तक्रारदारातर्फे – वकील – जी. बी. कोल्हे,
सामनेवालेतर्फे – वकिल – आर. बी. धांडे.
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार व सामनेवाले नं. 1 ते 3 यांच्या आपसात समझोता झाला व त्यानुसार मोबाईल संचाबाबत त्याची किंमत व तक्रारीचा खर्च असे एकूण रक्कम रु. 7,500/- सामनेवाले तक्रारदारांना देण्यास तयार आहेत. तसे तडजोड पत्र तक्रारदार व सामनेवाले नं. 1 ते 3 यांनी न्याय मंचात दाखल केलेले आहे.
तक्रारदार व त्यांचे वकील श्री जी. बी. कोल्हे तसेच सामनेवाले नं. 1 व 2 चे वकील श्री आर. बी. धांडे व सोमनेवाले नं. 3 चे वकील श्री व्ही.व्ही. जठार हे हजर. तक्रारदाराच्या तक्रारीत तडजोड झाल्याने त्याप्रमाणे सामनेवालेंनी तक्रारदारांना रक्कम रु. 7,500/- दयावयाचे आहेत. सबब, तडजोडीप्रमाणे तक्रार निकाली करणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार तडजोडीप्रमाणे निकाली.
2. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड