(द्वारा श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
1. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे कडुन “KC Complex” चिंचपाडा ता. अंबरनाथ जि. ठाणे येथील सदनिका क्र. 201 सि विंग मधील 573 चौ.फुट क्षेत्रफळाची रक्कम रु.11,64,000/- किमतीची विकत घेण्याचे ता. 13/06/2012 रोजी निश्चित केले.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदर सदनिका खरेदीपोटी एकुण रक्कम रु. 3,65,000/- चेक द्वारे व रोख स्वरुपात अदा केली आहे. तथापी सामेनवाले यांनी अद्याप पर्यंत सदनिका करार नोंदणी करुन सदनिकेचा ताबा दिलेला नाही अशी तक्रारदारची तक्रार आहे.
3. सामनेवाले यांना जाहीर प्रगटनद्वारे नोटिसीची बजावणी करुनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रस्तुत एकतर्फा चालविण्याचा आदेश परित झाला.
तक्रारदारची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद, यांचे मंचाने वाचन केले. तक्रारदारांनी त्यांचे लेखी युक्तिवाद हाच तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिली. सबब उपलब्ध कागदपात्रांच्या आधारे मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढत आहे.
4. कारणमिमांसाः
अ) तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वेगवेगळया क्रमांकाच्या सदनिका खरेदीपोटी खालील प्रमाणे चेक द्वारे व रोखीने अदा केल्याबाबतच्या सामनेवाले पावत्या मंचात दाखल आहेत.
अनु. क्र. | रुम क्र. | तारीख | रक्कम | तपशील |
1 | 304 | 11/01/2013 | 40,000/- | चेक |
2 | 304 | 03/04/2013 | 20,000/- | चेक |
3 | 201 | 13/06/2012 | 51,000/- | चेक |
4 | 201 | 03/08/2012 | 30,000/- | रोख |
5 | 304 | 11/10/2012 | 50,000/- | चेक |
6 | 1 | 06/03/2013 | 30,000/- | चेक |
7 | 201 | 08/05/2013 | 54,000/- | चेक |
8 | 201 | 06/08/2012 | 45,000/- | चेक |
9 | 304 | 16/11/2012 | 30,000/- | रोख |
10 | | 25/09/2013 | 25,000/- | चेक |
| | | 3,75,000/- | |
ब) तक्रारदार यांनी दाखल केलेलया वरील पावत्या नुसार सदनिका खरेदी पोटी सामनेवाले यांना चेकद्वारे व रोखीने पैसे अदा केल्याचे दिसून येते. वरील पावत्यांवर वेगवेगळया सदनिकेचा क्रमांक नमुद आहे. तथापी सदनिकेचे क्षेत्रफळ, स्थळ, एकुण किंमत वगैरे बाबतचा तपशील नमुद नाही.
क) तक्रारदार यांनी लेखी युक्तिवादामध्ये नमुद केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी सदनिकेचा ताबा डिसेंबर 2013 मध्ये देण्याचे कबुल केले होते. सामनेवाले यांनी सदनिका बुकींगच्या वेळी संबंधित स्थानिक प्रशासनाकडुन आवश्यक असलेली बांधकामाची परवानगी, व मंजुरी सदर प्रोजेक्टसाठी घेतल्याचे सांगितले. तथापी सामनेवाले यांना या संदर्भात कोणतीही मंजुरी प्राप्त झालेली नाही. सामनेवाले यांनी “KC Complex” प्रोजेक्टचे बांधकामाची मंजुरी प्राप्त झाल्याबाबतची कागदपत्रे तक्रारदार यांना दिली नाहीत. तक्रारीमध्ये सामनेवाले यांनी सदर प्रोजेक्टचे बांधकाम पुर्ण केले आहे किंवा काय? याबाबतचा तपशील नमुद नाही. त्यामुळे इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्याबाबत खुलासा होत नाही.
ड) तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे “KC Complex” चिंचपाडा, सी विंग, येथील इमारतीतील सदनिका क्र. 201 क्षेत्रफळ 575 चौ.फुट च्या ताब्याची मागणी केली आहे. तक्रारदारांनी दाखल केलेलया पावत्यांवर सदनिका क्र. 201 करीता एकुण रक्कम रु.1,80,000/- सामनेवाले यांचे कडे भरणा केल्याचे दिसून येते. तथापी सदर पावत्यांवरील सदनिका क्र. 201 ही “KC Complex” चिंचपाडा येथील प्रोजेक्टमधील आहे किंवा काय? या बाबबत खुलासा होत नाही. सदर पावतीवर इमारतीचे नाव प्रोजेक्टचे नाव, ठिकाण, सदनिकेचे एकुण मुल्य वगैरे तपशील नमुद नसल्यामुळे तक्रारदारांची सदनिका ताब्यात मिळण्याबाबत केलेली मागणी मान्य करता येत नाही असे मंचाचे मत आहे.
इ) तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे वेगवेगळया सदनिका क्रमांकाकरीता एकुण रक्कम रु. 3,75,000/- भरणा केल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे सदर रकमा परत मिळण्यासाठी (Refund of money) मागणी केल्याचे दिसुन येत नाही. सबब न्यायहिताच्या दृष्टीने तक्रारदारांना मुदतीची बाधा न येता वर नमुद केलेली रक्कम सामनेवाले यांचे कडुन परत मागणीसाठी नविन तक्रार योग्य त्या न्यायालयासमारे / आयोगामध्ये दाखल करण्याची परवानगी देवून प्रस्तुत तक्रार निकाली करण्यात येते.
5. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहेः
आ दे श
1. तक्रारदारांना मुदतीची बाधा न येता योग्य त्या न्यायालय / आयोगामध्ये नवीन तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात येवुन प्रस्तुत तक्रार निकाली करण्यात येते.
2. तक्रारदारांची सदनिका ताबा मिळणेबाबतची मागणी फेटाळण्यात येते.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
5. संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.