सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ. सविता भोसले, अध्यक्षा
मा. श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा. सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 162/2013
तक्रार दाखल दि.14-10-2013.
तक्रार निकाली दि.31-08-2015.
1.श्री. सोपान गुंडा थोरवे,
2.श्री. शंकर सोपान थोरवे,
दोघे रा. डांभेवाडी, पो.का.खटाव,
ता.खटाव, जि.सातारा तर्फे कुलमुखत्यार
महेश सोपान थोरवे
रा. डांभेवाडी,पो.का.खटाव,ता.खटाव, जि.सातारा .... तक्रारदार.
विरुध्द
1. अभिनव महिला ग्रामीण बिगरशेतीसहकारी पतसंस्था मर्या.लि.,वडुज
ता.खटाव,जि.सातारा तर्फे व्यवस्थापक
2. लक्ष्मण नागेश जाधव,
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,वडुजता.खटाव,जि.सातारा
3. सौ. उर्मिला लक्षमणराव जाधव,
अध्यक्षा, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,वडुज, ता.खटाव,जि.सातारा
4. वसुधा बाळकृषण कुलकर्णी
उपाध्यक्ष, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,वडुज,ता.खटाव,जि.सातारा
(नि.26 वरील आदेशान्वये वगळणेत आले.)
5. तानाजीराव नानासो जाधव,
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,वडुज ता.खटाव,जि.सातारा
(नि.26 वरील आदेशान्वये वगळणेत आले.)
6. दिलीप मल्लीकार्जून पुस्तके
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,वडुज,ता.खटाव,जि.सातारा
(नि.26 वरील आदेशान्वये वगळणेत आले.)
7. अमरसिंह लक्ष्मणराव जाधव
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,वडुज,ता.खटाव,जि.सातारा
8. श्रीमती निर्मला विश्वासराव जगताप
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,वडुज,ता.खटाव,जि.सातारा
(नि.26 वरील आदेशान्वये वगळणेत आले.)
9. भारती राजू देशमुख
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,वडुज
रा. सिध्देश्वर कुरोली, ता. खआव, जि. सातारा
(नि.26 वरील आदेशान्वये वगळणेत आले.)
10. लता संपतराव यादव
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,
रा. औंध, ता. खटाव,जि.सातारा
11. भारती नागेश काळंगे,
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,
रा.मोळ, ता.खटाव, जि.सातारा
12. विजय कुंडलिक राऊत
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,
रा.वडुज,ता.खटाव,जि.सातारा
(नि.26 वरील आदेशान्वये वगळणेत आले.)
13. अनिता आबासो गलांडे
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,
रा.पुजारवाडी (उंबर्डे),ता.खटाव,जि.सातारा
14. उषा सदाशिव खुडे,
संचालक, अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती
सहकारी पतसंस्था मर्या.लि.,
रा.वडुज,ता.खटाव,जि.सातारा
(नि.26 वरील आदेशान्वये वगळणेत आले.)
15. छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या., पिपोडे बु.
ता. कोरेगांव तर्फे मॅनेजर
16. व्यवस्थापक, छत्रपती संभाजी महाराज सहकारी
पतसंस्था मर्या., पिंपोडे बु., ता. कोरेगांव, जि.सातारा
17. श्री भरत खंडेराव साळुंखे,
चेअरमन, छत्रपती संभाजी महाराज सहकारी
पतसंस्था मर्या., पिपोडे बु.ता. कोरेगांव, जि.सातारा
18. सोपान ज्ञानदेव चव्हाण,
व्हा. चेअरमन, छत्रपती संभाजी महाराज सहकारी
पतसंस्था मर्या., पिपोंडे बु.ता. कोरेगांव, जि.सातारा
19. सुरेश गंगाराम साळुंखे,
संचालक, छत्रपती संभाजी महाराज सहकारी
पतसंस्था मर्या., पिपोडे बु.ता. कोरेगांव, जि.सातारा
20. अधिकराव दिनकरराव लेंथे,
संचालक, छत्रपती संभाजी महाराज सहकारी
पतसंस्था मर्या., पिपोडे बु.ता. कोरेगांव, जि.सातारा
21. हणमंत बाबूराव निकम,
संचालक, छत्रपती संभाजी महाराज सहकारी
पतसंस्था मर्या., पिपोडे बु.ता. कोरेगांव, जि.सातारा .... जाबदार.
....तक्रारदारतर्फे अँड.एस.एन.जाधव
....जाबदार क्र.1,10,11,13 एकतर्फा
....जाबदार क्र.4 ते 6,8,9, 12 व 14 वगळले
....जाबदार क्र.15 ते 21 तर्फे अँड.एस.एस.शिंदे
....जाबदार क्र.2,3,7 तर्फे स्वतः
न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारदारांचे तक्रार अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे मौजे डांभेवाडी, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तर जाबदार क्र. 1 ही महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतूदीनुसार स्थापन झालेली पतसंस्था आहे. तर जाबदार क्र. 2 ते 14 हे प्रस्तुत जाबदार क्र. 1 पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक आहेत. तर जाबदार क्र. 15 या पतसंस्थेमध्ये प्रस्तुत जाबदार नं. 1 या पतसंस्थेचे विलीनीकरण झालेले असून जाबदार क्र. 16 हे सदर पतसंस्थेचे व्यवस्थापक असून जाबदार क्र. 17 ते 21 हे प्रस्तुत संस्थेचे संचालक आहेत. तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 पतसंस्थेमध्ये खालील कोष्टकात नमूद ठेवीच्या रकमा पेन्शन मुदतठेव योजनेमध्ये गुंतविलेल्या होत्या व आहेत.
अ.नं | ठेव पावती क्र. | ठेवीची रक्कम | ठेव ठेवली तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख | मुदतीनंतरची रक्कम |
1 | 954 | 50,000/- | 22/09/2006 | 22/09/2011 | 50,000/- |
2 | 953 | 50,000/- | 22/09/2006 | 22/09/2011 | 50,000/- |
3 | 217 | 45,000/- | 31/03/2005 | 30/06/2011 | 45,000/- |
4 | 218 | 15,000/- | 31/03/2005 | 30/06/2011 | 15,000/- |
| एकूण | 1,60,000/- | | | 1,60,000/- |
येणेप्रमाणे पेन्शन ठेव योजनेअंतर्गत तक्रारदाराने जाबदार संस्थेत रकमा द.सा.द.शे. 12 टक्के व्याजदराने गुंतविल्या होत्या व आहेत. प्रस्तुतचे व्याज तक्रारदाराला दरमहा मिळणार होते तर मुळ मुद्दल मुदतीनंतर मिळणार होती. तक्रारदाराला प्रस्तुत रक्कमेवर फेब्रुवारी, 2009 अखेर पेन्शन स्वरुपात व्याजाची रक्कम मिळाली आहे. तथापी, दि.1/3/2009 पासून जाबदार संस्थेने व्याज देण्याचे बंद केले आहे. ठेवपावत्यांची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने जाबदार संस्थेत जाऊन वेळोवेळी सर्व रक्कम मागणी केली असता जाबदार यांनी त्यास टाळाटाळ केली व रक्कम अदा केलेली नाही. सबब तक्रारदाराने वकीलांमार्फत जाबदारांना नोटीस पाठवली. नोटीस मिळूनही जाबदाराने रक्कम अदा केली नाही. अशाप्रकारे जाबदाराला मानसिकत्रास दिला व सदोष सेवा दिलेने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे. परंतु दि. 31/10/2013 रोजी प्रस्तुत जाबदार क्र. 1 पतसंस्थेचे जाबदार नं. 15 या पतसंस्थेत विलीनीकरण झाले आहे. हे नि. 15/1 कडील कागदपत्रावरुन दिसून येते. सबब प्रस्तुत कामी सदर जाबदार क्र. 15 पतसंस्था व त्यांचे संचालक मंडळ यांना तक्रारदाराने याकामी जाबदार क्र. 15 ते 21 म्हणून सामील केले आहे. त्यामुळे प्रस्तुत जाबदार यांचेकडून ठेवीच्या रकमा उर्वरीत व्याजासह वसूल होऊन मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकपणे रक्कम रु.1,60,000/- व प्रस्तुत रकमेवर दि. 1/3/2009 पासून अर्ज दाखल तारखेपर्यंत व्याज रक्कम रु.86,400/- अशी एकूण रक्कम रु.2,46,400/- व प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाने होणारी सर्व रक्कम तक्रारदार यांना देणेबाबत जाबदार यांना हुकूम करावेत. जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदारास झाले मानसिक,शारिरीकत्रास व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.25,000/- मिळावेत अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदार यांनी याकामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 4 चे कागदयादीसोबत नि.4/1 ते 4/9 कडे अनुक्रमे मुदत ठेवीच्या सत्यप्रती, तक्रारदाराने जाबदाराला पाठविले नोटीसची मूळ प्रती, संचालक मंडळाची यादी, मुखत्यारपत्र, आधार कार्ड पावती, नि. 13 कडे दुरुस्ती अर्ज, नि. 14 दुरुस्ती अर्जाचे अँफीडेव्हीट, नि. 15 चे कागदयादीसोबत नि.15/1 ते नि.15/6 कडे कागदपत्रे, नि.15 अ कडे दुरुस्ती प्रत, नि.22 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.21 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 26 कडे जाबदारांना वगळणेची पुरसीस व नि. 27 कडे एकतर्फा करणेबाबत पुरसीस वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1 व 10 यांना नोटीस लागूनही ते मे. मंचात गैरहजर राहीले त्यांचे त्यांनी तक्रारअर्जास म्हणणेही दाखल केलेले नाही त्यामुळे त्यांचेविरुध्द नि. 1 वर ‘एकतर्फा आदेश’ पारीत झालेला असून जाबदार क्र.2,3,7, यांनी हजर होवून नि. 23 कडे म्हणणे व कागद दाखल केले आहेत. तर जाबदार क्र. 4 ते 6, 8,9, 12 व 14 यांना तक्रारदाराने वगळलेले आहे. तर जाबदार क्र. 15 ते 21 यांनी नि. 20 व 24 कडे म्हणणे दाखल केले आहेत. नि. 25 कडे जाबदार क्र. 15 ते 21 ने दाखल केलेले म्हणणे हाच पुरावा समजणेत यावा म्हणून पुरसीस वगैरे कागदपत्रे जाबदार यांनी याकामी दाखल केली आहेत.
जाबदार क्र. 2,3,7 व 15 ते 21 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. जाबदार क्र.2,3,7 यांनी त्यांचे म्हणणेत म्हटले आहे की, जाबदार क्र. 1 पतसंस्थेचे विलीनीकरण जाबदार क्र. 15 या पतसंस्थेत कायदेशीरपणे झालेले असून त्याची कागदपत्रे याकामी जाबदार क्र. 2,3,7 यांनी दाखल केली आहेत. असे संस्थेची विलीनीकरण झालेने तक्रारदाराचे तक्रारदाराचे ठेवीची रक्कम देणेस जाबदार क्र. 2,3,7 हे जबाबदार नाहीत. तर जाबदार क्र. 15 ते 21 हे प्रस्तुत ठेवीच्या रकमा देणेस जबाबदार आहेत.
तर जाबदार क्र. 15 ते 21 यांनी म्हटले आहे की, मा. सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दि. 31/10/2013 रोजीचे आदेशानुसार,-आदेशात नमूद केले अटी व शर्तीनुसार अट क्र.4 “ विलीनीकरणानंतर अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., वडूज, ता. खटाव, जि.सातारा या संस्थेच्या सर्व ठेवीदारांच्या रोख स्वरुपातील (हस्तांतरीत नव्हे) मूळ ठेवीचे 20 % विघटन (Erosion) करणेत यावे व अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., वडूज, ता. खटाव, जि.सातारा या संस्थेच्या सध्याचा व संभाव्य तोटा व कर्जाची वाढती थकबाकी विचारात घेता कर्ज वसूलीच्या प्रमाणात ठेवीदारांना समप्रमाणात मूळ ठेवींची रक्कम टप्याटप्पयाने जास्तीत जास्त 80 टक्के पर्यंत परत केली जाईल.” या अटीप्रमाणे तेवढया रकमेसच जाबदार क्र. 15 ते 21 जबाबदार आहेत असे म्हणणे जाबदार क्र. 15 ते 21 यांनी याकामी दाखल केलेले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का?- होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरविली आहे काय?- होय.
3. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे.
विवेचन -
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 पतसंस्थेत पेन्शन ठेव योजनेमध्ये ठेव पावती क्र. 954, 953, 217 व 218 अन्वये अनुक्रमे रक्कम रु.50,000/-, रु.50,000/-, रु.45,000/- व रु.15,000/- अशा ठेवीच्या रक्कमा गुंतविल्या होत्या व आहेत. प्रस्तुत ठेवपावत्यांच्या व्हेरिफाईड प्रती तक्रारदाराने नि. 4 चे कागदयादीसोबत नि. 4/1 ते नि.4/4 कडे दाखल केल्या आहेत. यावरुन तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. तसेच प्रस्तुत ठेवपावत्यांच्या रकमेवर पावतीवरील नमूद द.सा.द.शे. 12 टक्के व्याजदराप्रमाणे होणारे व्याज जाबदार यांनी तक्रारदार यांना माहे फेबुवारी,2009 अखेर अदा केले आहे. परंतु त्यानंतर सदरची व्याजाची रक्कम जाबदार यांनी तक्रारदार यांना अदा केलेली नाही. तसेच ठेवपावत्यांच्या मुदती संपूनही ठेवींची रक्कम तक्रारदार यांनी जाबदारांकडे वारंवार मागणी करुनही परत अदा केलेली नाही. वकीलांमार्फत जाबदाराला नोटीस पाठवूनही ठेवीची रक्कम उर्वरीत व्याजासह जाबदारांनी तक्रारदार यांना अदा केलेली नाही, रक्कम अदा करणेस टाळाटाळ केली आहे. सबब जाबदार यांनी सदोष सेवा पुरविली हे निर्विवाद सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 पतसंस्थेचे जाबदार क्र. 15 या पतसंस्थेत विलीनीकरण झालेने प्रस्तुत तक्रारदाराने जाबदार क्र. 15 ते 21 यांना याकामी दुरुस्ती अर्जावरील आदेशाप्रमाणे सामील केले आहे. याकामी जाबदार क्र.15 ते 21 यानी हजर होवून म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांचे म्हणण्यात म्हटले आहे की, मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र, पुणे यांचे दि.31/10/2013 रोजीचे आदेशानुसार, आदेशात नमूद केले अटी व शर्तीनुसार अट क्र. 4 “ विलीनीकरतानंतर अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,वडूज, ता. खटाव, जि.सातारा या संस्थेच्या सर्व ठेवीदारांच्या रोख स्वरुपातील मूळ ठेवींचे 20 टक्के विघटन (erosion) करणेत यावे व अभिनव महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वडूज, ता. खटाव, जि.सातारा या संस्थेच्या सध्याच्या व संभाव्य तोटा व कर्जाची वाढती थकबाकी विचारात घेता कर्ज वसूलीच्या प्रमाणात ठेवीदारांना समप्रमाणात मूळ ठेवींची रक्कम टप्प्याटप्पयाने जास्तीत जास्त 80 टक्के पर्यंत परत केली जाईल.” या अटीप्रमाणे तेवढया रकमेसच जाबदार क्र. 15 ते 21 जबाबदार आहेत असे म्हटले आहे. सबब प्रस्तुत तक्रारदार यांचे वर नमूद कोष्टकातील ठेवपावती नं. 954, 953, 217 व 218 या ठेवपावत्यांवरील नमूद रकमांपैकी 80 टक्के रक्कम तक्रारदार यांना अदा करणेची जबाबदारी जाबदार क्र. 15 ते 21 यांचेवर ठेवणेत येते व जाबदार क्र.15 ते 21 यांना प्रस्तुत 80 टक्के रक्कम तक्रारदार यांना अदा करणेसाठी Co-operative Corporate Veil नुसार वैयक्तिक व संयुक्तीकपणे जबाबदार धरणे न्यायोचीत होणार आहे. तसेच उर्वरीत 20 टक्के रक्कम व उर्वरीत व्याजास जाबदार क्र. 1 पतसंस्था व जाबदार क्र.1,2,3,7,10,11 व 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अदा करणेस जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. तसेच विलीनीकरणाचेवेळी झालेल्या करारातील अटी व शर्ती या तक्रारदार यांचेवर बंधनकारक असणेचे कारण नाही असे या मे मंचाचे स्पष्ट मत आहे. कारण प्रस्तुत विलीनीकरणाची प्रक्रीया व तसा करार होताना या अटी व शर्तीना तक्रारदार यांची/ठेवीदारांची संमती घेतलेली नाही. सबब तक्रारदार यांना त्यांचे ठेवीचे 100 टक्के रक्कम व्याजासह मिळणे न्यायोचित होणार आहे. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालील नमूद न्यायनिवाडा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे. मे. उच्च न्यायालय,मुंबई यांचेकडील रिटपिटीशन नं. 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकाचा आधार घेतला आहे.
7. सबब प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश करणेत येतो.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1,2,3,7,10,11 व 13 यांना तक्रारदार यांचे
ठेवपावती क्र. 954, 953, 217 व 218 या ठेवपावत्यांवरील ठेवीची रक्कम
अनुक्रमे रक्कम रु. रु.50,000/-, रु.50,000/-,45,000/- व रु.15,000/-
एकूण रक्कम रु.1,60,000/- (रुपये एक लाख साठ हजार फक्त) पैकी 20
टक्के रक्कम व तक्रारदारांना देणे राहीलेले फेब्रुवारी,2009 नंतरचे
सदर 20 टक्के रकमेवरील द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाची रक्कम
तक्रारदार यांना अदा करणेसाठी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार
धरणेत येते.
3. जाबदार क्र. 15 ते 21 यांना तक्रारदार यांचे वर नमूद ठेवपावती क्र. 954,
953, 217 व 218 वरील ठेवीच्या एकूण रकमांपैकी 80 टक्के ठेवीची
रक्कम व त्यावरील माहे फेब्रुवारी,2009 नंतरचे 12 टक्के ने होणारे व्याज
तक्रारदार यांना अदा करणेसाठी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार
धरणेत येते.
4. जाबदार क्र. 1,2,3,7,10,11,13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार
यांची नमूद ठेव पावती क्र. 954, 953, 217 व 218 वरील ठेवीच्या
रकमेपैकी 20 टक्के ठेवीची रक्कम व प्रस्तुत 20 टक्के ठेवीच्या रकमांवरील
माहे फेब्रुवारी,2009 नंतर ठेवपावत्याची मुदत संपेपर्यंत 12 टक्के प्रमाणेचे
उर्वरीत व्याज तक्रारदारांना अदा करावे.
5. जाबदार क्र. 15 ते 21 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराचे
ठेवपावती क्र. 954, 953, 217 व 218 वरील ठेवीच्या सर्व रकमांपैकी 80
टक्के रक्कम तक्रारदार यांना अदा करावी. तसेच प्रस्तुत 80 टक्के ठेवीच्या
रकमेवर माहे फेब्रुवारी,2009 नंतरचे ठेवपावत्यांची मुदत संपेपर्यंत 12 टक्के
होणारे व्याजाची रक्कम प्रस्तुत जाबदार क्र. 15 ते 21 यांनी वैयक्तिक व
संयुक्तिपणे तक्रारदार यांना अदा करावी.
6. वर नमूद जाबदार क्र. 1,2,3,7,10,11,13 व जाबदार क्र. 15 ते 21 यांनी
वैयक्तिक व संयुक्तिकपणे त्यांचे हिश्याच्या वर नमूद केलेप्रमाणे रकमेवर
तक्रारदार यांना मुदत संपले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत
द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे होणारी व्याजाची रक्कम अदा करावी.
7. तक्रारदार यांना झाले मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी
जाबदार क्र. 15 ते 21 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारास
रक्कम रु.15,000/-(रुपये पंधरा हजार फक्त) अदा करावेत.
8. वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून
45 दिवसांचे आत करावे.
9. आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेने तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
10. पस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
11. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.31-08-2015
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.