हे तक्रारदाराने विरुध्दपक्षाला परत करणे, हयाचा काहीही संबंध येत नाही. तसेच रु. ३०,०००/- अगोदर जमा करण्याविषयी विरुध्दपक्षाने तक्रारदाराला कधीही लेखी कळविले नाही. म्हणून विरुध्दपक्षाचे सर्व म्हणणे खोटे व गैरवाजवी आहे.
10. विरुध्दपक्षातर्फे त्यांच्या लेखी युक्तीवादात त्यांनी दाखल केलेल्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नउल्लेख करुन कथन केले की, विरुध्दपक्ष हे आजही तक्रारदाराचे पैसे परत करायला तयार आहे.
11. मुद्दा क्र. 1 चा विचार करता तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे मुदत ठेव रकमा ठेवल्याचे दस्त 2/1 वरुन दिसुन येते व त्याचा मुदत ठेव खाते क्र. K/47107/81 व K/16107/85
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..9..
असा आहे. याचा अर्थ तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक असुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ‘ग्राहक’ हया संज्ञेत ते मोडतात. म्हणून सदर प्रकरण वि. मंचाला चालविण्याचा पुर्णपणे अधिकार असुन मुद्दा क्र. 1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
12. मुद्दा क्र. 2 चा विचार करता तक्रारदाराने दस्त 2/1 मधील अ.क्र. 1 व 2 नुसार विरुध्दपक्षाकडे रु. ३५,०००/- व रु. ८०,०००/-, ची मुदत ठेव गुंतविल्याचे दिसुन येते. व तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे मुदतीनंतर रु. २,३०,०००/- तक्रारदाराला विरुध्दपक्षाकडून घेणे निघते व हे विरुध्दपक्षाने मान्य पण केले आहे. तक्रारदाराने सादर केलेल्या नि 2/3 प्रमाणे सहाय्यक निबंधक अचलपुर यांनी सुध्दा विरुध्दपक्ष यांना दि. १५.७२०१३ रोजी लेखी आदेश देऊन, ठेवीची रक्कम त्वरीत परत करण्याचे कळविले. परंतु सदर आदेशाला विरुध्दपक्षाने केराची टोपली दाखवुन, तक्रारदाराची ठेव रक्कम परत करण्यासाठी काहीही कार्यवाही केली नाही.
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..10..
13. विरुध्दपक्षाने सदर ठेव परत करण्यासाठी तक्रारदाराच्या वडीलांना दिलेले रु. ३०,०००/- परत करावे व नंतर प्रतिमाह रु. १०,०००/- प्रमाणे परत करण्यास तयार असल्याचे नमूद केले. परंतु विरुध्दपक्षाच्या सदर प्रस्तावास तक्रारदाराने अनुमोदन दिल्याचे किंवा तयार असल्याचे तक्रारदाराने कोठेही तक्रारीत असे म्हटले नाही किंवा युक्तीवादात पण उल्लेख केला नाही.
14. वास्तविक पाहता तक्रारदाराने मुदत ठेव म्हणुन जमा केलेली रक्कम, मुदती नंतर तक्रारदाराला परत करणे हे विरुध्दपक्षाचे प्राथमीक कर्तव्य आहे. विरुध्दपक्ष आर्थिक अडचणीत आहे हा त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे. त्यासाठी तक्रारदाराला वेठीस धरणे, व तक्रारदाराच्या वडीलांनी विरुध्दपक्षाकडून घेतलेले रु. ३०,०००/- परत करण्याची अट घालणे हे योग्य नाही. कारण तक्रारदाराच्या वडीलांचा व्यवहार हा वेगळा असून त्याचा तक्रारदाराच्या ठेवी सोबत काहीही संबंध नाही, हे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे. तसेच तक्रारदार व त्यांच्या
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..11..
वडीलांचा व्यवहार विरुध्दपक्षाकडे एकच आहे, हयाचा कोणताही कागदोपत्री पुरावा विरुध्दपक्षाने सादर केला नाही. उलट तक्रारदाराने दाखल केलेल्या निशाणी 2/1 मधील अ.क्र. 3 प्रमाणे तक्रारदाराच्या वडीलांनी विरुध्दपक्षाकडे रु. १५,०००/- मुदत ठेवीत गुंतवुन दि. १८.९.२०१३ रोजी रु. ३०,०००/- तक्रारदाराच्या वडीलांना घेणे होते. याचा अर्थ तक्रारदाराच्या वडीलांना विरुध्दपक्षाकडून रु. ३०,०००/- जे प्राप्त झाले ते त्यांच्या स्वतःच्या ठेवतील रकमेचे होते हे मान्य करायला हरकत नाही. हा मुद्दा जर बाजुला ठेवला तरी पण, विरुध्दपक्षाने तक्रारदाराला द्यावयाच्या मुदत ठेवतील रकमेतुन रु. ३०,०००/- वजा करुन, राहिलेली उर्वरित रक्कम तक्रारदाराला परत करु शकले असते. परंतु विरुध्दपक्षाने तसे केल्याचे दिसून येत नाही.
15. वरील सर्व विवेचनावरुन, प्रथम दर्शनी असे सिध्द होते की, विरुध्दपक्षाने तक्रारदाराची मुदत ठेव परत करण्यास हेतुपुरस्पर टाळण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी खोटे कारण विशद केले. म्हणून वरील प्रमाणे दोषपुर्ण सेवा
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..12..
तक्रारदाराला देणे व मुदत ठेव गुंतवणुक करण्यासाठी तक्रारदाराला बाध्य करुन एक प्रकारची अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते, व तक्रारदाराचा अर्ज अंशतः मान्य करण्यात येऊन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला त्यांची मुदत ठेव रक्कम रु. २,३०,०००/- द.सा.द.शे. 10 टक्के दराने दि. १०.८.२०१३ पासुन तर देय तारखेपर्यंत व्याजासह परत करावे.
- तक्रारदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. ५,०००/- व सदर तक्रार खर्च
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2014
..13..
रु. ५,०००/- असे एकूण रु. १०,०००/- विरुध्दपक्षाने तक्रारदाराला द्यावे.
- वरील आदेशाचे पालन, विरुध्दपक्ष यांनी निकालाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 40 दिवसाचे आत करावे.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 25/02/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष