तक्रार क्र.78/07. -ः आदेश ः- 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. सामनेवालेनी आदेश पारित तारखेच्या 45 दिवसाच्या आत- अ) सदनिका क्र.003, 303 व 304 या सिडको यांचेकडून नियमित करुन घ्याव्यात. ब) वादग्रस्त इमारतीमधील सदनिकाधारकांची सहकारी संस्था स्थापन करुन नोंदवून दयावी. क) वादग्रस्त इमारत व त्याखालील जमीन यांची मालकी व इतर हक्क या सहकारी संस्थेच्या नावे करुन फरोक्तखत नोंदवून दयावे व सहकारी संस्था व फरोक्तखत नोंदविण्यासाठी येणारा खर्च करारनाम्यातील तरतुदीनुसार तक्रारदार व सामनेवालेनी करावा. ड) करारनाम्यात ठरल्याप्रमाणे सिडकोकडे मिळकत हस्तांतर करण्याबाबतचा खर्च, सहकारी संस्था स्थापनेबाबतचा खर्च, त्यानंतर फरोक्तखत करण्यासाठी होणारा खर्च प्रथम प्रत्येक सदनिकाधारकांनी त्यांना ताबा मिळाल्या तारखेपर्यंत करावा व त्यानंतरचा खर्च सामनेवालेनी करावा. इ) सामनेवालेनी करारनाम्याप्रमाणे सर्व सोयीसुविधा करुन दयाव्यात. ई) तक्रारदारानी देखभालीसाठी केलेला खर्च रक्कम रु.47,200/- 5 टक्के व्याजदराने परत करावा. फ) तक्रारदारानी नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी रु.12,000/- व न्यायिक खर्चापोटी प्रत्येकी रु.2,000/- दयावेत. ग) सामनेवालेनी उपरोक्त आदेश ब, क, ड, इ, ई चे पालन उक्त मुदतीत न केल्यास तक्रारदार सामनेवालेकडून आदेश पारित तारखेपासून आदेश ब, क, ड, इ, ई चे अंमलबजावणीपर्यंत रु.2,000/- नुकसानभरपाईपोटी वसूल करण्यास पात्र रहातील. 3. उपरोक्त आदेश फ चे पालन न केल्यास रक्कम रु.15,000/- आदेश पारित तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने सव्याज सामनेवालेकडून वसूल करण्यास तक्रारदार पात्र रहातील. दि.18-2-2008. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) (ज्योती अभय मांधळे) सदस्य अध्यक्ष सदस्या
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |