Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/18/479

Pankaja Kishor Dumbhare - Complainant(s)

Versus

Aakash Institute - Opp.Party(s)

Amal Rohilla

13 Jan 2022

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/18/479
 
1. Pankaja Kishor Dumbhare
Gondia
Gondia
Maharastra
2. Sneha Dumbhare Kishor
Gondia
Gondia
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Aakash Institute
New Delhi
New Delhi
New Delhi
2. Aakash Institue Franchise Centre
Law College Square Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 Jan 2022
Final Order / Judgement

श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये.

 

1.               वि.प.क्र. 1 आकाश इंस्‍टीट्युट मुख्‍य शाखा असून ते आयआयटी-जेईई, एआयपीएमटी सारख्‍या परीक्षा देणा-या विद्यार्थ्‍यांकरीता मार्गदर्शन वर्ग चालवितात, त्‍यांची अनेक केंद्रे वेगवेगळया ठिकाणी असून त्‍यांचे एक केंद्र पूर्वी वि.प.क्र. 2 होते आणि आता वि.प.क्र. 3 ते चालवित आहेत. ते शिक्षणाची, राहण्‍याची, खाण्‍याची, वैद्यकीय सोई पुरविण्‍याची सेवा मोबदला घेऊन देतात. वि.प.ने सदर सोयी विद्यार्थ्‍यांकडून मोबदला घेऊनही न पुरविल्‍याने तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केलेली आहे.

 

2.               तक्रारकर्तीची तक्रार अशी आहे की, वि.प. दोन वर्षाच्‍या आयआयटी-जेईई-एआयपीएमटी अभ्‍यासक्रमाकरीता अग्रीम शुल्‍क आकारतात. तक्रारकर्ता क्र. 1 ने त्‍यांची मुलगी तक्रारकर्ती क्र. 2 च्‍या 14.12.2012 ते 07.02.2014 प्रवेशाकरीता वि.प.च्‍या इंस्‍टीट्युटमध्‍ये रु.177,138/- पैकी नोंदणी शुल्‍क, प्रवेश शुल्‍क, शिकवणी शुल्‍क याकरीता रु.1,72,138/- आणि गणवेषाकरीता रु.5,000/- वेगळे दिले. तसेच प्रथम वर्षाकरीता रु.6,500/- दरमहा होस्‍टेल फी दिले. अशाप्रकारे तक्रारकर्तीने एकूण रु.1,72,138/- ही रक्‍कम वि.प.ला दिली. वि.प.ने गणवेषाकरीता रक्‍कम घेतली परंतू कधीही गणवेष पुरविला नाही. बाहेरगावी राहणा-या विद्यार्थ्‍यांना होस्‍टेलची सुविधा पुरविण्‍यात येणार होती. परंतू वि.प.ने राहण्‍याकरीता आणि अभ्‍यासाकरीता आवश्‍यक सोयी त्‍यांना पुरविल्‍या नाही. वसतीगृहामध्‍ये विद्यार्थ्‍यांना त्‍यांचे अभ्‍यासाचे साहित्‍य ठेवण्‍याकरीता कपाट किंवा टेबल किंवा खुर्च्‍या नव्‍हत्‍या. वसतीगृहामधील खोल्‍यांमध्‍ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी राहत असल्‍याने त्‍यांना अभ्‍यास करतांना बाधा निर्माण होत होती. तसेच इमारतींमध्‍ये क्षमतेपेक्षा जास्‍त विद्यार्थी राहत असल्‍याने स्‍नानगृह, स्वच्‍छता गृह, भोजनाकरीता रांगा लागत असल्‍याने गैरसोय निर्माण झाली. जेवण हे निकृष्‍ट दर्जाचे पुरविण्‍यात येत होते. शुध्‍द पाण्‍याची व्‍यवस्‍था नव्‍हती.  इमारतीमध्‍ये हवा खेळती राहत नव्‍हती. पावसाळयाचे पाणी जमा झाल्‍याने भिंतीवर, गाद्या, कपडे आणि पुस्‍तके यांचेवर बुरशी वाढायला लागली होती. खुप पाऊस झाल्‍यावर वि.प.ला वसतीगृहाची अवस्‍था पाहून सुट्या जाहिर कराव्‍या लागल्‍या होत्‍या. वि.प.ने सांगितल्‍याप्रमाणे शिकवण्‍यास प्रशिक्षित शिक्षक वर्ग उपलब्ध नव्‍हता आणि वारंवार ते शिक्षक बदलवित होते. शेड्युलप्रमाणे स्‍टेट बोर्डाचा अभ्‍यासक्रम पूर्ण करण्‍यात आला नाही. विद्यार्थ्‍यांना शिक्षकांची वाट पाहत तासनतास क्‍लासरुममध्‍ये बसून वाट पाहावी लागत होती. काही शिक्षकांचे वर्तन भयानाक होते आणिते कधी-कधी मुलांना मारत होते. मुलांच्‍या मनात भिती निर्माण करणारे वातावरण होते. शिक्षक वर्ग मुलांच्‍या अभ्‍यासाकडे लक्ष देत नसल्‍याने उत्‍कृष्‍ट गुणवत्‍ता प्राप्‍त मुलांची घसरण होऊ लागली. अशा परिस्थितीमध्‍ये तक्रारकर्ती क्र. 2 हिने दि.18.06.2014 रोजी वि.प.क्र. 2 यांना सतत चालू असणा-या असुविधेबाबत सुचित करुन होस्‍टेल आणि कॉलेज सोडले. तक्रारकर्ती क्र. 2 यांनी पहिले वर्ष अत्‍यंत कठीण स्थितीमध्‍ये काढले आणि दुस-या सत्राचेवेळेस ती परत आली. वि.प.च्‍या निम्‍न आस्‍थापनेमुळे तक्रारकर्ती क्र. 2 ला मानसिक, शारिरीक, आर्थिक दडपण आले आणि त्‍यामुळे तिच्‍या गुणवत्‍ते/श्रेणीवर याचा परिणाम झाला. तक्रारकर्तीच्‍या मते वि.प.ने त्‍यांनी दिलेल्‍या रकमेपैकी शुल्‍काची अर्धी रक्‍कम रु.86,069/-, गणवेष शुल्‍काचे रु.5,000/- अशी एकूण रक्‍कम रु.91,069/- वि.प.ने व्‍याजासह परत करावे, तसेच तिच्‍या भविष्‍यावर परिणाम झाल्‍याने रु.17,61,069/- चे नुकसान झाले, नोटीस खर्च रु.5,000/- आणि कार्यवाहीचा खर्च रु.15,000/- मिळावा अशी  तक्रारकर्तीने सदर तक्रार आयोगासमोर दाखल करुन, मागणी केली आहे.       

 

3.                  सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 ते 3 यांचेवर बजावण्‍यात आली असता वि.प.क्र. 1 व 3 यांनी संयुक्‍तपणे तक्रारीस प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्‍तर दाखल केले. वि.प.क्र. 2 यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले.

 

4.               वि.प.क्र. 1 व 3 यांनी शिक्षण ही वस्‍तू नसल्‍याने आणि शैक्षणिक संस्‍था या सेवा पुरवित नसल्‍याने सदर तक्रार ही ग्रा.सं.का.नुसार चालविण्‍यायोग्‍य नाही. तसेच तक्रारकर्ती हा अज्ञान असल्‍यानेही तक्रार चालू शकत नाही. तसेच तक्रारीत आवश्‍यक पक्ष जोडला नसल्याने तक्रार खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.  पुढे आपल्‍या परिच्‍छेदनिहाय लेखी उत्‍तरामध्‍ये वि.प.क्र. 1 ने मार्च 2015 पासून अद्वंत एज्‍युकेशन प्रा.मि. फ्रेंचाईजी मौलिक शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करीत आहे. वि.प.क्र. 1 एक शैक्षणिक संस्‍था असून मेडीकल आणि इंजिनियरींगला जाणा-यांकरीता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्‍याचे महत्‍वाचे काम करतात. याकरीता त्‍यांनी फ्रेंचाइजी  नियुक्‍त केले आणि ते इच्‍छुक विद्यार्थ्‍यांना गुणवत्‍तायुक्‍त प्रशिक्षण देतात. तक्रारीत वसतीगृहाबाबत ज्‍या गैरसोई नमूद केल्‍या आहेत त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी ही वि.प.क्र. 2 आहे. विप.क्र. 1 हे फक्‍त कोचिंग फी घेतात आणि ते वेळेनुसार घेतात एकाच वेळेस घेत नाहीत. विद्यार्थी आपल्‍या सोईनुसार फी देऊ शकतात. वि.प. नविन तंत्रज्ञानानुसार आणि सुविधायुक्‍त शिक्षण देतात. वि.प.ने स्‍टेट बोर्डच्‍या विद्यार्थ्‍यांना कबुल केले नसतांनाही डाऊट सेशन घेतले. तक्रारकर्ती क्र. 2 हिने कधीही सुरळीतपणे क्‍लासेस केले नाही, कोचिंग क्‍लासला ती उपस्थित राहत नव्‍हती, एक्‍सट्रा क्‍लास आणि डाऊट सेशनला हजर राहत नव्‍हती, लायब्ररीचा वापर तिने केला नाही, तिला शिस्‍तीने राहवयास नको होते, अभ्‍यासात तिला रस नव्‍हता. त्‍यामुळे तिच्‍या गुणवत्‍तेवर आणि श्रेणीवर व पर्यायाने भविष्‍यावर परिणाम झाल्‍याचे त्यांनी नाकारले आहे. तक्रारकर्त्‍याची तक्रार ही बनावटी असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे. तसेच त्‍यांचे विद्यार्थी देशभर चांगल्या कॉलेजमध्‍ये प्रवेश मिळवित आहे.  सदर तक्रार ही दुर्बल मुले आणि त्‍यांचे पालक यांनी त्यांच्‍या उबदार वातावरणातून शिक्षणाकरीता बाहेर पडल्‍यावर सर्व सुविधायुक्‍त पंचतारांकित जिवन पाहिजे, जे शिक्षणाची गुणवत्‍तेवरुन लक्ष विचलित करणारे आहे. तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील संपूर्ण कथन नाकारुन सदर तक्रार ही दंडासह खर्चासह खारीज करावी. वि.प.क्र. 1 व 3 चे पुढे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्तीने दुसरे सत्र पूर्ण केले नाही आणि शंका उपस्थित करणा-या क्‍लासेसलासुध्‍दा ती उपस्थित नसल्याने तिची नुकसान भरपाईची मागणी नाकारण्‍यात यावी. सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकार आयोगाला नसल्‍याचा पुनरुच्‍चार करीत त्‍यांच्‍या क्‍लासमधील विद्यार्थी उच्‍च गुण मिळवून देशातील चांगल्‍या ठिकाणी प्रवेश घेतला आहे असेही नमूद केले आहे.

 

5.               वि.प.क्र. 2 यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल करतांना आकाश इंस्‍टीट्युट कोचिंग क्‍लासेस चालवित असून त्‍यांचे फ्रेंचाईजी अनेक ठिकाणी असल्‍याचे मान्‍य केले आहे. तसेच वि.प.क्र. 2 दक्षिण सेंटर असल्‍याची बाब माहितीअभावी अमान्‍य केली. तक्रारकर्ती क्र. 2 हिने त्‍यांचेकडे नोंदणी करुन दोन वर्षाच्‍या इंटीग्रेटेड क्‍लासरुम कोर्सकरीता प्रवेश घेतला होता. तसेच तक्रारकर्तीने एकाच वेळेस पूर्ण फी दिल्‍याची बाब नाकारली आहे. फ्रेंचाईजी होल्‍डर असल्‍याने त्‍यांनी 33 ते 35 टक्‍के टयुशन फी वि.प.क्र. 1 ला देणे आवश्‍यक होते. तक्रारकर्तीला दोन वर्षाकरीता रु.1,33,034/- देणे होते.  तक्रारकर्तीने रु.1,77,138/- दिले. त्‍यापैकी वि.प.क्र. 2 ने रु.46,562/- वि.प.क्र. 1 ला दिले. तसेच पुस्‍तकांकरीता रु.22,472/- दिले ते ना परतावा होते कारण वि.प.ने तिला पुस्‍तके पुरविली होती. तक्रारकर्तीने गणवेषाकरीता दिलेली फी रु.5,000/- परत मिळण्‍याची मागणी केलेली आहे. परंतू गणवेश पुरविला असल्‍याने तो परत मिळू शकत नाही आणि दरमहा रु.6,500/- प्रमाणे रक्‍कम होस्‍टेल, जेवण, ट्रांसपोर्ट चार्जेस बाबत वि.प.क्र. 2 ला देणे आवश्‍यक आहे. तक्रारकर्तीने वि.प.ला एकूण रु.1,71,989/- दिल्‍याचे नमूद केले आहे. वि.प.क्र. 2 च्‍या मते एका वर्षाच्‍या कोर्सकरीता त्‍यापेक्षा अधिक शुल्‍क लागत आहे. वि.प.क्र. 2 ही नामांकित संस्‍था असून ते गणवेषाशिवाय विद्यार्थ्‍यांना क्‍लासमध्‍ये बसू देत नाहीत. तक्रारकर्तीला कोर्स पूर्ण करावयाचा असता तर तिला वि.प.क्र. 1 ने वि.प.क्र. 3 कडे पाठविले असते कारण दि.13.03.2014 पासून वि.प.क्र. 3 कडे स्‍थानांतरीत केले होते. त्‍यामुळे तक्रारकर्ती तिचे दुसरे सत्र पूर्ण न झाल्‍याबाबतचा वि.प.क्र. 2 ला दोष देऊ शकत नाही. तक्रारकर्तीने केलेले इतर आक्षेप वि.प.क्र. 2 ने फेटाळले आहे.   

 

6.         सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर आयोगाने उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद त्‍यांचे वकीलांमार्फत ऐकला. तसेच उभय पक्षांनी दाखल केलेली कथने आणि दस्‍तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित झालेले मुद्दे  व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे.

 

 

 

अ.क्र.                  मुद्दे                                  उत्‍तर

 

1.   तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ? आणि                              तक्रार आयोगासमोर चालविण्‍यायोग्‍य आहे काय  ?                      होय.

2.   तक्रारकर्तीची तक्रार विहित कालमर्यादेत आहे काय ?                 होय.

3.   वि.प.च्या सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे काय?    होय.

4.   तक्रारकर्ती काय आदेश मिळण्‍यास पात्र आहे ?          अंतिम आदेशाप्रमाणे.

 

  • नि ष्‍क र्ष –

 

7.               मुद्दा क्र. 1तक्रारकर्तीने वि.प.कडे Two years integrated course for NEET 2015  करीता प्रवेश घेण्‍याकरीता आणि वसतीगृहाच्‍या सोईकरीता प्रथम वर्षाकरीता एकूण रु.91,069/- आणि द्वितीय वर्षाकरीता रु.86,069/- वि.प.ला दिल्‍याचे त्‍यांनी निर्गमित केलेल्‍या पावत्‍यांवरुन दिसून येते. वि.प.क्र. 1 व 3 ने सदर प्रकरणी शिक्षण ही वस्‍तू नसून तक्रारकर्ती त्‍यांची ग्राहक होत नाही आणि म्‍हणून सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकार या आयोगाला नाही असा आक्षेप घेतला आहे. सदर प्रकरणांसोबत समकालीन संलग्‍न प्रकरणांमध्‍ये (CC/15/102, CC/15/126 CC/15/127, आदेश पारित दि 30.12.2021) तक्रारीसोबत दाखल दस्‍तऐवजांमध्‍ये वि.प.क्र. 1 चे माहिती पुस्‍तक सादर केलेले आहे. सदर माहिती पुस्‍तकाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये पृ.क्र. 3 ची सुरुवात

TRANSPORTATION    

  • Local Transportation  
  • Free Pickup & Drop facility to your hometown on Festive Holidays  

 

अशी करण्‍यात आलेली आहे.तसेच पुढे CONTENTS मध्‍ये  Library facility, Why Residential, Residential Schedule, Aakash Residency, Dining facility,  Transportation Uniformity  अशा शिर्षकांचा समावेश आहे आणि यामध्‍ये या सर्व नमूद सोई-सुविधा समाविष्‍ट असल्‍याचे वि.प.चे म्‍हणणे आहे. अशा सुविधांकरीता  समावेश आहे.  तसेच प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, वैद्यकीय अधिकारी, वॉर्डन, अतिरिक्‍त क्‍लासरुम कोर्ससे इ. व्‍यवस्‍था पुरविण्‍याबाबत माहितीपुस्तिकेमध्‍ये नमूद केलेले असल्‍याने आणि या व्‍यवस्‍था पुरविण्‍याचे मोबदल्‍यात त्‍यांनी रु.5,000/-, युनिफॉर्म फी आणि काही पावत्‍या या टिचिंग फी अंतर्गत घेतल्‍याचे दाखल पावत्‍यांच्‍या प्रतींवरुन स्‍पष्‍टपणे दिसून येते आणि सदर पावती ही आकाश रेसिडेंसी यांनी दिलेली असल्‍याने वि.प.चे म्‍हणणे की त्‍यांनी वसतीगृहाची सोय उपलब्‍ध करुन दिलेली नव्‍हती आणि ते फक्‍त शैक्षणिक सत्र चालवितात हे मान्‍य करण्‍यायोग्‍य नाही. त्‍यांनी वसतीगृहाची आणि शैक्षणिक बाबीकरीता लागणा-या साहित्‍याची आणि पुस्‍तकाची सुध्‍दा सेवा तक्रारकर्तीला उपलब्‍ध करुन दिलेली असल्‍याने वि.प.चा तक्रारकर्ती ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, नवी दिल्ली, 3 सदस्यीय खंडपिठाने “Manu Solanki & Ors - Versus- Vinayaka Misssion University, decided on 20.01.2020, I (2020) CPJ 210 (NC)” ग्राहक तक्रारी व रिवीजन पिटिशन मध्ये ग्राहक सरंक्षण कायद्याअंतर्गत शिक्षण क्षेत्रासंबंधित तक्रारी निवारण करताना लागू असलेल्या विविध कायदेशीर तरतुदींचा विस्तृत ऊहापोह करीत दि 20.01.2020 रोजी आदेश पारित केला. मा राष्ट्रीय आयोगाने खाजगी शिकवणी वर्ग (प्रायवेट Coaching Classes) शैक्षणिक संस्था (Educational Institution) या व्याख्येत मोडत नसल्याचे स्पष्ट करीत त्यांची शाळा व कॉलेजशी तुलना करणे शक्य नसल्याचे स्पष्ट निरीक्षणे नोंदविली आहेत. तसेच खाजगी शिकवणी वर्गांच्या सेवेत त्रुटि अथवा अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब असल्यास त्याविरुद्ध ग्रा.सं कायद्या अंतर्गत तक्रार निवारण्याचे आयोगास अधिकार क्षेत्र असल्याचे स्पष्ट निरीक्षणे वरील आदेशात परिच्छेद क्रं 45 व 46 मध्ये नोंदविली आहेत. सबब, वि.प.चा सदर आक्षेप फेटाळून लावण्‍यात येतो. वि.प.ने शिक्षणासोबत इतरही सेवा पुरविल्‍याचे स्पष्ट असल्याने सदर तक्रार ही आयोगासमोर चालविण्‍यायोग्‍य असल्‍याचे आयोगाचे स्पष्ट मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

  1.                मुद्दा क्र. 2सदर प्रकरणी विद्यार्थ्‍यांना वि.प.क्र. 1 च्‍या वसतीगृहामध्‍ये गेल्‍यावर त्‍यांनी आश्‍वासित केलेल्‍या सुविधा मिळाल्‍या नाहीत आणि माहिती पुस्तिकेमध्‍ये नमूद उच्‍च शिक्षीत तज्ञ मंडळीकडून विद्यार्थ्‍यांना शिकविण्‍यात येणार असे म्‍हटले आहे आणि वि.प.ने राहण्‍याची, भोजनाची, शिक्षणाची आणि वाहतूकीची सुविधा उपलब्ध करुन देण्‍याकरीता वि.प.ने तक्रारकर्तीकडून रक्‍कम स्विकारली आहे. प्रत्‍यक्षात मात्र शिकवीणारा वर्ग हा कुशल शिक्षकवर्ग नव्‍हता आणि उपरोक्‍त नमूद सुविधांमध्‍ये अनेक त्रुट्या असल्याने तक्रारकर्त्‍याने सदर रक्‍कम ही परत मिळण्‍याकरीता वारंवार वि.प.ला  पत्राद्वारे आणि नोटीसद्वारे सुचित केले आहे. तसेच कोचिंग क्‍लास सोडत असतांना वि.प.ला पत्र पाठवून विद्यार्थ्‍यांच्‍या राहण्‍याची आणि शिक्षणाची सोय अयोग्‍य असून वारंवार फॅकल्‍टी/शिक्षक वर्ग बदलत असल्‍याने विद्यार्थ्‍यांना त्‍यांचे शिकविणे समजत नाही असेही नमूद केले आहे. परंतू वि.प.ने त्‍याकडे दुर्लक्ष केले आणि अद्यापर्यंत त्‍यांनी न पुरविलेल्‍या सेवेबाबत घेतलेली रक्‍कम परत केली नसल्‍याने वादाचे कारण सतत सुरु आहे. तसेच दि 11.09.2014 रोजी दाखल केलेली तक्रार ग्रा.सं. कायदा 1986, कलम 24 –ए नुसार असलेल्या 2 वर्षाच्या कालमर्यादेत दाखल केल्याचे दिसते. सबब, मुद्दा क्र. 2 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

  1.                मुद्दा क्र. 3सदर प्रकरणात दाखल केलेल्‍या दि.18.06.2014 च्‍या तक्रारकर्ता क्र. 1 च्‍या पत्राप्रमाणे शिक्षणाची गुणवत्‍ता चांगली नसल्‍याने मुलीच्‍या भविष्‍यावर प्रश्‍नचिन्‍ह लागल्‍याचे म्‍हटलेले आहे. वारंवार शिक्षकवर्ग/फॅकल्‍टी बदलल्‍याने अभ्‍यास लक्षात येत नसल्‍याचेही त्‍यांचे म्‍हणणे आहे. तसेच त्‍यांनी होस्‍टेल आणि इंस्‍टीटयुट सोडत असल्‍याचेही नमूद केले आहे आणि त्‍यांनी दिलेली रक्‍कम परत घेतलेली आहे असे त्‍यावरील नमूद शे-यावरुन दिसून येते. त्‍यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या होणा-या गैरसोयीची माहिती दिलेली आहे. ‘’आकाश इंस्‍टीट्युट’’ म्‍हणजे उच्‍च गुणवत्‍ता असलेली शिक्षण संस्‍था नावारुपास आलेली संस्‍था असल्‍याचे वि.प.क्र. 2 चे म्‍हणणे आहे आणि याच नामांकितपणामुळे ते विद्यार्थ्‍यांकडून भरपूर शुल्‍क आकारतात. परंतू नागपूर येथील सदर संस्‍था ही तक्रारकर्त्‍याकडून केवळ संस्‍थेच्‍या नावाचे आकर्षक जाहिरात आणि व्‍यवस्‍थापन दर्शवून भरपूर शुल्‍क आकारीत असल्‍याचे दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येते. उच्‍च शैक्षणिक अर्हता नसलेला शिक्षक वर्ग ठेवून केवळ लाभ मिळविण्‍याचे दृष्‍टीने त्‍याबाबत वि.प.ने बरीच रक्‍कम उकळल्याचे दाखल पावत्‍यांवरुन दिसून येते. तक्रारकर्तीने सादर केलेल्‍या दस्‍तऐवज क्र. 1 वर वि.प. क्‍वार्टरली होस्‍टेल फी रु.16,500/- व प्रतीमाह रु.5500/- असे स्विकारतील असे नमूद आहे. रु.5,000/- बुक, बोर्डस, आणि युनिफॉर्म फी म्‍हणून आकारली जाईल असेही नमूद आहे.  वि.प.क्र. 2 मात्र लेखी उत्‍तरामध्‍ये या सर्व बाबी नाकारीत आहे. वि.प.क्र. 2 चा असा दृष्‍टीकोन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारा असल्‍याचा दिसून येतो.  

   

  1. तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍ये वि.प.च्‍या होस्‍टेलमध्‍ये 100 चौ.फु.च्‍या खोलीमध्‍ये चार विद्यार्थ्‍यांना ठेवले जात होते आणि तेथेही त्‍यांना कपाट, टेबल खुर्च्‍या अभ्‍यासाचे साहित्‍य ठेवण्‍याकरीता देण्‍यात आले नव्‍हते. त्‍यामुळे चार विद्यार्थ्‍यांना सामान ठेवण्‍याकरीता असुविधा होत होती. खोल्यांना हवा खेळती राहण्‍याकरीता सुविधा नसल्‍याने एकत्र राहण्‍याची सोय नव्‍हती. पावसाळयात त्‍यावर बुरशी येत होती. तक्रारकर्तीच्‍या आरोग्‍याशी खेळणा-या वि.प.ने याबाबत कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. वि.प.क्र. 1 ते 3 ने जरी या बाबी नाकारल्‍या असल्‍यातरी त्‍यांची बाजू सिध्‍द करण्‍याकरीता कुठलाही पुरावा, फोटोग्राफ्स सादर केलेले नाही, जेणेकरुन ही बाब स्‍पष्‍ट झाली असती. वि.प.क्र. 2 चा असा दृष्‍टीकोन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारा असल्‍याचा दिसून येतो. तसेच मुलांना प्रवेश देतांना त्‍यांना आणि त्‍यांच्‍या पाल्‍यांना अशी आकर्षक माहिती पत्रके दाखवून व त्‍यांच्‍याकडून अवाढव्‍य प्रमाणात त्‍या सेवेकरीता शुल्‍क आकारुन प्रत्यक्षात मात्र त्‍या मुलांची गैरसोय होत असतांना आणि त्‍यांनी तक्रारी केल्‍यावरही आणि वसतीगृह सोडून जाण्‍याची पाळी येईपर्यंत तक्रारींवर दुर्लक्ष करणे हे वि.प.क्र. 1 आणि 2 चे वर्तन तक्रारकर्त्‍यांच्‍या बाबतीत अक्षम्‍य निष्‍काळजीपणा केल्‍याचे निदर्शनास येते. यानुसार वि.प.क्र. 2 ने तक्रारीवर घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावण्‍यात येत असून वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्तीस आश्‍वासित केलेली सेवा न पुरवून सेवेत त्रुटी केल्‍याचे दस्‍तऐवजासह स्‍पष्‍ट होते आणि म्‍हणून मुद्दा क्र. 3 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविण्‍यात येतात.

