मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई किरकोळ अर्ज क्रमांक – 06/2011 मूळ तक्रार क्रमांक – 71/2005 आदेश दिनांक – 24/03/2011 श्रीमती शिला दगडू पवार, 3 ईस्माईल चाळ, मनोहर हेअर कटींगसलूनच्या मागे, जंगल मंगल रोड, सर्वोदय नगर, भांडूप (पश्चिम), मुंबई 400 078. ....... अर्जदार/मूळ तक्रारदार विरुध्द
1) व्यवस्थापक, अभ्युदय को.ऑप.बँक लि., के. के. टॉवर, अभ्युदय बँक लेन., ग. द. आंबेकर मार्ग, परेल व्हीलेज, मुंबई 400 012. 2) शाखा अधिकारी, अभ्युदय को.ऑप.बँक लि., चेतना अपार्टमेंट, जंगल मंगल रोड, सर्वोदय नगर, भांडूप (पश्चिम), मुंबई 400 078. ......... गैरअर्जदार/मूळ सामनेवाले समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – तक्रारदार व त्यांचे हजर गैरअर्जदारातर्फे त्यांचे प्रतिनिधी हजर - आदेश - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत दरखास्त प्रकरण अर्जदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अंतर्गत दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला आज रोजी रुपये 68,608/- रकमेचा डिमांड ड्राफ्ट दिलेला आहे. तसेच रुपये 25,000/- गैरअर्जदार यांनी मा. राज्य आयोग यांचेकडे अपिल दाखल केले होते तेव्हा जमा केले होते. सदर रक्कम ही तक्रारदार यांना देण्याचा आदेश मा. राज्य आयोग यांनी पारित केलेला आहे. गैरअर्जदार यांनी मंचाने पारित केलेल्या आदेशाची पूर्तता केलेली आहे. अर्जदार यांनी प्रस्तुत दरखास्त ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अंतर्गत केलेली आहे ती मागे घेण्याबाबत अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी मंचाच्या आदेशाची पूर्तता केलेली असल्यामुळे, तसेच तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरण मागे घेतल्यामुळे सदर दरखास्त क्रमांक 6/2011 ची नस्ती बंद करण्यात येते. उभयपक्षांनी आपापला खर्च सोसावा. उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 24/03/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |