1. विरुध्द पक्ष यांनी, तक्रारकर्त्यास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. वि.प. हे रेडीमेड कपडयांचे विक्रेते असून तक्रारकर्त्याने दिनांक 19/1/2018 रोजी वि.प.कडून रू.999/- ला टी शर्ट विकत घेतला. तक्रारकर्त्याने सदर टी शर्ट दिनांक् 25/1/2018 रोजी बघीतला असता टी शर्टची खालची बाजू पन्हलीअसून त्यामुळे त्याचा खालचा भाग मोठा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याच दिवशी वि.प.कडे जावून टी शर्ट चा दर्जा योग्य नसून तो बदलवून देण्याची किंवा त्या किंमतीची रक्कम परत करण्याची विनंती केली, परंतु वि.प.ने एकदा विकलेली वस्तु परत घेतली जाणार नाही तसेच किंमतीची रक्कमही परत केली जाणार नाही असे सांगितले. सबब तक्रारकर्त्याने वि.प.ला दिनांक 14/2/2018 रोजी नोटीस पाठवून वरीलप्रमाणे मागणी केली. वि.प. यांनी सदर नोटीसला खोटे उत्तर दिले. नोटीसच्या उत्तरात वि.प.ने तक्रारकर्त्याला दोषयुक्त टी शर्ट बदलून देण्याचे किंवा रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु तक्रारकर्ता दिनांक 22/2/2018 रोजी टी शर्ट बदलून घेण्यास्तव किंवा रक्कम परत घेण्यास्तव वि.प.कडे गेला असता वि.प.ने टी शर्ट बदलून दिली नाही तसेच रक्कमही परत केली नाही. वि.प.ने तक्रारकर्त्यास सदोष टी शर्ट विकून तसेच सदर टी शर्ट बदलून न देवून तक्रारकर्त्याप्रती त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे. सबब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, वि.प. ने तक्रारकर्त्याला सदोष टी शर्ट बदलून दुसरा टीशर्ट द्यावा किंवा त्या किंमतीची रक्कम रु.999/- व ती 12 टक्के व्याजासह परत करावी, तसेच तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 10,000/-/- तसेच तक्रार खर्चापोटी एकुण रक्कम रु.5000/- वि.प. क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्तास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. ने मंचासमक्ष हजर होवून त्यानी आपले लेखी उत्तर दाखल केले. वि.प.ही एक नामंकीत व प्रतिष्ठीत कापड दुकान असून मागील 45 वर्षांपासून कापड विकण्याचा व्यवसाय करते. तक्रारकर्त्याने दिनांक 19/1/2018 रोजी वि.प.कडून रू.999/- ला टी शर्ट योग्यरीत्या तपासूनच विकत घेतला व सदर टी शर्ट विकत घेतल्यानंतर जवळपास 6 दिवस तक्रारकर्त्याच्या जवळ होता. तक्रारकर्त्याने टी शर्ट विकत घेतांना तो तपासून घेतला नाही असे त्याचे कोठेही म्हणणे नाही. तरीदेखील विरूध्द पक्षांची पत खराब होवू नये म्हणून वि.प.ने टीशर्ट बदलून देण्याची वा किमत परत करण्याची तयारी दर्शविली व नोटीसउत्तर मिळाल्यापासून 7 दिवसाचे आत टी शर्ट बदलून घ्यावे किंवा त्याची किंमत परत घ्यावी असे त्याने तक्रारकर्त्याला नोटीस उत्तरात स्पष्टपणे नमूद केले. परंतू तक्रारकर्ता वि.प.कडे आलाच नाही. तक्रारकर्त्याने वि.प.ला त्रास देण्याचे वाईट उद्देशाने तक्रार दाखल केली असल्याने सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व वि.प. यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व वि. प यांचे तोंडी युक्तिवादावरून मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात. मुद्दे निष्कर्ष 1. वि.प. यांनी तक्रारकर्त्याला सदोष वस्तू विकून व तो बदलवून न देवून त्याचेप्रती सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय 2. आदेश काय ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 बाबत :- 5. तक्रारकर्त्याने दिनांक 19/1/2018 रोजी वि.प.कडून रू.999/- ला टी शर्ट विकत घेतला ही बाब वि.पक्षास मान्य असल्याने तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे याबाबत वाद नाही. तक्रारकर्त्याने टीशर्टमध्ये दोष असल्याबाबत नोटीसद्वारे कळविले असता वि.प.ने टीशर्ट बदलून देण्याची वा किंमत परत करण्याची तयारी दर्शविली व नोटीसउत्तर मिळाल्यापासून 7 दिवसाचे आत टी शर्ट बदलून घ्यावे किंवा त्याची किंमत परत घ्यावी असे त्याने तक्रारकर्त्याला नोटीस उत्तरात स्पष्टपणे नमूद केले परंतू तक्रारकर्ता वि.प.कडे आलाच नाही असे वि.प.ने नमूद केले. सदर नोटीस व नोटीस उत्तर प्रकरणात नि क्र.दस्त क्र.2 व 5 वर दाखल आहेत. यावरून सदर टीशर्टमध्ये दोष असल्याचे निष्पन्न होते. मात्र वि.पक्ष यांनी तक्रारकर्ता हा नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांत व नंतर हि आलाच नाही व त्यामुळे वि.प. टीशर्ट बदलून किंवा रक्कम परत करू शकले नाही असे वि.प.चे म्हणणे आहे. परंतु वि.प.ने सदर बाब कोणताही पुरावा दाखल करून सिध्द केलेली नाही. सबब वि.प.ने तक्रारकर्त्यास सदोष टीशर्ट बदलून दिला नाही व रक्कम परत केली नाही व त्यामुळे तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसीक त्रास झाला आहे व योग्य ती सेवा न दिल्याने नुकसानभरपाई देण्यास वि.प. जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 6. मुद्दा क्र. 1 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश |