आदेश
द्वारा श्री. आर.बी. सोमानी - मा.अध्यक्ष
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः
तक्रारदार यांची सामनेवाले क्र. 2 विमा कंपनी यांचेकडे नियमित विमा पॉलिसी आहे. सामनेवाले क्र. 1 ही तक्रारदाराची बँक असून त्यांचेकडे कॅश क्रेडिट खाते आहे. तक्रारदार नियमित सन 2002 पासून सामनेवाले क्र. 3 यांचेकडे मेडिक्लेम विमा देत आहे. सामनेवाले क्र. 3 हे विमा एजंट आहेत. तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून सन 2008-09 करीता पॉलिसी नुतनीकरण करण्यासाठी सामनेवाले क्र. 2 ला सामनेवाले क्र. 1 कडील पॉलिसी नुतनीकरण करण्यासाठी सामनेवाले क्र. 2 ला सामनेवाले क्र. 1 कडील खात्याचा चेक रु. 12,494/- चा दिला.
सामनेवाले क्र. 2 यांनी त्याविषयी पॉलिसी निर्गमित केली. परंतु सामनेवाले क्र. 1 बँकेने तक्रारदाराचे विम्यापोटी दिलेला धनादेश तक्रारदारास कोणतीही सूचना न देता न वटविता परत दिला आणि त्यामुळे तक्रारदाराचे अतोनात नुकसान झाले आहे. तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 बँकेकडे चौकशी केली असता दि. 4/4/2008 रोजीचे पत्र देऊन सामनेवाले क्र. 1 यांनी नमूद केले की नजरचुकीने सदर चेक परत केलेला आहे. याविषयी कळविल्यानंतरदेखील सामनेवाले क्र. 2 यांनी पुन्हा पॉलिसी दिली नाही आणि म्हणून दि. 27/5/2008 ला सदर पॉलिसी नुतनीकरण करुन दयावी अशी विनंती केली. दुय्यम प्रत मिळणेसाठी योग्य फी भरली आणि सामनेवाले क्र. 2 यांनी सदर फ्लोटिंग मेडिकल पॉलिसीचे नुतनीकरण न करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे. सामनेवाले क्र. 1 यांनी खात्यात पुरेशी रक्कम असूनही धनादेश न वटविता परत केला आणि म्हणून सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. सामनेवाले क्र. 3 विमा एजंट आहेत. त्यांनी योग्य सेवा दिली नाही आणि म्हणून तक्रारदाराला प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली.
तक्रारदाराने प्रार्थना केली की, सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिल्याचे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याबाबत घोषित करावे. सामनेवाले क्र. 2 यांचेकडून सदर पॉलिसी नुतनीकरण करुन मिळावे. तक्रारदाराला झालेल्या नुकसानीपोटी सामनेवाले क्र. 1 यांनी नुकसान भरपाई दयावी. तसेच सामनेवाले क्र. 1 यांनी वैदयकीय तपासणीचा खर्च वहन करावा. रु. 1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी, रु. 50,000/- खर्च व इतर व्याज मिळावे अशी तक्रार प्रतिज्ञालेखासह दाखल केली आणि तक्रारीसोबत निशाणी 3 यादीसोबत 6 दस्तऐवज दाखल केले. त्यात तक्रारदाराने त्याच्या परिवाराची वेळोवेळी काढलेल्या पॉलिसीच्या प्रती, सदर चेकवरुन सामनेवाले क्र. 2 यांनी दिलेली पॉलिसी, धनादेशाची झेरॉक्स प्रत तसेच सामनेवाले क्र. 1 यांनी दिलेला दाखला, तक्रारदाराने केलेली सामनेवाले विमा कंपनीकडील तक्रार व इतर दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
सामनेवाले क्र. 1 यांनी हजर होऊन आपलस लेखी जबाब पान क्र. 46 वर दाखल केला असून त्यांनी त्यांचेविरुध्द सर्व आक्षेप फेटाळले आहेत आणि नमूद केले की तक्रारदाराने महत्त्वपूर्ण मुद्दे लपविले आहेत. सामनेवाले क्र. 1 कडून तक्रारदाराचे ओव्हरड्राफ्ट अकाऊंट रु. 2,85,000/- चा होता. दि. 29/2/2009 ला ओव्हरड्राफ्ट जास्त झाला होता. म्हणजेच रु. 2,85,000/- चे वर असल्याकारणाने तक्रारदाराचा चेक न वटता परत गेलेला आहे. तक्रारदार स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही म्हणून तक्रार खारीज करावी. सामनेवाले क्र. 1 यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराचे ओव्हरड्राफ्ट अकाऊंट नियमित जास्त राहत होते व पुरेसा निधी नसल्याने चेक परत गेला आहे. त्यात सामनेवाले यांची कोणतीही चूक नाही. दि. 4/4/2008 चे पत्र तक्रारदारास त्याचे समाधानासाठी दिले होते आणि तक्रारदाराचे विनंतीवरुन दिलेने सामनेवाले क्र. 1 चा दोष नाही. सदर दाखल्याचा गैरफायदा घेण्याचा तक्रारदाराचा हेतू दिसतो. तसेच लेखी जबाबाचे समर्थनार्थ त्यांचा प्रतिज्ञालेख सादर केला आहे. सामनेवाले यांनी दस्तऐवत दाखल करुन नमूद केले की, धनादेश परत करतांना संबंधीतांना तक्रारदाराचे खात्यात ओव्हरड्राफ्ट जास्त होता.
सामनेवाले क्र. 2 यांनी लेखी जबाब दाखल केला व नमूद केले की त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. धनादेश परत केला गेला, पॉलिसी परत केली. तसे करणे कायदेशीर व नियमानुसार आहे आणि म्हणून सामनेवाले क्र. 2 यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. लेखी जबाबासोबत प्रतिज्ञालेख दाखल केला आहे.
तक्रारदाराने पान 75 वर सामनेवाले क्र. 1 कडील त्यांचे खात्याचे पासबुकाची नव्याने दाखल केले आहे. तक्रारदाराने आपला लेखी युक्तीवाद मंचासमोर दाखल केला आहे. त्यांनी तक्रारीचे समर्थन करुन सामनेवालेकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सामनेवाले क्र. 1 यांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदाराने तोंडी युक्तीवाद मंचासमोर केला. सामनेवाले क्र. 2 यांनी पुरसिस पान क्र. 93 वर दिली यासोबत मा. राष्ट्रीय आयोगाचा निवाडा II 2009 CPJ 392 दाखल आहे.
उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
उभय पक्षांचे शपथेवरील लेखी कथन, शपथेवरील पुरावा, लेखी युक्तीवाद व कागदपत्रे यांचे सुक्ष्म वाचन केल्यानंतर आणि तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद ऐकल्यावर मंचासमोर निर्णयाकरीता खालील मुद्दे उपस्थित झालेतः
मुद्देः
1. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारास धनादेश ओव्हरड्राफ्ट अकाऊंट
जास्त झाल्याचे कारण देऊन धनादेश न वटवता पाठवून दोषपूर्ण सेवा
दिली आहे काय?
2. सामनेवाने क्र. 2 विमा कंपनी यांनी तक्रारदारास तक्रारदाराची दिलेली
पॉलिसी रद्द करुन किंवा नुतनीकरणाची विनंती फेटाळून दोषपूर्ण सेवा
दिली आहे काय? --- अंतीम आदेशानुसार
निष्कर्षः
सामनेवाले क्र. 1 कडे तक्रारदाराचे ओव्हरड्राफ्ट अकाऊंट होते व आहे तसेच तक्रारदार सामनेववाले क्र. 2 कडे त्याची व त्याचे कुटुंबाची मेडिक्लेम पॉलिसी नियमित घेतो तसेच विवादीत पॉलिसीकरीता तक्रारदाराने सामनेवाले यांनी सामनेवाले क्र. 1 कडील त्याचे ओव्हरड्राफ्ट अकाऊंटचे धनादेश दिले होते. तसेच उभय पक्षांकडील ग्राहक व सेवा देणा-यासंबंधी उभय पक्षांनी मान्य केले असूनही त्याविषयी वाद नाही.
सामनेवाले 1 बँकेने नमूद केले की सदर ओव्हरड्राफ्ट अकाऊंटमध्ये तक्रारदाराचे खात्यात पुरेशी रक्कम नव्हती म्हणजेच ओव्हरड्राफ्ट लिमिट रु. 2,85,000/- चे वर बॅलन्स असल्याने तक्रारदाराचा संबंधीत तारखेस, म्हणजे दि. 29/2/2008 रोजी विमा हप्त्यापोटी दिलेला धनादेश परत केला. त्या संपूर्ण प्रकरणात सामनेवाले क्र. 1 यांचा कोणताही दोष नाही. दि. 4/4/2008 च्या पान 36 वरील दाखल्याबद्दल सामनेवाले यांनी नमूद केले की फक्त तक्रारदार हा जुना ग्राहक असल्यामुळे त्याचे विनंतीवरुन समाधानाकरीता विमा पॉलिसी नुतनीकरण करणे सुलभ होणेकरीता सदर दाखला दिला आहे. तक्रारदार सदर दाखल्याचा गैरवापर करीत आहे व म्हणून तक्रारदार स्वच्छ हाताने मंचासमोर आला नाही. करीता तक्रार खारीज करावी असा ठाम लेखी जबाब व अनुषंगिक युक्तीवाद दाखल केला आहे.
सामनेवाले क्र. 2 यांनी स्पष्टपणे नमूद केले की पॉलिसी नुतनीकरणाकरीता देण्यात आलेला धनादेश हा कोणाच्याही कसल्याही चुकीने परत गेला असेल तर आणि त्याची रक्कम सामनेवालेस मिळाली नसेल तर त्या धनादेशानुसार दिलेली पॉलिसी रद्द करण्याचा अधिकार कायद्याने सामनेवालेस नाही आणि सामनेवालेची कृती कोणतीही दोषपूर्ण सेवा अथवा अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला म्हणून ग्राहक धरता येत नाही.
सामनेवाले क्र. 3 हे हजर झाले नाही त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 चे कथनाचा विरोधात दस्त यादी पान 75 सोबत पासबुकचा उतारा दाखल केला आहे. त्यामध्ये 26 एप्रिल, 2006 पासून रक्कम नांवे जमा केल्याचे दिसून येते आणि सामनेवाले क्र. 1 यांचे कथनानुसार कुठेही स्पष्ट होत नाही की तक्रारदाराचे ओव्हरड्राफ्ट अकाऊंट फक्त रु. 2,85,000/- चे होते कारण जवळ जवळ सर्वच नोंदी या रु. 3,00,000/- व त्याचेवर दिसून येतात. मंचाचेमते सामनेवाले क्र. 1 यांनी धनादेश परत करण्याचे दिलेले कारण रास्त व योग्य नाही. कारण तक्रारदाराला नेहमीच जवळ जवळ रु. 3,00,000/- व त्याचेवर ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे असे दिसून येते आणि अशा स्थितीत तक्रारदाराचे कथन रास्त व ग्राहय धरण्यासारखे वाटते. तसेच सामनेवाले क्र. 1 चे कथन योग्य वाटत नाही. मंचासमोर असे सिध्द होते की, सामनेवाले क्र. 2 यांनी केलेली कृती कोणतीही अनुषंगाने दोषपूर्ण सेवा ग्राहय धरल्या जाऊ शकत नाही. तक्रारदाराने सामनेवाले क्र. 3 विरुध्द कोणतीही दोषपूर्ण सेवा सिध्द केली नाही. म्हणून त्याचेविरुध्द तक्रार खारीज करणे योग्य आहे.
सामनेवाले क्र. 2 यांनी आपले बचावाचे समर्थनार्थ मा. राज्य आयोगाचे निवाडयाची प्रत दाखल केली. त्यात संबंधीत बँक काही अंशी जबाबदार ठरते असे स्पष्ट होते. एकंदरीत सर्व प्रकरणात तक्रारदारास नक्कीच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर पॉलिसीचा कालावधी लोटून जवळ जवळ चार वर्षे झाले आहेत. अशा परिस्थितीत सदर पॉलिसीअंतर्गत संपर्ण बेनिफीट रु. 10,000/- देण्याचे आदेशीत करण्याची कायदेशीर व न्यायोचित राहणार नाही. सामनेवाले क्र. 2 यांनी नमूद केले की ते तक्रारदाराची व त्याचे कुटुंबियांची पॉलिसी नुतनीकरण करुन देण्यास तयार आहे. परंतु श्रीमती विमल हिराजी छेडा, तक्रारदाराची आई यांची प्रकृतीची तपासणी केलेनंतर ती ग्राहय धरता येईल व तक्रारदाराने तक्रार दाखल केलेनंतर सदर नियमित पॉलिसी घेतली असल्यास याविषयी कोणतेही आदेश पारीत करणे योग्य नाही.
तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागजा आहे आणि दाखल दस्तऐवज पान 36 वरुन स्पष्ट होते की तक्रारदारास त्याचे ओव्हरड्राफ्ट लिमिटचेवर अनेकवेळा रक्कम अदा केली गेली आहे. पान 75 यादीवरील दस्तऐवजावरुन स्पष्ट होते आणि म्हणून मंचाचेमते सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदाराचे धनादेश रास्त कारण न देता परत करुन तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली आणि प्रस्तुत तक्रारीस कारण घडले आहे आणि म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सामनेवाले क्र. 2 यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याचे स्पष्ट होत नाही. वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेः
आ दे श
1. तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. विमा रकमेपोटी दिलेले सामनेवाले क्र. 1 बँकेने धनादेश त्याने रु. 2,85,000/- न वटवून तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली आहे असे जाहिर करणेत येत आहे.
3. तक्रारदारास सामनेवाले क्र. 1 यांनी झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई दाखल रु. 25,000/- (अक्षरी रुपये पंचविस हजार) देय करावे.
4. तक्रारदार यांनी तक्रारदाराची आई श्रीमती विमल हिराजी छेडा यांचे वैद्यकीय तपासणीनंतर पॉलिसीची विनंती केल्यास त्यांना निर्गमित करावे.
5. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारास तक्रारीचे खर्चापोटी रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) दयावेत.
6. उपरोक्त आदेशाचे पालन सामनेवाले क्र. 1 यांनी आदेश प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे अन्यथा संपूर्ण आदेशीत रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याज देय राहील याची सामनेवाले यांनी नोंद घ्यावी.
7. सामनेवाले क्र. 3 विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते.
8. सामनेवाले क्र. 1 यांनी आदेशाचे पालन न केल्यास ते ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाईस पात्र राहतील याची सामनेवाले यांनी नोंद घ्यावी.
9. आदेशाची निशुल्क प्रत उभय पक्षांस उपलब्ध करुन देण्यात यावी.
|
[HON'ABLE MR. R.B. SOMANI] |
PRESIDENT |
|
[ HON'BLE MRS. JYOTI IYER] |
MEMBER |