जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
तक्रार दाखल दिनांक :22/04/2010.
आदेश दिनांक :27/07/2010.
ग्राहक तक्रार क्रमांक : 205/2010.
1. सौ. प्रिती सुहास नष्टे, वय 34 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
2. श्री. सुहास म. नष्टे, वय 40 वर्षे, व्यवसाय : दूधविक्रेता,
दोघे रा. दमाणी नगर, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. वर्धमान कार्डस मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड, 4, सुयश अपार्टमेंट,
कस्तुरबा मार्केटसमोर, चंडक बगीचा, बुधवार पेठ, सोलापूर.
2. श्री. राजकुमार शहा, कार्यकारी संचालक, वर्धमान कार्डस मार्केटींग
प्रायव्हेट लिमिटेड, 4, सुयश अपार्टमेंट, कस्तुरबा मार्केटसमोर,
चंडक बगीचा, बुधवार पेठ, सोलापूर.
3. सौ. शोभा राजकुमार शहा, वर्धमान कार्डस मार्केटींग
प्रायव्हेट लिमिटेड, 4, सुयश अपार्टमेंट, कस्तुरबा मार्केटसमोर,
चंडक बगीचा, बुधवार पेठ, सोलापूर.
4. अमृता राजकुमार शहा, वर्धमान कार्डस मार्केटींग
प्रायव्हेट लिमिटेड, 4, सुयश अपार्टमेंट, कस्तुरबा मार्केटसमोर,
चंडक बगीचा, बुधवार पेठ, सोलापूर.
5. स्नेहल सुरेश चित्रगार, राखी अपार्टमेंट, दमाणी नगर, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : विनोद पी. सुरवसे
विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचेतर्फे विधिज्ञ : एस.व्ही. न्हावकर
विरुध्द पक्ष क्र.5 यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस. देशपांडे
आदेश
सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, विरुध्द पक्ष यांनी चालू केलेल्या समृध्द ठेव योजनेमध्ये त्यांनी दि.7/4/2008 रोजी रु.1,00,000/- गुंतविले असून ठेवीची मुदत दि.7/4/2009 रोजी संपते. ठेवीकरिता द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दर देय असून ठेव पावतीचा क्रमांक 1054 आहे. तक्रारदार यांना उपरोक्त रकमेची गरज असल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याकडे मागणी केली असता व मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांना रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन ठेव रक्कम द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचासमोर हजर झाले. त्यांना उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कैफियतीशिवाय तक्रार चालविण्याचा आदेश करण्यात आला.
3. विरुध्द पक्ष क्र.5 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा व विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांचा कसलाही संबंध नाही. त्या केवळ वैभव कार्डस या दुकानात कामास होत्या. त्या विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे नोकरीस नव्हत्या व नाहीत. त्यांच्या विरुध्द विनाकारण तक्रार केल्यामुळे त्यांचे नांव वगळण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.5 यांचे म्हणणे व रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच तक्रारदार यांच्याकरिता युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार ठेव रक्कम व्याजासह मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांच्याकडे समृध्द ठेव योजनेमध्ये दि.7/4/2008 रोजी रु.1,00,000/- गुंतविल्याचे व ठेवीची मुदत दि.7/4/2009 रोजी संपल्याचे रेकॉर्डवर दाखल ठेव पावतीचा क्रमांक 1054 वरुन निदर्शनास येते. ठेवीची मुदत संपल्यानंतर मागणी करुनही ठेव परत करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे.
6. विरुध्द पक्ष यांच्या समृध्द ठेव योजनेनुसार ठेवीचा तक्रारदार यांना ठेव रकमेवर द.सा.द.शे. 16 टक्के दराने व्याज देण्याचे कबूल केले आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे ठेवीद्वारे रक्कम गुंतवणूक करुन त्यावर व्याज मिळविण्यासाठी वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेवीची मुदत संपल्यानंतर विरुध्द पक्ष यांना वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर किंवा मुदतपूर्व त्यावरील देय व्याजासह परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर म्हणणे दाखल केले नसले तरी ठेविदारांकडून त्यांनी ठेवी स्वीकारल्याचे व ठेव रक्कम देणे बाकी असल्याचे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी मंचासमोर तोंडी कबूल केले आहे.
7. विरुध्द पक्ष क्र.5 यांच्या म्हणण्यानुसार त्या विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे नोकरीस नव्हत्या व नाहीत. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.5 या विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या कर्मचारी असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. विरुध्द पक्ष क्र.5 या तक्रारदार यांच्या गुंतवणूक केलेल्या ठेव रक्कम परत करण्याकरिता जबाबदार असल्याचे रेकॉर्डवरुन सिध्द होत नाही.
8. वरील विवेचनावरुन तक्रारदार यांना विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी ठेव रक्कम व त्यावरील व्याज परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 हे तक्रारदार यांच्या ठेव रकमा परत करण्यास संपूर्णत: जबाबदार ठरतात. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) दि.7/4/2008 पासून द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷)
अध्यक्ष
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/26710)
|
[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER |