(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून मोबाईल विकत घेतला. मोबाईल दुरुस्त करण्यास गैरअर्जदार यांनी नकार दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल दि.04.02.2010 रोजी विकत घेतला. मोबाईल व्यवस्थित चालत नसल्यामुळे त्यांनी दुरुस्तीसाठी गैरअर्जदार क्र.1 यांच्या दुकानात अनेक वेळेस चकरा मारल्या. गैरअर्जदार क्र.1 यांनी तो दुरुस्तीसाठी स्विकारला नाही म्हणून त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशनतर्फे त्यांना ग्राहक मंचामध्ये तक्रार करण्याबददल सांगण्यात आल्यामुळे त्यांनी मंचात तक्रार दाखल केली असून, गैरअर्जदार यांना मोबाईलची खरेदी रक्कम व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी मंचात जवाब दाखल केला नाही, म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जवाबानुसार अर्जदाराने मोबाईल खरेदी केल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने मोबाईल दुरुस्तीसाठी कोणाशी संपर्क केला व केव्हा केला, याबाबत तक्रारीत काहीही म्हटलेले नाही. अर्जदार मोबाईल दुरुस्तीसाठी त्यांच्या औरंगाबाद येथील सर्व्हिस सेंटरमध्ये आलेले नाहीत किंवा दुरुस्तीसाठी कोणतीही तक्रार नोंदविली नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांच्या दुकानातून मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल दि.04.02.2010 रोजी खरेदी केला. गैरअर्जदार क्र.3 हे या मोबाईल कंपनीचे उत्पादक असून, गैरअर्जदार क्र.2 हे त्यांचे औरंगाबाद येथील सर्व्हिस सेंटरचे काम पाहतात. गैरअर्जदार क्र.2 यांनी मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही, ही अर्जदाराची मूळ तक्रार आहे. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन त्यांनी मोबाईल गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला असल्याचे किंवा याबाबत पत्र व्यवहार केला असल्याचा कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार (3) त.क्र.362/10 क्र.2 यांनी सेवा देण्यास नकार दिला असे मानता येत नाही. अर्जदाराने दि.04.02.2010 रोजी मोबाईल विकत घेतला असून, त्यानंतर 3 – 4 महिन्यात मोबाईल दुरुस्तीबाबत गैरअर्जदार यांच्या विरुध्द मंचात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात लागलेला कालावधी पाहता, गैरअर्जदार क्र.2 यांनी वॉरंटीचा कालावधी न पाहता अर्जदाराचा मोबाईल दुरुस्ती करुन द्यावा. आदेश 1) गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराचा मोबाईल 30 दिवसात दुरुस्त करुन द्यावा. 2) खर्चाबददल आदेश नाही. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |