Maharashtra

Jalna

CC/94/2013

Ganesh Ashok Patil - Complainant(s)

Versus

2) The Manager, Roshani Trading Service - Opp.Party(s)

R.V.Jadhav

11 Apr 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/94/2013
 
1. Ganesh Ashok Patil
R/o.Ram nagar,Police colony R.No.225,New Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 2) The Manager, Roshani Trading Service
Shop No.15/16,Prem ganga Plaza,Jalna-431203
Jalna`
Maharastra
2. 2) Samsung India Electronics Pvt.Ltd.
3rd floor and 7 floor,IFCI Towers61,Nehru Place,New Delhi-110019.
Delhi
Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(घोषित दि. 11.04.2014 व्‍दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्‍या)

 

      अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून मोबाईल विकत घेतला होता. मोबाईल व्‍यवस्थित काम करीत नसल्‍यामुळे त्‍यांनी याबाबत गैरअर्जदार यांच्‍याकडे केलेल्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात न आल्‍यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.

      अर्जदाराच्‍या तक्रारी नुसार त्‍यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल 4,800/- रुपयात दिनांक 18.08.2013 रोजी विकत घेतला. सदरील मोबाईल विकत घेतल्‍यानंतर काही दिवसातच त्‍यात दोष निर्माण झाला. मोबाईलवर बोलत असताना मध्‍येच आवाज येणे बंद व्‍हायचे. मोबाईल हॅंग होऊन बंद व्‍हायचा. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडे या संबंधी तक्रार दिली असता त्‍यांनी मोबाईल मधील हार्डवेअरमध्‍ये बिघाड झाला असून, दुरुस्‍तीसाठी पाठवावा लागेल असे सांगितले. त्‍यानुसार अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडे मोबाईल दुरुस्‍तीसाठी जमा केला. मोबाईल दुरुस्‍ती नंतरही पुन्‍हा तीच समस्‍या येऊ लागली. मोबाईल व्‍यवस्थित चालत नसल्‍यामुळे अर्जदाराने मोबाईल बदलून देण्‍याची मागणी केली. परंतु गैरअर्जदार यांनी ती मान्‍य न केल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून मोबाईल खरेदीची किंमत व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

      अर्जदाराने तक्रारी सोबत मोबाईल खरेदीचे बिल, जॉब कार्ड इत्‍यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.

      गैरअर्जदार क्रमाक 1 व 2 यांच्‍या तर्फे संयुक्‍तपणे जवाब दाखल करण्‍यात आला. त्‍यांनी दाखल केलेल्‍या जवाबानुसार अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीत तथ्‍य नसून मोबाईल व्‍यवस्थित काम करीत नसल्‍याचा कोणताही पुरावा तक्रारी सोबत दाखल करण्‍यात आलेला नाही. अर्जदाराचा मोबाईल पाण्‍यामुळे खराब झालेला आहे त्‍यामुळे तो वॉरंटीमध्‍ये येत नाही. अर्जदाराने दिनांक 04.09.2013 रोजी त्‍यांच्‍याकडे मोबाईल दुरुस्‍तीसाठी दिला त्‍यावेळेस तयार करण्‍यात आलेल्‍या जॉब कार्डमध्‍ये त्‍यात पाणी असल्‍याचा स्‍पष्‍टपणे उल्‍लेख केला आहे. अर्जदारास दुरुस्‍तीचा खर्च सांगण्‍यात आल्‍यानंतर त्‍यांनी मोबाईल परत घेतला. त्‍यामुळे मोबाईल परत करण्‍याची अर्जदाराची मागणी चुकीची व मंचाची दिशाभूल करणारी असल्‍याचे सांगून अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍याची विनंती मंचास केली आहे.

      गैरअर्जदार यांनी जवाबासोबत वॉरंटी कार्डची प्रत, मोबाईल दुरुस्‍तीसाठी उघडण्‍यात आल्‍यानंतरचे फोटो मंचात दाखल केले आहेत.

      अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की,

  1. अर्जदाराने दिनांक 18.08.2013 रोजी श्री गोल्‍डन कम्‍युनिकेशन, जालना यांच्‍याकडून सॅमसंग कंपनीचा, (मॉडेल क्रमांक 5282) मोबाईल 4,800/- रुपये किंमतीत विकत घेतला. अर्जदाराने दिनांक 18.08.2013 रोजीचे मोबाईल खरेदी बिल दाखल केले आहे.

  2. अर्जदाराने दिनांक 04.09.2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍या सर्व्हिस सेंटर मध्‍ये मोबाईल व्‍यवस्थित चालत नसल्‍यामुळे दुरुस्‍तीसाठी दिला असल्‍याचे जॉब कार्ड वरुन दिसून येते.

  3. जॉब कार्डचे निरीक्षण केल्‍यावर असे आढळून येते की, सदरील मोबाईल हा वॉरंटी काळात दुरुस्‍तीसाठी दिलेला आहे. मोबाईल दुरुस्‍तीचे कारण (Defect Description) या समोर Dead, fully water damaged असे लिहीलेले दिसून येते. या जॉब कार्डवर अर्जदाराची सही आहे. या जॉबकार्डच्‍या निरीक्षणावरुन अर्जदाराने मोबाईल दुरुस्‍तीसाठी दिला त्‍यावेळी मोबाईलमध्‍ये पाणी असल्‍यामुळे चालत नव्‍हता हे स्‍पष्‍ट होते.

  4. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या वॉरंटी कार्डचे निरीक्षण केल्‍यावर त्‍यातील कलम सात नुसार मोबाईल बाहय कारणामुळे खराब झालेला आढळून आल्‍यास वॉरंटीच्‍या अटी लागू होणार नाही असे नमूद केलेले आहे. अर्जदाराचा मोबाईल पाण्‍यामुळे खराब झालेला असल्‍यामुळे तो वॉरंटीच्‍या अटी नुसार वॉरंटीमध्‍ये बसत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

  5. गैरअर्जदार यांनी जॉब कार्ड मध्‍ये दुरुस्‍तीचा खर्च रुपये 2,625/- असल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू अर्जदाराने ही रक्‍कम भरल्‍याचा पुरावा मंचात दाखल केलेला नाही.

    वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराने मंचात दाखल केलेली तक्रार मान्‍य करता येत नाही. अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

     

    आदेश

     

  1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चा बद्दल आदेश नाही.
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.