Maharashtra

Nanded

CC/10/24

Shard Apparao Poul - Complainant(s)

Versus

Aadhar Hospital - Opp.Party(s)

ADV. P.N. Shinde

20 May 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/24
1. Shard Apparao Poul Shilona, Tq.pusad, Dist YavatmalYavatmalMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Aadhar Hospital Shivajinager, NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 20 May 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  2010/24.
                          प्रकरण दाखल तारीख - 25/01/2010
                          प्रकरण निकाल तारीख 20/05/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
शरद पि.अप्‍पाराव पौळ
वय 29 वर्षे, धंदा शेती                                  अर्जदार
रा.शिळोना ता.पुसद जि.यवतमाळ                                      
     विरुध्‍द.
आधार हॉस्‍पीटल,
बर्न अन्‍ड प्‍लॅस्‍टीक सर्जरी
शिवाजी नगर, नांदेड चे
डॉ. संजय कदम,
शिवाजी नगर, नांदेड
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.पी.एन.शिंदे
गैरअर्जदारा तर्फे वकील          - अड.एस.एन.हाके
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
             गैरअर्जदार आधार हॉस्‍पीटल यांचे सेवेच्‍या ञूटी बददल अर्जदार यांनी तक्रार नोंदवीली असून त्‍यांनी चूकीची सेवा दिल्‍याबददल झालेला खर्च रु.2,00,000/- अतिरिक्‍त खर्च रु.,1,50,000/- तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.1,50,000/- असे एकूण रु.5,00,000/- नूकसान भरपाईची त्‍यांची मागणी आहे.
              अर्जदार यांचे प्रकरणाची थोडक्‍यात हकीकत अशी आहे की, अर्जदार हे मूळचे शिळोना ता. पूसद जि.यवतमाळ येथील रहीवासी असून त्‍यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे आधार हॉस्‍पीटल  ही सूसज्‍ज असे हॉस्‍पीटल आहे. अर्जदार हे दि.04.12.2008 रोजी मोटार सायकल नंबर एम.एच.-26-
 
 
पी-4640 जात असताना गौळ आणि शिळौना  या गांवाचे रोडवर अटोने धडक देऊन मोठा अपघात झाला. या अपघातात अर्जदाराच्‍या डाव्‍या पायास जबर मार लागला व फ्रॅक्‍चर झाले. ताबडतोब अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे उपचाराकरिता  शरीक केले. डॉ. संजय कदम यांनी अर्जदारावर इलाज करण्‍यासाठी तपासणी केली. त्‍यांचे नातेवाईकास पायाचे ऑपरेशन करण्‍यावीषयी सल्‍ला दिला. डॉक्‍टरच्‍या सांगण्‍याप्रमाणे रक्‍कम जमा केली. तसेच औषधासाठी ठेव रक्‍क्‍म म्‍हणून दूकानावर रक्‍कम जमा केली. यानंतर डॉ.संजय कदम यांनी अर्जदाराच्‍या डाव्‍या पायाचे एक्‍सरे काढून ऑपरेशन केले असे सांगितले. या इलाजासाठी अर्जदाराला एकूण रु.3,00,000/- खर्च आला. इलाज पूर्ण झाला म्‍हणून दि.2.2.2009 रोजी डॉ. संजय कदम यांनी डिसचार्ज दिला. अर्जदार त्‍यांच दिवशी शिळौणा येथे गेले असता काही दिवसनंतर डाव्‍या पायास वेदना होऊ लागल्‍या म्‍हणून अर्जदाराने पूसद येथे डॉ. मालपानी यांचेकडे दाखविले असता त्‍यांनी ऑपरेशन बरोबर झालेले नाही कारण पायात फ्रॅक्‍चरवर उपचार केलेला नाही व फ्रॅक्‍चर तसेच आहे त्‍यामूळे परत ऑपरेशन करावे लागेल असा सल्‍ला दिला. त्‍यावेळेस अर्जदाराने नांदेड येथे आधार हॉस्‍पीटल येथे उपचार झाल्‍याचे सांगितले. डॉ. मालपानी यांनी अर्जदारावर नागपूर येथे सरकारी दवाखान्‍यात जाऊन बोन फ्रॅक्‍चरवर ऑपरेशन सल्‍ला दिला. गैरअर्जदार यांनी एकाच बोनचे ऑपरेशन केले त्‍यामूळे पूढील इलाजासाठी रु.30,000/- वेगळा खर्च आला. यानंतर अर्जदाराने नागपूर येथे जाऊन उपचार घेतला. तेथे डॉक्‍टरांनी एकच फ्रॅक्‍चरचे ऑपरेशन केले दोन फ्रॅक्‍चर राहीले असे सांगितले. त्‍यामूळे राहीलेले दोन फ्रॅक्‍चर चे ऑपरेशन नागपूर येथे झाले. दोन ऑपरेशचा सरकारी दवाखान्‍यात खर्च व इतर खर्च रु.50,000/- आला. हा सर्व खर्च गैरअर्जदार यांचे सेवेच्‍या ञूटी मूळे झालेला आहे. त्‍यामूळे वर मागणी केलेली रक्‍कम अर्जदार यांना गैरअर्जदाराकडून मिळावी असे म्‍हटले आहे.
 
              गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्‍हणणे वकिलामार्फत दाखल केले आहे. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार ही चूक असल्‍याकारणाने खारीज करावी असे म्‍हटले आहे. आधार हॉस्‍पीटल हे बर्न अन्‍ड प्‍लॅस्‍टीक सर्जरी साठी कार्यरत आहे. डॉ. संजय कदम हे बर्न अन्‍ड प्‍लॉस्‍टीक सर्जन म्‍हणून काम करतात,ते एम.एस.एम.सी. एच. प्‍लॉस्‍टीक सर्जन आहेत.
डॉ. विजय कागणे  हे एम.एस. आर्थो सर्जन आहेत, तसेच डॉ. राजेश्‍वर पवार हे एम.बी.बी.एस. डि. आर्थो सर्जन आहेत.  हे तीघेही एकञित काम करतात. तक्रारदार हा दि.4.12.2008 रोजी शरीक झाला हे म्‍हणणे त्‍यांना मान्‍य आहे. परंतु त्‍यांचे नातेवाईकांनी डॉक्‍टरांच्‍या सांगण्‍याप्रमाणे  पैसे जमा केले
 
 
तसेच औषधी साठीची रक्‍कम ठेव म्‍हणून दिली हे त्‍यांचे म्‍हणणे स्‍पष्‍टपणे नाकारले आहे. तसेच अर्जदाराला रु.3,00,000/- खर्च आला व दि.2.2.2009 रोजी डॉ. संजय कदम यांनी पायावर उपचार पूर्ण झाले म्‍हणून डिसचार्ज दिला हे ही म्‍हणणे स्‍पष्‍टपणे नाकारलेले आहे. सत्‍य परिस्थिती गैरअर्जदार म्‍हणतात अर्जदार हे दि.15.11.2008 रोजी राञी 9.30 वाजता त्‍यांचेकडे शरीक झाले. अर्जदाराच्‍या उजव्‍या पायाच्‍या मांडीचे फेंडरीचे हाड मोडलेले होते. अर्जदाराच्‍या टाचेस जबर मार लागला होता तसेच पायाचा रक्‍त पूरवठा बंद झाला होता. त्‍यामूळे अर्जदारास व त्‍यांच्‍या नातेवाईकांना पूर्व सूचना देऊन व तशा प्रकारचे संमतीपञ संबंधीत नातेवाईकाचे घेण्‍यात आले तसेच त्‍यांच्‍या भावाने लेखी संमतीपञ दि.15.11.2008 रोजी दिले होते त्‍यावर त्‍यांच्‍या भावांची सही आहे. दि.15.11.2008 ते दि.19.11.2008 या दरम्‍यानच्‍या काळात गैरअर्जदार व त्‍यांच्‍या सहका-याकडून कूठल्‍याच प्रकारचा निष्‍काळजीपणा झालेला नाही. अर्जदारास आवश्‍यक त्‍या सर्व बाबीची माहीती देण्‍यात आली होती. सर्व डॉक्‍टरांनी पूर्ण कौशल्‍य पणाला लावून अर्जदारावर इलाज केले. अत्‍यावश्‍यक असलेली शस्‍ञक्रिया दि.16.8.2008 रोजी करण्‍यात आली. खरे तर ही शस्‍ञक्रिया नसून तातडीची मायनर सर्जरी आहे.
1.                Application of external fixator and fasciotomy for fracture Tibia   
                    Fibula Right with compartment syndrome.
2.                Close reduction and internal fixation with femur interlock nail
                    for fractured shaft femur (righ)
3.                Debridment of heel pad avulsion (right)
 
यासाठी  external fixture वापरणं व पायाची alignment maintain करणेसाठी तात्‍पूरत्‍या स्‍वरुपाची शस्‍ञक्रिया करण्‍यात आली. सदरील अपघातामध्‍ये अर्जदाराच्‍या पायाचा रक्‍तपूरवठा पूर्णपणे बंद असल्‍यामूळे Fasciotomy  (रक्‍ताभिसरण सूरळीत होण्‍यासाठी करण्‍यात येणारी शस्‍ञक्रिया ) करणे व external fixcator बसवीणे आवश्‍यक असल्‍यामूळे ती शस्‍ञक्रिया गैरअर्जदार यांनी केली.  दि.29.11.2008 ला डिसचार्ज दिला व पूढील उपचारासाठी  परत येण्‍यास सांगितले. त्‍यानंतर अर्जदार हा दि.4.12.2008 रोजी शरीक झाला. त्‍यांला उपचारानंतर दि..2.2.2009 रोजी सूटटी देण्‍यात आली. या दरम्‍यान अर्जदाराच्‍या पायाच्‍या फेडरींचे Plastic Surgeory (Fasciotomy closer with split skin graft )  असे सांगितले. दि.2.2.2009 रोजी डिसचार्ज घेतल्‍यावर अर्जदार गेले ते परत त्‍यांचेकडे आलेच नाहीत. त्‍यामूळे यापूढील कोणतीही ञूटीची सेवा गैरअर्जदार यांनी दिलेली नाही. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे डॉ. मालपानी यांनी अर्जदारास नागपूर येथे पाठविले व बोन
 
 
फ्रॅक्‍चरसाठी ऑपरेशन सल्‍ला दिला व त्‍यात तीन फ्रॅक्‍चर आहे. त्‍यात एका फ्रॅक्‍चर चे ऑपरेशन गैरअर्जदार यांनी केले हे म्‍हणणे गैरअर्जदारास मान्‍य नाही. डॉ.मालपानी यांनी सल्‍ला दिल्‍या वीषयीचा कोणताही पूरावा तक्रारी सोबत दिला नाही. नागपूर येथील डॉक्‍टरांचे म्‍हणणे की, गैरअर्जदार यांचेकडे  एकच बोनचे फ्रॅक्‍चर केले हे ही म्‍हणणे स्‍पष्‍टपणे नाकारण्‍यात येते. ञूटीच्‍या सेवे बददल व तक्रारीमध्‍ये तज्ञाचा पूरावा नाही. शासकीय रुग्‍णालय नागपूर यांनी दोन फ्रॅक्‍चर चे आपॅरेशन केले हे गैरअर्जदार यांना माहीत नाही व त्‍यामूळे अर्जदारास मानसिक ञास झाला यावीषयीचा कोणत्‍याही तज्ञाचा वैयक्‍तीक पूरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही. म्‍हणून सबब ही तक्रार खर्चासह खारीज होण्‍यास पाञ आहे.
 
             अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे, दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
                 
          मूददे                                       उत्‍तर
1.                 गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी किंवा
     निष्‍काळजीपणा अर्जदार सिध्‍द करतात काय ?         नाही.
2.    काय आदेश ?                       अंतिम आदेशाप्रमाणे.
                      कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार यांचा गौळ व शिळौना रोडवर दि.4.12.2008 रोजी मोटार सायकलवर अपघात झाला व त्‍यांना त्‍यांच दिवशी गैरअर्जदार यांचेकडे उपचारासाठी शरीक केले असे म्‍हटले आहे. त्‍या संबंधी शपथपञात यांचा उल्‍लेख आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांचे म्‍हणणे खोडत असे म्‍हटले आहे की, दि..4.12.2008 रोजी अर्जदार यांचेकडे शरीक झाले ही गोष्‍ट खरी आहे परंतु यापूर्वी त्‍यांचे मोटार सायकलमध्‍ये अपघात झाल्‍याकारणाने गैरअर्जदार यांचे हॉस्‍पीटलमध्‍ये ते दि.15.11.2008 रोजी राञी 9.30 वाजता शरीक झाले. अर्जदाराच्‍या उजव्‍या पायाच्‍या मांडीचे फेंडरीचे हाड मोडलेले होते. अर्जदाराच्‍या टाचेस जबर मार लागला होता तसेच पायाचा रक्‍त पूरवठा बंद झाला होता. त्‍यामूळे अर्जदारास व त्‍यांच्‍या नातेवाईकांना पूर्व सूचना देऊन व तशा प्रकारचे संमतीपञ संबंधीत नातेवाईकाचे घेण्‍यात आले. दि.15.11.2008 ते दिनांक 19.11.2008  या  दरम्‍यानच्‍या   काळात  गैरअर्जदार व त्‍यांच्‍या
 
 
सहका-याकडून कूठल्‍याच प्रकारचा निष्‍काळजीपणा झालेला नाही. अर्जदारास आवश्‍यक त्‍या सर्व बाबीची माहीती देण्‍यात आली होती. सर्व डॉक्‍टरांनी पूर्ण कौशल्‍य पणाला लावून अर्जदारावर इलाज केले. उपचार करणारी टिम डॉ. संजय कदम हे बर्न अन्‍ड प्‍लॉस्‍टीक सर्जन म्‍हणून काम करतात,ते एम.एस.एम.सी. एच. प्‍लॉस्‍टीक सर्जन आहेत. डॉ. विजय कागणे हे एम.एस. आर्थो सर्जन आहेत, तसेच डॉ. राजेश्‍वर पवार हे एम.बी.बी.एस. डि. आर्थो सर्जन आहेत. हे तीघेही क्‍वालिफाईड डॉक्‍टर आहेत व ते एकञित काम करतात.  दि.15.1.1.2008 रोजीला शरीक झाल्‍या बददल गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यात स्‍पष्‍टपणे तसा उल्‍लेख केलेला असून त्‍यांनी त्‍या सोबतचे अडमीशन व डिसचार्ज कार्ड व त्‍यावर केलेले उपचार या बददलचे रेकॉर्डच दाखल केलेले आहे. या  रेकॉडवरुन अर्जदार यांनी खोटी माहीतीचे आधारे या मंचात तक्रार दाखल केलेली आहे. त्‍यांचा अपघात दि.15.8.2008 रोजी झाला व त्‍यांनी दि.4.12.2008 रोजीला अपघात झाला असे खोटे सांगावयास नको होते. अर्जदाराने सूरुवातीपासूनच सत्‍य परिस्थिती लपविली आहे. दि.15.11.2008 रोजी अर्जदाराच्‍या भावाकडून संमतीपञ घेतले आहे. यात स्‍पष्‍टपणे अपघातामध्‍ये उजव्‍या मांडीस व टाचाला अपघातामध्‍ये जबर मार लागला आहे. पायाला सूज असल्‍यामूळे रक्‍त पूरवठा बंद झालेला आहे. कारण पायास होणारा रक्‍तपुरवठा micro veins सूरळीत न झाल्‍यास पाय कापावा लागला असता. पायाचे हाड न जूळल्‍यास नंतर internal fixation  करावे लागू शकते. ही शस्‍ञक्रिया सर्व बारीक जखमा भरल्‍यानंतर करु असे सांगितले. परंतु अर्जदार दि.2.2.2009 ला डिसचार्ज घेतल्‍यानंतर परत गैरअर्जदार यांचेकडे आलेच नाहीत. यात ऑपरेशन नोटस व डॉक्‍टरांनी काय काय उपचार केले हे दिनांकासहीत रेकार्ड दाखल केलेले आहे. अर्जदार हे दि.4.12.2008 रोजी शरीक झाले हे पहिल्‍यांदा उपचार घेतल्‍यानंतर दूस-यादा शरीक झाले. यात  सूरुवातीस डॉक्‍टरांनी दि.15.11.2008 ला त्‍यांचे अपघात झाल्‍यावर तपासणी केली त्‍यात अर्जदाराच्‍या डाव्‍या पायास मार लागून तिन  फ्रॅक्‍चर झालेले आहे ही गोष्‍ट गैरअर्जदार नाकारत नाहीत. दोन आर्थोपेडीक्‍स व एक बर्न व प्‍लॉस्‍टीक सर्जन या तीघांच्‍या टिमने अर्जदारावर ऑपरेशन कले. अर्जदाराच्‍या भावाकडून संमतीपञ घेऊन तात्‍पूरत्‍या स्‍वरुपाची शस्‍ञक्रिया केली. यात
1.                Application of external fixator and fasciotomy for fracture Tibia  
                    Fibula Right with compartment syndrome.
2.                Close reduction and internal fixation with femur interlock nail
                    for fractured shaft femur (righ)
3.                Debridment of heel pad avulsion (right)
 
