Maharashtra

Nagpur

CC/535/2020

MR. KISHOR VISHNU ADMANE - Complainant(s)

Versus

A) SHRI. DILIP SHANKARRAO GADHAVE, B) SMT. PRATIBHADEVI MADHUKARRAO SHELAR, THROUGH THEIR POWER OF A - Opp.Party(s)

ADV. B.C. PAL

11 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/535/2020
( Date of Filing : 10 Dec 2020 )
 
1. MR. KISHOR VISHNU ADMANE
R/O. PLOT NO.40, BARDE LAYOUT, BORGAON, GOREWADA ROAD, NAGPUR-440013
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. A) SHRI. DILIP SHANKARRAO GADHAVE, B) SMT. PRATIBHADEVI MADHUKARRAO SHELAR, THROUGH THEIR POWER OF ATTORNEY HOLDER SHRI. SANJAY MAHADEORAO GHATURLE
R/O. PLOT NO.5, JOGI NAGAR, PARVATI NAGAR, RING ROAD, SHATABDI SQUARE, NAGPUR-440027
NAGPUR
MAHARASHTRA
2. VIDHARBHA NAGAR VIKAS GHRIHA NIRMAN SAMASYA NIVRAN SANSTHA NAGPUR, THROUGH SECRETARY DNYANESHWAR RAMBHAUJI KHANTE
R/O. SNEHA NAGAR, NAGPUR, PLOT NO.30, OLD SNEHA NAGAR, WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. SOU. SUREKHA MAHADEORAO WANZARI
R/O. PLOT NO.84, SARWATRA NAGAR, WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
4. NAGPUR IMPROVEMENT TURST THORUGH ITS CHAIRMAN
OFF.AT, KINGSWAY, SADAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
5. THE NAGPUR MUNICIPAL CORPORATION, THROUGH COMMISSIONER
CIVIL LINES, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
6. THE CITY SURVEY OFFICER-3, THROUGH AUTHORIZED OFFICER
ADMINISTRATIVE BUILDING-I, CIVIL LINES, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. B.C. PAL, Advocate for the Complainant 1
 
Dated : 11 Apr 2022
Final Order / Judgement

मा.अध्‍यक्षश्री संजय वा. पाटीलयांच्या आदेशान्वये-

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ते यांनी वि.प. संजय महादेवराव घाटूर्ले वि.प.क्रं.1. ए-दिलीप शंकरराव गाढवे व 1.बी- श्रीमती प्रतिभादेवी मधूकरराव शेलार, यांचे आममुख्त्यार यांचे कडुन मौजा-सोमलवाडा, ख.क्रं. 108/2 व 5, सिटी सव्हे क्रं.563, शिट क्रं.711/88, एन.आय.टी. व एन.एम.सी.च्या हद्दीत नागपूर विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर. यांचे कडुन दोन भुखंड क्रमांक 27 व 28 खरेदी केले होते. वि.प.क्रं. 1-ए ने आममुख्त्यार पत्र संजय महादेवराव घाटूर्ले यांचे नावे यांनी दिनांक 13.8.2008 रोजी उप‍-निबंधक, नागपूर-2, यांचेकडे नोंदणी क्रमांक-01560-2008 अन्वये उपरोक्त भुखंड क्रं.27 चे अधिकारपत्र दिले होते. तसेच 1-बी, श्रीमती प्रतिभादेवी मधूकरराव शेलार, यांनी दिनांक 22.4.2010 रोजी आममुख्त्यारपत्र नोंदणीकृत क्रमांक -1970, सन 2010 अन्वये भुखंड क्रं.28 चे  अधिकारपत्र करुन दिले होते.
  3. तक्रारदाराने वि.प.क्रं. 1- ए व बी यांचे आममुख्त्यार संजय घाटूर्ले यांचेकडुन भुखंड क्रं.27 ज्याचे एकुण क्षेत्रफळ 167.22 चौ.मि. (1800 चौ. फुट) व भुखंड क्रं.28, ज्याचे एकुण क्षेत्रफळ 167.22 चौ.मि. (1800 चौ.फुट), असे दोन्ही भुखंड मिळून 334.44 चौ.मि. (3600 चौ.फुट), विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर कडुन विक्रीपत्र दिनांक 22.11.2012 रोजी नोंदणीकृत क्रं.5791-2012 उपनिबंधक नागपूर-5 यांचेकडे एकुण रक्कम रुपये 16,00,000/- देऊन स्वतःचे नावे नोंदणीकृत करुन घेतले. याविक्रीपत्र नोंदणीकरिता श्री उमाशंकर देवनारायण पांडे यांनी सहमतीदार म्हणुन स्वाक्षरी केलेली आहे. त्यानंतर तक्रारदाराने सदरच्या भुखंडावर स्वतःचे नाव नोंदविण्‍याकरिता वि.प.क्रं.5 कडे अर्ज केला  व नागपूर महानगरपालीका यांचे कडे सन 2013-14 मध्‍ये रुपये 1,08,158/- धनादेशाव्दारे करापोटी भरले व वि.प.क्रं.5 यांनी त्याबाबत पावती तक्रारदाराला दिली. त्यानंतर तक्रारदाराने  नागपूर सुधार प्रन्यास (वि.प.क्रं.4) यांचेकडे सदरचे भुखंड क्रं.27 व 28 चे  नियमितीकरण करण्‍याकरिता गेले असता त्यांना दिनांक 29.7.2002 रोजी रुपये 1,000/- भरले त्याबाबत पावती देण्‍यात आली.
  4. वि.प.क्रं.5 यांनी दिनांक 18.3.2019 चे पत्रान्वये तक्रारदाराला कळविले की, वि.प.क्रं.5 ने भुखंड क्रं.27 व 28 व 29, ख.क्रं.108/5 , एकुण क्षेत्रफळ 0.81 हेक्टर आर, महसूल रुपये 2.25, वर्ग-2, मौजा-सोमलवाडा,प.ह.नं.44, ता.जि.नागपूर, या जागेचे वि.प.क्रं.3 - सौ सुरेखा महादेवराव वंजारी चे नावे आधीच नोंदविले आहे. हे कळल्यानंतर तक्रारदाराने माहिती अधिकाराअंतर्गत वि.प.क्रं.5 यांचे कडे वि.प.क्रं.3 चे मालकीहक्काबाबतच्या दस्तऐवजांची मागणी केली असता त्यात तक्रारदाराला असे दिसुन आले की, सदरचे भुखंड हे वि.प.क्रं.3- सौ सुरेखा महादेवराव वंजारी च्या नावे त्यांची आई स्व. जनाबाई रामभाऊ खंते यांनी दिनांक 7.2.2000 रोजी मृत्यपत्राव्दारे बक्षीस म्हणुन देण्‍यात आले होते. वि.प.क्रं.5 ने त्यानुसार वि.प.क्रं.3 चे नाव अभिलेखावर नोंदविले होते. त्याप्रमाणे वि.प.क्रं.4 यांनी वि.प.क्रं.3 यांचे नावे नियमितीकरणाबाबतचे पत्र देण्‍यात आले होते.
  5. तक्रारकर्ता पूढे नमुद करतात की, सदरची संपूर्ण जागा ही वि.प.क्रं.3 यांची आई स्व. जनाबाई रामभाऊ खंते यांचेकडे वारसाहक्काने प्राप्त झाली असुन ती मालमत्ता त्यांच्या मुले व मुली यांचेमधे वाटणी केलेली होती. जनाबाई रामभाऊ खंते यांनी भुखंड क्रं. 27,28, व 29 सदर मालमत्तेची वाटणी झाल्यानंतर वि.प.कं.3 यांना देण्‍याबाबत मृत्यपत्र केले. सदरची भुखंडे आधीच विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर या संस्थेअंतर्गत येतात. या संस्थने भुखंड क्रं.27 चे नोंदणीकृत विक्रीपत्र 1-ए, दिलीप शंकरराव गाढवे व भुखंड क्रं.28 चे नोंदणीकृत विक्रीपत्र 1-बी, प्रतिभादेवी मधूकरराव शेलार यांचे नावे अगोदरच नोंदविले होते. या 1-ए, व   1-बी यांचेकडुन संजय घाटूले यांचेकडुन आममुख्‍्त्यारपत्र घेऊन तक्रारदाराचे नावे भुखंड क्रं.27 व 28 रक्कम 16,00,000/- नोंदणीकृत विक्रीपत्र दिनांक 16.12.2012 रोजी नोंदवून दिले होते.
  6. यावरुन असे दिसून येते की, विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर. यांचे सचिव ज्ञानेश्‍वर रामभाऊ खंते (स्व. जनाबाई रामभाऊ खंते यांचे पुत्र) यांना सदरची मालमत्ता वारसा हक्कानुसार ज्ञानेश्‍वर रामभाऊजी खंते यास भुखंड क्र.1,2,36,37,38,39,40,42, आराजी  30x50=1500 चौ.फुट. नोंदणीकृत दस्त क्र.3041, लिफाफा दिनांक 28.11.1986 रोजी दस्ताचा प्रकार आममुख्‍त्यापत्र तयार करुन दिले होते. या दस्ताआधारे वादी क्रं.2 यांनी नोंदणीकृत दस्त क्रं. 397 ,दिनांक 30.11.1992 रोजीच्य दस्तामधे नमुद लिहून देणार विदर्भ नगर विकास गृहनिर्माण सहकारी संस्था नागपूर. नोंदणी क्रमांक NGP/632/83, अध्‍यक्ष - श्री विजय नामदेवराव मुरकुटे यास आराजी 40 आर ( एक एकर ) जमिनीचे विक्रीपत्र करुन दिले होते व संस्थेचे सचिव पद स्वतःचे नावे नोंदविले होते.
  7. या जागेवर विदर्भ नगर विकास गृहनिर्माण सहकारी संस्था नागपूर. संस्थेने ले-आऊट पाडुन व भुखंड पाडुन त्यांची विक्री केली होती. स्व. जनाबाई रामभाऊ खंते हिने आपले मृत्युपत्रात चार मुलां मुलींमध्‍ये श्री रामभाऊ खंते यांचेकडुन वारसाहक्काव्दारे मिळालेल्या जागेची वाटणी केल्यानंतर तिचा मुलगा वि.प.क्रं.2, ज्ञानेश्‍वर रामभाऊ खंते यांनी ले-आऊट पाडुन विक्री केलेल्या विदर्भ नगर विकास गृहनिर्माण सहकारी संस्था नागपूर. याच लेआऊट मधील तीन भुखंड तिची मुलगी वि.प.क्रं.3 सुरेखा महादेवराव वंजारी हिचे नावे लिहून दिलेले आहेत.  ही वि.प.क्रं.1 ,2 व 3 यांचे सेवेतील त्रुटी असल्याचे दिसून येते. तसेच वि.प.क्रं.1 ,2 व 3  यांनी तक्रारदाराकडुन रुपये 16,00,000/- एवढी मोठी भरघोस रक्कम घेऊन त्यांचे नावे केवळ विक्रीपत्राची नोंदणी करुन दिली परंतु जागेचा प्रत्यक्ष ताबा दिला नाही ही वर्तणून तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते. तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि.क्रं. 2 व 3 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवंलब करुन सेवेत त्रुटी केलेली आहे. वि.प.क्रं.2 यांनी तक्रारदाराचे नावे खसरा क्रमांकाबाबत दुरुस्तीखत करुन द्यावे व वि.प.क्रं.3 यांनी तक्रारदाराला भुखंड क्रं.27 व 28 चा प्रत्यक्ष ताबा द्यावा. तसेच वि.प.क्रं.4 यांनी तक्रारदाराचे नावे सदरचे भुखंडांचे नियमितीकरण करुन द्यावे व वि.प.क्रं.5 यांनी त्यांचे नाव महानगर पालीकेलेच्या अभिलेखावर चढवून त्यांनी सदरचे भुखंडापोटी आधी भरलेला कर 1,08,159/- समायोजीत करावा असे आदेश करण्‍यात यावे व वि.प.क्रं.6 यांनी मालमत्ता पत्रकात तक्रारदाराचे नाव नोंदवुन देण्‍याबाबत आदेशीत करावे. वि.प.1 ते 3 यांना वरील आदेश कायदेशिररित्या अमंलात आणणे शक्य नसल्याने त्यांनी आजचे शासकीय मुद्रदांक शुल्काप्रमाणे येणारी रक्कम तक्रारदारास व्याजसह परत करावी तसेच तकारदाराला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 3,00,000/- भरपाई मिळावी अशी विंनती केलेली आहे.
  8. तक्रार दाखल करुन वि.प.क्रं.1 ते 6 यांना नोटीस काढण्‍यात आली. परंतु वि.प.क्रं.2 हे नोटीस मिळुनही तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन तक्रार त्यांचे विरुध्‍द दिनांक 5.1.2021 रोजी सदरची तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. तसेच विरुध्‍द पक्ष क्रं. 5 नागपूर महानगर पालीका हे सुध्‍दा नोटीस मिळुनही ते तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 11.4.2022 रोजी पारित करण्‍यात आला. वि.प.क्रं.1-ए, 1-बी, 3, 4, 6, हे तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपले लेखी उत्तर अभिलेखावर दाखल केले आहे.
  9. वि.प.क्रं. 1-ए व 1-बी तर्फे संजय महादेवराव घाटुर्ले आपल्या उत्तरात नमुद करतात की, तकारदाराचे म्हणणे खरे आहे की, त्यांचे नावे 1-ए यांनी भुखंड क्रमांक 27 चे मालक दिलीप शंकरराव गाढवे व 1-बी  भुखंड क्रं. 28 चे मालक श्रीमती प्रतिभादेवी मधुकरराव शेलार यांनी स्वतंत्र नोंदणीकृत आममुखत्यारपत्र श्री संजय घाटुर्ले यांचे नावे केले असुन त्यांनी तक्रारदार-किशोर विष्‍णू आदमने यांचे नावे ठरल्याप्रमाणे मोबदला रक्कम रुपये 16,00,000/- दिनांक 22.11.2012 रोजी स्वीकारुन उपरोक्त भुखंड क्रं.27 व 28 चे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारदाराचे नावे नोंदवुन दिले होते. वि.प.क्रं.2 ज्ञानेश्‍वर रामभाऊजी खंते, सचिव- विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर, यांनी वि.प.क्रं.1-ए व 1-बी यांना विक्रीपत्र नोंदणीकृत करण्‍याआधी प्रत्यक्ष भुखंडाची जागा दाखविली व तीच जागा संजय घाटुर्ले यांना आममुखत्यार पत्र नोंदणी करण्‍याआधी दाखविली होती. तसेच सदरची जागा शासकीय अभिलेखावर वि.प.क्रं.2 चे नावावर मूळ जमिनमालक (Absolute original owner) म्हणुन नोंदविली आहे. त्यामूळेच उपनिबंधकाने तक्रारदाराचे नावे सदर जमिनीचे विक्रीपत्र केलेले आहे.
  10. वि.प.क्रं.1-ए व 1-बी यांनी वि.प.क्रं.2, विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर,यांचे कडुन सदरचे भुखंड क्रं. 27 व 28 नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे विकत घेतले होते. त्याकरिता संजय महादेवराव घाटुर्ले यांचा त्यात काहीही सहभाग नाही ते केवळ 1-ए व 1-बी तर्फे नियुक्त केलेले नोंदणीकृत आममुखत्यार होते. कारण वि.प.क्रं. 1-ए व 1-बी हे नोदंणी. कार्यालयात येण्‍यास असमर्थ होते. तसेच सदरच्या भुखंडाची रक्कम स्वि‍कारुन ती 1-ए व 1-बी यांना परत करावयाची होती. त्यामूळे तक्रारकर्ता हा वि.प.क्रं. 1-ए व 1-बी यांचे आममुखत्यार संजय घाटुर्ले यांचे ग्राहक नाही.
  11. वि.प.क्रं.3 , आपल्या लेखी उत्तरात नमुद करतात की, तक्रारकर्ता किशोर आदमने यांनी वि.प.क्रं.1-ए व 1-बी यांनी आममुखत्यार श्री संजय महादेवराव घाटुर्ले यांचे कडुन मौजा-सोमलवाडा, ख.क्रं. 108/2 व 5, सिटी सव्हे क्रं.563,शिट क्रं.711/88, एनआयटी व एनएमसीच्या हद्दीत नागपूर विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर. यांचे कडुन दोन भुखंड क्रमांक 27 व 28 खरेदी केले होते. परंतु प्रत्यक्षात या भुखंडांच्या व्यवहाराशी वि.प.क्रं.3 चा काहीही संबंध नाही. वि.प.क्रं.3 पूढे नमुद करतात की, त्यांचे नावे असलेले भुखंड क्रं. 27,28,29 मौजा-सोमलवाडा, ख.क्रं. 108/5, येथे असुन ते विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर, याचे लगत येतात. सदरची ही संस्था व वि.प.कं.3चे भुखंड ज्या खसरा मधे आहे त्या 9 एकर मूळ जमिनीचे मूळ मालक स्व.भागाबाई जानबाजी भोले ही त्यांची आजी होती. तिने दिनांक 12.4.1982 रोजी तिचे वारसान मूली स्व.जनाबाई रामभाऊ खंते (वि.प.क्रं.3 ची आई ), स्व.सोनाबाई नथ्‍्युजी तेलरांधे( वि.प.कं.3 ची मावशी) व श्रीमती पूनाबाई बुध्‍दुजी महाकाळकर (वि.प.क्रं.3 ची मावशी) व स्वतःचा समान हिस्सा ठेवुन शेत जमीनीची वाटणी केली होती.
  12. त्यापैकी वि.प.क्रं.3 ची आई स्व.जनाबाई रामभाऊ खंते हिच्या हिश्‍यात आराजी 0.81 हेक्टर आर जमीन वाटणीनुसार मिळालेली होती व त्या जमिनीपैकी आराजी 0.41 हेक्टर आर जमिन तिने सन-1986 रोजी स्व.जनाबाई खंते ले-आऊट नावाने न.भु.क्रं.563, शिट क्रं.711/88, नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगरपालीकेच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येते असलेल्या व ख.क्रं.108/5 या क्रमांकाचे जमिनीच्या नकाशाप्रमाणे पाडलेल्या भुखंडानुसार तिचे वारसान 1. स्व हंसराज रामभाऊजी खंते यांस भुखंड क्रं. 3,4,5,6,31,32,33,34,35, आममुख्‍त्यार पत्र (2) श्रीमती सुरेखा महादेवराव वंजारी भुखंड क्रं.27,28,29 (स्वतः प्रतीवादी) मृत्युपत्र व बक्षिसलेख (3) श्रीमती मंदा रमेशराव आदमने , भुखंड क्रं. 16,17,22,23,24,25,26 आणि (4) श्री रमेश रामभाऊ खंते, आममुख्‍त्यापत्र व बक्षिसपत्र भुखंड क्रं.11,12,13,14,15, 30,35 हयास आममुख्‍त्यार पत्राव्दारे भुखंड दिले होते. व तिने तिचा आणखी एक वारसान (5) ज्ञानेश्‍वर रामभाऊजी खंते यास भुखंड क्र.1,2,36,37,38,39,40,42, (आराजी-30x50=1500 चौ.फुट.) नोंदणीकृत दस्त क्र.3041, लिफाफा दिनांक 28.11.1986 रोजी दस्ताचा प्रकार आममुख्‍त्यापत्र तयार करुन दिले होते. या दस्ताआधारे वादी क्रं.2 यांनी नोंदणीकृत दस्त क्रं. 397 ,दिनांक 30.11.1992 रोजीच्य दस्तामधे नमुद लिहून देणार विदर्भ नगर विकास गृहनिर्माण सहकारी संस्था नागपूर. नोंदणी क्रमांक NGP/632/83, अध्‍यक्ष - श्री विजय नामदेवराव मुरकुटे यास आराजी 0.40 आर (एक एकर) जमिनीचे विक्रीपत्र करुन दिले होते व संस्थेचे सचिव पद वि.प.क्रं.2 ज्ञानेश्‍वर रामभाऊ खंते यांनी  स्वतःचे नावे नोंदविले होते.
  13. नोंदणीदस्त क्रं.3042/ दिनांक 28.11.1986 दस्त प्रकार आममुख्‍त्यारपत्र व दिनांक 15.10.1985 दस्तप्रकार बक्षीसपत्र हयांचे आधारे त्याचवर्षी भुखंड क्रं.28 व 29 वर अर्धे अर्धे येते असलेले पक्के तीन रुमचे घर व एका वि‍हीरीचे बांधकाम वि.प.क्रं.2 यांनी केले होते, जे आजही अस्तीत्वात आहे.
  14. अशाप्रकारे विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर. लगत असलेले वि.प.क्रं.3 चे भुखंड क्रं. 27,28,29 वर सन 1986 पासुन घराचे बांधकामसहीत कब्जा असल्याने व वि.प.क्रं.3 चे नावे मृत्युपत्र असल्याने तिने 2001 मध्‍ये नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय येथे सदर भुखंडाचे नियमितीकरणाकरिता अर्ज सादर केला होता व वादी किशारे आदमने यांनी सुध्‍दा वि.प.क्रं.3 च्या भुखंडाकरिता जो खसरा क्रं.108/2 मध्‍ये येतात त्यासंबंधी अर्ज दाखल केला होता. परंतु कार्यालयातील अधिका-यांनी वि.प.कं.3 चे नाव डिमांड दिली होती व त्यांचे नावे आर एल लेटर दिले होते. तसेच भुमी अभिलेख कार्यालयाने सुध्‍दा वि.प.क्रं.3 चे नाव फेरफार नोंदणी नुसार वि.प.कं.3 चे नाव नोंदविले असुन नागपूर म्युनिसिपल कार्यालयाने वि.प.क्रं.3 चे नावे कर पावती दिली आहे.
  15. प्रतीवादी 1-ए, यांनी प्रतीवादी क्रं.2 यांचकडे प्रस्तुत दाव्यामध्‍ये दाखल रजिस्ट्री, रजिसट्रशन दस्त क्रं.3623,नागपूर मधे नमुद मजकूराप्रमाणे भुखंड क्रमांक 27, 28, ख.क्रं.108/2 मध्‍ये येत असलेले भुखंड खरेदी केलेले होते व हा खसरा क्रं.नगर भुमापन क्रमांक 563 मधील आखिव पत्रीकेत नमुद नोंदणीप्रमाणे वि.प.कं.3 ची मावशी स्व. सोनाबाई नथ्थुजी तेलरांधे हिचा हिस्सापूर्ण जमिनीमधे असलेले ले-आऊट राधाकृष्‍ण को-ऑपरेटिव्ह हाऊसिेग सोसायटीमधे येतो पण या व्यवहारात तिच्या वारसानपैकी किंवा तिने रजिस्टीत नमुद भुखंडाप्रमाणे भुखंड क्रं.27 ,28 स्वतः विकलेला नसुन प्रतीवादी क्रं.2-ज्ञानेश्‍वर रामभाऊ खंते यांनी विकले होते व पुन्हा 108/2 हाच खसरा नमुद करुन प्रतीवादी क्रं.2 याने नगर रजिस्ट्रेशन क्रमांक 3623, दिनांक 13.3.1989 मधे विकलेले भुखंड क्रं.27 व 28 पैकी भुखंड क्रं. 27 परत दिनांक 27.1.1989 रजिस्ट्रेशन दस्त क्रंमांक 1186 च्या वादी यांनी पुराव्या स्वरुपात दाखल दस्ताप्रमाणे प्रतीवादी क्रं.1-ए यांना विकला होता. प्रतीवादी 1-ए व 1-बी यांनी 108/2 मधील दोन्ही भुखंड प्रत्यक्षात कुठे येतात हे न बघितल्यामूळे व सोसायटीचे योग्य अध्‍यक्ष व सचिव कोण हे न पडताळता सदरचे भुखंड खरेदी केले होते.
  16. पूढे प्रतीवादी1-ए व 1-बी हयांना घोटाळा झाल्याचे समजल्याने त्यांनी प्रतीवादी क्रं.2 यांच्या विरोधात न्यायालयात न जाता स्वतःच निपटारा करत भुखंड क्रं.27,28 तर्फे आममुख्‍त्यारपत्र संजय महादेवराव घाटुर्ले यांना तयार करुन दिले व वादी किशोर आदमने यांना दोन्ही भुखंड विकण्‍याकरिता 1-ए व 1-बी यांनी वि.प.क्रं2 यांच्या सोसायटीमधील ख.क्रं.108/5 ज्यात वि.प.क्रं.3 चे भुखंड क्रमांक 27,28 व 29 येतात ते आममुख्‍त्यार पत्रात स्वतःच ख.क्रं.108/5 नमुद करुन दिला. जेव्हा की, 1-ए व 1-बी त्यांच्या मूळ रजिस्टरीत कुठेही नमुद नव्हता. अशाप्रकारे दोन खसरे आममुख्‍त्यारपत्रात नमुद करुन वादी किशोर आदमने यांना ख.क्रं.108/5 मधील वि.प. क्रं.3 यांचे भुखंड क्रं. 27,28 दाखवुन तर्फे आममख्‍्त्यार संजय घाटुर्ले यांनी विकले होते व त्यांची तब्बल 18 लाख रुपयांनी फसवणूक केली होती. करिता वि.प.क्रं.3 यांनी सर्व दोषी प्रतीवादी विरुध्‍द कारवाईचे आदेश पारित करावे अशी विंनती केली आहे.
  17. वि.प.क्रं. 4-नागपूर सुधार प्रन्यास,नागपूर, आपले लेखी उत्तरात नमुद करतात की, त्यांचे नाव सदरच्या प्रकरणात विनाकारण गोवण्‍यात आले आहे. शासकीय परिपत्रक दिनांक 27.8.2019 नुसार त्यांचे सर्व अधिकार नागपूर महानगरपालीका यांना देण्‍यात आले आहे. त्यामूळे भुखंड क्रं.27 व 28 चे‍ नियमितीकरण नागपूर सुधार प्रन्यास करु शकत नाही. त्यामूळे वि.प.क्रं.4 चे नाव सदर प्रकरणातुन वगळयात यावे.
  18. वि.प.1-बी- श्रीमती प्रतिभादेवी मधुकरराव शेलार यांनी भुखंड क्रं. 28, ख.क्रं.108/2, मौजा-सोमलवाडा, विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर येथील भुखंडाचे नियमितीकरण करण्‍याकरिता रुपये 1,000/- जमा केले होते. व त्यानुसार तक्रारदाराने सुध्‍दा सदरच्या भुखंडाचे नियमितीकरण करण्‍याकरिता दिनांक 3.10.2016 रोजी अर्ज केला होता व तो अर्ज महाराष्‍ट्र गुठेंवारी कायदा 2001, च्या “ Land Dispute” या कारणामूळे दिनांक 19.7.2011 रोजी नाकारण्‍यात आला होता व त्यामूळे तक्रारदाराचे नावे दिनांक 10.7.2017 रोजी परमिट क्रमांक BE/17/27 नुसार सदरचा अर्ज नामंजूर केल्याचे पत्राव्दारे कळविण्‍यात आले होते.
  19. वि.प.क्रं.3 - श्रीमती सुरेखा महादेवराव वंजारी यांनी भुखंड क्रं.27 व 28 ख.क्रं.108/5, मौजा-सोमलवाडा,विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर. तर्फे दिनांक 31.10.2007 रोजी यांचे नावे महाराष्‍ट्र गुठेंवारी कायदा 2001 नियमतीकरण करण्‍यात आले होते व त्यानुसार वि.प.क्रं.3 यांनी डिमांड नोटप्रमाणे नियमितीकरणाचे शुल्क जमा केले त्यामूळे त्यांचे नावे दिनांक 17.5.2018 रोजी भुखंड क्रं.27,28,चा प‍रमिट क्रमांक 4441 व 4440 असा आहे. शासन परिपत्रक दिनांक 27.8.2019 नुसार त्यांचे सर्व अधिकार नागपूर महानगरपालीका यांना देण्‍यात आले आहे. त्यामूळे उपरोक्त भुखंड क्रं. 27 व 28 चे नियमितीकरण आता नागपूर सुधार प्रन्यास यांना करता येणार नाही. सदरचे परिपत्रक सोबत जोडले आहे याकारणास्तव वि.प.क्रं.4 यांचे विरुध्‍द सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विंनती केली आहे.
  20. वि.प.क्रं.6 – भुमीअभिलेख कार्यालय यांनी आपले लेखी उत्तरात नमुद केले की, ते सेवा देणारे कार्यालय नसुन त्यांचे कार्य केवळ भुखंड/सदनिका खरेदीदार व्यक्तीचे नावावर फेरफार करणे एवढेच आहे व या कामाकरिता हे कार्यालय कोणतेही शु्ल्क आकारत नाही. तक्रारदाराने सदर तक्रार Section 158 of  Maharashtra Land Revenue Code 1966 या अंतर्गत दाखल केलेली आहे. तसेच तक्रारदाराने Section 247 of  Maharashtra Land Revenue Code 1966 नुसार योग्य मागणी केलेली नाही. तकारदाराने सदरची तक्रार वि.प. क्रं.6 हे कार्यालय राज्य शासनाचे अंतर्गत येत असल्यामूळे U/S 80 of C.P.C नुसार वि.प.क्रं.6 हा तक्रार दाखल करण्‍याअगोदर नोटीस देणे आवश्‍यक होते.  कार्यालयीन अभिलेखानुसार उपरोक्त भुखंड क्रमांक 27 व 28 फेरफार नोंदणी क्रमांक 43150, दिनांक 24.4.2018 नुसार श्रीमती सुरेखा महादेवराव वंजारी यांचे नावे फेर‍फार नोंदणी आहे व या भुखंडाचा मालकी हक्क त्यांना त्यांची आई श्रीमती जनाबाई रामभाऊ खंते यांचे नोंदणीकृत मृत्युपत्र क्रं.19 दिनांक 7.2.2000 या व्दारे प्राप्त झाला आहे. मृत्यपत्र नोंदणी केल्यानंतर कायद्यानुसार 15 दिवसापर्यत कोणाचेही त्यावर आक्षेप  आला नाही त्यामूळे Section 149 व  150 of  Maharashtra Land Revenue Code 1966 नुसार सदरचे भुखंड क्रमांक 27 व 28 हे श्रीमती सुरेखा महादेवराव वंजारी यांचे नावे फेर‍फार नोंद करण्‍यात आली. स्व.जनाबाई रामभाऊ खंते यांचा मृत्यु दिनांक 11.6.2001 रोजी झाला होता. फेरफार करण्‍यास कारण स्व.जनाबाई रामभाऊ खंते यांचे मृत्यपत्रावरुन सदर फेरफार दिनांक 24.4.2018 ते P.R.Card of C.T.S. No.563. नुसार नोंदविण्‍यात आला असल्यामूळे Section 158  247 of  Maharashtra Land Revenue Code 1966 प्रमाणे तक्रारदाराचे नावे फेरफार करता येणार नाही असे वि.प.क्रं.6 चे म्हणणे आहे.  भुमीअभिलेख कार्यालयातील अभिलेख नोंदणीनुसार सन 1970 ते 1975 नुसार नगर भुमापन क्रमांक 563, चलता क्रमांक-3, हा मूळता ख.क्रं.108, हा कृषीजमीनीचा भाग होता व ती संपूर्ण जागा 7/12 नुसार 28,489.30 चौ.मि. इतकी होती. व याजागेचा अभिलेख वि.प.क्रं.6 कडे नसुन महसूल तलाठी यांचेकडे होता. काही वर्षापूर्वी ख.क्रं.108 हा गुंठेवारी योजनेत आला. वि.प.क्रं.3 यांनी दाखल केलेल्या 7/12 नुसार 108/2, हा गुंठेवारी योजनेमधे अनाधिकृत योजनेमधे भुखंड क्रं. 27,28 व 29 हे अकृषक करण्‍याकरिता तहसिलदार यांचेकडे पाठविण्‍यात आला.  त्याप्रमाणे तहसिलदार यांनी त्याचे अकृषक व नियमितीकरण करुन दिनांक 24.2.2018 रोजी फेरफार क्रमांक 43147 ते 43149 नुसार गुंठेवारी योजने वि.प.क्रं.3 श्रीमती सुरेखा महादेवराव वंजारी यांचे नावे फेरफार नोंदणी करण्‍यात आली. त्याचा दिनाक 24.4.2018 रोजी मालमत्ता पत्रक क्रमांक 43150 असा होता. या सर्व फेरफार वर कोणतेही अपील दाखल नाही. कलम Section 247 of  Maharashtra Land Revenue Code 1966 नुसार केवळ competent appellate authority यांनाच केवळ कोणत्याही मालमत्तेचे नाव कमी करण्‍याचे व वगळण्‍याचे किवा दुरुस्त करण्‍याचे अधिकार आहे.  तक्रारदाराने सदरची तक्रार वि.प.क्रं.6 यांना मानसिक त्रास देण्‍याचे हेतुने सदर तक्रार दाखल केलेली आहे सबब सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विंनती केली आहे.

मुद्दे                                                  उत्तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                        होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ?                 होय
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय ?                 होय
  4. काय आदेश ?                                                                        अंतिम आदेशानुसार

 

  •  
  1. तक्रारकर्ते यांनी वि.प.क्रं.1-ए-दिलीप शंकरराव गाढवे व 1.बी- श्रीमती प्रतिभादेवी मधूकरराव शेलार, यांचे आममुख्त्यार संजय महादेवराव घाटूर्ले कडुन मौजा-सोमलवाडा, ख.क्रं. 108/2 व 5, सिटी सव्हे क्रं.563,शिट क्रं.711/88, एनआयटी व एनएमसीच्या हद्दीत नागपूर विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर. यांचे कडुन दोन भुखंड क्रमांक 27 व 28 एकुण रक्कम रुपये 16,00,000/- देऊन स्वतःचे नावे खरेदी केले आहे व त्याचे एकुण क्षेत्रफळ 3600 चौ.फुट आहे. या भुखंडाचे विक्रीपत्र वि.प.क्रं.2 - सचिव, ज्ञानेश्‍वर खंते, विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर यांचे कडुन वि.प.क्रं.1-ए व 1-बी यांचे नावे आधीच करुन देण्‍यात आले होते. त्यानंतर तक्रारदाराने सदरच्या भुखंडाचे फेरफार करुन घेण्‍याकरिता वि.प.क्रं.5,नागपूर महानगरपालीका यांचे कडे सन 2013-14 मध्‍ये रुपये 1,08,158/- धनादेशाव्दारे करापोटी भरले. तसेच तक्रारदार यांनी नागपूर सुधार प्रन्यास (वि.प.क्रं.4) यांचेकडे नियमितीकरणचे शुल्क रुपये 1,000/- सुध्‍दा भरले. परंतू वि.प.क्रं.5 यांनी दिनांक 18.3.2019 चे पत्रान्वये तक्रारदाराला कळविले की, वि.प.क्रं.5 ने उपरोक्त भुखंड क्रं.27 व 28 व 29, ख.क्रं.108/5 ,एकुण क्षेत्रफळ 0.81 हेक्टर आर, महसूल रुपये 2.25, वर्ग-2, मौजा-सोमलवाडा, प.ह.नं.44, ता.जि.नागपूर, या जागेचे वि.प.क्रं.3-सौ सुरेखा महादेवराव वंजारी चे नावे आधीच नोंदविले आहे. हे माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने माहिती अधिकाराअंतर्गत वि.प.क्रं.5 यांचे कडे वि.प.क्रं.3 चे मालकीहक्काबाबतच्या दस्तऐवजांची मागणी केली असता त्यात त्याला असे दिसुन आले की, सदरचे भुखंड हे वि.प.क्रं.3- सौ सुरेखा महादेवराव वंजारी च्या नावे स्व. जनाबाई रामभाऊ खंते यांचे नावे दिनांक 7.2.2000 रोजी मृत्युपत्राव्दारे करण्‍यात आला होता. वि.प.क्रं.5 ने त्यानुसार वि.प.क्रं.3 चे नाव अभिलेखावर नोंदविले आहे आणि त्यामूळे वि.प.क्रं.4 यांनी वि.प.क्रं.3 यांचे नावे नियमितीकरण्‍याबाबतचे पत्र दिले.  उभयपक्षकारांनी तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरची संपूर्ण जागा ही वि.प.क्रं.3 यांची आई स्व. जनाबाई रामभाऊ खंते यांचेकडे त्यांच्या आजी स्व.भागाबाई जानबाजी भोले यांचे कडुन वारसाहक्काने प्राप्त झाली होती. उपरोक्त भुखंड क्रं.27 व 28 हे आधीच विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्थेला त्यांची आई स्व.जनाबाई खंते यांनी दिले होते. या संस्थने भुखंड क्रं.27 चे नोंदणीकृत विक्रीपत्र 1-, दिलीप शंकरराव गाढवे व भुखंड क्रं.28 चे नोंदणीकृत विक्रीपत्र 1-बी, प्रतिभादेवी मधूकरराव शेलार यांचे नावे सन 1989 मध्‍ये नोंदविले होते.  त्यानंतर 1-ए, व   1-बी यांचेकडुन संजय घाटूले यांचेकडुन आममुख्‍्त्यारपत्र घेऊन तक्रारदाराचे नावे भुखंड क्रं.27 व 28 रक्कम 16,00,000/- नोंदणीकृत विक्रीपत्र दिनांक 16.12.2012 रोजी नोंदवून दिले होते. यावरुन असे दिसून येते की, विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर. यांचे सचिव ज्ञानेश्‍वर रामभाऊ खंते (जनाबाई रामभाऊ खंते यांचे पुत्र ) यांना सदरची मालमत्ता वारसा हक्कानुसार दिनांक 28.11.1986 नुसार प्राप्त झाली होती. याजागेवर त्यांनी लगेचच ले-आऊट व भुखंड पाडुन त्यांची विक्री केली होती. स्व. जनाबाई रामभाऊ खंते हिने आपले मृत्युपत्रात चार मुलां मुलींना सदर मालमत्तेची वाटणी केल्यानंतर, तिच्या मुलाच्या हिस्स्यातील वि.प.क्रं.2, सचिव, श्री ज्ञानेश्‍वर रामभाऊ खंते यांनी त्यांच्या विदर्भ नगर विकास गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर. यांनी ले-आऊट पाडुन विक्री केलेल्या भुखंडामधीलच तीन भुखंड क्रमांक 27,28, व 29 हे तिची मुलगी वि.प.क्रं.-3, सुरेखा महादेवराव वंजारी हिचे नावे दिनांक 7.2.2000 रोजी मृत्युपत्र/बक्षीसलेखाव्दारे लिहून ठेवले आहे. तक्रारकर्ता हा वि.प.क्रं 2 व 3 चा प्रत्यक्ष ग्राहक नसला तरी वि.प.क्रं. 1-ए व 1-बी हे वि.क्रं.2 चे प्रत्यक्ष ग्राहक आहेत. वि.प.क्रं.1,2यांनी तक्रारदाराकडुन रुपये 16,00,000/- रक्कम स्वि‍कारुनही त्यांचे नावे केवळ विक्रीपत्राची नोंदणी करुन दिली परंतु जागेचा प्रत्यक्ष ताबा दिला नाही. वि.प.क्रं.3 यांनी आपल्या उत्तरात सदरची बाब नमुद करुन वि.प.क्रं.2 यांनी तक्रारदारासोबत धोकादाडी व फसवणूक केली असल्याचे मान्य केले आहे. वि.प.ची ही कृती तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दर्शविते तसेच तक्रारदाराचे प्रती सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्‍ट होते.
  2. वि.प.क्रं.6 यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांनुसार वि.प.क्रं.2 यांची आई श्रीमती जनाबाई खंते यांचे नावे दिनांक 4.4.2005 रोजी अती.तह. गैरकृषी कर आकारणी नागपूर यांचे कडील रा.मा.क्रं.0/16166 एन.ए.पी. 34/04-05, दिनांक 4/3/05 ख.नं.108/5 भु.क्रं.10 क्षे.139.820 चौ.मी.जागा गैरकृषी वापरास मंजूरी प्राप्त झाल्यामूळे क वर्गात रुपांतरीत नोंद व महसूली 7/12 नुसार श्रीमती जनाबाई रामभाऊ खंते यांचे नावे फेरफार नोंद करण्‍यात आली आहे.
