Maharashtra

Solapur

CC/10/491

Prasad Gurunath Nafade R/o C.107 casal Apt.69 railway line,Near Mahapour bangla,Solapur.1 - Complainant(s)

Versus

1)United Constraction co.110/1,Modikhana, Near yatiraj Hotel Solapur2)Anivardha Pandarnath Ghordare - Opp.Party(s)

Palnde

04 Jan 2014

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum, Solapur.
Behind District Treasury Office, Solapur.
 
Complaint Case No. CC/10/491
 
1. Prasad Gurunath Nafade R/o C.107 casal Apt.69 railway line,Near Mahapour bangla,Solapur.1
R/o C.107 casal Apt.69 railway line,Near Mahapour bangla,Solapur.1
Solapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1)United Constraction co.110/1,Modikhana, Near yatiraj Hotel Solapur2)Anivardha Pandarnath Ghordare,118A Aasara HOS,Hotgi Rd,Solapur.3)Rajesing Devisingh Dodmani,Geet vardhavan park,Hotgi Rd,Solapur.
1)United Constraction co.110/1,Modikhana, Near yatiraj Hotel Solapur2)Anivardha Pandarnath Ghordare,118A Aasara HOS,Hotgi Rd,Solapur.3)Rajesing Devisingh Dodmani,Geet vardhavan park,Hotgi Rd,Solapur.
Solapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan PRESIDING MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 


 

ग्राहक तक्रार क्रमांक : 491/2010.

तक्रार दाखल दिनांक : 12/08/2010.

                                                           तक्रार आदेश दिनांक : 04/01/2014.                               निकाल कालावधी: 03 वर्षे 04 महिने 23 दिवस 

 

 


 

प्रसाद गुरुनाथ नाफडे, वय 44 वर्षे, व्‍यवसाय : कर सल्‍लागार व

प्रमाणित लेखापरीक्षक, रा. सी-107, कॅसल अपार्टमेंट, 69,

रेल्‍वे लाईन्‍स, महापौर बंगल्‍यासमोर, सोलापूर – 413 001.               तक्रारदार  

                   विरुध्‍द                          

 

(1) मे. युनायटेड कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी, 110/1, मोदीखाना, यतीराज

    हॉटेलजवळ, सोलापूर 413 001. भागीदार :-

(2) अनिरुध्‍द पंढरीनाथ घोगरदरे, वय 43 वर्षे, व्‍यवसाय : व्‍यापार,

    118/अ, आसरा हौसिंग सोसायटी, होटगी रोड, सोलापूर-413003.

(3) राजेसिंग देवीसिंग दोडमनी, वय 43 वर्षे, व्‍यवसाय : व्‍यापार,

    फ्लॅट नं. जी-1, वृंदावन पार्क, होटगी रोड, सोलापूर-413003.

(4) अनिल मल्‍लेशप्‍पा गोरे, वय 43 वर्षे, व्‍यवसाय : व्‍यापार,

    फ/17, वृंदावन पार्क, होटगी रोड, सोलापूर-413003.             विरुध्‍द पक्ष

 

                        गणपुर्ती  :-   श्री. दिनेश रा. महाजन, अध्‍यक्ष

                        सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्‍य 

 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  श्री. वि.ह. पाळंदे

                   विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. म.ध. बिराजदार

विरुध्‍द पक्ष क्र.4 यांचेतर्फे विधिज्ञ : एस.के. शेळगीकर

 

आदेश

 

सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्‍य यांचे द्वारा :-

 

1.    प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की, सिटी सर्व्‍हे नं.8328/अ या मिळकतीमधील सी-107, पहिला माळा, क्षेत्रफळ 51.07 चौ.मी. ही मिळकत तक्रारदार व सौ. प्रिती आनंद आठल्‍ये यांनी खरेदी घेतली आहे. त्‍याकरिता विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचे भागीदार नात्‍याने अग्रीमेंट करुन दिलेले आहे आणि कराराप्रमाणे मिळकतीची रु.9,00,000/- विक्री किंमत आहे. कराराप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी जानेवारी 2008 पर्यंत सर्व सोईयुक्‍त फ्लॅटचा ताबा देण्‍याचा होता. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांना नियमाप्रमाणे रक्‍कम अदा केली आहे. तक्रारदार यांनी एप्रिल/मे 2007 मध्‍ये बँक ऑफ इंडिया यांच्‍याकडून कर्ज घेतले असून तेव्‍हापासून त्‍यांना व्‍याज भरावे लागत आहे. दि.13/8/2008 रोजी खरेदीखतासह जागेचा कब्‍जा देण्‍यात आला आहे. विरुध्‍द पक्ष व तक्रारदार यांच्‍यामध्‍ये दि.23/1/2007 रोजी अतिरिक्‍त कामाबाबत नोटरीद्वारे करारपत्र करुन दिले असून त्‍याकरिता रु.2,45,950/- द्यावयाचे होते. त्‍या करारपत्रास नोंदणीकृत दस्‍तऐवजाचा दर्जा नसल्‍यामुळे तो दस्‍त रद्द करुन त्‍यातील रक्‍कम मुळ खरेदीखतात नमूद करण्‍याचे ठरविले आणि खरेदीखताचा दस्‍त रु.11,50,000/- प्रमाणे करण्‍यात आला. दस्‍तामध्‍ये रु.52,000/- स्‍टॅम्‍प डयुटीसह रु.12,02,000/- अदा केल्‍याचे नमूद आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सन 2006 मध्‍ये रोख रु.1,52,000/- स्‍वीकारलेले असताना ते साठेखतामध्‍ये नमूद केले नाहीत. तसेच दि.25/6/2006 व 28/9/2006 रोजी रु.1,00,000/- रोख स्‍वीकारले असताना त्‍याची कच्‍ची पावती देण्‍यात आली. प्रस्‍तुत रक्‍कम खरेदीखतामध्‍ये नोंदविण्‍याबाबत विनंती करुनही दुर्लक्ष केले आणि खरेदीखत करुन न घेतल्‍यास जागेचा कब्‍जा व खरेदीखत न करुन देण्‍याची धमकी दिली. त्‍यामुळे तक्रारदार यांनी खरेदीखत व कब्‍जा घेतला आहे. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांच्‍या बांधकामाबाबत खालीलप्रमाणे त्रुटी ठेवल्‍या आहेत.

 

      (1) दि.23/1/2008 रोजी फ्लॅटचा कब्‍जा देण्‍याऐवजी दि.13/8/2008 रोजी कब्‍जा दिल्‍यामुळे तक्रारदार यांना मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

      (2) बेडरुममध्‍ये सुरक्षीततेकरिता ग्रील लावले नाही. तसेच पश्चिमेकडून भिंतीऐवजी अल्‍युमिनियम सेक्‍शन पार्टीशन लावल्‍यामुळे खडखड आवाज येतो.

      (3) ‘सी’ बिल्‍डींगमध्‍ये तक्रारदार यांना चारचाकी वाहनाकरिता सोय उपलब्‍ध करुन दिली नाही.

      (4) बाथरुममधून पार्कींगमध्‍ये पाण्‍याची गळती होत आहे.

      (5) स्‍वंयपाक घरातील सिंक व टाईल्‍सचे काम अपूर्ण आहे.

      (6) दरवाजे व फ्रेम योग्‍य पध्‍दतीने बसविल्‍या नाहीत आणि काही दरवाजांना वाळवीचा प्रादुर्भाव झाला आहे.

      (7) दरवाजे चांगल्‍या व योग्‍य गुणवत्‍तेचे, तसेच योग्‍य पध्‍दतीने बसविले नाहीत.

      (8) किचन कट्टा, बाथरुम व संडास यामधील कामे अपूर्ण आहेत.

      (9) घराचे रंगकाम अपूर्ण आहे.

      (10) ‘सी’ बिल्‍डींगच्‍या लिफ्टकरिता बॅटरी बॅक-अपची सोय केलेली नाही.

      (11) खिडक्‍या, बाथरुम व संडासचे काम सदोष झाले आहे. बेसीनची फिटींग आयोग्‍य झाली आहे. संडासचे भांडे दुय्यम दर्जाचे व अयोग्‍य पध्‍दतीने बसविलते आहे.

      (12) पार्किंगमधील नामनिर्देशक फलकावर तक्रारदार यांचे नांव लिहिले नाही.

      (13) ‘सी’ बिल्‍डींगच्‍या जिन्‍यातील फरशीचे पॉलीश केलेले नाही.

      (14) मुख्‍य दरवाजा दुय्यम दर्जाचा असून त्‍यामध्‍ये फट शिल्‍लक आहे.

 

2.    तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीमध्‍ये पुढे असे नमूद केले आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी उपरोक्‍त त्रुटी ठेवल्‍यामुळे सेवेमध्‍ये त्रुटी केली आहे आणि दि.23/1/2007 रोजीच्‍या कराराप्रमाणे संपूर्ण कामे करुन देण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष यांचेवर आहे. विरुध्‍द पक्ष यांनी फ्लॅटचा ताबा देण्‍यास विलंब केल्‍यामुळे तक्रारदार यांना रु.18,200/- घरभाडे खर्च व बँक व्‍याजाकरिता रु.56,944/- व्‍याज द्यावे लागले. प्रस्‍तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांनी अतिरिक्‍त घेतलेली रक्‍कम रु.1,00,000/-, घरभाडे रु.18,200/-, बँक व्‍याज रु.56,944/- व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.12,000/- असे एकूण रु.1,87,144/- व्‍याजासह मिळावेत आणि उपरोक्‍त नमूद त्रुटी स्‍वखर्चाने दुरुस्‍त करण्‍याबाबत विरुध्‍द पक्ष यांना आदेश करण्‍यात यावेत, अशी विनंती केली आहे. तसेच दि.23/1/2007 च्‍या कराराप्रमाणे अतिरिक्‍त कामे विरुध्‍द पक्ष यांनी स्‍वखर्चाने करण्‍यासह तक्रार खर्च रु.500/- देण्‍याचा आदेश करावा, अशी विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी अभिलेखावर लेखी म्‍हणणे दाखल केले असून तक्रारीतील मजकूर अमान्‍य केला आहे. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे तक्रारदार व त्‍यांच्‍यामध्‍ये सदनिकेची किंमत रु.11,50,000/- निश्चित केली होती. त्‍या रकमेवर स्‍टॅम्‍प डयुटी जास्‍त लागणार होती आणि रु.2,50,000/- अतिरिक्‍त कामाचे दर्शविल्‍यास त्‍यावर स्‍टॅम्‍प डयुटी द्यावी लागणार नसल्‍याने व तक्रारदार यांना फायदा होणार असल्‍यामुळे रु.9,00,000/- चे साठेखत नोंदवून अतिरिक्‍त कामाकरिता रु.2,50,000/- चा नोटरी पब्‍लीक यांचेसमोर कराराचा दस्‍त करण्‍यात आला. त्‍यानंतर तक्रारदार यांनी अतिरिक्‍त कामाचा दि.23/1/2007 रोजी केलेले करारपत्र दि.12/8/2008 रोजीच्‍या करारपत्राद्वारे रद्द केले. विरुध्‍द पक्ष यांनी पुढे असे नमूद केले आहे की, त्‍यांनी केलेले बांधकाम हे शास्‍त्रास अनुसरुन व दर्जेदार साहित्‍य वापरुन केले आहे. त्‍यांनी तक्रारदार यांच्‍याकडून ठरलेल्‍या किंमतीपेक्षा जास्‍त रक्‍कम घेतलेली नाही. त्‍यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नव्‍हते व नाही. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

4.    विरुध्‍द पक्ष क्र.4 यांनी अभिलेखावर लेखी म्‍हणणे दाखल केले असून तक्रारीतील मजकूर अमान्‍य केला आहे. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे ते दि.31/3/2007 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 भागीदारी फर्ममधून निवृत्‍त झाले आहेत आणि त्‍यांचा भागीदारी फर्मबाबत कोणताही हक्‍क, हितसंबंध, जबाबदारी, येणे-देणे अस्तित्‍वात राहिलेले नाही. विरुध्‍द पक्ष क्र.4 हे तक्रार-अर्जामध्‍ये ‘विरुध्‍द पक्षकार’ होऊ शकत नाहीत. त्‍यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या  सेवेमध्‍ये त्रुटी केलेली नाही. त्‍यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

 

5.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी म्‍हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, तसेच तक्रारदार व विरुध्‍द पक्ष क्र.4 यांच्‍या लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले असता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                    उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                                होय.

2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?          होय.

3. काय आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

6.    मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रामुख्‍याने, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून सिटी सर्व्‍हे नं.8328/अ या मिळकतीमधील सी-107, पहिला माळा, क्षेत्रफळ 51.07 चौ.मी. ही मिळकत रु.9,00,000/- मोबदला देऊन खरेदी करण्‍यासाठी दि.23/1/2007 रोजी साठेखत केल्‍याविषयी उभय पक्षकारांमध्‍ये विवाद नाही. त्‍याच दिवशी म्‍हणजे दि.23/1/2007 रोजी नमूद फ्लॅटबाबत करावयाच्‍या अतिरिक्‍त कामाबाबत उभय पक्षकारांमध्‍ये नोटरीद्वारे करारपत्र करण्‍यात आले आणि त्‍या कामाकरिता तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांना रु.2,45,950/- द्यावयाचे होते. त्‍यानंतर उभय पक्षकारांनी दि.12/8/2008 रोजी नोटरीद्वारे अतिरिक्‍त कामाबाबत केलेला दि.23/1/2007 रोजीचे करारापत्र रद्द करुन घेतले आहे. त्‍यानंतर उभय पक्षकारांमध्‍ये विवादीत मिळकतीचा नोंदणीकृत खरेदीखत दस्‍त नोंदविण्‍यात आला असून त्‍याप्रमाणे फ्लॅटची किंमत रु.11,50,000/- निश्चित करण्‍यात आल्‍याचे व ती विरुध्‍द पक्ष यांना प्राप्‍त झाल्‍याचे निदर्शनास येते.

 

7.    तक्रारदार व विरुध्‍द पक्ष यांनी विवादीत मिळकतीबाबत दुय्यम निबंधक, सोलापूर उत्‍तर यांचेसमोर नोंदलेल्‍या खरेदी दस्‍ताचे अवलोकन करता, क्‍लॉज नं. 5 खालीलप्रमाणे नमूद केलेला आहे.

 

      5. By this deed of conveyance, the vendors have particularly vendor No.2 has sold to the purchaser the Flat No.107 on First floor, in Bldg. C, admeasuring 51.07 Sq. Mtrs. In bult-up area as shwon in clause of the declaration on the following terms and conditions

 

            A) The purchaser has paid and the vendor No.2 has received a consideration of this conveyance of Rs.11,50,000/- as stated hereinabove. Initially the cost of the said flat agreed was Rs.900,000/- & accordingly the agreement to sale was executed of the said cost on dt. 23/1/2007. But due to delay in payment of consideration cost by purchaser to vendors and increased material cost, both the purchaser and vendors accepts & agreed to increase in cost of the flat by Rs.2,50,000/- and therefore after complete acceptance of the such increased cost of the said flat by purchaser, the vendors are executring this deed of sale by paying the difference of stamp duty by the purchaser. The purchaser accepts that he has absolutely have no claim over such increase in the cost of flat.

 

8.    तसेच दि.12/8/2008 रोजी नोटरीद्वारे अतिरिक्‍त कामाबाबत रद्द केलेल्‍या करारपत्रामध्‍ये खालीलप्रमाणे मजकूर नमूद आहे.

 

            Out of the above total cost the party of the second part could not able to arrange the said extra item payment and decided not to execute the said extra items as mentioned above & informed to the party of the first part herein before only.

            So, by this cancellation deed the party of the second part agrees & declare that he has no claim over the said extra items as he has not paid any consideration towards the said extra items.

            The party of the second part agrees that he has no dues towards the said extra items from the party of the first part.

 

9.    तक्रारदार व विरुध्‍द पक्ष यांनी अतिरिक्‍त कामाबाबत एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्‍यारोप पाहता, अतिरिक्‍त कामाबाबत व फ्लॅटच्‍या किंमतीबाबत उभय पक्षकारांनी त्‍या-त्‍या वेळी आवश्‍यकतेनुसार करारपत्र केलेले आहेत. त्‍या करारपत्राबाबत किंवा खरेदीखताबाबत त्‍यांच्‍यामध्‍ये विवाद नाही. खरेदीखत व नोटरीद्वारे रद्द करण्‍यात आलेला दस्‍त पाहता, अतिरिक्‍त कामे करण्‍यात तक्रारदार यांनी रद्द केलेले आहे आणि फ्लॅटची किंमत रु.9,00,000/- ऐवजी रु.11,50,000/- केलेली आहे, हे स्‍पष्‍टपहणे निदर्शनास येते. करारातील मजकूर किंवा अटी व शर्ती उभय पक्षकारांनी मान्‍य केलेल्‍या असून त्‍यावेळी त्‍यांची कोणतीही हरकत किंवा आक्षेप नव्‍हता. तक्रारदार हे स्‍वत: कर सल्‍लागार व प्रमाणित लेखा परीक्षक आहेत. लेखी करारपत्रानुसार अतिरिक्‍त कामे करणे किंवा रद्द करणे आणि फ्लॅटची किंमत निश्चित करणे, अशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी खरेदीखतामध्‍ये सोईनुसार मजकूर नमूद केल्‍याचे तक्रारदार यांचे कथन मान्‍य करता येणार नाही. तक्रारदार यांनी दि.23/1/2007 रोजीच्‍या करारपत्रानुसार अतिरिक्‍त कामे करुन देण्‍याची केलेली मागणी संयुक्तिक व उचित ठरत नाही आणि त्‍या मर्यादेत विरुध्द पक्ष यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी असल्‍याचे सिध्‍द होत नाही.

 

10.   विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना खरेदीखताचे वेळेस जास्‍तीचे घेतलेले रु.1,00,000/- परत केलेले नाहीत, अशी तक्रार केलेली आहे. वास्‍तविक पाहता, खरेदीखतामध्‍ये तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांना फ्लॅटचा मोबदला कशाप्रकारे दिला  आहे ? याचे पूर्ण स्‍पष्‍टीकरण नमूद केलेले आहे. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांना फ.12,02,000/- रक्‍कम प्राप्‍त झालेली असली तरी त्‍यामध्‍ये स्‍टॅम्‍प डयुटी व रजिस्‍ट्रेशन फी अंतभूत असल्‍याचे नमूद केलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍याकडून रु.1,00,000/- रक्‍कम विरुध्‍द पक्ष यांनी अतिरिक्‍त स्‍वीकारल्‍याचे निदर्शनास येत नाही; किंबहुना तक्रारदार यांनी कागदोपत्री सिध्‍द केलेले नाही.

 

11.   विरुध्‍द पक्ष व तक्रारदार यांच्‍यामध्‍ये दि.23/1/2007 रोजी साठेखत होऊन 12 महिन्‍याचे आत खरेदीखत करुन देण्‍याचे निश्चित झाल्‍याचे निदर्शनास येते. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना दि.13/8/2008 रोजी फ्लॅटचे खरेदीखत करुन ताबा दिलेला आहे. नमूद कालावधीमध्‍ये फ्लॅटचा ताबा न देऊन विरुध्‍द पक्ष यांनी सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे मान्‍य करावे लागते. तक्रारदार हे किरायाचे घरामध्‍ये राहत असल्‍यामुळे त्‍यांना नमूद कालावधीकरिता घरभाडे भरावे लागलेले आहे. त्‍याकरिता तक्रारदार यांनी रु.18,200/- प्रमाणे मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी रु.2,200/- किराया देत असल्‍याबाबत कागदपत्रे दाखल केलेली असल्‍यामुळे 8 महिन्‍याच्‍या कालावधीचे रु.17,600/- नुकसान भरपाई मिळविण्‍यास तक्रारदार पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत.

 

12.   तक्रारदार यांनी बँकेचे व्‍याज विनाकारण भरावे लागल्‍यामुळे रु.56,944/- ची मागणी केलेली आहे. वास्‍तविक पाहता, तक्रारदार यांना कोणत्‍या कारणामुळे व कशाप्रकारे बँकेचे व्‍याज अतिरिक्‍त रु.56,944/- भरावे लागले, याचे उचित स्‍पष्‍टीकरण व कागदोपत्री पुरावे अभिलेखावर दाखल केलेले नाहीत. अभिलेखावर दाखल कागदपत्रावरुन तक्रारदार यांना बँकेचे रु.56,944/- अतिरिक्‍त भरणा करावे लागल्‍याचे सिध्‍द होत नसल्‍यामुळे त्‍यांची मागणी मान्‍य करता येणार नाही.

 

13.   तक्रारदार यांनी दि.19/11/2013 रोजी दत्‍तात्रय तुकाराम पारेकर, स्‍थापत्‍य अभियंता यांचा परीक्षण अहवाल दाखल केलेला आहे. त्‍यामध्‍ये बाथरुम, किचनकट्टा, दरवाजे, रंगकाम, फरशी, खिडक्‍या इ. बाबत त्रुटी असल्‍याचे नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी दि.13/8/2008 रोजी फ्लॅटचा ताबा घेतलेला आहे आणि फ्लॅटमध्‍ये तथाकथित त्रुटीबाबत दि.19/11/2013 रोजी केलेला अहवाल दाखल आहे. निर्विवादपणे, तथाकथित त्रुटीबाबत 5 वर्षानंतर अहवाल घेण्‍यात आला आहे. असे असले तरी, तक्रारदार यांनी तक्रार दाखल करताना प्रस्‍तुत त्रुटी नमूद केलेल्‍या आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी प्रस्‍तुत निरीक्षण अहवालाचे खंडन केलेले नाही. त्‍यामुळे तो अहवाल मान्‍य करणे उचित वाटते. स्‍थापत्‍या अभियंत्‍याने नमूद त्रुटीचे निराकरण करण्‍यासाठी येणा-या खर्चाचे मुल्‍यांकन केलेले नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुत त्रुटीचे निराकरण करण्‍यासाठी येणारा खर्च नुकसान भरपाई स्‍वरुपात विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावा, या निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत. योग्‍य विचाराअंती विरुध्‍द पक्ष यांनी प्रस्‍तुत नुकसान भरपाईकरिता रु.50,000/- द्यावेत, या मतास आम्‍ही आलो आहोत.

 

14.   विरुध्‍द पक्ष क्र.4 यांच्‍या कथनाप्रमाणे ते दि.31/3/2007 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 भागीदारी फर्ममधून निवृत्‍त झाल्‍यामुळे त्‍यांचा भागीदारी फर्मबाबत कोणताही हक्‍क, हितसंबंध, जबाबदारी, येणे-देणे अस्तित्‍वात राहिले नसल्‍याचे नमूद केले आहे. त्‍यांनी प्रस्‍तुत कथनापृष्‍ठयर्थ नोंदणीकृत निवृत्‍ती दस्‍त अभिलेखावर दाखल केलेला आहे. त्‍यामुळे  विरुध्‍द पक्ष क्र.4 यांच्‍याविरुध्‍द कोणतेही आदेश करणे संयुक्तिक ठरणार नाही. अंतिमत: विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी असल्‍याचे सिध्‍द होत असल्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

 

15.   शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

    

(1) विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना घरभाड्याकरिता रु.17,600/-  व फ्लॅटमधील त्रुटीकरिता रु.50,000/- नुकसान भरपाई द्यावी.

       (2) विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत.

      (3) विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्‍तीपासून तीस करावी.  

(4) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्‍क द्यावी.

 

                                                                              

(सौ. विद्युलता जे. दलभंजन)                              (श्री. दिनेश रा. महाजन÷)

       सदस्‍य                                              अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

 
 
[HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan]
PRESIDING MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.