 
 
 
यासाठी  external fixation  वापरणे व पायाची शस्‍ञक्रिया केली. विशेष तज्ञ यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे पायावर जर सूज असेल तर फ्रॅक्‍चर झालेल्‍या पायाचे
ऑपरेशन करता येत नाही कारण मार लागलेल्‍या जागी पीडरीवरुन रक्‍तवाहिन्‍या गेलेल्‍या असतात त्‍यांचा रक्‍तपूरवठा पूर्णपणे बंद झालेला असतो. रक्‍तपूरवठा सूरळीत होण्‍यासाठी शस्‍ञक्रिया करुन फ्रॅक्‍चर झालेल्‍या हाडाचे external fixation  बसवीणे आवश्‍यक होते. ही शस्‍ञक्रिया केली व यासाठी बराच कालावधी लागतो म्‍हणून त्‍यांचे डिसचार्ज नोट प्रमाणे दि.29.11.2008 रोजीला सूटटी दिली. अर्जदार यांस एक फ्रॅक्‍चरची शस्‍ञक्रिया केली असे समजतात हे त्‍यांना माहीती नसल्‍याचे कारणावरुन किंवा मूददामहून सांगण्‍याचे हीशोबावरुन तक्रारीत असे म्‍हटले आहे. यानंतर  गैरअर्जदार हे दि.4.12.2008 रोजीला परत शरीक झाले. यांचेनंतर प्‍लॉस्‍टीक सर्जरी  पायाच्‍या टाचेची करण्‍यात आली. अर्जदारास सूचना दिली की पायाचे हाड न जूळण्‍यास नंतर internal fixation  करावे लागेल. त्‍यासाठी सर्व बारीक जखमा भरल्‍यानंतर करु पण अर्जदार परत आलेच नाहीत. दि.2.2.2009 रोजीला डिसचार्ज घेतल्‍यानंतर ते सरळ आपल्‍या गावी गेले व तेथे साधारणतः दि.22.2.2009 रोजीला पूसद येथे डॉ. मालपानी कडे दाखविले. त्‍यांनी शस्‍ञक्रिया करावी लागेल म्‍हणून नागपूर येथे जाण्‍याचा सल्‍ला दिला. अर्जदाराचे म्‍हणणे की, त्‍यांनी डॉक्‍. मालपानी यांनी गैरअर्जदार यांचकडे इलाज घेतल्‍याचे सांगितले. हे खरे असते तर डॉ. मालपानी यांनी अर्जदारास परत नांदेड येथे जाण्‍याचा सल्‍ला दिला असता. अर्जदारांना ही गोष्‍ट कथन न केल्‍यामूळे त्‍यांना नागपूरला पाठविण्‍याची शक्‍यता दिसून येते किंवा अर्जदार यांनी स्‍वतः हून नांदेड येथे येणे आवश्‍यक होते. गैरअर्जदार यांनी दि.2.2.2009 रोजीच्‍या आपॅरेशन नोटस मध्‍ये स्‍पष्‍ट असे सांगितले की, external fixation  मध्‍ये हाड जूळून येते काय हे पाहिल्‍यानंतर हाड न जूळल्‍यास परत ऑपरेशन करुन internal fixation  लावावे लागतील व यानंतर हाड जूळेल. किंवा हाड जुळण्‍यासाठी शस्‍ञक्रिया करावी लागेल. शासकीय रुग्‍णालय नागपूर यांचे अडमीशन व डिसचार्ज कार्ड व ऑपरेशन नोटस पाहिले असता व एक्‍सरे पाहिले असता तसेच अर्जदारानी अपघात झाल्‍या बरोबर जे नांदेड येथे एक्‍सरे काढलेले आहे त्‍यांचे अवलोकन केले असता त्‍यांचे पायास तिन फ्रॅक्‍चर झाल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. गैरअर्जदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे ती जी शस्‍ञक्रिया करणार होते तीच शस्‍ञक्रिया नागपूर येथे करण्‍यात आली व ती बरोबर ही आहे.कारण अर्जदार नागपूर ऐवजी नांदेड येथे आले असते तर तीच शस्‍ञकिया नांदेड येथे झाली असती. अर्जदार नांदेड येथे आले नसल्‍याकारणाने हे सर्व घडले. यात गैरअर्जदार यांनी
 
 
म्‍हटलेच आहे की, हाड न जूळल्‍यास शस्‍ञक्रिया करावीच लागेल. त्‍याप्रमाणे सर्व झालेले आहे. अर्जदार यांनी दाखल कलेले एक्‍सरे, रिपोर्ट पॅथालॉजी रिपोर्टस, दिलेले मेडीसीन हे सर्व कागदपञ नांदेड, पूसद व नागपूर येथील दाखल केलेले आहेत. या कागदपञाप्रमाणे नागपूरला बोन ग्राफट करुन जॉईट करण्‍यात आलेले आहेत. यात रिपोर्ट हे दोन बोन ग्राफट करुन ऑपरेशन केलेले आहे व ते योग्‍य झालेले आहे. बाकी तक्रारदाराने सूरुवातीस रु.3,00,000/- खर्च आला असे जे म्‍हटले आहे त्‍यांला कोणताही आधार नाही. त्‍यांनी मेडीसीनची बिले दाखल केलेली आहेत. त्‍यांचे एकूण बेरीज केली असता रु.20,000/- होतात व रु.50,000/- खर्च आलेला असताना रु.3,00,000/- खर्च, यात त्‍यांनी दोन महिने गैरअर्जदार यांचे हॉस्‍पीटला ट्रीटमेंट घेतलेली आहे. गैरअर्जदार यांनी दिलले उपचारासंबंधी मेडीसीन,ऑपरेशन नोटस, पॅथालॉजी रिपोर्ट इत्‍यादी पाहिले असता  त्‍यात निष्‍काळजीपणा केलेला आहे असे कूठेच आढळून आलेले नाही. आता अर्जदार ठिकही झालेले आहेत. सरकारी हॉस्‍पीटलचा लागणारा खर्च जर रु.50,000/- असेल तर खाजगी हॉस्‍पीटलला तेवढा किंवा जास्‍त खर्च होऊ शकतो. त्‍यात सूरुवातीस अर्जदाराने सूसज्‍ज हॉस्‍पीटल व तज्ञ डॉक्‍टर असे म्‍हटले आहे. म्‍हणजे एकंदरीत जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटया माहीतीच्‍या आधारावर केली आहे. डॉक्‍टरांनी दिलेले उपचारामध्‍ये कोणताही निष्‍काळजीपणा झालेला नाही किंवा ञूटी झाली हे अर्जदार सिध्‍द करु शकलेले नाहीत. उलट तक्रारदाराने सूरुवातीपासूनच आपली कहानी सत्‍य कथन करण्‍या ऐवजी सत्‍य लपवून बरेच मूददे खोटे सांगितलेले आहेत. म्‍हणून अर्जदार तक्रारीत म्‍हणतात त्‍याप्रमाणे खरे सांगितले असेल याविषयी शंका आहे.फ्रॅक्‍चर बूक नोटस व ते कसे करतात याविषयीचे काही प्रिटेंड मेटेरियल ते गैरअर्जदार यांनी या प्रकरणात दाखल केलेले आहे. शिवाय मा. राष्‍ट्रीय आयोगाचे निकालपञ
Ajay /Gupta Vs Dr. pradeep Aggarwal and ors.
 
Consumer Protection Act (68 of 1986) - S. 2(1)(g) -- Deficiency in rendering medical services – Proof – Complainant met with accident and got injuries on left upper arm of humerus bone – Whenever nerve is bruised, it takes about 4 to 6 months for nerve to regenerate – Complainant without waiting for same rushed from one doctor to another and chose to undergo re-exploration of injured arm – Gap of 4 cm between nerve ends had increased to 20 cm in matter of three months  -- This has happened after second operation and damage cannot be attributed to Doctor who did first surgery—Complainant also could not show that the treatment given was in any way contrary to established medical norms – No case of medical negligence made out. (paras 25,26,28)
 
 
 
 
तसेच  Medical Negligence : Proof     (Suprem Court) 
Ins. Malhotra   Vs. A. Kriplani (Dr.) and others.   हे दाखल केलेले आहेत.
याप्रमाणे काही सूचना दिलेल्‍या आहेत. प्रस्‍तूत केस मध्‍ये यांची आवश्‍यकता वाटत नाही.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
1.                 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात येतो.
 
2.                 पक्षकांरानी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                 निकालाच्‍या प्रति पक्षकारांना देण्‍यात याव्‍यात.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                                     श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                                                                  सदस्‍य
 
 
 
 
 
जयंत पारवेकर,
लघूलेखक.