 

11.        वि.प.च्या वकिलांनी मौखिक युक्तीवादा दरम्यान त्याच्या निवेदनाच्या समर्थनार्थ मा. राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली व मा राज्य आयोग, रांची,झारखंड यांचे खालील न्‍याय निवाडे दाखल केले.

 

1) FIITJEE LTD Vs S Balavignesh, Revision Petition No 2684 of 2014, decided on 09.01.2015,( NC),

2) Homeopathic Medical College & Hospital v/s Miss Gunita Virk”. Vol 1(1996) CPJ 379(NC),

3) Ansuman das Gupta - Versus- FIITJEE & Anr, First Appeal No 88 of 2008, decided on 15.05.2008, IV (2008) CPj 4(2020) CPJ 210 (Jharkhand State Commisssion)”

 

प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारकर्तीने स्‍वतःच्‍या वैयक्‍तीक कारणास्‍तव प्रवेश रद्द केलेला नसून वि.प.च्‍या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्तीला प्रवेश रद्द करावा लागला. मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, नवी दिल्ली, 3 सदस्यीय खंडपिठाने “Manu Solanki & Ors - Versus- Vinayaka Misssion University, (supra) या प्रकरणी दि 20.01.2020 रोजीच्या आदेशात नोंदविलेले निष्कर्ष सुस्पष्ट आहेत त्यामुळे वि.प.ने सादर केलेले वरील निवाडे प्रस्तुत प्रकरणी गैरलागू असल्याचे आयोगाचे मत आहे.

 

12.              मुद्दा क्र. 4तक्रारकर्तीने ज्‍या सुविधा वि.प.कडून मिळतील म्‍हणून मोबदला दिला आहे, त्‍या त्‍यांना मिळाल्‍या नसल्‍याने त्‍यांनी वि.प.ला त्‍याबाबत दिलेली रक्‍कम ही व्‍याजासह मिळण्‍यास ते पात्र असल्‍याचे आयोगाचे मत आहे.

 

13.              वि.प.क्र. 1 ने वि.प.क्र. 2 ची फ्रेंचाईजी ही 13 फेब्रुवारी, 2015 ला समाप्‍त होत असल्‍याचे लेखी उत्‍तरात नमूद केले आहे आणि आता ती फ्रेंचाईजी वि.प.क्र. 3 कडे आहे आणि ते कोचिंग क्‍लासेस चालवित आहे असे नमूद केले आहे. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्तीने एक वर्ष पूर्ण करुन दुसरे वर्षी कोचिंग क्‍लास सोडला यावर उत्‍तर देतांना असे नमूद केले की, तक्रारकर्ती वि.प.क्र. 3 कडे स्‍थानांतरण करुन तिचा कोचिंग क्‍लासचा अभ्‍यासक्रम पूर्ण करु शकली असती. आयोगाचे मते तक्रारकर्तीने वि.प.क्र. 1 ला कळविल्यावर होणा-या गैरसोयीबाबत काय पावले उचलली आणि त्‍यावर काय समाधान काढले याचा उल्‍लेख संपूर्ण लेखी युक्‍तीवादात केलेला नाही. त्‍यांनी फक्‍त फ्रेंचाईजी काढली. वि.प.क्र. 2 च्‍या अयोग्‍य वर्तनावर वि.प.क्र. 1 ने काय कृती केली किंवा आलेल्‍या तक्रारीची प्रत्‍यक्ष शहानिशा केली की नाही हे समजून येत नाही. वि.प.क्र. 1 ने जरी वि.प.क्र. 2 वर कुठलीही कार्यवाही केली नसली तरी वि.प.क्र. 2 च्‍या प्रत्‍येक कृतीस वि.प.क्र. 1 जबाबदार आहेत. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रारीतील गैरसोईस वि.प.क्र. 1 आपण जबाबदार नाहीत म्‍हणून जबाबदारी नाकारु शकत नाही. फ्रेंचाईजीच्‍या प्रत्‍येक कृतीस वि.प.क्र. 1 जबाबदार आहेत. तसेच वि.प.च्‍या प्रत्‍येक जाहिरातीमध्‍ये आकाश इंस्‍टीट्युटचे छापील चिन्‍ह आणि नाव असल्‍याने, 13 फेब्रुवारी, 2015 पूर्वी प्रवेश घेतला असल्‍याने  वि.प.क्र. 2 सदर तक्रारीस नाकारु शकत नाही. वि.प.क्र. 1 ने संपूर्ण तक्रार नाकारण्‍याचे पुष्‍टयर्थ कुठलेही समर्थनीय दस्‍तऐवज दाखल केलेले नाही. तक्रारकर्तीला नियमित स्‍वरुपात आणि चांगल्या वातावरणात अभ्‍यास करता आला नाही, वि.प.च्‍या चांगल्‍या शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन मिळाले नाही, राहण्‍याच्‍या आणि खाण्‍याच्‍या गैरसोईमुळे तिला मानसिक आणि शारिरीक त्रास झाला या सर्वांमुळे तक्रारकर्तीच्‍या शैक्षणिक कालावधीचे आणि भविष्‍यामध्‍ये त्‍याचे आधारावर असलेल्‍या पुढील शिक्षणाचे नुकसान झाले. तक्रारकर्तीच्या दि 18.06.2014 रोजीच्या दाखल पत्रावरुन अनेक विद्यार्थीनींनी एकाच वेळेस कोचिंग क्‍लास सोडले आहे आणि त्‍यावर त्यांच्‍या आणि त्‍यांच्‍या पालकांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. आयोगाने दाखल पावत्‍यांच्‍या प्रतींचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीने एकूण रक्‍कम रु.1,77,138/- दिल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍ये तिने वि.प.कडे दिलेल्या एकूण रु.1,77,138/- पैकी रु.91,069/- रक्‍कम परत मिळण्‍याची मागणी केलेली आहे. संपूर्ण पावत्‍यांच्‍या प्रतींचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता तक्रारकर्ती तिच्या मागणींनुसार रक्‍कम रु.91,069/- व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे.

 

14.              तक्रारकर्तीने मानसिक, शारिरीक त्रासासाठी रु.16,50,000/- रक्कमेची मागणी केली पण त्यासाठी मान्य करण्यायोग्य निवेदन दिलेले नाही. सबब, सदर मागणी अवाजवी असल्याचे आयोगाचे मत आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील एकंदर वस्‍तुस्थितीचा विचार करता वि.प.क्र. 1 व 2 यांचेमधील अंतर्गत वाद हा तक्रारकर्तीच्‍या नुकसानास व त्रासास  जबाबदार आहे. वि.प.च्‍या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्तीला तिचा प्रवेश रद्द करावा लागला. परिणामी त्याचा तक्रारकर्तीचे भविष्‍यातील शिक्षणावर परिणाम झाला आणि त्‍यामुळे तक्रारकर्तीला निश्चितच मानसिक, शारिरीक त्रास सहन करावा लागला, त्‍यामुळे तक्रारकर्ती माफक नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र असल्याचे आयोगाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्तीच्‍या पालकांनी वि.प.ला होत असलेल्‍या गैरसोईची आणि मोबदला देऊन सुविधा उपलब्ध करुन न दिल्‍याने त्‍याला वि.प.क्र. 1 व 2 सोबत पत्रव्‍यवहार, नोटीस इ. कारवाई करावी लागली. सदर कार्यवाहीचा खर्च मिळण्‍याससुध्‍दा तक्रारकर्ती पात्र असल्‍याचे आयोगाचे मत आहे.

 

15.              वि.प.क्र. 1 ने वि.प.क्र. 3 ला फ्रेंचाईजी ही वि.प.क्र. 2 ला संलग्‍न करुन दिलेली आहे असे कुठलेही दस्तऐवज आयोगासमोर दाखल केलेले नाही आणि तक्रारकर्तीची मागणी ही वि.प.क्र. 3 विरुध्‍द नाही. वि.प.क्र. 3 यांचा वि.प.क्र. 2 च्‍या अनुचित व्‍यापारी प्रथेशी किंवा सेवेतील निष्‍काळजीपणाशी काहीही संबंध नसल्‍याने त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारिज करण्‍यात येते.    

 

16.              प्रकरणातील वस्‍तुस्थिती, पुराव्‍याचा व वरील नमूद कारणांचा निष्‍कर्षानुसार आणि उपलब्‍ध दस्‍तऐवजानुसार विचार करता आयोग सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. 

 

अंतिम आदेश 

 

1)   तक्रारकर्तीची तक्रार (एकत्रीत)  अंशत: मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला (एकत्रीत) रु.91,069/- शेवटची रक्‍कम दिल्‍याचे दि.07.02.2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यन्त द.सा.द.शे.12% व्याजासह परत करावे.

2)   वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्तीस झालेल्‍या शारिरीक आणि मानसिक त्रासापोटी (एकत्रीत) रु.30,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी (एकत्रीत) रु.10,000/- द्यावेत.

3)   वि.प.क्र. 1 व 2 ने संयुक्‍तपणे किंवा पृथ्‍थकपणे वरील आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

4)   वि.प.क्र. 3 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

5)   उभय पक्षकारांना निकालपत्राची प्रत निःशुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.