जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 390/2008. प्रकरण दाखल दिनांक – 16/12/2008 प्रकरण निकाल दिनांक – 04/06/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. श्रीमती सुजाता पाटणकर सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. 1. मो.माजीद हुसैन सिद्यीकी काटेवाला पि. मो. यूसुफ हुसैन वय, 27 वर्षे, धंदा, व्यापार, अर्जदार 2. निकहत परविन भ्र.मो.माजीद हुसैन सिद्यीकी काटेवाला वय.20 वर्षे, धंदा घरकाम, रा. दोघेही घर नंबर 551-300 महेर मंजील, नगर गल्ली किल्ला रोड, नांदेड जि. नांदेड. विरुध्द अब्दूल वहाब पि.अब्दूल हबीब बाबशर वय, 40 वर्षे, धंदा व्यापार, संचालक अल गैरअर्जदार हबीब हज उमरा टूर्स, हबीब टॉकीज चौक, नांदेड, ता.जि. नांदेड अर्जदारा तर्फे - अड.एम.डी.देशपांडे गैरअर्जदारा तर्फे - अड.ऐ.के.इर्शाद. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार अल हबीब हज उमरा टुर्स नांदेड यांचे सेवेच्या अनूचित प्रकाराबददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार क्र.1 व 2 हे नात्याने पती पत्नी असून हज याञेस जाण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचे जाहीरातीप्रमाणे मुंबई ते जैद्या व जैद्या ते मुंबई राहणे जेवणे खाणे या सूवीधेसह 2008 सालीच्या हज याञे करिता गैरअर्जदार यांचे सांगणेप्रमाणे दि.09.04.2008 रोजी रु.65,000/- व यानंतर दि.06.06.2008 रोजी रु.21,000/- असे एकूण रु.86,000/- दिले. अर्जदार व गैरअर्जदार यांचेत करारनामा करण्यात आला. अर्जदार यांनी कराराप्रमाणे उर्वरित रक्कम विजा व विमानाचे तिकिट मिळाल्यानंतर गैरअर्जदार यांना देण्याचे होते. याप्रमाणे गैरअर्जदार यांनी दोन्ही अर्जदाराकडून कराराप्रमाणे रक्कम प्राप्त करुन घेतल्यानंतर त्यांना हज याञे बाबत निश्चित राहण्याचे सांगण्यात आले. यानंतर अर्जदार यांनी हज याञेची तयारी सूरु केली. गैरअर्जदार यांनी काही बाबीची पूर्तता न झाल्याने अर्जदाराचे हज याञेचे जाणे रदद झाल्याचे सांगितले. यानंतर दि.24.11.2008 रोजी अर्जदार यांनी वकिलामार्फत गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठविली व उर्वरित रक्कम स्विकारुन हज याञेस नेण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. नोटीस प्राप्त होऊनही गैरअर्जदार यांनी प्रतिसाद दिला नाही किंवा रक्कमही परत केली नाही. गैरअर्जदाराने काहीही कारण नसताना अर्जदारास हज याञेला नेण्याची व्यवस्था केली नाही किंवा रक्कम परतही केली नाही असे करुन त्यांने धंदातील अनूचित प्रकार केल्याचे सिध्द होते. त्यामूळे अर्जदारास गैरअर्जदारांने घेतलेली पूर्ण रक्कम वापस करण्याचे तसेच मानसिक ञासाबददल रु.10,000/- देण्याचे आदेश व्हावेत व तक्रारीचा खर्च म्हणून रु.4,000/- मिळावेत म्हणून हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराकडून रु.86,000/- हज याञेस जाण्यासाठी त्यांना प्राप्त झाले होते हे त्यांना मान्य आहे. अर्जदार क्र.2 ही अर्जदार क्र.1 यांची पत्नी असून ती आठ महिन्याची गरोदर होती. सदरील माहीती अर्जदार यांनी गैरअर्जदारास स्पष्टपणे सांगितली नव्हती व ही बाब लपवून ठेवली होती. वेळेप्रमाणे कधीही प्रसूती होईल व सदरील हज याञा करण्यास अवघड होईल यांची जाणीव ठेऊन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराकडे संबंधीताची माहीती देऊन त्यानुसार त्यांना रक्कम देऊन आपली याञा रदद करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी दिलेली रक्कम दि.05.01.2009 रोजी साक्षीदार श्री. अब्दूल हयात अ. सत्तार व अ. वाहेद शे. आलम (फुलारी) च्या समक्ष नगदी रु.86,000/- अर्जदार क्र.1 व 2 यांना परत देण्यात आले. सदरील रक्कम देते वेळेस अर्जदाराचे क्र.1 चे वडील म. यूसूफ सिद्यीकी काटेवाला हे प्रत्यक्षपणे हजर होते. हज याञेकरीता म्हणून दिलेली रक्कम गैरअर्जदार यांनी परत केली व ही याञा पविञ असताना या व्यवहारात कोणीही खोटे बोलत नाही. यावर विश्वास ठेऊन दिलेल्या रक्कमेची पोहच पावती गैरअर्जदाराने अर्जदाराकडून घेतली नाही. याचा फायदा घेऊन सूडबूध्दीने व रक्कमेबाबतचा खोटा दावा दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी कोणतीही रक्कम देणे नाही. सदर अर्जदाराने खोटा तक्रार अर्ज दाखल केला म्हणून रु.10,000/- खर्चासह तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुददा क्र.1 ः- गैरअर्जदारांनी आपले लेखी म्हणण्यात अर्जदारांनी ज्या पावत्या दाखल केलेल्या आहेत त्या मान्य करत रु.86,000/- अर्जदारांनी त्यांना दिल्याचे मान्य केले आहे. गैरअर्जदारांनी असेही म्हटले आहे की, हज याञेसाठी म्हणून दिलेली रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना परत केलेली आहे. ही याञा पविञ असते या व्यवहारात कोणीही खोटे बोलत नाही. त्यामूळे दिलेल्या रक्कमेची पोहच पावती गैरअर्जदार यांनी घेतलेली नाही. गैरअर्जदार हे ट्रॅव्हल्स कंपनी चालवितात. त्यांनी अर्जदार यांचेकडून चेकने रु.86,000/- घेतलेले आहे जर त्यांनी ही रक्कम जर वापास केली असेल तर व्यवहारामध्ये कोणीही धंदेवाईक माणूस त्यांची पोहच पावती निश्चितच घेईल. हजचा वास्ता अर्जदार व गैरअर्जदार या दोघांनीही दिलेला आहे व दोघानीही शपथपञ दाखल केलेले आहे. त्यामूळे नूसते भावनावीवश होऊन किंवा शपथपञावर विश्वास ठेऊन रक्कम वापस केली असे म्हणता येणार नाही. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी म्हणण्यात दि.5.1.2009 रोजी अब्दूल हयात सत्तार व अब्दूल वाहेद शे. आलम यांचे समक्ष अर्जदार यांना रु.86,000/- वापस केलेले आहेत व यावेळेस अर्जदार क्र.1 चे वडील म.यूसुफ सिद्यीकी हे ही प्रत्यक्ष हजर होते असे म्हटले आहे असे असेल तर गैरअर्जदार यांना वरील साक्षीदारांची साक्ष शपथपञाद्वारे देता आली असती परंतु अशी साक्ष गैरअर्जदारांनी या प्रकरणात समोर आणलेली नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे याञेची पूर्ण व्यवस्था केली होती जसे की, तेथील राहण्याची, खाण्याची तसेच विमानांची तिकीटाची सोय झाली होती या बददल कोणताही पूरावा समोर आणलेला नाही. उलट अर्जदार यांनी उर्वरित रक्कम देण्यास तयार आहोत आम्हाला याञेस घेऊन जा अशी नोटीस वकिलामार्फत गैरअर्जदार यांना दिलेली होती ही नोटीस गैरअर्जदार यांना प्राप्तही झाली परंतु यांचे उत्तर गैरअर्जदार यांनी दिलेले नाही. यांचा अर्थ अर्जदार यांनी केलेले आरोप त्यांना मान्य आहेत असा का घेऊ नये ? मंचामध्ये दावा दाखल केल्याचेनंतर सर्व कागदपञपूरावा आवश्यक असतो व समोरच्या पार्टीस तशी संधीही दिली जाते. दूसरी बाब अर्जदार यांची याञा रदद करण्यासाठी अर्जदार क्र.1 ची पत्नी आठ महिन्याची गरोदर होती असेही गैरअर्जदाराने म्हटले आहे म्हणून पूढील हज याञा अवघड असल्यामूळे संभाव्य नव्हती म्हणून यांची जाणीव ठेऊन हज याञा गैरअर्जदाराने रदद केलेली आहे. अर्जदार क्र.1 यांनी ही बाब स्पष्टपणे नाकारलेली नाही किंवा यावर भाष्यही केलेले नाही. गैरअर्जदारांनी अर्जदार क्र.1 ची पत्नी गरोदर असल्याबददल पूरावा समोर आणलेला नाही परंतु या सबबीवर याञा रदद झाली हे दोन्ही पक्षकारांना मान्य आहे. त्यामूळे यावीषयीचा वाद जास्त न करता फक्त रक्कम अर्जदार यांना वापस मिळाली का ? एवढीच बाब शिल्लक आहे, कागदपञानुसार अर्जदारांनी रक्कम गैरअर्जदार यांना दिलेली आहे, याञा रदद झालेली आहे व ती रक्कम पूर्णपणे गैरअर्जदार यांना वापस देण्याचे मान्यही केलेले आहे परंतु ती रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दिल्याचे सिध्द होत नाही. म्हणून गैरअर्जदारांनी असे करुन अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे गृहीत धरण्यास हरकत नाही. मूस्लीम धर्मामध्ये हज याञा ही पविञ असते व हजचा वास्ता देऊन अर्जदार अंमलबजावणी प्रकरणात देखील रक्कम त्यांना मिळाली आहे असे सांगत असतील तर अर्जदार हे गैरअर्जदार यांना ही रक्कम माफ करु शकतील. पण मंचासमोर जे कागदपञ व पूरावा उपलब्ध आहेत त्यानुसार गैरअर्जदार यांना ही रक्कम देणे बंधनकारक राहील. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार क्र. 1 व 2 यांना एकूण रक्कम रु.86,000/- व त्यावर दि.24.11.2008 पासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.2,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |