Final Order / Judgement | (आदेश पारीत व्दारा- एस. आर. आजने, मा. सदस्य) - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडुन मौजा शिरुर, तहसिल हिंगना, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका नंबर ८३/०१ येथील लेआऊट मधील प्लॉट क्रमांक १, क्षेञफळ १६५३ चौ.फुट रुपये ४००/- प्रती चौरस फुट प्रमाणे एकूण रुपये ६,६१,२००/- एवढ्या किंमतीत विकत घेण्याचा करार विरुध्द पक्ष यांचेशी १००/- रुपये एवढ्या किंमतीच्या स्टॅम्प पेपर वर केला. तक्रारकर्त्याने कराराचे दिवशी बयाणा रक्कम रुपये १,६५,०००/- विरुध्द पक्षाला दिली. तक्रारकर्त्याने उर्वरीत रक्कम रुपये ४,९५,९००/- प्रतीमहा २०,६६२/- प्रमाणे २४ हप्त्यात अदा करावयाची होती. विरुध्द पक्ष सदर लेआऊट चे विकसन करुन देणार होते. ज्यामध्ये WBH रोड, ड्रेनेज, वॉटर व इलेक्ट्रीफीकेशन चा समावेश आहे. तक्रारकर्त्याला सदर प्लॉट चे विक्रीपञ नोंदणीचा खर्च सोसायचा होता. विरुध्द पक्षाने सदर लेआऊट चे एन.ए. अॅन्ड टी.पी. करुन देण्याचे वचन दिले होते.
- तक्रारकर्त्याने दिनांक १५/१२/२०१२ पर्यंत विरुध्द पक्षाला रुपये ४,०५,०००/- इतकी रक्कम अदा केल्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला लेआऊट चे एन.ए. व टी.पी. बाबत विचारणा केली असता विरुध्द पक्षाने एन.ए. व टी.पी. बाबत असमर्थता दाखविली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला प्लॉटचे विक्रीपञ नोंदणीबाबत विचारणा केली असता विरुध्द पक्षाने विक्रीपञ नोंदणी सध्या शक्य नसल्याबाबत सांगितले. सहा वर्षाचा कालावधी लोटुनही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विक्रीपञ नोंदणी करुन दिले नाही तेव्हा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला त्याने प्लॉट खेरदीपोटी दिलेली रक्कम कराराप्रमाणे ५० टक्के जास्त अतिरीक्त रक्कम आकारुन परत करण्याबाबत विनंती केली. त्यानूसार विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला माहे ऑक्टोबर २०१६ ला रुपये ७५,०००/- माहे फरवरी २०१७ ला रुपये ३२,०००/- अदा केले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कराराप्रमाणे द्यावयाचे एकूण ६,०७,५००/- पैकी रुपये १,०७,०००/- अदा केले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कराराप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिलेल्या ४,०५,०००/- च्या १५० टक्के रक्कम रुपये ६,०७,५००/- पैकी रुपये १,०७,०००/- अदा करुन तक्रारकर्त्याशी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला आहे आणि तक्रारकर्त्याप्रती दोषपूर्ण सेवा दिली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला वकील मार्फत दिनांक २४/०४/२०१७ ला कायदेशीर नोटीस पाठविली परंतू विरुध्द पक्षाने नोटीस ला उत्तर दिले नाही किंवा उर्वरीत देय रक्कम रुपये ५,००५००/- १८ टक्के व्याजासह दिनांक ३/१२/२०१३ पासून अदा केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात यावे की, त्यांनी तक्रारकर्त्याला रुपये ५,००५००/- १८ टक्के व्याजासह दिनांक ३/१२/२०१३ पासून अदा करावे.
- मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये ४,००,०००/- व तक्रारीचा खर्च अदा करावा.
