नि.21 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 22/2011 नोंदणी तारीख – 29/1/2011 निकाल तारीख – 7/4/2011 निकाल कालावधी – 112 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. सौ मंगल अधिकराव मांडवे 2. कु. पुजा आदिकराव मांडवे अ.पा.क. सौ मंगल अधिकराव मांडवे सर्व रा. वडूज, ता. खटाव जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री व्ही.पी.मुळे) विरुध्द 1. अभिनव महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.वडूज तर्फे मॅनेजर अमर लक्ष्मणराव जाधव 2. चेअरमन, उर्मिला लक्ष्मणराव जाधव 3. लक्ष्मणराव नागेश जाधव, संचालक सर्व रा.वाकेश्वर रोड, वडूज ता.खटाव जि.सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री पांडुरंग भोसले) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. यापैकी दोन ठेवींची रक्कम मासिक वेतन योजनेत ठेवली होती. त्यानुसार जाबदार यांनी काही महिने दरमहा व्याज सेव्हिंग्ज खात्यावर जमा केले. परंतु सप्टेंबर 2009 पासून व्याजाची रक्कम जमा केलेली नाही. तसेच अर्जदारचे मुलीचे नावावर लखपती योजनेअंतर्गत ठेवलेली ठेवीची रक्कम जाबदार यांनी अर्जदारचे बचत खात्यावर वर्ग केली. अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, बचत खात्यातील रक्कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.15 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे थकीत कर्जदारांनी थकीत कर्जाची रक्कम भरली नाही त्यामुळे जाबदार संस्था अडचणीत आली. ठेवपावती क्र.916 ची रक्कम अर्जदार यांनी मुदतपूर्व नेल्यामुळे सदरचे रकमेवर बचत खात्याप्रमाणे देय होणारे व्याज अर्जदारचे बचत खात्यामध्ये जमा केलेले आहे. जाबदार यांनी सहकार खात्याच्या एप्रिल 2006 पासून आदर्श पोटनियम स्वीकारल्याने संस्था ठेवीवर 12 टक्के व्याज आकारणी करु शकत नाही. तसा ठराव जाबदार संस्थेने पारीत केला आहे. त्यामुळे अर्जदार यांना दामपाचपट रक्कम मागता येणार नाही. ठेवपावती क्र.876 व 877 ची मुदत अद्याप संपलेली नाही त्यामुळे त्यांची रक्कम अर्जदार यांना मागता येणार नाही. कर्जवसुलीची कार्यवाही चालू आहे. कर्जवसुली झालेनंतर अर्जदारची रक्कम देणेस जाबदार तयार आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे नि.20 कडील पुरसिस पाहिली तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाख्ला कागदपत्रे पाहणेत आली. 4. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारच्या जाबदार संस्थेकडे ठेव रकमा असून दोन ठेवपावत्यांवरती अर्जदार मासिक व्याज घेत होते. परंतु सप्टेंबर 2009 पासून तेही बंद केले आहे. तसेच मुलीचे नावावरती लखपती योजनेत रक्कम रु.20,000/- ठेवले होते, मुदत दि.31/12/2009 रोजी संपणार होती. सबब मुदत संपलेनंतर अर्जदार गेले असता गोड बोलून पावतीवर सही घेतली व दि.31/3/2008 रोजीच रक्कम रु.26,606/- अर्जदारचे सेव्हिंग्ज खात्याला जमा केलेचे सांगितले. अशा प्रकारे जाबदारने सेवेत त्रुटी केली आहे. सबब कलम 5 प्रमाणे सर्व रक्कम वसुल होवून मिळावी अशी अर्जदारची तक्रार दिसते. 5. जाबदार यांनी नि.15 कडे म्हणणे तसेच शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे व अर्जदार ठेव पावती क्र.916 कडील रक्कम घेवून गेले आहेत असे कथन केले आहे. 6. निर्विवादीतपणे पावती क्र.877 व 876 नाव मंगल अधिकराव मांडवे या ठेवपावत्या दाखल आहेत. परंतु ठेवपावती क्र.916 या पावतीची झेरॉक्सप्रत दाखल आहे व अर्जदारचे कथनानुसार सदर ठेवपावतीची मुदत दि.31/12/2009 रोजी संपलेनंतर अर्जदार संस्थेत गेले असता त्यांची गोड बोलून सही घेतली होती परंतु दि.31/3/2008 रोजीच सदर पावतीपोटी रक्कम रु.26,606/- सेव्हिंग्ज खातेमध्ये जमा केलेचे सांगितले. जाबदारने नि.17 सोबत कागदपत्रे दाखल केली आहेत. ती पाहता दि.26/4/2008 रोजीचे सभेचे प्रोसिडींग बुक मधील लागूपुरता ठरावाची प्रत असून दामपाचपट योजना बंद करुन त्या ठेवीवरती सेव्हिंग्ज दराप्रमाणे व्याज देणेचे ठरलेले दिसते. अर्जदारने नि. 5 सोबत मूळ सेव्हिंग्ज खाते पुस्तक दाखल केले आहे, ते पाहता दि.31/3/08 रोजी रक्कम रु.26,608/- अर्जदारचे खात्यात जमा आहेत. अर्जदारचे कथनानुसार ही बाब त्यांना दि.31/12/2009 नंतर जेव्हा अर्जदार पावती घेवून गेले तेव्हा समजली असे म्हणतात. परंतु दि.12/6/2008 रोजीच अर्जदारने रक्कम रु.20,000/- (वीस हजार) काढून नेले आहेत. हे त्यांनीच दाखल केलेले पासबुक वरुन दिसते. सबब दि.31/3/08 रजी केवळ रु.260/- शिल्लक असताना दि.12/6/2008 रोजी अर्जदार रु.20,000/- काढून नेतात म्हणजे सदर रक्कम रु.26,606/- ठेवीपोटी जमा झालेले आहेत हे अर्जदार यास माहीत आहे. जाबदारनेही अर्जदारची विथड्रॉवल स्लीप दाखल केली आहे. सबब अशा पध्दतीने पावती क्र.916 बाबत अॅफिडेव्हीटने खोटे कथन करणे म्हणजे हे गुन्हयास पात्र असणारे क़ृत्य आहे व यासाठी तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासाची रक्कम अर्जदारास मंजूर न करणे या पध्दतीने समज देणेत येत आहे. 7. अर्जदार यांनी नि.5 सोबत ठेव पावती क्र.877 व 876 यांच्या मूळ प्रती व बचत खात्याचे पासबुक दाखल केले आहे. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच बचत खात्याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्या खात्यामध्येही रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. ठेवींची मुदत संपलेनंतर अगर संपणेपूर्वी ठेव रक्कम परत मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. त्यामुळे सदरचे दोन्ही ठेवपावत्यांची मुदत जरी संपलेली नसली तरी अर्जदारचे इच्छेविरुध्द जाबदार त्यांची रक्कम अडवून ठेवू शकत नाही. तसेच संस्था आर्थिक अडचणीत आली आहे, कर्जवसुलीची कारवाई चालू आहे, कर्जवसुली झालेनंतर अर्जदारची ठेव रक्कम परत करण्यात येईल ही कारणे ठेवरक्कम परत न करण्यासाठी कायदेशीर कारणे ठरु शकत नाही. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि.5 सोबतचा दि.20/12/2010 चा ठेव रक्कम मागणीबाबतची अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेला अर्ज पाहिला असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 5 सोबतच्या ठेव पावती क्र.877 व 876 या ठेवींच्या रकमा मुदतपूर्व ठेवपावत्यांवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी तसेच बचत खात्यातील शिल्लक रक्कम नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासहित द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 8. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.877 व 876 कडील रक्कम मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 3. बचत खाते क्र. 6/30 कडील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 7/4/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |