Maharashtra

Ahmednagar

CC/14/453

Shri Bandu Bajirao Dhamdhere - Complainant(s)

Versus

Abhijit Dichwalkar,Asst.Manager,Future Generali India Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Bhor/Karale

07 Nov 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/14/453
( Date of Filing : 24 Nov 2014 )
 
1. Shri Bandu Bajirao Dhamdhere
State Bank Colony,Ghodnadi,Shirur,Tal Shirur
Pune
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Abhijit Dichwalkar,Asst.Manager,Future Generali India Insurance Co.Ltd.
M.A.R.C.Square Building,2nd Floor,Near Kankriya Automobile,Savedi,Ahmednagar- 414 003
Ahmednagar
Maharashtra
2. Future Generali India Insurance Co.Ltd.
MARC Square Building,2nd Floor,Near Kankariya Automobile,Savedi,Ahmednagar-414 003
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Bhor/Karale, Advocate
For the Opp. Party: Adv.s.P.Meher, Advocate
Dated : 07 Nov 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०७/११/२०१९

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.    तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की,  तक्रारदार हे घोडनदी, तालुका शिरुर जिल्‍हा पुणे येथील रहिवाशी असुन वाहतुकीचा व कंत्राटारांना वाहने पुरविण्‍याचा व्‍यवसाय करतात. तक्रारदाराने त्‍याच्‍या मालकीचे वाहन क्र.एम.एच-०१-एल-४०८३ हे मौजे शिराढोण, कोल्‍हेगांव परिसरात तळ्यातील गाळ काढुन परिसरातील शेतक-यांना पुरविण्‍याच्‍या कामावर लावले होते. सदर वाहनाकरीता सामनेवालेकडुन पॉलिसी क्रमांक २०१२ व्‍ही १६४५८३५ ही पॉलिसी घेतली होती व तिचा कालावधी दिनांक ०६-०२-२०१२ ते ०५-०२-२०१३ असा होता व प्रिमियम रक्‍कम रूपये १७,३०८/- स्विकारून सामनेवालेने कॉम्‍प्रेहेन्‍सी पॉलिसी दिलेली होती. सदर पॉलिसीनुसार वाहनाची आयडीव्‍ही रूपये ३,००,०००/- एवढी नमुद करण्‍यात आली असुन त्‍यासाठी टोटल ओन डॅमेन प्रिमीयम (ए) या सदराखाली रूपये ५,२५६/- एवढी रक्‍कम स्विकारलेली आहे. तक्रारदाराच्‍या सदर नमुद वाहनचा दिनांक ३०-०३-२०१२ रोजी मौजे शिराढोण, तालुक कळंब जिल्‍हा  उस्‍मानाबाद या गावचे हद्दीमध्‍ये अपघात झाला आणि सदर अपघातामध्‍ये  वाहनाचे अतोनात नुकसान झाले, तक्रारदाराने त्‍याचे नमुद वाहनास अपघात झाल्‍यानंतर तात्‍काळ सामनेवाले यांचे कार्यालयात अपघाताबाबतची सुचना दिली आणि अपघाताची नुकसान भरपाई मिळणेबाबत क्‍लेम फॉर्म व आवश्‍यक कागदपत्रे  सामनेवाले यांच्‍या मागणीप्रमाणे सामनेवाले यांचे कार्यालयात दाखल केली. सामनेवाले सदर दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन क्‍लेम नंबर सीव्‍ही  १८५५२४ असा दिला. सदर कागदपत्र दाखल करून देखील सामनेवाले यांनी आजतागायत तक्रारदारास त्‍याचा क्‍लेम मंजुर केला अथवा नाकारला याबाबत कळवले नाही. तक्रारदाराला त्‍याचे अपघातग्रस्‍त वाहन दुरूस्‍त करण्‍यासाठी त्‍यास एकुण रूपये ३,७४,३९५.७५ एवढा खर्च आला, याबाबत दुरूस्‍तीच्‍या पावत्‍या  तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या आहेत. सामनेवालेने सदर नुकसानभरपाई न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली व तक्रारदार यांना शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला, म्‍हणुन सदर तक्रार दाखल करणेस भाग पडले आहे.

       तक्रारदाराने अशी विनंती केली आहे की, सामनेवालेकडुन वाहनास झालेल्‍या नुकसानीची नुकसान भरपाई रूपये ३,७४,३९७.७५/- अधिक मानसिक त्रास व आर्थिक नुकसानीबाबत रूपये २५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- सामनेवालेकडुन मिळावा व सदर रक्‍कम वसुल होईपर्यंत त्‍यावर दाखल तारीख ३१-०५-२००२ पासुन द.सा.द.शे. १५ टक्‍के दराने व्‍याज तक्रारदारास मिळावे, तसेच सदर तक्रार अर्जाचा खर्च मिळावा.

३.   तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र तसेच नि.६ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकुण २६ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत.  त्‍यामध्‍ये जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच उस्‍मानाबाद यांचा न्‍यायनिवाडा यात तक्रारदार यांची तक्रार योग्‍य न्‍यायीक क्षेत्राकरीता फेटाळण्‍यात येते, असा उल्‍लेख आहे. इन्‍शुरन्‍स पॉलिसी, एफ.आय.आर, पंचनामा, आर.टी.ओ.चे रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकीट, सामनेवाला इन्‍शुरन्‍स पॉलिसीचे पॉलिसी शेड्युल, टिप्‍पर गाडीचा मालवाहतुक परमिट फॉर्म, फिटनेस सर्टीफिकीट, टॅक्‍शेसन सर्टीफिकीट, विष्‍णु  साहेबराव चौधरी यांचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स, विष्‍णु साहेबराव चौधरी यांचे Extract of the driving licence, खालसा पाटा वर्क्‍स शिरूर यांचे रक्‍कम रूपये ४,७५०/- चे बिल, विशाल स्‍प्रे पेन्‍टींग वर्क्‍स चे रूपये १६,५०० चे बिल, गोविंद ऑटो गॅरेज हिंदुस्‍थान पाटेवाला यांचे रूपये १४,३५०/- चे बिल, बिश्‍वास इलेक्‍ट्रीकल वर्क्‍स अॅण्‍ड ग्रीसींग यांचे रक्‍कम रूपये ४,८००/- चे बिल, बी.बी. ढमढेरे सर्व्‍हीस स्‍टेशन यांचे रक्‍कम रूपये ११,५००/- चे बिल, नॅशनल रेडीएटर रिपेअरर यांचे रक्‍कम रूपये ७,३१२/- चे बिल, शुभम बॅटरीज यांचे रक्‍कम रूपये ७,५००/- चे बिल, भावना ऑटोमोबॉइल्‍स यांचे रक्‍कम रूपये १४२५३.७५ चे बिल, संतोष शो मेकर्स अॅन्‍ड वेल्‍डींग वर्क्‍स यांचे रूपये ५३,५००/- व रूपये १,२०,०००/- चे बिल, रामलिंग टायर हाऊस यांचे रक्‍कम रूपये ३४,५००/- व रूपये ३६,०००/- चे बिल रूपयाचे बिल, ढमढेरे ऑटोमोबॉईल्‍स यांचे रक्‍कम रूपये ३७,३६५/- व रूपये १२,०७०/- चे बिल, सामनेवाले यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस दाखल आहे. निशाणी क्र.१५ वर तक्रारदाराने लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. निशाणी ३३ वर तक्रारदाराने सरतपासणी कामी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. नि.३७ वर तक्रारदारातर्फे लेखी युक्तिवाद दाखल करण्‍यात आला आहे. तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ यांना सामील करण्‍याविषयी अर्ज दिला. दिनांक २९-०२-२०१६ रोजी मंचाने मंजुर केला.     

४.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना मे. मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले क्र.१ हजर झाले, परंतु मुदतीत कैफीयत दाखल न केल्‍याने त्‍यांचेविरूध्‍द ‘नो से’ चा आदेश करण्‍यात आला.

     त्‍यानंतर सामनेवाले क्र.२ वकिलांमार्फत मे.मंचात हजर होऊन नि.२९ वर कैफीयत दाखल केली. त्‍यामध्‍ये असे कथन केले आहे की, तक्रारदाराची तक्रार खोटी व चुकीची असुन नाकबुल आहे. तक्रारदाराने श्री.अभिजीत डिचवलकर यांच्‍याविरूध्‍द वैयक्तिक स्‍वरुपात दाखल केली असुन ती बेकायदेशीर आहे व रद्द होण्‍यास पात्र आहे. तक्रारदाराने सामनेवालेकडुन घेतलेली पॉलिसी, पॉलिसीचा कालावधी व अपघाताची दिलेल्‍या माहिती व त्‍यामध्‍ये वाहनाचे नुकसान झालेबाबत वाद नाही. सत्‍य परिस्थितीमध्‍ये असे नमुद केले आहे की, तक्रारदरकडुन अपघातात नुकसान झालेल्‍या वाहनाची महिती मिळाल्‍यानंतर त्‍वरीत सामनेवालेने वाहनाची झालेले नुकसान व नुकसानभरपाई बाबत सर्व्‍हेअरची त्‍वारती नेमणुक केली होती.  सर्व्‍हे रिपोर्ट व पोलीस पेपर्स वरुन असे निदर्शनास आले की, तक्रारदाराचे वाहन क्रमांक एम.एच.०१-एल.४०८३ हे वाहन ३ प्रवासी व्‍यक्‍तींना घेऊन जात होते जे की वाहन चालविण्‍यात अनधिकृत आहे.  सदरील वाहन मोटर व्‍हेईकल अॅक्‍टप्रमाणे वाहतुक वाहन (Goods Vehicle) असुन सदर वाहनाला प्रवासी वाहनाची परवानगी देण्‍यात आली नव्‍हती. तक्रारदाराला देण्‍यात आलेल्‍या इन्‍शुरन्‍स पॉलिसीमध्‍ये वाहन प्रवासी व्‍यक्‍तींसाठी वापरल्‍यास त्‍याची जबाबदारी स्विकारण्‍यात आली नव्‍हती. पोलीस तपासाच्‍या  पुराव्‍यावरुन तक्रारदाराच्‍या वाहनामध्‍ये बेकायदेशीरप्रमाणे प्रवासी व्‍यक्‍ती  असल्‍याने सामनेवालेने तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे. तक्रारदाराने तक्रारीत केलेली मागणी चुकीची असुन तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केली असल्‍याने तक्रारदाराकडुन रक्‍कम रूपये ५,०००/- कॉम्‍पनेसेटरी कॉस्‍ट मिळावी व तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती केली आहे.

         सामनेवालेने खुलाश्‍याच्‍या पुष्‍ट्यर्थ नि.३० वर शपथपत्र दाखल केले आहे. नि.३२ वर दस्‍तऐवज यादीसोबत ४ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या  आहेत. नि.३३ ला तक्रारदाराने सरतपासणीचेकामी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. नि.३५ ला सामनेवाले क्र.२ कंपनीतर्फे श्री.संतोष अर्जुन मोरे, लिगल मॅनेजर यांनी शपथपत्र दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये सदर अपघातासंबंधी दिलेला इनव्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट, श्री,दिलीप मवाळे यांनी दिलेला फायनल सर्व्‍हे रिपोर्ट, ग्राहक तक्रार क्र.१३/२०१३ चा उस्‍मानाबाद येथील ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिलेल्‍या निकाल दाखल केला आहे. नि.३७ वर दस्‍तऐवज यादीसोबत उस्‍मानाबाद येथील एम.ए.सी.सी. नं.१५१/२०१२ ची सर्टीफाईड प्रत, सामनेवाले विमा कंपनीच्‍या विमा पॉलिसीची शर्ती व अटीची सर्टीफाईड प्रत दाखल केलेली आहे. नि.३९ वर सामनेवालेचा लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. नि.... वर मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे पुढील न्‍यायनिवाडे दाखल केले आहेत. 1 - 2019(1) CPR 738(NC), 2 - 2013(2) CPR 315(NC), 3 - 2013(2) CPR 140(NC), 4 – 2013(2) CPR 143 (NC), 5 – 2005 SAR (Civil) 110 Supreme Court.   

  ५.    तक्रारदाराची तक्रार, तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदाराने दाखल केलेले पुराव्‍याचे शपथपत्र, त्‍यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद तसेच सामनेवालेने दाखल केलेले म्‍हणणे, त्‍यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व सामनेवालेने दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केने अयतस मंचासमोर  न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही  सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत. .

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात त्रुटी दिली आहे काय ?

होय

(३)

तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍याकडुन विमा दाव्‍याची रक्‍कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे

काय ?

होय

(४)

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा

६.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार यांनी त्‍याच्‍या मालकीचे वाहन क्र.एम.एच-०१-एल-४०८३ या वाहनाकरीता सामनेवालेकडुन पॉलिसी क्रमांक २०१२ व्‍ही १६४५८३५ ही पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीची प्रत तक्रारदाराने नि.६/२ वर दाखल केली आहे.  याबाबत उभयपक्षात वाद नाही. यावरून तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ चे ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

७.  मुद्दा क्र. (२) :   तक्रारदाराने जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्‍मानाबाद चे निकालपत्र नि.६/१ वर तक्रारीसोबत लावले आहे.  त्‍याचा निकाल न्‍याय कार्यक्षेत्राबाबत देण्‍यात येऊन तक्रार फेटाळण्‍यात यावी, असे देण्‍यात आले असुन त्‍याचे अवलोकन करण्‍यात आले असता सदर तक्रार ही त्‍या न्‍यायक्षेत्राच्‍या  अभावी खारीज करण्‍यात आली होती. दिनांक ३०-०३-२०१२ रोजी तक्रारीत नमुद केलेल्‍या वाहनास अपघात होऊन त्‍यात सदरचे वाहनाचे खुप नुकसान होऊन वाहन दुरूस्‍तीसाठी ३,७४,३९७.७५/- एवढा खर्च करावा लागला. वाहनाचा अपघात झाल्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले विमा कंपनीला कळविले असता सामनेवाले कंपनीच्‍या सर्व्‍हेअर यांनी वाहनाची पाहणी करून तसा सर्व्‍हे रिपोर्ट सामनेवाले यांच्‍याकडे दाखल केला.  सामनेवालेंच्‍या मागणीप्रमाणे सामनेवालेंच्‍या कार्यालयात क्‍लेम फॉर्म व आवश्‍यक कागदपत्र दिले. त्‍यानंतरसुध्‍दा सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाईच्‍या क्‍लेमबाबत कळविले नाही. सामनेवाले क्र.१ हे सदर तक्रारीत हजर झाले परंतु मुदतीत कैफीयत दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द ‘नो से’ चा आदेश करण्‍यात आला. त्‍यानंतर सामनेवाले क्र.२ यांनी सदरील वाहन हे माल वाहतुक वाहन (गुडस् व्‍हेईकल) असुन सदील वाहनास प्रवासी वाहनाचा परवाना देण्‍यात आला नव्‍हता.  वाहनामध्‍ये अपघातासमयी बेकायदेशीरप्रमाणे प्रवासी व्‍यक्‍ती असल्‍याने तक्रारदाराचा विमा क्‍लेम अटी व शर्तींचा भंग केला असल्‍याने नामंजुर करण्‍यात आला. सामनेवाले क्र.२ विमा कंपनीच्‍यातर्फे लिगल मॅनेजर यांनी शपथपत्र दाखल नि.३५ वर दाखल केले आहे. त्‍यात त्‍यांनी सदरील वाहनामध्‍ये ३ प्रवासी प्रवास करीत होते, सदरील वाहनस प्रवासी वाहतुक करण्‍याची परवानगी नव्‍हती. दोनपेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींची वाहतुक करण्‍याची परवानगी नव्‍हती. आर.सी. बुकमध्‍ये प्रवासी क्षमता २ व्‍यक्‍तींसाठीची होती. तसेच सदरील वाहन हे माल वाहतुक वाहन होते, असे नमुद केले आहे व त्‍यात सर्व्‍हेअरने दाखल केलेल्‍या  अहवालानुसार सामनेवाले विमा कंपनीने पुर्ण तपासकाम करून तक्रारदाराचा क्‍लेम नामंजुर केलेला असुन तक्रारदाराला त्‍याबाबत कळविण्‍यात आले होते, असे म्‍हटलेले आहे. सामनेवालेने निशाणी ३७ वर उस्‍मानाबाद येथे MACP-151-2012 चा न्‍याय निवाड्याची प्रत दाखल केली आहे. सदरील न्‍याय निवाड्याचे अवलोकन केले असता असता सदरील मोटर अपघात दावा असल्‍याने तो या प्रकरणात लागु होत नाही, असे मंचाचे मत आहे. नि.३८ वर सामनेवालेचे पुराव्‍याचे शपथपत्र व नि.३९ वर सामनेवालेचा लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे. तसेच सामनेवाले यांनी मा.वरीष्‍ठ न्‍यायालयांचे पुढील न्‍यायनिवाडे दाखल केले आहे.

                         1  - 2019(1) CPR 738(NC) – New India Assurance Co.Ltd. Vs. M/s. Sumangal Traders.

 2 -2013(2) CPR 315(SC) – Vikram Greentech (I) Ltd. & Anr Vs. New India Assurance Co. Ltd.

 3 - 2013(2) CPR 140(NC) New India Assurance Co.Ltd. Vs. Mrs. Shikha Bhatia & Anr.

 4 – 2013(2) CPR 143 (NC) – R.W.H. Ghyaz Ahmed Vs. M/s.New India Assurance Co.Ltd. & Ors.

 5 – 2005 SAR (Civil) 110 Supreme Court. – Polymat India Pvt. Ltd. & Anr. Vs. National Insurance Co. Ltd. & Ors.

 

       सदरील न्‍यायनिवाड्यांचे अवलोकन केले असता या न्‍यायनिवाड्यातील बहुतांशी तथ्‍थे ही तक्रारीतील तथ्‍यांशी सुसंगत नसल्‍याने सदरचे न्‍याय निवाडे विचारात घेतले नाही.

     तक्रारीतील कथन, त्‍या अनुषंगाने दाखल केलेले दस्‍तऐवज सामनेवालेने कैफीयत व त्‍याअनुषंगाने दाखल केलेले दस्‍तऐवज, उभयपक्षांचा पुरावा व युक्‍तीवाद यावरून असे स्‍पष्‍ट होते की, वाहनास झालेला अपघात हा क्षमतेपेक्षा जास्‍त प्रवासीमुळे झाला नाही व त्‍या कारणानेसुध्‍दा अपघात झाला नाही,  या निष्‍कर्षाप्रत हे मंच आले आहे, म्‍हणुन अपघातात असलेल्‍या वाहनामध्‍ये  अवाजवी व जास्‍त प्रवासी प्रवास करत असल्‍याने अटी व शर्तींचा भंग झालेचे तांत्रीक कारण दाखवुन तक्रारदार यांचा विमा दावा रद्द करणे योग्‍य व न्‍यायाचे होणार नाही. केवळ तांत्रीक कारणाचा आधार घेऊन सामनेवाले यांनी तक्रारदाराची नुकसान भरपाईचा विमा क्‍लेम नाकारून तक्रारदारास देण्‍यात   येणा-या सेवेत त्रुटी दिली, या निष्‍कर्षाप्रत हे मंच आले आहे. म्‍हणुन मुद्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.     

८.  मुद्दा क्र. (३) : सामनेवाले यांनी तांत्रीक बाबींचा विचार न करता सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्टप्रमाणे रक्‍कम रूपये १,२२,०७५/- ही तक्रारदारास देणे रास्‍त होते. परंतु सदरील विमा कंपनीने विमा क्‍लेम तक्रारदारास वेळेत न दिल्‍याने निश्चितच तक्रारदारास मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला आहे व त्‍याकरीता मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे. तसेच तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम देण्‍यास सामनेवाले जबाबदार आहेत, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्‍हणुन मुद्दा क्र.३ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

९.  मुद्दा क्र. (४) :  उपरोक्‍त सर्व विवेचनावरुन हे न्‍याय‍मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

आदेश

१.  तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवालेने तक्रारदाराला आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन पुढील ३० दिवसांच्‍या आत खालीलप्रमाणे रक्‍कम अदा करावी.

 

(अ)  तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या मालकीच्‍या अपघातातील नमुद वाहन क्रमांक एम.एच.०१-एल.-४०८३ या वाहनास अपघतात झालेले नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रूपये १,२२,०७५/- सर्व्‍हे रिपोर्ट दिनांक  १०-०५-२०१२ पासुन रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्‍के व्‍याज दराने अदा करावी.

 

(ब) सामनेवाले विमा कंपनीने दिलेल्‍या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रूपये १०,०००/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रूपये ३०००/- अदा करावी.

 

३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

४. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.