- विरुध्द पक्षाचे कथनानूसार तक्रारकर्त्याने सदरचा प्लॉट हा निवासी उपयोगाकरीता घेतला नसून तो सौदा गुंतवणुक करुन नफा कमवायचा या उद्देशाने विकत घेतला आहे कारण तक्रारकर्त्याचे प्लॉट नंबर ९, साविञी फुले नगर, भगतसिंग मार्ग, नागपूर येथे घर आहे त्यामुळे सदरची तक्रार न्यायमंचासमोर चालु शकत नाही. तक्रारकर्त्याने तक्रार अर्ज हा गुंतविलेली रक्कम व्याजासह परत मिळण्याहेतु केलेल्या विनंतीसह असल्याने सदर अर्ज हा पूर्णपणे गैरकायदेशीर आहे. कारण मंचासमोर रक्कम परत मिळण्या हेतु अर्ज सादर करता येत नाही. तक्रारकर्त्याने मंचासमोर दाखल केलेली तक्रार मुदतबाह्य आहे त्यामुळे ती खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्त्याने सदर प्लॉट नंबर १ मौजा शिरुर, आराजी १६५३ चौ.फुट सर्वे नंबर ८३/१, तहसिल हिंगणा, जिल्हा नागपूर याबाबतचा करारणामा विरुध्द पक्षाशी दिनांक ३/२/२०१० रोजी केला व प्लॉट चे एकूण किंमत रुपये ६,६१,२००/- पैकी रुपये १,६५,०००/- इतकी रक्कम दिनांक ३/२/२०१० ला विरुध्द पक्षास अदा करण्यात आली. तक्रारकर्त्याने दिनांक १५/१२/२०१२ पर्यंत रुपये ४०५०००/- इतकी रक्कम विरुध्द पक्षाला अदा केली आहे. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला माहे ऑक्टोबर २०१६ ला रुपये ७५,०००/- व माहे फरवरी २०१७ मध्ये रुपये ३२,०००/- परत केले. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार दिवाणी स्वरुपाची असल्यामुळे सदरची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
- उभयपक्षाने दाखल केलेले दस्ताऐवज तसेच त्यांनी केलेला तोंडी युक्तीवाद ऐकल्यावर निकालीकामी खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्यावरील निष्कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहे.
अ.क्र. मुद्दे उत्तर I. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय II. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय III. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणमिमांसा - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडुन मौजा शिरुर, तहसिल हिंगना, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका नंबर ८३/०१ येथील लेआऊट मधील प्लॉट क्रमांक १, क्षेञफळ १६५३ चौ.फुट रुपये ४००/- प्रती चौरस फुट प्रमाणे एकूण रुपये ६,६१,२००/- एवढ्या किंमतीत विकत घेण्याचा करार विरुध्द पक्ष यांचेशी १००/- रुपये एवढ्या किंमतीच्या स्टॅम्प पेपर वर केला. तक्रारकर्त्याने कराराचे दिवशी बयाणा रक्कम रुपये १,६५,०००/- विरुध्द पक्षाला दिली. तक्रारकर्त्याने उर्वरीत रक्कम रुपये ४,९५,९००/- प्रतीमहा २०,६६२/- प्रमाणे २४ हप्त्यात अदा करावयाची होती. विरुध्द पक्ष सदर लेआऊट चे विकसन करुन देणार होते. ज्यामध्ये WBH रोड, ड्रेनेज, वॉटर व इलेक्ट्रीफीकेशन चा समावेश आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला प्लॉट खरेदीपोटी रक्कम रुपये ४,०५,०००/- अदा केले. तक्रारकर्त्याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन केल्यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला वादातील प्लॉट नंबर १ च्या खरेदीपोटी रुपये ४,०५,०००/- रक्कम दिली व उर्वरीत रक्कम रुपये २,५६,२००/- वादातील प्लॉट चे विक्रीपञ नोंदणी वेळी देणार होता परंतू विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला प्लॉट नंबर १ चे विक्रीपञ करुन दिले नाही ही विरुध्द पक्षाची तक्रारकर्त्याप्रती दोषपूर्ण सेवा असुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला आहे.
- उभयपक्षामध्ये झालेल्या करारामध्ये विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सदर लेआऊट चे एन.ए. अॅन्ड टी.पी. करुन देण्याचे वचन दिले होते परंतू विरुध्द पक्ष सदर लेआऊट चे एन.ए. व टी.पी. करुन देण्यास अपयशी ठरला व त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला वादातील प्लॉट चे विक्रीपञ नोंदणी करुन दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला प्लॉट खरेदीपोटी दिलेली रक्कम रुपये ४,०५,०००/- करारात नमुद केल्याप्रमाणे ५० टक्के जास्त अतिरीक्त रक्कम आकारुन परत करण्याबाबत विनंती केली परंतू Vendor ने सदर वादातील प्लॉट तक्रारकर्त्याकडुन विकत न घेतल्यामुळे ५० टक्के अतिरीक्त रकमेची करारातील अट सदर प्रकरणात लागु होत नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला देय रक्कम रुपये ४०५०००/- पैकी रुपये ७५,०००/- माहे आक्टोबर २०१६ ला व रुपये ३२,०००/- माहे फरवरी २०१७ ला असे एकूण रुपये १,०७,०००/- अदा केले. त्यामुळे तक्रारकर्ता उभयपक्षातील करारानूसार विरुध्द पक्षाला दिलेल्या रकमेच्या (रुपये ४०५०००/- - १,०७,०००/-) रुपये २९८०००/- इतकी रक्कम व्याजासह घेण्यास पाञ आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात येते की, विरुध्द पक्षाने करारानूसार तक्रारकर्ता कडुन वादातील प्लॉट विक्रीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये २,९८,०००/- दिनांक ३/१२/२०१० पासुन १२ टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला रक्कम प्रत्यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मानसिक, शारीरीक व आर्थिक ञासापोटी रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |