Maharashtra

Chandrapur

CC/11/62

Fakharuddhin Saifudhin Bohara - Complainant(s)

Versus

A.K.GHANDHI CARS,BRANCH MANAGER ,CHANDRAPUR - Opp.Party(s)

Adv. Rajesh Thakur

22 Jul 2011

ORDER


Arange sequence number in year 2009 confo-ch-mh@nic.in
Complaint Case No. CC/11/62
1. Fakharuddhin Saifudhin BoharaVishwakarma Chaowk BalagiWard ChandrapurM.S. ...........Appellant(s)

Versus.
1. A.K.GHANDHI CARS,BRANCH MANAGER ,CHANDRAPURNear Wadgaon police Station ChandrapurM.S.2. Branch Manager ,United Insurance,compaly ltd. Mul Raod ChandrpurChandrapurM.S. ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri Anil. N.Kamble ,PRESIDENTHONABLE MRS. Adv. Varsha Jamdar ,MEMBERHONORABLE Shri Sadik M. Zaweri ,Member
PRESENT :Adv. Rajesh Thakur, Advocate for Complainant
Adv Kirti Gadgil, Advocate for Opp.Party Adv. V.G.Pugliya, Advocate for Opp.Party

Dated : 22 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्‍यक्ष)

                  (पारीत दिनांक :22.07.2011)

 

            अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           अर्जदार यांनी, आपल्‍या खाजगी वापराकरीता टाटा इंडीका क्र.एम.एच.34 के 9080 ही गाडी विकत घेतलेली आहे.  अर्जदाराच्‍या गाडीचा दि.11.8.2010 रोजी मौजा येरखड, तह. धानोरा, जिल्‍हा गडचिरोली येथे अपघात झाला व सदरील अपघातामुळे अर्जदाराच्‍या गाडीचे बरेच नुकसान झाले.  सदर गाडी ही पोलीस स्‍टेशन, धानोरा येथे ठेवण्‍यात आली व त्‍यानंतर कोर्टातून सुप्रतनाम्‍यावर गाडी मिळाल्‍यानंतर दुरुस्‍ती करीता गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दिली.  सदर गाडी ही गैरअर्जदार क्र.2 यांच्‍याकडे विमाकृत असून गाडीची नुकसान भरपाई मिळविण्‍याकरीता अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 ला कळविले.

2.          अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदार क्र.1 कडे गाडी बद्दल विचारणा केली, परंतु प्रत्‍येक वेळी गैरअर्जदार क्र.1 यांनी गाडी तयार झाली नसल्‍याचे सांगीतले. अर्जदाराने, गैरअर्जदाराला गाडीची मागणी केली तेंव्‍हा गैरअर्जदाराने गाडी पूर्णपणे दुरुस्‍त झालेली नाही व गैरअर्जदार क्र.2 कडून क्‍लेम सुध्‍दा मिळालेला नाही असे कळविले. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्‍याकडे क्‍लेम संबंधी चौकशी केली असता, आम्‍ही तुम्‍हाला पञ पाठवून कळवू असे आश्‍वासन दिले. परंतू, गैरअर्जदार क्र.2 यांनी गाडीचे नुकसान भरपाई संबंधात चौकशी केंव्‍हा व कशी केली याची कल्‍पना कधीच दिलेली नाही.

 

3.          अर्जदार यांनी दि.8.3.11 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना रजिष्‍टर्ड पोष्‍टाने पञ पाठवून गाडीची मागणी केले, तेंव्‍हा गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या पञाला उत्‍तर देवून गाडी परत घेऊन जाण्‍यास सांगीतले.  गैरअर्जदार क्र.1 यानी दिलेल्‍या पञाचे उत्‍तर खोटे असून अमान्‍य आहे. तसेच, शिल्‍लक रक्‍कम जमा करुन 24 तासाच्‍या आंत गाडी न नेल्‍यास रुपये 250/- प्रती दिवस प्रमाणे पार्कींग चार्जेस द्यावे लागेल असे कळविले व तेंव्‍हा पासून गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराला गाडी घेऊन जाण्‍यास नियमित तगादा लावला.  अर्जदार दि.19.3.11 रोजी गाडी घेण्‍याकरीता गेला असता, रुपये 39,200/- जमा करुन गाडी घेऊन जावे असे कळविले.  अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कडे चौकशी केली असता, गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना दि.14.2.11 रोजी रुपये 91,800/- चा धनादेश दिल्‍याचे कळविले व अर्जदाराला सदर धनादेशाची झेरॉक्‍स प्रत देण्‍यात आली.  गैरअर्जदार क्र.2 यांनी रुपये 91,800/- ची आकारणी कशावरुन केली याबद्दल कुठलीच माहिती अर्जदाराला देण्‍यात आली नाही.  सदरील व्‍यवहार गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी परस्‍पर अर्जदाराच्‍या पश्‍चात करुन अर्जदाराला न्‍युनतापूर्ण सेवा दिलेली आहे.

 

4.          अर्जदाराला गाडीची आवश्‍यकता असल्‍यामुळे त्‍यांनी दि.22.3.11 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडे पैसे जमा केले तरी सुध्‍दा गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराला दि.23.3.11 रोजी गाडी परत केली.  अर्जदारानी गाडी परत घेऊन गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडे गाडीची दुरुस्‍ती योग्‍य न झाल्‍याचे कळविले, परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे गाडी दुरुस्‍त करुन देणार नाही, असे सांगीतले. तेंव्‍हा, अर्जदारानी गैरअर्जदार क्र.1 च्‍या जॉब स्‍याटीफॉकशन रिपोर्टमध्‍ये त्‍यांच्‍या कामाने संतुष्‍ट नसल्‍याचा शेरा मारुन दिला व लगेच चंद्रपूरचे प्रसिध्‍द इन्‍शुरन्‍स सर्व्‍हेअर श्री गौतम कोठारी यांच्‍याकडे गाडीची तपासणी करुन अहवाल घेतलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी रुपये 1,30,000/- वसूल करुनही अर्जदाराच्‍या गाडीची योग्‍य दुरुस्‍ती केली नाही व नादुरुस्‍त गाडी चालविल्‍यास अर्जदार व त्‍यांच्‍या परिवाराच्‍या जिवाला धोका असल्‍याची माहिती असूनही गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास गाडी घेण्‍यास बाध्‍य केले आहे, ही गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेली सेवेतील न्‍युनता आहे.  त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराकडून घेतलेली रक्‍कम रुपये 39,200/- अर्जदाराला परत करावे, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना गाडीच्‍या दुरुस्‍तीकरीता लागणारी रक्‍कम रुपये 40,000/- अर्जदाराला द्यावी. गैरअर्जदार क्र.1 यांनी गाडीच्‍या दुरुस्‍तीत विलंब केल्‍यामुळे अर्जदाराला रुपये 44,412/- देण्‍यास पाञ आहे, अर्जदारास झालेल्‍या आर्थिक, शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 1,00,000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी द्यावे.  गैरअर्जदार क्र.2 यांनी सेवेत न्‍युनता केल्‍यामुळै नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 25,000/- द्यावे, व तक्रार खर्च म्‍हणून रुपये 15,000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून देण्‍याचा आदेश द्यावे, अशी प्रार्थना केली आहे.

 

5.          अर्जदाराने तक्रारीचे कथना पृष्‍ठयर्थ नि.क्र.4 नुसार 16 दस्‍ताऐवज दाखल केले आहे.  अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्‍यात आला.  गैरअर्जदार क्र.1 व 2 हजर होऊन लेखी उत्‍तर दाखल केले.  गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.12 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.13 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले.

6.          गैरअर्जदार क्र.1 ने लेखी बयानात नमूद केले की, हे म्‍हणणे खरे आहे की, तक्रारकर्त्‍याची गाडी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे विमाकृत होती व गैरअर्जदार क्र.1 कडे दुरुस्‍तीकरीता आली होती. गाडीमध्‍ये आतील बिघाडाव्‍यतिरिक्‍त डेंटींग  व पेंटींगचे व इतर अन्‍य कामे करणे आवश्‍यक होते व त्‍यासाठी वेळ लागणे स्‍वाभाविक आहे, याची तक्रारकर्त्‍यांना जाणीव होती.  गाडी पूर्णपणे दुरुस्‍त झाल्‍यावरच तिची डिलीवरी दिली जावू शकते व तसेच, गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून गाडी दुरुस्‍त करण्‍याकरीता क्‍लेम सेटल झाल्‍याचे कळल्‍यावर व गैरअर्जदार क्र.2 कडून गाडी दुरुस्‍त करण्‍याचे आदेश प्राप्‍त झाल्‍यावरच गाडी दुरुस्‍ती केली जावू शकते याची तक्रारकर्त्‍यांना जाणीव आहे.  त्‍यामुळे, त्‍यांचे हे कथन की, गाडी वेळेवर जाणून-बुजून दुरुस्‍त केली नाही हे पूर्णतः खोटे असून निराधार आहे.

 

7.          अर्जदाराचे हे म्‍हणणे माहिती अभावी खोटे आहे की, तक्रारकर्ता यांना दि.2.3.11 व 8.3.11 रोजी नागपूर येथे घरगुती कामाकरीता जावे लागले व त्‍याकरीता रुपये 3210/- इतकी रक्‍कम गाडीच्‍या भाड्याच्‍या स्‍वरुपात द्यावी लागली.  तक्रारकर्त्‍यांनी आपल्‍या तक्रारीसोबत गाडीने गेल्‍याच्‍या दिक्षा ट्रॅव्‍हल्‍स या टुरीस्‍ट कंपनीच्‍या पावत्‍या लावलेल्‍या आहेत.  त्‍या पावत्‍यांमध्‍ये असे कुठेही नमूद नाही की ते नेमके कोणत्‍या ठिकाणी गेले होते.

 

8.          तक्रारकर्त्‍यांना गाडी तयार झाल्‍यावर उर्वरीत रकमेचा भरणा करुन गाडी घेवून जाण्‍यास सांगीतले.  परंतु, तक्रारकर्त्‍यांनी दि.23.3.11 ला रुपये 39,200/- चा भरणा चेकव्‍दारे केलेला आहे व त्‍याआधी दि.8.3.11 रोजी पाठविलेल्‍या पञामध्‍ये त्‍यांनी रकमेचा भरणा केल्‍याबद्दल किंवा करण्‍याची तयारी  असल्‍याबद्दल कुठलीही माहिती दिली नाही.  इतकेच नव्‍हेतर, रकमेचा भरणा न करुन देखील गैरअर्जदार क्र.1 यांना गाडी परत न दिल्‍यास केस टाकण्‍याची सुचना दिली.  अर्जदाराने दि.23.3.11 रोजी रकमेचा भरणा केला असल्‍याने ही रक्‍कम त्‍यांना मान्‍य होती. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दि.10.3.11 रोजी पञ पाठवून व गैरअर्जदाराचे कर्मचारी श्री सतीश यांनी बरेच वेळा तक्रारकर्त्‍याशी संपर्क साधून गाडी देण्‍याचा किंवा गाडी घेवून जाण्‍यासंबंधी सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, तक्रारकर्त्‍यांनी हेतुपुरस्‍पर गाडी घेतली नाही व गाडी नेण्‍यास विलंब केला. गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.16.3.11 व दि.18.3.11 रोजी रिमानंडर पाठविले.  तक्रारकर्त्‍याच्या स्‍वतःच्‍याच कथनावरुन सिध्‍द होते की, गैरअर्जदार क्र.1 यांनी बरेच वेळा गाडी नेण्‍याची विनंती केली.  गैरअर्जदार क्र.1 यांनी धनादेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांनी त्‍याची झेरॉक्‍स प्रत तक्रारकर्ता यांना ताबडतोब दि.14.2.2011 रोजी दिली.  गैरअर्जदार क्र.2 यांनी रकमेबाबत तक्रारकर्ता यांना माहिती का दिली नाही याचे उत्‍तर देण्‍याचे गैरअर्जदार क्र.1 यांना कुठलेही कारण नाही.

 

9.          तक्रारकर्त्‍यानी स्‍वतःहून श्री गौतम कोठारी यांना नियुक्‍त करुन गाडीचे सर्वेक्षण केले, ते सर्वेक्षण गैरअर्जदार क्र.1 यांना मान्‍य नाही.  तक्रारकर्त्‍यानी गाडीचे पूर्ण निरिक्षण करुनच गाडी गैरअर्जदार क्र.1 च्‍या गॅरेज मधून डिलीवरी घेतली, त्‍यामुळे सदरचे आरोप हे कायद्याच्‍या भाषेत  After Thought असल्‍याचे निदर्शनास येते.  हे म्‍हणणे खोटे आहे की, तक्रारकर्त्‍यांना कुठल्‍याही प्रकारे मानसिक, शारीरीक व आर्थिक ञास सहन करावा लागला आहे. तक्रारकर्त्‍यानी जाणून-बुजून गाडीची डिलीवरी घेतली नाही व ही तक्रार गैरअर्जदारांकडून पैस उकलण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून दाखल केल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. तक्रारकर्त्‍याची गाडी दुरुस्‍त करुन देखील गैरअर्जदार क्र.1 यांनी परत करण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तक्रारकर्त्‍याचा टॅक्‍सी भाडे देण्‍यास गैरअर्जदार जबाबदार नाहीत.  मानसिक ञासापोटी केलेले रुपये 1,00,000/- ची मागणी निराधार आहे व तसेच, तक्रारकर्त्‍यांना तक्रारीचा खर्च रुपये 15,000/- कोणत्‍या स्‍वरुपात लागला याबाबत खुलासा नाही.  त्‍यामुळे, प्रस्‍तूत तक्रार ही पूर्णपणे निराधार असून खारीज होण्‍यास पाञ आहे.

 

10.         गैरअर्जदार क्र.2 ने लेखी उत्‍तरात नमूद केले की, संबंधीत वाहनाची मालकी व अपघात संबंधी मजकूर कागदपञाच्‍या आधारे अविवादीत आहे.  तसेच, संबंधीत वाहन अपघातानंतर गैरअर्जदार क्र.1 कडे दुरुस्‍तीसाठी देण्‍यात आले हे म्‍हणणे सुध्‍दा कागदपञाचे आधारे अविवादीत आहे.  गैरअर्जदार क्र.2 वर लावलेला सेवेत न्‍युनता बाबतचा आरोप मुळातच खोटा व बेकायदेशीर असल्‍यामुळे नाकबूल आहे.

 

11.          गैरअर्जदार क्र.2 यांनी विशेष कथनात नमूद केले की, सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.2 यांनी सेवेत न्‍युनता केल्‍याचा कोणताही पुरावा दाखल केला नाही.  संबंधीत विमा कराराप्रमाणे विमाकृत वाहनाचा अपघातानंतर गैरअर्जदार क्र.2 ने आपल्‍या सर्व्‍हेअर मार्फत वाहनाचे निरिक्षण केले व रिपोर्ट तयार केला. तसेच, अर्जदाराच्‍या मर्जीनुसार संबंधीत वाहन गैरअर्जदार क्र.1 कडे दुरुस्‍तीसाठी पाठविले व त्‍यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने सादर केलेल्‍या बिलाची सर्व्‍हेअर मार्फत चौकशी करुन अर्जदारास विश्‍वासात घेऊन दुरुस्‍तीचा बिल मंजूर करुन त्‍याचे भुगतान गैरअर्जदार क्र.1 ला केलेले आहेत.  याबाबत, अर्जदाराने त्‍यावेळी कोणतीही उजर केली नाही व दुरुस्‍ती करण्‍यात आलेले वाहनाची डिलीवरी संपूर्ण समाधानानंतर घेतली. जर काही वाहन दुरुस्‍ती संबंधी वाद  असेल तो अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 मधील आहे, त्‍याच्‍याशी गैरअर्जदार क्र.2 चा मुळीच संबंध नाही. करीता, अर्जदाराची सदर तक्रार गैरअर्जदार क्र.2 च्‍या विरुध्‍द बेकायदेशीर व अदखलपाञ आहे म्‍हणून तक्रार गैरअर्जदार क्र.2 च्‍या विरुध्‍द खर्चासह खारीज करण्‍यात यावी.

 

12.         अर्जदाराने नि.16 नुसार शपथपञ दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी उत्‍तर हेच शपथपञ म्‍हणून समजण्‍यात यावे, अशी पुरसीस नि.17 नुसार दाखल केली. गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखी बयानातील मजकूर हाच गैरअर्जदार क्र.2 चा शपथपञ समजण्‍यात यावा, अशी पुरसीस नि.13 नुसार दाखल केली. गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.10 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज, शपथपञ व गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल केलेला लेखी युक्‍तीवाद, तसेच उभय पक्षांच्‍या वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

                        @@  कारणे व निष्‍कर्ष @@

 

13.         अर्जदाराने सदर तक्रारीत, गै.अ.क्र.1 व 2 यांनी सेवा देण्‍यात न्‍युनता केली असल्‍याने दाखल केली आहे. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 कडून टाटा इंडिका एम.एच.34-के 9080 ही गाडी विकत घेतली होती, त्‍या गाडीचा विमा काढला.  सदर गाडी विमाकृत असतांना मौजा-येरखड, तह.धानोरा, जि. गडचिरोली येथे दि.11.8.10 रोजी अपघात झाला. त्‍या अपघातात गाडीचे नुकसान झाले, सदर गाडी ही विमाकृत असल्‍यामुळे दुरुस्‍तीचा खर्च गै.अ.क्र.2 कडून मिळण्‍याकरीता क्‍लेम फार्म पाठविला.  गै.अ.क्र.2 ने, सर्व्‍हेअर नियुक्‍त करुन वाहनाचा सर्व्‍हे करुन निरिक्षण अहवाल सादर केला.  गै.अ.क्र.1 कडे अपघातानंतर वाहन दुरुस्‍तीकरीता देण्‍यात आले.  परंतु, गै.अ.क्र.1 यांनी, वाहन दुरुस्‍तीकरीता विलंब लावल्‍यामुळे अर्जदारास खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला. तसेच, गै.अ.क्र.1 यांनी वाहन योग्‍य प्रकारे दुरुस्‍त केले नाही.  विमा कंपनी कडून रुपये 91,800/- दि.14.2.11 ला स्विकारल्‍या नंतरही, अर्जदाराकडून रुपये 39,200/- घेतले.  गै.अ.क्र.1 व 2 यांनी सेवेत न्‍युनता केल्‍यामुळे, अर्जदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन गै.अ.क्र.1 कडून रुपये 39,200/- परत करण्‍याची मागणी केलेली आहे.  अर्जदाराने ही केलेली मागणी संयुक्‍तीक नाही.  वास्‍तविक, गै.अ.क्र.1 यांनी वाहन दुरुस्‍त करुन दिले व वाहन दुरुस्‍तीकरीता लागलेले साहित्‍य त्‍याने लावलेले आहेत. त्‍यामुळे, ती रक्‍कम गै.अ.क्र. 1 कडून परत मिळण्‍याची केलेली मागणी मंजूर करण्‍यास पाञ नाही. परंतु, वाहन योग्‍य प्रकारे दुरुस्‍त करुन दिले नाही. त्‍यामुळे काही रक्‍कम अर्जदारास देण्‍यास जबाबदार आहे.

 

14.         अर्जदाराने, गै.अ.क्र.1 कडून वाहन दि.23.3.11 ला रुपये 39,200/- दिल्‍यानंतर ताबा घेतला, त्‍यावेळीच सर्व्‍हेअर गौतम कोठारी यांचेकडून त्‍याचदिवशी दुपारी 1-30 वाजता निरिक्षण केले असता, वाहन दुरुस्‍तीमध्‍ये दोष आढळून आले.  अर्जदाराने, श्री गौतम कोठारी, Insurance Surveyor & Laws Assessor यांचेकडून निरिक्षण केले असता, 35 ते 40 हजार रुपयाचे खर्च अपेक्षीत असल्‍याबाबत रिपोर्ट दिला.  अर्जदाराने, गौतम कोठारी यांचा रिपोर्ट अ-13 वर दाखल केला.  गै.अ.क्र.1 यांनी टॅक्‍स इनव्‍हाईस रुपये 1,30,069/- अ-10 नुसार दिले असूनही त्‍याप्रमाणे दुरुस्‍ती योग्‍यप्रकारे केली नाही, ही बाब सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्टवरुन स्‍पष्‍ट होतो.  वास्‍तविक, विमा कंपनीने गै.अ.क्र.1 ला दि.14.2.11 ला रुपये 91,800/- गै.अ.क्र.2 कडून मिळाल्‍याचे मान्‍य केले आणि अर्जदाराकडून रुपये 39,200/- दि.23.3.11 ला वाहनाचा ताबा देण्‍याचे पूर्वी मिळाल्‍याचे मान्‍य केले.  अशास्थितीत, अर्जदाराकडून, गै.अ.क्र.1 यांनी टॅक्‍स इनव्‍हाईसच्‍या रकमेपेक्षा रुपये 931/-  जास्‍त रक्‍कम वसूल केले. (91,800/- + 39,200/-  = 1,31,000/- 1,30,069/-  = 931/-) ही गै.अ.क्र.1 ची अनुचीत व्‍यापार पध्‍दत असून, सेवेतील न्‍युनता असल्‍याची बाब सिध्‍द होतो.  एकंदरीत, गै.अ.क्र.1 यांनी वाहन दुरुस्‍तीकरीता रक्‍कम पूर्ण मिळूनही योग्‍यप्रकारे वाहन दुरुस्‍त केले नाही, त्‍यामुळे वाहनातील दरवाजा, बोनेट मध्‍ये दोष असून गाडी पेंटींग एकाच कलरमध्‍ये केली नसल्‍याचे, गौतम कोठारी यांनी आपल्‍या रिपोर्टमध्‍ये नमूद केले.  यावरुन, गै.अ.क्र.1 यांनी योग्‍य प्रकारे गाडी दुरुस्‍त करुन दिली नाही, ही त्‍याचे सेवेतील न्‍युनता असल्‍याचा निष्‍कर्ष निघतो.

 

15.         गै.अ.क्र.2 यांनी, विमाकृत वाहनाचा विमा देण्‍यास अक्षम्‍य विलंब केला.  गै.अ.क्र.2 यांनी कुठल्‍याही सर्व्‍हे रिपोर्ट सादर केलेला नाही व तो सर्व्‍हे रिपोर्ट केंव्‍हा प्राप्‍त झाला हे सुध्‍दा लेखी उत्‍तरात नमूद केले नाही. वाहन दुरुस्‍तीकरीता किती खर्च आहे याचा काहीही उल्‍लेख केलेला नाही, तसेच गै.अ.क्र.1 ला किती रुपये केंव्‍हा दिले हे सुध्‍दा आपले लेखी उत्‍तरात नमूद केलेले नाही. यावरुन, गै.अ.क्र.2 मोघमपणे आपले कथन केलेले आहे. गै.अ.क्र.2 याने वाहनाचा क्‍लेम देण्‍यास विलंब केल्‍यामुळे व त्‍यांचेकडून होकार मिळेपर्यंत गै.अ.क्र.2 यांनी वाहन दुरुस्‍त केले नाही, असे त्‍याचे लेखी बयानावरुन दिसून येतो.  अशास्थितीत, गै.अ.क्र.2 च्‍या ञृटीयुक्‍त सेवेमुळेच अर्जदारास वाहन मिळण्‍यास विलंब झाला.  गै.अ.क्र.2 यांनी आपले लेखी उत्‍तरात असे कथन केले की, दुरुस्‍ती करण्‍याचे काम हे त्‍याचे नाही, तसेच दुरुस्‍ती योग्‍य की अयोग्‍य झाले याचेशी त्‍याचा संबंध नाही. ही बाब, जरी उचीत असली तरी गै.अ.क्र.2 यांनी वाहनाचा क्‍लेम निकाली काढण्‍यास विलंब केला, त्‍यामुळेच गै.अ.क्र.1 यांनी वाहन दुरुस्‍तीस विलंब केला, असाच निष्‍कर्ष निघतो.  गै.अ.क्र.2 ने, क्‍लेमची रक्‍कम गै.अ.क्र.1 ला परस्‍पर दिले, त्‍याची कल्‍पना अर्जदारास दिली नाही, यात गैरअर्जदाराचे एकमेकांशी संगनमत असल्‍याचे स्‍पष्‍ट होतो.

 

16.         अर्जदाराने, गै.अ.क्र.2 कडून कुठलेही मागणी केली नाही, परंतु, गै.अ.क्र.1 यांनी सेवा देण्‍यात न्‍युनता केली, त्‍यामुळे अर्जदारास वाहन मिळण्‍यास विलंब झाला असल्‍याने अर्जदारास तक्रार दाखल करावी लागली. त्‍यामुळे, अर्जदारास तक्रारीचा खर्च आणि झालेल्‍या मानसिक, शारीरीक ञासापोटी नुकसान भरपाई देण्‍यास गै.अ.क्र.2 जबाबदार आहे.  गै.अ.क्र.2 यांनी, विमा दावा लवकरात-लवकर निकाली काढला असता तर गै.अ.क्र.1 कडून वाहन अर्जदारास लवकर मिळाले असते.  परंतु, गै.अ.क्र.2 यांनी अपघात दि.11.8.10 पासून विमा क्‍लेमची रक्‍कम देईपर्यंत म्‍हणजेच 14.2.11 पर्यंत विलंब केला.  वास्‍तविक, मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांनी एका प्रकरणात आपले मत दिलेले आहे, त्‍यात विमा कंपनीला क्‍लेम निकाली काढण्‍याकरीता सर्व्‍हेअरचा रिपोर्ट मिळाल्‍यानंतर दोन महिन्‍याचा कालावधी पुरेसा आहे, असेच मत दिले आहे.  त्‍यापेक्षा जास्‍ता कालावधी लावल्‍यास सेवेतील न्‍युनता असल्‍याच्‍या सदरात मोडतो असे मत दिले आहे. त्‍यातील महत्‍वाचा भाग खालील प्रमाणे.

 

(ii)        Consumer Protection Act.1986 – Sections 12 & 17 – Insurance claim – Compensation claim for delay in settlement of insurance claim – Incident of fire took place on 25-5-1991 – 1st Surveyor submitted  report on 6-8-1991 and second Surveyor gave report on 24-6-1993 – Report of 2nd surveyor was complete, comprehensive and recommended settlement of claim for full policy amount of Rs.6 lacs – amount was paid in two installments, 1st 3 lacs on 20-4-1994 & balance Rs. 2.73 lacs on 2-5-1994 – If was deficiency in service – Respondent Insurance Company directed to pay interest at 12 % on the amount from after two months of receipt of Surveyor’s report.

 

            Sushanta Kumar Roy-Vs.- M/s. Oriental Insurance Co. Ltd.

                                    2003 (2) CPR 116 (NC)

 

            वरील न्‍यायनिवाडयात दिलेल्‍या मता नुसार प्रस्‍तूत प्रकरणात ही गै.अ.ने विमा दावा निकाली काढण्‍यास विलंब करुन सेवा देण्‍यात न्‍युनता केली, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे.

17.         गै.अ.क्र.1 ने आपले लेखी उत्‍तरात असे कथन केले आहे की, विमा कंपनी कडून गाडी दुरुस्‍त करण्‍याकरीता क्‍लेम सेटल झाल्‍याचे कळल्‍यावर गाडी दुरुस्‍त करण्‍याचे आदेश त्‍याचेकडून प्राप्‍त झाल्‍यावर दुरुस्‍त करण्‍यास सुरुवात केली.  गाडी दुरुस्‍त झाल्‍यानंतर 10.3.11 ला पञ पाठवून गाडी नेण्‍यास कळविले. त्‍यानंतर दि.16.3.11 व 18.3.11 ला अर्जदारास रिमाइन्‍डर पाठवून गाडी नेण्‍यास कळविले, असे लेखी उत्‍तरात म्‍हटले आहे.  परंतु, अर्जदारास वरील तारखांना रिमाइन्‍डर दिल्‍याची प्रत रेकॉर्डवर दाखल केलेली नाही.  यामुळे, गै.अ.क्र.1 चे म्‍हणणे संयुक्‍तीक नाही.  अर्जदाराने दि.23.3.11 ला वाहनाचा ताबा घेते वेळीच गै.अ.क्र.1 कडे जॉब स्‍याटीफॅक्‍शन रिपोर्टवर असंतुष्‍ट असल्‍याचा शेरा मारुन दिला, असे अर्जदाराने आपले तक्रारीत नमूद केले आहे.  परंतु, गै.अ.क्र.1 नी त्‍याबद्दल लेखी उत्‍तरात काहीच कथन केले नाही. तसेच, जॉब कार्ड रेकॉर्डवर दाखल केला नाही, त्‍यामुळे अर्जदाराने असंतुष्‍ट असल्‍याचा शेरा जॉबकार्ड वर मारला ही बाब गौतम कोठारीच्‍या निरिक्षण रिपोर्टवरुनही सिध्‍द होतो.  गै.अ.क्र.1 यांनी योग्‍यप्रकारे वाहन दुरुस्‍त करुन दिले नाही, त्‍यामुळे पुन्‍हा वाहन दुरुस्‍तीकरीता खर्च असल्‍याने रुपये 39,200/- पैकी काही रक्‍कम अर्जदारास देण्‍यास जबाबदार आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे. 

 

18.         अर्जदाराने, तक्रारीत गै.अ.क्र.2 कडून कुठलीही मागणी केलेली नाही.  परंतु, गै.अ.क्र.1 कडून गाडी दुरुस्‍तीस लागलेल्‍या विलंबामुळे खाजगी गाडी करुन सुरत व अहमदाबाद येथे जावे लागले असल्‍याने, तसेच नागपुरला जावे लागले असल्‍याने, आलेला खर्च रुपये 44,412/- ची मागणी केलेली आहे. त्‍याकरीता, दिक्षा ट्रॅव्‍हल्‍स व टुरिस्‍टचे बील अ-14, 15, व 16 वर दाखल केले आहे.  सदर बीलचे अवलोकन केले असता, कुठल्‍या ठिकाणावरुन कुठपर्यंत गेले याचा काहीही उल्‍लेख केलेला नाही.  सदर बिले हे बनावटी असल्‍याचा आक्षेप गै.अ.क्र.1 ने आपले लेखी उत्‍तरात घेतलेला आहे, तो संयुक्‍तीक आहे.  त्‍यामुळे, अर्जदाराची ही मागणी मंजूर करण्‍यास पाञ नाही.

 

19.         एकंदरीत, वरील विवेचनावरुन गै.अ.क्र.1 व 2 यांनी सेवा देण्‍यात न्‍युनता केली या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍याने तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                        // अंतिम आदेश //

(1)   गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास वाहन दुरुस्‍तीकरीता येणा-या खर्चाकरीता रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(2)   गैरअर्जदार क्र.2 ने, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी व तक्रार खर्चापोटी सर्व मिळून रुपये 5000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

      (3)   अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.


[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member