Maharashtra

Nagpur

CC/626/2015

Ashish A. Atloye - Complainant(s)

Versus

Accord Medical Products Ltd. - Opp.Party(s)

Priya P. Meshram

20 Feb 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/626/2015
 
1. Ashish A. Atloye
Trimurti Nagar Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Accord Medical Products Ltd.
Rohini New Delhi 110085 India
Delhi
Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Priya P. Meshram , Advocate
For the Opp. Party:
ORDER

        (मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)

 

                          -//  आ दे श  //-

 

                       (पारित दिनांकः 20/02/2016)

 

1.          तक्रारकर्त्‍याने  ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे थोडक्‍यात कथन असे की,  तक्रारकर्ता व्‍यवसायाने डॉक्‍टर असुन स्‍वतःच्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये पेशंटवर उपचार करीतो. विरुध्‍द पक्षाकडून पंचकर्माशी संबंधीत काही प्रॉडक्‍ट विकत घेण्‍यासाठी विरुध्‍द पक्षाकडे ऑनलाईन संपर्क केला असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास आवश्‍यक असलेले अकशीथरपना यंत्र (नेत्र वस्‍त्री), कठी वस्‍ती यंत्र (मेटल), ग्रेवा वस्‍ती (मेटल), जानु वस्‍ती (मेटल),  शीरीओ वस्‍ती कॅप  इत्‍यादी खरेदीबाबत चर्चा केली आणि दि.29.06.2015 रोजी विरुध्‍द पक्षास  रु.17,400/- देऊन वरील पंचकर्म प्रॉडक्‍ट विकत घेतले. त्‍याबाबत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रु.17,378/- चे बिल दि.30.06.2015 दिले. वरील प्रॉडक्‍टची डिलीव्‍हरी दि.01.07.2015 रोजी विरुध्‍द पक्षातर्फे पंकज अरोरा, एकॉर्ड मेडिकल प्रॉडक्‍ट फिडऍक्‍स ऐक्‍सप्रेस ट्रान्‍सपोर्ट ह्यांच्‍या कडून प्राप्‍त देखिल झाली.

 

2.          सदर प्रॉडक्‍ट विकत घेतांना ते निर्दोष असुन त्‍यातून तेल लिकेज होणार नाही याची विरुध्‍द पक्षांनी खात्री दिली होती आणि समजा लिकेज झाले तर ते बदलुन देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. सदर प्रॉडक्‍टचा तक्रारकर्त्‍याने आयुर्वेदिक थेरपीमध्‍ये वापर सुरु केला तेव्‍हा असे निदर्शनास आले की, त्‍यात तेल योग्‍य प्रकारे लॉक होत नाही आणि प्रत्‍येकवेळी तेल लिक होते. सदरचा दोष तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या सर्व प्रॉडक्‍टमध्‍ये दिसुन आला, त्‍यामुळे सदर प्रॉडक्‍ट तक्रारकर्त्‍याला आयुर्वेदिक थेरपीमध्‍ये वापर करण्‍यासाठी निरुपयोगी ठरले आणि त्‍याव्‍दारे रुग्‍णांना योग्‍य ती ट्रीटमेंट तक्रारकर्ता देऊ शकला नाही.

 

3.          वरील सदोष प्रॉडक्‍टबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास कळवुनही त्‍यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर प्रॉडक्‍ट दि.11.07.2015 रोजी विरुध्‍द पक्षाकडे परत पाठविले आणि सदोष प्रॉडक्‍ट बदलवुन निर्दोष प्रॉडक्‍ट देण्‍याची विनंती केली. विरुध्‍द पक्षाने त्‍याचेकडे सध्‍या दुसरे निर्दोष प्रॉडक्‍ट उपलब्‍ध नसल्‍याचे सांगितले तेव्‍हा तक्रारकर्त्‍याने सदोष प्रॉडक्‍टची किंमत परत करावी अशी विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने ती देखिल परत केली नाही. विरुध्‍द पक्षाचे सदरचे कृत्‍य हे सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे म्हणून तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये खालिल प्रमाणे मागणी केलेली आहे.

 

      1)    विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍यास विकलेले सदोष प्रॉडक्‍टची किंमत रु.17,400/- आणि

      तक्रारकर्त्‍याने सदोष प्रॉडक्‍ट विरुध्‍द पक्षास परत कुरियरव्‍दारे पाठविले त्‍याचा खर्च      रु.570/- तक्रारकर्त्‍यास परत करण्‍याचा विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आदेश व्‍हावा.

      2)    शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.50,000/- आणि सेवेतील      न्‍युनतेबाबत रु.20,000/- नुकसान भरपाई मिळावी.

 

4.          तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाने पाठविलेले रिटेल इन्‍व्‍हाईस, एचडीएफसी बँकेत भरलेल्‍या बिलाची पावती, विरुध्‍द पक्षाने प्रॉडक्‍ट पाठविलेल्‍या कुरियरचे पत्र, तक्रारकर्त्‍याने डीसीडीसी कुरियरव्‍दारे प्रॉडक्‍ट परत पाठविल्‍याचा दस्‍त, वकीलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केलेले आहेत.

 

 

 

5.          विरुध्‍द पक्ष यांना मंचाकडून पाठविलेली नोटीस प्राप्‍त झाल्याबाबत पोष्‍टाचा अहवाल प्राप्‍त झाला परंतू ते गैरहजर राहील्‍याने प्रकरण त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍यांत आले.

 

6.          तक्रारीच्‍या निणर्यासाठी खालिल मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे...

 

            मुद्दे                                             निष्‍कर्ष            

1) विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केला आहे काय ?         होय.                                 

2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?          अंशतः

3) आदेश ?                                                   अंतिम आदेशाप्रमाणे.            

               

  • // कारणमिमांसा // -

     

    7.          मुद्दा क्र.1 ते 3 बाबतः- तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत विरुध्‍द पक्षाकडून ऑनलाईन खरेदी केलेले आयुर्वेदीक उपचार पध्‍दतीचे प्रॉडक्‍टचे बिल दस्‍त क्र. 1 वर दाखल केले आहे. त्‍याप्रमाणे सदर प्रॉडक्‍ट बाबत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून रु.17,400/- घेतल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे असे की, सदर प्रॉडक्‍टव्‍दारे रुग्‍णांवर उपचार करतांना तेलाचा वापर करावा लागतो, परंतु विरुध्‍द पक्षाने ऑनलाईन विकलेले प्रॉडक्‍ट सदोष असल्‍याने त्‍यातून तेल गळती होत असुन रुग्‍णांवर उपचारासाठी निरुपयोगी ठरले आहे. तक्रारकर्त्‍याचे पुढे म्‍हणणे असे की, सदर प्राडक्‍ट विकते वेळी विरुध्‍द पक्षाने ते निर्दोष असल्‍यास आणि त्‍यात काही दोष असल्‍यास बदलवुन देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. तक्रारकर्त्‍याचे हे शपथपत्रावरील कथन विरुध्‍द पक्षाने लेखीउत्‍तर दाखल करुन नाकारलेले नाही. तक्रारकर्त्‍याने वरील सदोष प्रॉडक्‍ट विरुध्‍द पक्षास दि.11.07.2015 रोजी कुरियरव्‍दारे पाठविल्या बाबतची पावती दस्‍त क्र.4 वर दाखल केली आहे. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने कुरियरचा खर्च रु.570/- केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. मात्र विरुध्‍द पक्षाने वरील सदाष प्रॉडक्‍ट बदलवुन दिले नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने अधिवक्‍ता मेश्राम यांचेमार्फत दि.05.08.2015 रोजी नोंदणीकृत डाकेव्‍दारे नोटीस पाठविला, त्‍याबाबत नोटीसची प्रत आणि पोष्‍टाची पावती दाखल केलेली आहे. तसेच विरुध्‍द पक्षास सदरचा नोटीस दि.08.08.2015 रोजी मिळाल्‍याबाबत पोष्‍टाचा अहवाल दाखल केलेला आहे. सदर नोटीस मिळूनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास सदोष प्रॉडक्‍ट बदलवुन दिले नाही किंवा प्रॉडक्‍टची आणि कुरियर खर्चाची रक्‍कम परत केली नाही. विरुध्‍द पक्षाची सदरची कृती ही निश्चितच सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे. म्‍हणून तक्रारकर्ता तक्रारीत मागणी केल्‍याप्रमाणे प्रॉडक्‍टची किंमत रु.17,400/- आणि कुरियरचा खर्च रु.570/- असे एकूण रु. 17,970/- तक्रार दाखल दिनांक 23.10.2015 पासुन प्रत्‍यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे.12% व्याजासह मिळण्‍यांस पात्र आहे. याशिवाय शारीरिक, मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाईचे रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्‍यांस देखिल पात्र आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 1 ते 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविलेले आहेत.

     

                वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

     

    - // अं ति म आ दे श // -

     

          तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 खालील तक्रार विरुध्‍द

          पक्षा विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

    1.         विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास प्रॉडक्‍टची किंमत रु.17,400/- आणि कुरियरचा खर्च रु.570/-      असे एकूण रु.17,970/- दिनांक 23.10.2015 पासुन प्रत्‍यक्ष अदायगी पर्यंत   द.सा.द.शे.12% व्‍याजासह परत करावी.

    2.         विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.5,000/-      आणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- अदा करावे.

    3.    सदर आदेशाचे पालन विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्‍त  झाल्‍यापासून 30 दिवसांचे    आत करावे.

    4.    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.   

     

     

     

     

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.