  3. त्यानंतर दिनांक 4.4.2005 रोजीच खरेदीने र.द.क्रं.397, दि.30.11.1992 अन्वये रुपये 2,00,000/- ख.क्रं.108/5 क्षे. 0.81 हे.आर. जमीन श्रीमती जनाबाई रामभाऊ खंते यांचेपासून भु.धा.विदर्भ नगर विकास गृहनिर्माण सहकारी सो. नागपूर फेरफार क्रं. 461 प्रमाणे नोंदविण्‍यात आला आहे.
  4. त्यानंतर दिनांक 4.4.2005 रोजी खरेदी र.द.क्रं.571, दि.28.2.2005 अन्वये रुपये 1,42,500/- मध्‍ये भु.क्रं.10 क्षे. 139.82 चौ.मि.जागा अभिलीखीत सो.पासून भु.धा. ललित यशंवतराव राऊत यांचे नावे फेरफार क्रं. 461 प्रमाणे नोंदविण्‍यात आले.
  5. दिनांक 17.5.2005 रोजी अती.तह. गैरकृषी कर आकारणी नागपूर यांचे कडील रा.मा.क्रं.0/16258,एन.ए.पी.34/04-05, ख.क्रं.108/2 भु.क्रं.15 क्षे.139.5 चौ.मी. दिनांक 17.3.2005 अन्वये गैरकृषी वापरास मंजूरी प्राप्त झाल्यामूळे क वर्गात रुपांतरीत नोंद व महसूली 7/12 नुसार राधाकृष्ण को-आप.हाऊसिंग सोसायटी नागपूर फेरफार क्रं.4852 यांचे नावे फेरफार नोंद करण्‍यात आली आहे.
  6. तसेच दिनांक 24.4.2018 रोजी जनाबाई वि.रामभाऊ खंते यांचा मृत्यु 11.6.2001 ला झाला त्यांनी मृत्य अगोगर मृत्युलेख र.द.क्रं.19, दिनांक 7.2.2001 मध्‍ये आपल्या हक्कातील मिळकत भुखंड क्रं.27,28,29 क्षेत्र-139.2930 चौ.मि., प्रत्येकी मिळकत श्रीमती सुरेखा महादेवराव वंजारी यांचे नावे करुन दिल्याने नोंद, फेरफार क्रं.43150 अशी 24.8.2018 रोजी करुन देण्‍याची नोंद आहे.
  7. दिनांक 14.2.2003 च्या 7/12 उतारानुसार मौजा-सोमलवाडा, ख.क्रं.108/5, भो.वर्ग-2, हा अमोल हंसराज खंते, नातु, आनंद हसंराज खंते,नातु, श्रीमती रजनी हंसराज खंते, सुन, ज्ञानेश्‍वर रामभाऊ खंते, रमेश रामभाऊ खंते, श्रीमती महादेवराव वंजारी, मंदा ऊर्फे कुंदा रमेशराव आदमने यांचे नावे आहे.
  8. दिनांक 12.4.1982 रोजी तिचे वारसान मुलगी स्वर्गीय जनाबाई रामभाऊ खंते यांचे नावे सदरची मालमत्ता आराजी 0.81 हेक्टर आर जमिन आली. त्यापैकी आराजी 0.41 हेक्टर आर जमीन तिने जनाबाई खंते ले-आऊट सिटी सव्र्हे क्रं. 563, ना.सु.प्र. /ना.म.पालीका यांच्या कार्यक्षेत्रा  अंतर्गत व 108/5 खसरा क्रमांकाचे जमिनीचे नकाशाप्रमाणे पाडलेल्या भुखंडानुसार (1) श्री हंसराज रामभाऊजी खंत यास भुखंड क्रंमांक 3,4,5,6,31,32,33,34,दस्तप्रकार आममुख्‍त्यार पत्र (2) सुरेखा महादेवराव वंजारी भुखंड क्रं.27,28 व 29 आममुखत्यारपत्र व बक्षीसपत्र,  (3) श्रीमती मंदा रमेशराव आदमने , भुखंड क्रं. 16,17,22,23,24,25,26 आणि 4 , आममुख्‍त्यापत्र व बक्षिसपत्र (3) श्री रमेश रामभाऊ खंते, भुखंड क्रं.11,12,13,14,15, 30,35 हयास आममुख्‍त्यार पत्राव्दारे भुखंड दिले होते. व तिने तिचा आणखी एक वारस (5) ज्ञानेश्‍वर रामभाऊजी खंते यास भुखंड क्र.1,2,36,37,38,39,40,42, आराजी  30x50=1500 चौ.फुट. नोंदणीकृत दस्त क्र.3041, लिफाफा दिनांक 28.11.1986 रोजी दस्ताचा प्रकार आममुख्‍त्यापत्र तयार करुन दिले होते. या दस्ताआधारे वादी क्रं.2 यांनी नोंदणीकृत दस्त क्रं. 397 ,दिनांक 30.11.1992 रोजीच्य दस्तामधे नमुद लिहून देणार विदर्भ नगर विकास गृहनिर्माण सहकारी संस्था नागपूर. नोंदणी क्रमांक NGP/632/83, अध्‍यक्ष - श्री विजय नामदेवराव मुरकुटे यास आराजी 40 आर ( एक एकर ) जमिनीचे विक्रीपत्र करुन दिले होते व संस्थेचे सचिव पद स्वतःचे नावे नोंदविले होते असे असुन सुध्‍दा म्हणजेच वि.प.क्रं.2 हिचे नावे भुखंड क्रं. 27,28,29 याचे बक्षीसपत्र असुन सुध्‍दा वि.प.क्रं. 2 ज्ञानेश्‍वर रामभाऊजी खंते, सचिव विदर्भ नगर विकास गृहनिर्माण सहकारी संस्था नागपूर. यांचे नावे दिनांक 21.1.1989 रोजी त्यांना अधिकार प्राप्त झाले होते असे विक्रीपत्र अभिलेखावरुन दिसुन येते व या अभिलेखावर सदरच्या मालमत्तेचा खसरा क्रं. 108/2 ,5 असा दिसुन येत आहे.
  9. -बी प्रतिभादेवी मधुकरराव शेलार हिचे नावे 13 मार्च 1989 रोजी विक्रीपत्र करुन दिले यात ख.क्रं.108/2 असे नमुद आहे. त्यात भुखंड क्रं. 27 व 28 नमुद आहे. तसेच दिनांक 20.1.1989 रोजी दिलीप शंकरराव गाढवे यांचे नावे विक्रीपत्र नोंदवून दिले आहे. यात सुध्‍दा ख.क्रं.108 असे नमुद असुन त्यांचा भुखंड क्रमांक. 27 आहे. तसेच श्रीमती जनाबाई विधवा रामभाऊ खंते हिने दिनांक 7.2.2000 रोजी मृत्युपत्र लेखाव्दारे ख.क्रं.108/5 मधील भुखंड क्रं.27,28 व 29 सुरेखा महादेवराव वंजारी यांचे नावे करुन दिले
  10.  यावरुन असे दिसुन येते की, वि.प.क्रं.2 ज्ञानेश्‍वर खंते यांनी उपरोक्त भुखंड क्रं. 27 व 28 चे विक्रीपत्र सन 1989 मधे वि.प.क्रं.1-ए श्री दिलीप गाढवे व वि.प.क्रं.2-बी प्रतिभा शेलार यांचे नावे नोंदवून दिले आहे व त्यांची आई जनाबाई रामभाउ खंत हिने मृत्युपत्र दिनांक 7.2.2000 रोजी केलेले आहे. यावरुन वि.प.कं.2 व 3 यांनी तकारदाराची फसवणूक करुन त्यांचेसोबत अनुचित व्यापारी पध्‍दतीचा अवलंब करुन त्यांना उपरोक्त भुखंड क्रं. 27 व 28 चा प्रत्यक्ष ताबा न दिल्यामूळे सेवेत त्रुटी केल्याचे सिध्‍द होते. म्हणुन तक्रारकर्ते यांना योग्य ते दुरुस्तीपत्र करुन देऊन भुखंड क्रं.27 व 28 चा ताबा देणे उचित आहे. तक्रारकर्ते यांना ताबा देण्‍यास अडचणी असतील तर सदरहू भुखंडाबाबतची आदेशाच्या दिनांकाच्या दिवशी येणारी किंमत तक्रारदाराला देणे उचित आहे.
  11. वि.प.क्रं.1-ए व 1-बी यांचे आममुखत्यारधारक संजय घाटुर्ले यांनी तक्रारदाराकडुन रक्कम रुपये 16,00,000/- स्वीकारुन तक्रारदाराचे नावे नोंदणीकरुन विक्रीपत्र करुन दिले. ते केवळ एजंट होते व तक्रारकर्ता त्याचा ग्राहक नाही. सबब वि.प.क्रं.1-ए व 1-बी यांचे विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात येते.

सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.क्रं.1-ए व 1-बी यांचे तर्फे आममुखत्यार श्री संजय घाटुर्ले यांचे विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात येते.
  3. (अ)  वि.प.क्रं.2 व 3 यांनी तक्रारदाराचे नावे ख.क्रं.108/2,5 ऐवजी ख.क्रं.108/5 याप्रमाणे दुरुस्ती पत्र (Correction Deed ) नोंदणीकृत करुन द्यावे. दुरुस्तीपत्राचा खर्च तक्रारदाराने स्वतः सोसावा.

(ब) वि.प.क्रं.3 यांनी उपरोक्त भुखंड क्रं.27 व 28 चा प्रत्यक्ष ताबा तक्रारदाराला  

द्यावा.

(क) विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांनी दुरुस्तीपत्र करुन दिल्यानंतर आणि सदरहू भुखंडाचा  ताबा दिल्यानंतर वि.प.4,5 व 6 यांनी योग्य आणि कायदेशिर कार्यवाही करावी.

अथवा

(अ) वरील आदेश क्रं.3 (अ) आणि (ब) यांचे पालन करणे कायदेशि‍ररित्या अथवा तांत्रि‍कदृष्‍टया  शक्य नसल्यास वि.प.क्रं.2 व 3 यांनी तक्रारदाराला भुखंड क्रं.27 व 28 चे एकुण क्षेत्रफळ 3600 स्के.फुट एवढया क्षेत्रफळाच्या अकृषक भुखंडासाठी आदेशाच्या दिनांकाच्या दिवशी सदरहू मिळकतीच्या झोन मधील अथवा जवळच्या झोन मध्‍ये शासकीय दराने येणारी किंमत तक्रारकर्ते यांना वेयक्तीकरित्या अथवा संयुक्तीरित्या तक्रारदाराला द्यावी.

(ब) तसेच सदरहू शासकीय दराने येणा-या रक्कमेवर द.सा. द.शे 9 टक्के दराने आदेशाच्या दिनांपासून म्हणजे दिनांक 11.4.2022 पासून रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो दराने व्याज द्यावे.

4.    तकारदाराला झालेल्या झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून  रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- वि.प.क्रं.2 व 3 यांनी वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या द्यावे.

 

5.    विरुध्‍द पक्ष क्रं. 1,4,5 व 6 विरुध्‍द कोणतेही आदेश नाही.

 

6.    वि.प.क्रं. 2 व 3 यांनी वर नमुद केलेल्या वैकल्पीक आदेश क्रं. 3(अ) आणि (ब)

    आणि 4 यांचे पालन केल्यास तक्रारकर्ते यांनी त्यांना दिलेले नोंदणीकृत विक्रीपत्र    

    वि.प.क्रं.2 व 3 यांना परत करावे आणि सदरहू विक्रीपत्र रद्द करण्‍याचे पत्र

     नोंदणीकृत करण्‍याकरिता तक्रारदाराने सहकार्य करावे आणि सदरहू नोंदणीचा खर्च   

     वि.प.क्रं.2 व 3 यांनी सोसावा.

 

7.   विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून

         45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

8.    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

9.    तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.